About Us
चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी, हिस्ट्रोपॅथॉलॉजी व एफ.एन.ए.सी. सेंटर
"आपले आरोग्य – आमची जबाबदारी."
Ph: 02462-241198, 234284
चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी, हिस्ट्रोपॅथॉलॉजी व एफ.एन.ए.सी. सेंटर, नांदेड
तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल हे स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण, श्वसनविकार व पॅथॉलॉजी सेवा देणारे एक अत्याधुनिक केंद्र आहे. आमच्या स्त्रीरोग विभागात वंध्यत्व निवारण व समुपदेशन, IUI, IVF, ICSI, सरोगसी, लेझर हॅचिंग, PGD/PGS टेस्टिंग, एम्ब्रियो व एग डोनेशन, स्पर्म बँकिंग व ब्लास्टोसिस्ट कल्चर अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
पल्मोनोलॉजी विभागात दुर्बीणद्वारे फुफ्फुस तपासणी (ब्रॉन्कोस्कोपी, थोरॅकोस्कोपी), PFT, एक्स-रे, ईसीजी, ॲलर्जी तपासणी, क्षयरोग, दमा व एड्स निदान-उपचार, स्लीप स्टडी, लंग बायोप्सी व 6 मिनिट वॉक टेस्ट या सेवा दिल्या जातात.
आमच्या पॅथॉलॉजी व हिस्टोपॅथॉलॉजी विभागात अचूक निदानासाठी अत्याधुनिक यंत्रणा व तज्ज्ञांचा संघ कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कुशल डॉक्टर व समर्पित सेवा यामुळे आमचे हॉस्पिटल रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी नांदेडमधील एक विश्वासार्ह नाव ठरले आहे.
स्त्रीरोग विभाग -
- वंधत्व निवारण आणि समुपदेशन
- IUI (आय.यु.आय.)
- IVF
- ICSI (Intracy toplaomic Sperm injectron)
- सरोगसी
- लेझर हॅचींग
- PGD/PGS Testing
- Embryo Donation
- Egg Donation
- Sperm Banking
- Blastocyst Culture
पल्मोनोलॉजी (श्वसनविकार) विभाग -
- दुर्बीणद्वारे फुफ्फुसाची तपासणी (Bronchoscopy & Thoracoscopy)
- कॉम्प्युटरद्वारे फुफ्फुसाची तपासणी (PFT)
- एक्सरे /इसीजी/ॲलर्जी टेस्ट
- क्षयरोग निदान व उपचार केंद्र
- अस्थमा (दमा) निदान व उपचार केंद्र
- एड्स निदान उपचार व मार्गदर्शन केंद्र
- झोपेमध्ये घोरणे ह्यावर उपचार व मार्गदर्शन केंद्र (Sleep Study)
- लंग बायोप्सी
- अतिदक्षता विभाग
- 6 मिनट वॉक टेस्ट
पॅथॉलॉजी विभाग -
- बायोप्सी व हिस्टोपॅथॉलॉजी
- सुईद्वारे गाठीची तपासणी (F.N.A.C.)
- पॅप स्मीयर तपासणी आणि L.B.C. (Liquid based cytology)
- फ्लुईड सायटॉलॉजी (पाण्याची तपासणी)
- Fertility markers/Thyroid Test/Vit. B12/ Vit.D/ PSA etc. by Beckman Coulter instrument.
- रक्ताची तपासणी CBC & Biochemistry
- क्लिनिकल पॅथॉलॉजी - मूत्र तपासणी
- संपूर्ण शरीर आरोग्य पॅकेजेस.
Asha pathology laboratory health packages available:
- Basic health pakage
- Advance health pakage
- Premium health pakage
Products/Services
तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी व हिस्ट्रोपॅथॉलॉजी सेंटर
"आपले आरोग्य – आमची जबाबदारी."

तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी व हिस्ट्रोपॅथॉलॉजी सेंटर
डॉ. अनिल आर. तोष्णीवाल
- MBBS, DTCD (Pune), FCCP MICAI (Delhi) MIPHA
- दमा, क्षयरोग, छातीचेटरोग व ॲलर्जी तज्ञ

तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी व हिस्ट्रोपॅथॉलॉजी सेंटर
डॉ. सौ. शोभा अ. तोष्णीवाल
- MBBS, MD (OBGY)
- स्त्री रोग आणि प्रसूती तज्ञ

तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी व हिस्ट्रोपॅथॉलॉजी सेंटर
डॉ. भरत अ. तोष्णीवाल
- MBBS, MD, DNB (Chest Medicine)
- European Diploma in Adult Respiratory Medicine (EDARM)
- P.G. Diploma in HIV Medicine (PGDHIVM) FAPSR (Japan), FCCP (USA)
- MNAMS, Fellowship in Sleep Medicine (FSM, New Delhi) P.G. Certificate
- Course in Allergy Immunology (Banglore) Accrediated By European Academy of Allergy & Clinical Immunology (EAACI)
- दमा, क्षयरोग, ॲलर्जी, छातीच्या विकाराचे तज्ञ, आणि ब्रॉंकोस्कोपीस्ट

तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी व हिस्ट्रोपॅथॉलॉजी सेंटर
डॉ. सौ. पुजा भ. तोष्णीवाल
- MBBS, DGO, MS, DNB (OBGY)
- Fellowship in Laparoscopy & IVF
- स्त्री रोग, प्रसुती व व्यध्य निवारण तज्ञ

तोष्णीवाल चेस्ट हॉस्पिटल मॅटर्निटी & नर्सिंग होम व आशा पॅथॉलॉजी व हिस्ट्रोपॅथॉलॉजी सेंटर
डॉ. सौ. गायत्री र. तोष्णीवाल
- डॉ. सौ. गायत्री र. तोष्णीवाल
- MBBS, MD, DNB (Pathology)
- Fellowship in Cytopathology (KEM Mumbai)
- पॅथॉलॉजिस्ट

BRONCHOSCOPY (फुफ्फुसाचे दुर्बिण परिक्षण)
BRONCHOSCOPY (फुफ्फुसाचे दुर्बिण परिक्षण) : खालील फुफ्फुसांच्या आजारांचे निदान निश्चित करण्यासाठी व उपचारासाठी दुर्बिण परीक्षण करणे आवश्यक असते.
- न बसणारा खोकला व ताप
- खोकल्यामध्ये रक्त येणे
- श्वासनलिकेमध्ये काही वस्तू अटकल्यास जसे की शेंगदाणा, सुपारी, दात
- कर्करोगाचे निदान करणे
- टीबी व विविध प्रकारच्या न्यूमोनियाचे निदान

थोराकोस्कोपी (Thoracoscopy)
थोराकोस्कोपी ही फुप्फुसांच्या आसपासच्या छातीच्या पोकळीचे निरीक्षण करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये एक छोटासा छेद करून कॅमेरासह लवचिक ट्यूब टाकली जाते.
उपयोग:
- फुप्फुसांमधील गाठी, संसर्ग किंवा फुफ्फुसावरणातील विकारांचे निदान.
- छातीतील द्रव काढणे किंवा तपासणीसाठी ऊतींचे नमुने घेणे.
- फुफ्फुसांच्या काही विकारांवर उपचार करणे.

फुप्फुस कार्य चाचणी (Pulmonary Function Test - PFT)
फुप्फुस कार्य चाचणी ही फुप्फुसांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणारी चाचणी आहे. ती श्वास घेण्याची क्षमता, ऑक्सिजन-कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण, आणि श्वसनमार्गातील अडथळा ओळखण्यासाठी उपयोगी आहे.
उपयोग:
- अस्थमा, COPD, ILD यांसारख्या श्वसनविकारांचे निदान.
- उपचारांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन.
- शस्त्रक्रियेपूर्वी फुप्फुसांचे आरोग्य तपासणे.

ॲलर्जी चाचणी (Allergy Testing)
अॅलर्जी चाचणी ही विशिष्ट पदार्थांमुळे होणाऱ्या अॅलर्जी ओळखण्यासाठी केली जाणारी चाचणी आहे. यात त्वचेवर लहानसा छेद, रक्त चाचणी किंवा इतर पद्धती वापरल्या जातात.
उपयोग:
- धूळ, परागकण, अन्नपदार्थ, औषधे यांसारख्या ॲलर्जन ओळखणे.
- अलर्जीमुळे होणाऱ्या आजारांचे निदान, जसे की अस्थमा, अॅलर्जिक राइनायटिस.

पॉलीसॉमनोग्राफी (Polysomnography)
पॉलीसॉमनोग्राफी ही झोपेमध्ये येणाऱ्या समस्या आणि विकारांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येणारी चाचणी आहे. यामध्ये मेंदूची लहरी, हृदयाची गती, श्वासोच्छ्वास, स्नायूंची हालचाल आणि ऑक्सिजन पातळी मोजली जाते.
उपयोग:
- स्लीप ॲपनिया, निद्रानाश (इन्सोम्निया), नार्कोलेप्सी यांसारख्या झोपेच्या विकारांचे निदान.
- झोपेमध्ये श्वासोच्छ्वासाच्या अडथळ्यांचे मूल्यांकन.

