About Us
Dedicated to Excellence
♦️डॉ. माघाडे के. एस.
- MBBS, MS. (General Surgeon) मद्रास मेडीकल कॉलेज, चेन्नई
- पोटाचे विकार, मुळव्याध व कर्करोग तज्ञ
♦️डॉ. नंदकिशोर सारंग (मानद)
- MBBS, DNB (Med.)
- हृदयरोग तज्ञ व मधुमेह तज्ञ
उपलब्ध सुविधा -
- सर्जिकल (ICU) अतिदक्षता विभाग
- Ventilator ची सुविधा
- कार्डियाक मॉनिटर
- ईसीजी
- डीफ्रीब्रीलेटर, सेंट्रल ऑक्सीजन व्यवस्था
- ब्रेस्ट कॅन्सर चाचणी (स्क्रिनींग) केंद्र
- सुसज्ज ऑपरेशन थिएटर
- पॅथॉलॉजी सर्व रक्त तपासणी
खालील आजारांवर उपचार उपलब्ध :
शस्त्रक्रिया विभाग -
- सर्व प्रकारचे जनरल सर्जीकल ऑपरेशन्स अपेंडिक्स, हर्नीया, आतड्यांचे (पोटाचे), थायरॉईड इत्यादी.
- लहान मुलांचे जनरल सर्जीकल ऑपरेशन्स.
- ब्रेस्ट, गर्भ पिशवी, अंडाशय, आतडे (पोटाचे) व नाक, कान, घसा इ. कॅन्सरचे ऑपरेशन्स, सल्ला व किमोथेरपी.
- शरिरातील सर्व प्रकारच्या गाठीचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया
- लहान/मोठ्या आतडीची दुर्बिणीद्वारे तपासणी (एंडोस्कोपी)
- अपेंडिक्स व पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया
मेडीसीन विभाग -
- हदय विकार व मधुमेह विकार
- छाती विकार-दमा व टिबी / क्षयरोग
- अर्धांगवायु, आमवात, श्वसनाच्या आजारांवर उपचार
- सर्पदंश, विषबाधा व इतर आजारांवर विशेष उपचार
Products/Services
अपेंडिक्स वर उपचार
अपेंडिक्स हा लहान, नळीसारखा अवयव आहे, जो लहान आतड्याच्या शेवटी जोडलेला असतो. तो पचन प्रक्रियेत थेट उपयोगी नसतो.
कारणे :
- अपेंडिक्समध्ये अडथळा होणे (जसे की स्टूल, परजीवी किंवा ट्यूमर)
- बॅक्टेरियल संसर्ग
- जास्त प्रमाणात जंतुसंसर्ग
लक्षणे :
- पोटाच्या उजव्या खालच्या भागात तीव्र वेदना
- ताप येणे
- उलट्या किंवा मळमळ
- भूक मंदावणे
- पोट फुगणे किंवा मऊ वाटणे
उपचार: अपेंडिक्सच्या उपचारांमध्ये त्वरित शस्त्रक्रिया (अपेंडिसेक्टॉमी) केली जाते. काही प्रकरणांमध्ये लवकर निदान झाल्यास औषधोपचाराचा वापर केला जातो.

हार्नियावर उपचार
हार्निया ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये एखादे अंतर्गत अवयव किंवा त्याच्या आसपासची स्नायू किंवा ऊती कमजोर होऊन ते बाहेरच्या भागात फुगतात.
कारणे :
- स्नायूंची कमजोरी
- जड वस्तू उचलणे
- वारंवार खोकला
- अपचन किंवा पोट साफ न होणे
लक्षणे :
- फुगलेला भाग दिसणे
- वेदना किंवा अस्वस्थता
- जड वस्तू उचलताना त्रास
- फुगलेल्या भागावर दबाव दिल्यास हलका दुखणे
उपचार : हार्नियासाठी मुख्यतः शस्त्रक्रिया केली जाते (ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक). गंभीर प्रकरणांमध्ये त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.

थायरॉईड संबंधित आजार
थायरॉईड ही मानेला समोरच्या बाजूस असलेला ग्रंथी आहे, जी हार्मोन्स तयार करून शरीराच्या चयापचय (मेटाबॉलिझम) नियंत्रित करते.
कारणे :
- आयोडीनची कमतरता
- ऑटोइम्यून विकार (जसे की हाशिमोटो रोग किंवा ग्रेव्ह्स डिसीज)
- आनुवंशिक कारणे
- हार्मोन्सचे असंतुलन
- थायरॉईड ग्रंथीवर सूज किंवा ट्यूमर
लक्षणे :
- वजन वाढणे किंवा कमी होणे
- थकवा व अशक्तपणा
- केस गळणे
- त्वचा कोरडी पडणे
- चिडचिड किंवा ताण जाणवणे
- हृदयाचे ठोके वेगाने होणे किंवा मंदावणे
उपचार : थायरॉईडच्या उपचारांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या प्रमाणानुसार औषधे दिली जातात (हायपोथायरॉईडसाठी थायरॉक्सिन, हायपरथायरॉईडसाठी अँटी-थायरॉईड औषधे). काही प्रकरणांमध्ये रेडिओआयोडीन थेरपी किंवा शस्त्रक्रिया केली जाते.