OSCILLOMETRY / SPIROMETRY (फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेची तपासणी)
ज्याप्रमाणे ECG, 2D Echo. व्दारे हृदयाच्या आजाराचे निदान केले जाते त्याच प्रमाणे फुफ्फुसाच्या विविध आजारांचे व कार्यक्षमतेचे अचूक निदान करणे स्पायरोमेट्री किंवा ऑसीलोमेट्री व्दारे शक्य आहे.
लहान मुले किंवा वयोवृध्द व्यक्तींसाठी स्पायरोमेट्री ऐवजी ऑसीलोमेट्री तपासणी जास्त सोयीस्कर असते व ह्या दोन्ही तपासण्या एक दुसऱ्यांसाठी पूरक आहेत.
या तपासणीव्दारे फुफ्फुसाची कार्यक्षमता व आजारांची तिव्रता निश्चित करुन उपचार केल्यास जास्त फायदेशीर ठरतात.

दमा – Asthma
दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.
अस्थमाची लक्षणे (Asthma symptoms) :
- खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
- खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
- श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
- दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

COPD (जिर्ण आजारांचा दमा)
जिर्ण आजारांचा दमा (COPD/Chronic Obstructive Pulmonary Disease) यामध्ये श्वास नलिकेमध्ये अडथळा निर्माण होतो व त्या आकुंचन पावतात आणि फुफ्फूस जिर्ण होत जाते.
या आजारांचे लक्षणे काय ?
- चालल्यानंतर दम लागणे
- छातीत दाटून येणे
- बरेच दिवसाचा खोकला
- धुम्रपान हे या आजाराचे मुख्य कारण आहे.
COPD चे उपचार शक्य आहे काय ?
- स्पायरोमेट्रीव्दारे योग्य निदान व वेळीच उपचार केल्यास हा आजार नियंत्रीत राहु शकतो.

न्यूमोनिया - Pneumonia
न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.
या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.
आपल्या डॉक्टरांकडून वेळीच निदान व योग्य उपचार न केल्यास हा आजार गंभीर रुप धारण करु शकतो, ज्यामध्ये ब्लड प्रेशर व ऑक्सीजन कमी होऊन कृत्रीम श्वसन यंत्रणेची गरज पडू शकते.
न्यूमोनियाची लक्षणे :
- खोकला येणे, बेडके पडणे.
- सर्दी होणे, ताप येणे,
- थंडी वाजून येणे.
- श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण श्वास जलदपणे घेत असतो.
- छातीत दुखणे, अंगदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणविणे, भूक मंदावणे, मळमळ व उलट्या, डोकेदुखी ही लक्षणे न्यूमोनियात दिसू लागतात. तसेच काही रुग्णाच्या खोकल्यातून रक्तही येत असते.

क्षयरोग – Tuberculosis (TB)
क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.
क्षयरोग लक्षणे (TB symptoms) :
- तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
- बेडकायुक्त खोकला येणे,
- थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
- खोकताना छातीत दुखणे,
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- अशक्तपणा,
- भूक व वजन कमी होणे,
- रात्री झोपल्यावर घाम येणे,
- सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.
🛑वरील लक्षणे असल्यास तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या जसे की एक्स-रे, थुकीचा नमूना करुन वेळीच निदान व पूर्ण काळ उपचार केल्यास क्षयरोग समुळ नष्ट होऊ शकतो.
क्षयरोग ची औषधे सरकारी दवाखान्यात सुध्दा मोफत मिळतात.

आंतरस्थ फुफ्फुस रोग (Interstitial Lung Disease - ILD)
आंतरस्थ फुफ्फुस रोग (Interstitial Lung Disease - ILD): फुप्फुसांच्या ऊतींमध्ये जखमा होऊन निर्माण होणारे विकार, ज्यामुळे श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजनची देवाणघेवाण प्रभावित होते.
लक्षणे:
- श्वास घेताना त्रास होणे (श्वसनसंकोच)
- कोरडा खोकला, थकवा
- अनियोजित वजन कमी होणे
- छातीत अस्वस्थता
कारणे:
- Autoimmune diseases
- पर्यावरणीय संपर्क (धूळ, रसायने)
- संसर्ग (Infections)
- औषधांचे दुष्परिणाम

निद्रारोग (स्लिप आपनिया)
झोपेत घोरणे हे काही लोकांमध्ये गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. स्थूलता हे या आजाराचे मुख्य कारण आहे. खालील लक्षणे असल्यास रुग्णांनी त्वरीत योग्य निदान व उपचार करावे अन्यथा गंभीर स्वरुपाचे परिणाम होऊ शकतात.
लक्षणे :
- झोपेत घोरणे, झोपेत वारंवार कड पलटवणे किंवा जाग येणे.
- गळ्यात व छातीत दाटल्यासारखे वाटणे दिवसा जास्त झोप येणे
- Polysomnography (Sleep Study) व्दारे या आजारांचे संपूर्ण निदान होऊ शकते.

स्त्री वंध्यत्व
गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे:
- स्त्री-प्रजनन अवयवांतील दोष,
- PCOS ची समस्या असणे,
- हार्मोन्समधील असंतुलन,
- pelvic inflammatory disease (PID) मुळे,
- एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्स) यासारख्या आजारांमुळे,
- स्त्रीचे वय अधिक असणे,
- स्त्रीचे वजन जास्त असणे, लठ्ठपणा,
- हायपोथायरॉडिजमची समस्या,
- सिगारेट स्मोकिंग व अल्कोहोलचे व्यसन,
- मानसिक तणाव,
- कुपोषण किंवा शारीरिक दुर्बलता,
- लैंगिक आजार,
- किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम,
- वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधांचा अतिवापर,
- गर्भनिरोधक गोळ्या औषधांचा चुकीचा वापर, यासारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होत असते.

आय. यु. आय. (IUI) लॅब
अंतर्गर्भाशयी गर्भधारणा (IUI) ही एक वंध्यत्व उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये विशेषरित्या प्रक्रिया केलेले शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात इंजेक्शन द्वारे ओव्ह्युलेशनच्या काळात सोडले जातात, ज्यामुळे गर्भधारणेची संधी वाढते. हा उपचार माईल्ड मेल इंफर्टिलिटी, Unexplained Infertility, गर्भाशय मुखातील श्लेष्मा (mucus) समस्या आणि आवश्यकतेनुसार डोनर शुक्राणूंची आवश्यकता असल्यास केली जाते. IUI ही IVF पेक्षा कमी गुंतागुंतीची आणि किफायतशीर प्रक्रिया आहे.

इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)
इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) ही एक आधुनिक आणि प्रभावी वंध्यत्व उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये स्त्रीच्या अंडाशयातील अंडी बाहेर काढून त्यांचे प्रयोगशाळेत पुरुषाच्या शुक्राणूंशी मिलन घडवले जाते. तयार झालेल्या भ्रूणाला काही दिवसांच्या वाढीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात पुन्हा ठेवले जाते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. हा उपचार ट्युब ब्लॉकेज, गंभीर पुरुष वंध्यत्व, एंडोमेट्रिओसिस, वय अधिक असलेली महिलांमध्ये किंवा इतर पद्धतींना अपयश आले असल्यास केला जातो. IVF ही अत्याधुनिक प्रक्रिया असून ती IUI पेक्षा अधिक गुंतागुंतीची आणि खर्चिक असली, तरी गर्भधारणेच्या यशाची शक्यता जास्त असते.

लेझर हॅचिंग
लेझर हॅचिंग म्हणजे काय?
IVF प्रक्रियेत भ्रूण (Embryo) गर्भाशयात रोपण व्हावा म्हणून त्याच्या बाहेरील आवरणावर (Zona Pellucida) लहानसा छिद्र लेझरच्या सहाय्याने केला जातो.
त्यामुळे भ्रूण गर्भाशयाच्या आतील आवरणाशी सहज चिकटतो.
याची गरज कधी भासते?
- वय 35 पेक्षा जास्त असलेल्या महिलांमध्ये
- पूर्वी IVF मध्ये यश न आलेल्या रुग्णांमध्ये
- भ्रूणाचे आवरण जाड असताना
- गोठवलेले (Frozen) भ्रूण वापरताना
लेझर हॅचिंगचे फायदे:
- भ्रूणाचे रोपण होण्याची शक्यता वाढते
- गर्भधारणा होण्याचे प्रमाण सुधारते
- पुनःपुन्हा IVF अपयश आलेल्या रुग्णांसाठी उपयोगी