बाल शस्त्रक्रिया
बाल शस्त्रक्रिया म्हणजे नवजात शिशू, लहान मुले किंवा किशोरवयीन मुलांवर करण्यात येणाऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया होय. या शस्त्रक्रियांमध्ये टॉन्सिल काढणे, अपेंडिक्स शस्त्रक्रिया यासारख्या सामान्य शस्त्रक्रियांपासून हृदय शस्त्रक्रिया, ट्यूमर काढणे यासारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंतचा समावेश असतो. मुलांच्या वयाचे, शारीरिक विकासाचे आणि आरोग्याचे विशेष लक्ष घेत ही शस्त्रक्रिया केली जाते. योग्य निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा वापर करून या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या जातात, ज्यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते.

लहान/मोठ्या आतडीची दुर्बिणीद्वारे तपासणी
एंडोस्कोपी ही वैद्यकीय प्रक्रिया असून, विशेष प्रकारच्या लवचिक ट्यूबमध्ये कॅमेरा बसवून लहान व मोठ्या आतड्यांची तपासणी केली जाते. यामध्ये आतड्यांच्या आतील स्थिती, अल्सर, सूज, ट्यूमर किंवा रक्तस्रावासारख्या समस्यांचे निदान केले जाते. ही प्रक्रिया वेदनारहित असून, योग्य उपचारांची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही तपासणी केली जाते.

पोटाचा कॅन्सर - Stomach cancer
पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते.
लक्षणे : पोटातील कॅन्सरची लक्षणे ही अनेकदा सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावरचं अधिक जाणवतात.
- पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे,
- भुक कमी होणे,
- अपचनाच्या तक्रारी उद्भवणे,
- जेवणानंतर अस्वस्थ वाटणे,
- मळमळ किंवा उलटी होणे,
- उलटीमध्ये रक्त आढळणे,
- शौचामधून रक्त पडणे,
- वजन कमी होणे,
- अशक्तपणा जाणविणे,

तोंडाचा कर्करोग – Oral cancer
आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.
लक्षणे :
- तोंडात जखमा व सूज येऊन वेदना होऊ लागतात.
- तोंडातून रक्तस्राव होणे.
- तोंड उघडण्यास त्रास होऊ लागतो.
- बोलताना किंवा अन्न गिळताना, अन्न चावण्यास त्रास होऊ लागतो.
- अशक्तपणा, वजन कमी होते.

स्तनाचा कर्करोग - Breast cancer
स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.
लक्षणे : स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.
- स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
- अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
- बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
- स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

गर्भाशय मुखाचा कॅन्सर - Cervical cancer
स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या कॅन्सरच्या यादीमध्ये याचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.
लक्षणे :
- योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे.
- गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
- लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
- रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
- याशिवाय भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack
हार्ट अटॅक का व कशामुळे येतो..?
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.
लक्षणे :
- छातीत दडपल्यासारखे वाटते,
- छातीत दुखायला लागते,
- छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
- बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
- अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
- अशक्तपणा जाणवणे,
- उलटी किंवा मळमळ होणे,
- चक्कर येणे,
- दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
- श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

मधुमेह – Diabetes mellitus
स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.
लक्षणे :
- वारंवार लघवीला जावे लागणे,
- वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
- अचानकपणे वजन घटणे,
- अशक्तपणा, चक्कर येणे,
- अधिक भूक लागणे,
- हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
- डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
- मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
- जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
- मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

क्षयरोग – Tuberculosis
क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.
लक्षणे :
- तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
- बेडकायुक्त खोकला येणे,
- थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
- खोकताना छातीत दुखणे,
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- अशक्तपणा,
- भूक व वजन कमी होणे,
- रात्री झोपल्यावर घाम येणे,
- सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

आमवात – Rheumatoid arthritis
आमवात हा एक रोग प्रतिकारशक्ती संबंधित आजार (ऑटोइम्यून डिसीज) असून यात सांध्यांमध्ये सूज व अतिशय वेदना होत असतात. आमवात हा आर्थराइटिसचा एक प्रकार असून याला ‘रुमेटाइड आर्थराइटिस’ या नावानेही ओळखले जाते.
लक्षणे :
- सांध्यांमध्ये सूज येणे,
- सूज आलेल्या ठिकाणचे सांधे लालसर होणे,
- सांध्यांच्या ठिकाणी अतिशय वेदना होणे,
- सांध्यांच्या ठिकाणी सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे.
- सांधे जखडणे,
- सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटणे,
- सांध्यांची हालचाल करणे अवघड होणे अशी प्रमुख लक्षणे आमवातमध्ये असतात.

दमा – Asthma
दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.
लक्षणे :
- खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
- खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
- श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
- दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

Gallery