PGD/PGS टेस्टिंग
PGD/PGS टेस्टिंग म्हणजे काय?
IVF प्रक्रियेदरम्यान भ्रूण गर्भाशयात ठेवण्यापूर्वी त्याची जीन तपासणी केली जाते.
PGD (Pre-implantation Genetic Diagnosis): विशिष्ट आनुवंशिक आजार शोधण्यासाठी.
PGS (Pre-implantation Genetic Screening): भ्रूणामध्ये क्रोमोसोम्स योग्य आहेत का हे तपासण्यासाठी.
याची गरज कधी भासते?
- कुटुंबात आनुवंशिक आजारांचा इतिहास असताना
- वारंवार गर्भपात होणे
- IVF मध्ये वारंवार अपयश येणे
- वय 35 वर्षांपेक्षा जास्त असताना
फायदे:
- निरोगी भ्रूण निवडला जातो
- गर्भपाताची शक्यता कमी होते
- गर्भधारणा यशस्वी होण्याची शक्यता वाढते

Embryo (भ्रूण) Donation
Embryo Donation म्हणजे काय?
IVF प्रक्रियेत तयार झालेले अतिरिक्त भ्रूण (Embryo) दाम्पत्याच्या संमतीने इतर वंध्य दाम्पत्यांना देण्यात येतात.
हे भ्रूण गर्भाशयात ठेवून गर्भधारणा साध्य केली जाते.
याची गरज कधी भासते?
- स्त्रीमध्ये अंड्यांची (Eggs) गुणवत्ता खूपच कमी असणे
- पुरुषामध्ये स्पर्म पूर्णपणे नसणे
- वारंवार IVF अपयश येणे
- काही आनुवंशिक आजार टाळण्यासाठी
फायदे:
- निरोगी भ्रूणामुळे गर्भधारणा होण्याची संधी वाढते
- वंध्यत्व निवारणासाठी सुरक्षित आणि प्रभावी पर्याय
- पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते

Sperm Banking
Sperm Banking म्हणजे काय?
पुरुषाचे शुक्राणू (Sperm) विशेष तंत्राने गोळा करून थंडगार तापमानात (Cryopreservation) दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे Sperm Banking.
नंतर गरज पडल्यास IVF किंवा IUI सारख्या उपचारात ते वापरले जाऊ शकतात.
याची गरज कधी भासते?
- कॅन्सर किंवा इतर आजारासाठी औषधोपचार/कीमोथेरपीमुळे स्पर्म नष्ट होण्याची शक्यता असताना
- लांब काळासाठी प्रवास/नोकरीमुळे अनुपस्थित राहणार असल्यास
- स्पर्मची गुणवत्ता कमी असताना
- दाम्पत्याला भविष्यासाठी पर्याय ठेवायचा असल्यास
फायदे:
- भविष्यातील वंध्यत्व टाळता येते
- सुरक्षित व प्रभावी तंत्र
- कुटुंब वाढवण्याची संधी जपली जाते.

Blastocyst Culture
Blastocyst Culture म्हणजे काय?
IVF प्रक्रियेत भ्रूण (Embryo) तयार झाल्यावर तो प्रयोगशाळेत ५–६ दिवस वाढवला जातो. या अवस्थेला ब्लास्टोसिस्ट म्हणतात. त्यानंतर योग्य भ्रूण गर्भाशयात ठेवला जातो.
याची गरज कधी भासते?
- IVF मध्ये वारंवार अपयश आलेले रुग्ण
- भ्रूणांची संख्या जास्त असताना त्यातील सर्वोत्तम निवडण्यासाठी
- गर्भाशयात चिकटण्याची (Implantation) शक्यता वाढवण्यासाठी
फायदे:
- भ्रूणाची नैसर्गिक निवड होते
- यशस्वी गर्भधारणा होण्याचे प्रमाण वाढते
- एकावेळी कमी भ्रूण ठेवावे लागतात, त्यामुळे बहुगर्भधारणेचा धोका कमी होतो.

बायोप्सी व हिस्टोपॅथॉलॉजी
बायोप्सी म्हणजे काय?
- बायोप्सी ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीरातील संशयास्पद गाठ, जखम किंवा अवयवाचा छोटासा ऊतकाचा (Tissue) तुकडा घेतला जातो.
- हा तुकडा प्रयोगशाळेत तपासला जातो.
- बायोप्सी करण्यामागचा उद्देश म्हणजे रोगाचे नेमके कारण शोधणे, विशेषतः कॅन्सर आहे की नाही हे निश्चित करणे.
बायोप्सीचे प्रकार:
- नीडल बायोप्सी – सुईने ऊतकाचा छोटा तुकडा काढणे.
- इन्सिजनल बायोप्सी – गाठीचा/जखमेचा काही भाग काढणे.
- एक्सिसिजनल बायोप्सी – पूर्ण गाठ किंवा जखम काढून टाकणे.
- एंडोस्कोपिक बायोप्सी – एंडोस्कोप वापरून आतल्या अवयवातून ऊतक घेणे.
हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे काय?
- हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे मायक्रोस्कोपखाली ऊतकांची रचना (Tissue structure) तपासण्याची प्रक्रिया.
- बायोप्सीतून काढलेल्या ऊतकाचा तुकडा विशेष रंगद्रव्ये (Stains) वापरून स्लाईडवर तयार केला जातो.
- नंतर पॅथॉलॉजिस्ट मायक्रोस्कोपखाली त्याचे सूक्ष्म निरीक्षण करतात.
हिस्टोपॅथॉलॉजीमधून काय समजते?
- पेशींची (Cells) वाढ, रचना व त्यातील बदल.
- कॅन्सरची पातळी (Stage/Grade).
- संसर्ग (Infection), दाह (Inflammation) किंवा इतर आजारांची उपस्थिती.

सुईद्वारे गाठीची तपासणी (F.N.A.C.)
FNAC (Fine Needle Aspiration Cytology) म्हणजे काय?
- FNAC म्हणजे बारीक सुईच्या साहाय्याने पेशींचे नमुने (cells) घेऊन त्यांचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करणे.
- हि एक सोपे, जलद आणि तुलनेने कमी वेदनादायक निदान पद्धत आहे.
FNAC करण्याची पद्धत:
- डॉक्टर तपासायच्या गाठीवर किंवा अवयवावर एक बारीक सुई (साधारण 22–25 gauge) टोचतात.
- सुईद्वारे पेशी बाहेर काढून त्यांचे स्लाइड तयार केले जातात.
- पॅथॉलॉजिस्ट हे पेशी सूक्ष्मदर्शकाखाली तपासतात.
- त्यावरून गाठ सौम्य (benign), दाहयुक्त (inflammatory) की घातक (malignant) आहे याचा अंदाज येतो.
FNAC का केले जाते?
- गाठ किंवा सूज तपासण्यासाठी (उदा. मानेला आलेली गाठ, थायरॉईड, स्तनातील lump, लिम्फ नोड्स इ.)
- कॅन्सर आहे की नाही हे तपासण्यासाठी
- संसर्ग, क्षयरोग, किंवा इतर दाहक आजार निदानासाठी

पॅप स्मीयर तपासणी आणि L.B.C. (Liquid based cytology)
पारंपरिक (Conventional) पॅप स्मिअर तपासणी:
- पॅप स्मिअर ही तपासणी गर्भाशयाच्या मुखावर (cervix) होणारे कर्करोगपूर्व बदल, संसर्ग आणि कर्करोग ओळखण्यासाठी केली जाते.
- जुनी पद्धत (conventional) मध्ये ब्रश/स्पॅचुलाने गर्भाशय मुखावरील पेशी घेऊन त्या थेट स्लाईडवर पसरवल्या जातात.
- नंतर स्लाईड रंगवून मायक्रोस्कोपखाली तपासल्या जातात.
मर्यादा:
- पेशी कोरड्या होऊन खराब होऊ शकतात.
- पेशी एकमेकांवर चढून दिसतात, त्यामुळे रिपोर्ट अचूक नसतो.
- गोळा केलेला संपूर्ण नमुना स्लाईडवर लागत नाही, बऱ्याच पेशी वाया जातात.
- रक्त, श्लेष्मा (mucus) किंवा दाह (inflammation) असला तर पेशी स्पष्ट दिसत नाहीत.
लिक्विड-बेस्ड साइटोलॉजी (LBC) पॅप स्मिअर:
- यामध्ये ब्रशने घेतलेल्या पेशी थेट विशेष द्रव द्रावणात टाकल्या जातात.
- प्रयोगशाळेत या द्रावणावर प्रक्रिया करून रक्त, श्लेष्मा व घाण काढली जाते आणि पेशींचा पातळ थर स्लाईडवर चढवला जातो.
- त्यामुळे पेशी स्वच्छ, व्यवस्थित व स्पष्ट दिसतात.
महत्त्व:
- चांगल्या दर्जाचा नमुना – पेशी स्पष्ट व कमी चुका होतात.
- अधिक अचूक तपासणी – कर्करोगपूर्व बदल आणि संसर्ग नीट दिसतो.
- अधिक संवेदनशीलता – चुकीचे निगेटिव्ह (false negative) कमी होतात.
- अतिरिक्त तपासण्याची सोय – त्याच द्रावणातून HPV DNA चाचणी किंवा इतर तपासण्या करता येतात.

फ्लुईड सायटॉलॉजी (पाण्याची तपासणी)
Fluid Cytology: फ्लुइड साइटोलॉजी (Fluid Cytology) म्हणजे शरीरातील विविध द्रवांचे सूक्ष्मदर्शकाखाली पेशींचे परीक्षण होय.
शरीरातील काही महत्त्वाचे द्रव ज्यांचे साइटोलॉजिकल परीक्षण केले जाते:
- प्ल्युरल फ्लुइड (छातीतील पाणी)
- पेरिटोनियल फ्लुइड / अॅसाइटिक फ्लुइड (पोटातील पाणी)
- पेरिकार्डियल फ्लुइड (हृदयाभोवतीचे पाणी)
- CSF – सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (मेंदू व मज्जारज्जूमधील द्रव)
- युरिन (मूत्र)
फ्लुइड साइटोलॉजीचे उद्दिष्ट:
- त्या द्रवामध्ये संसर्ग (infection) आहे का हे तपासणे
- कर्करोगाच्या पेशी (malignant cells) आहेत का हे पाहणे
- द्रवामध्ये सूज (inflammation), टीबी, इतर आजार यांचा अंदाज घेणे.

Fertility markers/Thyroid Test/Vit. B12/ Vit.D/ PSA etc. by Beckman Coulter instrument.
Beckman Coulter Access-2 Instrument: हे एक इम्युनोअॅसे बेस्ड ऑटोमेटेड अॅनालायझर आहे, ज्याद्वारे रक्तातील विविध हार्मोन्स, जीवनसत्त्वे व इतर मार्कर्स मोजले जातात. याची गती, अचूकता व पुनरुत्पादनक्षमता (reproducibility) जास्त असल्यामुळे रोगनिदानासाठी फार महत्त्वाचे ठरते.
1. Fertility Markers (फलनक्षमतेसंबंधी मार्कर्स): यामध्ये खालील तपासण्या येतात.
- FSH (Follicle Stimulating Hormone) – अंडाशय/वृषण कार्य तपासण्यासाठी
- LH (Luteinizing Hormone) – अंडोत्सर्जन व फलनक्षमता तपासण्यासाठी
- AMH (Anti-Müllerian Hormone) – अंडाशयातील अंडांची साठवण क्षमता (ovarian reserve) दाखवते
- Prolactin – जास्त प्रमाणात असल्यास वंध्यत्व होऊ शकते
- Estradiol / Progesterone – मासिक पाळीचक्र व गर्भधारणेची क्षमता समजण्यासाठी
महत्त्व: यामुळे स्त्री-पुरुष दोघांमध्येही वंध्यत्वाचे कारण शोधणे सोपे होते व योग्य उपचार योजना ठरवता येते.
2. Vitamin B12:
- Vitamin B12 मज्जासंस्था (nervous system) व रक्तपेशींसाठी अत्यावश्यक.
- कमतरतेमुळे अॅनिमिया (megaloblastic anemia), थकवा, हात-पाय सुन्न होणे, स्मृतीदोष होऊ शकतो
महत्त्व: Access-2 Analyzer वर Vitamin B12 मोजल्याने लवकर निदान होते व पूरक उपचार सुरू करता येतात.
3. Vitamin D (25-OH Vitamin D):
- हाडे व स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक.
- कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, वेदना, मुलांमध्ये रिकेट्स होऊ शकतात.
महत्त्व: योग्य पातळी मोजून पूरक औषधे/सूर्यप्रकाश थेरपी ठरवता येते.
4. PSA (Prostate Specific Antigen):
- पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीतील प्रोटीन.
- PSA वाढल्यास प्रोस्टेटचा कर्करोग, प्रोस्टेटायटिस किंवा सौम्य वाढ (BPH) यांचा संशय येतो.
महत्त्व: Access-2 Analyzer वर PSA मोजल्याने प्रोस्टेट कर्करोगाचे लवकर निदान व मॉनिटरिंग करता येते.

रक्ताची तपासणी CBC & Biochemistry
Erba H560 – CBC 5 Part Analyzer: हे एक ऑटोमेटेड हेमॅटोलॉजी अॅनालायझर आहे.
तपासणी:
- WBC (White Blood Cells) – एकूण संख्या + 5 प्रकार (Neutrophils, Lymphocytes, Monocytes, Eosinophils, Basophils)
- RBC (Red Blood Cells) – संख्या, आकारमान, गुणवत्ता
- Hb (Hemoglobin) – हिमोग्लोबिन पातळी
- Platelets – रक्त गोठवण्याची क्षमता
महत्त्व:
- अॅनिमिया, संसर्ग, रक्तदोष, ल्युकेमिया यांचे निदान
- अचूक डिफरेंशियल काउंट → पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक विश्वासार्ह
- फॉलोअप व उपचार योजना ठरवणे सोपे
Erba XL200 – Fully Automated Biochemistry Analyzer: हे एक फुल्ली ऑटोमेटेड क्लिनिकल बायोकॅमिस्ट्री अॅनालायझर आहे.
तपासणी:
- लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT)
- किडनी फंक्शन टेस्ट (KFT)
- लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्स)
- ब्लड शुगर (ग्लुकोज)
- एन्झाइम्स व इलेक्ट्रोलाईट्स
महत्त्व:
- जलद आणि अचूक परिणाम
- एकावेळी मोठ्या संख्येने नमुने तपासण्याची क्षमता
- हृदय, लिव्हर, किडनी, मेटाबॉलिझम यांचे आरोग्य तपासणे
- डायबेटीस, हृदयरोग, यकृत-किडनी आजार लवकर ओळखता येतात

क्लिनिकल पॅथॉलॉजी - मूत्र तपासणी
Laura Smart (Erba) – Urine Analyzer: हे एक ऑटोमेटेड युरीन अॅनालायझर आहे.
तपासण्या (Analyzer द्वारे): Protein, Glucose, Ketones, Blood, pH, Specific Gravity, Bilirubin, Urobilinogen, Nitrite, & Leukocytes.
महत्त्व:
- किडनी विकार, डायबेटीस, यकृत आजार, UTI शोधण्यासाठी उपयुक्त
- जलद आणि अचूक परिणाम
- मानवी चुका कमी
- हॉस्पिटल व लॅबमध्ये रूटीन तपासणीसाठी आदर्श
DekaPHAN – Urine Test Strips: ही विशेष केमिकल स्ट्रिप्स आहेत ज्या मूत्रातील घटकांशी प्रतिक्रिया करून रंग बदलतात.
Laura Smart सारख्या Urine Analyzer मध्ये टाकल्यास स्ट्रिप्सचे अचूक वाचन (optical reading) मिळते.
तपासण्या (Strips द्वारे): Glucose, Protein, Blood, pH, Ketones, Nitrite, Leukocytes, Bilirubin, Urobilinogen, Specific Gravity.
महत्त्व:
- मूत्र तपासणी सोपी, जलद व किफायतशीर बनवतात
- डायबेटीस, किडनी आजार, युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन यांचे स्क्रिनिंग करण्यासाठी

संपूर्ण शरीर आरोग्य पॅकेजेस.
हेमॅटोलॉजी (Erba H560 CBC 5-Part Analyzer):
- CBC (Complete Blood Count – 5 Part Differential)
- Hemoglobin
- RBC Count
- WBC Count (Neutrophils, Lymphocytes, Monocytes, Eosinophils, Basophils)
- Platelet Count
बायोकॅमिस्ट्री (Erba XL 200 Fully Automated Biochemistry Analyser):
- Liver Function Test (LFT)
- Kidney Function Test (KFT)
- Lipid Profile
- Blood Glucose (Fasting/PP)
- Enzymes (SGPT, SGOT, ALP इ.)
Serum Electrolyte Analyser by Erba:
- Serum Sodium (Na⁺)
- Serum Potassium (K⁺)
- Serum Chloride (Cl⁻)
- Serum Bicarbonate (HCO₃⁻)
हार्मोन्स व स्पेशल टेस्ट्स (Beckman Coulter Access-2):
- Fertility Markers (FSH, LH, AMH, Prolactin, Estradiol, Progesterone)
- Vitamin B12
- Vitamin D (25-OH)
- PSA (Prostate Specific Antigen)
क्लॉटिंग प्रोफाइल:
- PT (Prothrombin Time)
- INR (International Normalized Ratio)
युरीन टेस्ट्स:
- Routine Urine Analysis (Laura Smart – Erba)
- DekaPHAN Urine Strips Parameters (Protein, Glucose, Ketones, Blood, pH, Specific Gravity, Bilirubin, Urobilinogen, Nitrite, Leukocytes)
Asha pathology laboratory health packages available:
- Basic health pakage
- Advance health pakage
- Premium health pakage

Gallery



















