About Us

ठोकळ चिल्ड्रन हॉस्पिट

अकोला पॅथॉलॉजी लॅब

"बाळांचे आरोग्य, आमची प्राथमिकता!"

ठोकळ चिल्ड्रन हॉस्पिटल चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी समर्पित असून उत्कृष्ट आणि तज्ज्ञ सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. बालकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, कुशल परिचारिका आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, आम्ही सर्वोत्कृष्ट उपचार प्रदान करतो. लसीकरण, पोषण सल्ला, वाढ व विकास तपासणी, तसेच विविध बालरोगांवरील उपचारांसाठी आमच्याकडे विशेष व्यवस्था आहे. प्रत्येक मुलाला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावे, यासाठी आम्ही काळजीपूर्वक प्रयत्नशील आहोत. आमच्या सेवेत सहानुभूती, विश्वास आणि गुणवत्ता यांचा समावेश असून, "बाळांच्या उज्ज्वल भविष्याची हमी" हेच आमचे ध्येय आहे.

डॉ. मनोज एस. ठोकळ

  • M.B.B.S., D.C.H.
  • बालरोग व नवजात शिशु तज्ञ.
  • Reg. No.: 2003/07/2528

डॉ. चैताली चव्हाण ठोकळ 

  •  MBBS, D.P.B.
  • कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट
  •  Regd. No.: 2009/05/2131


AREA OF EXPERTISE :

  • Newborn Baby Check up
  • Vaccination
  • Growth and Development : Assessment & Counselling 
  • Nutrition Assessments & Counselling 
  • Behavioural Assessments & Counselling 
  • High Risk Followup
  • Paediatric Major & Minor Illnesses 
  • Safe & Painless Ear Piercing
  • Pediatric Nutrition

उपलब्ध सुविधा :-

  • सुज्जज बाह्यरुग्ण विभाग (OPD)
  • सुज्जत आतंरुग्ण विभाग (IPD)
  • नवजात शिशु विभाग (NICU)
  • कावीळ साठी फोटोथेरपी 
  • सर्व प्रकारचे लसीकरण 
  • पल्स ऑक्सिमीटर 
  • बालदमा उपचार 
  • आत्याआधुनिक वार्मर 
  • मेंदूरोग निदान, फीटचे विकार 
  • उपचार 
  • नेबुलायझेशन

Products/Services

ठोकळ चिल्ड्रन हॉस्पिटल

ठोकळ चिल्ड्रन हॉस्पिटल

नवजात बाळाची देखभाल

नवजात बाळ म्हणजे काही दिवसापूर्वीच जन्मलेले बाळ. अशा नवजात बाळाची देखभाल अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. नवजात शिशुची देखभाल कशी करावी याविषयी पालकांच्या मनात खूपच शंका व प्रश्न असतात.

नवजात बाळाची काळजी अशी घ्यावी : नवजात बाळाचा सांभाळ करणाऱ्यांनी स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. जेणेकरून बाळाला इन्फेक्शन होणार नाही. नवजात बाळाला रोज कोमट पाण्याने अंघोळ घालावी. बाळाला अंघोळ घालताना बाळाची नाळ साबणाने व पाण्याने धुऊन स्वच्छ करावी. बाळाला सहा महिने होईपर्यंत केवळ आईचे दूध पाजावे.

नवजात बाळाची देखभाल

नवजात बाळाचे वजन वाढवणे

जर नवजात शिशुचे वजन कमी असल्यास त्यासाठी आईचे दूध हाचं एकमेव व सर्वोत्तम असा पर्याय आहे. नवजात बाळाचे वजन वाढवण्यासाठी प्रत्येक दोन-दोन तासांनी आपल्या नवजात बाळास स्तनपान करावे. आईचे दूध पिण्यामुळे नवजात बाळाचे योग्यप्रकारे वजन वाढण्यास मदत होते. कारण, आईच्या दुधात सर्व पोषकघटक आणि खनिजतत्वे असतात, जी बाळाच्या अधिक चांगल्या विकासासाठी आवश्यक असतात.

बाळाला स्तनपान करताना ही महत्वाची सूचना लक्षात ठेवा :
बाळाला दूध पाजताना दोन्ही बाजूच्या स्तनांचे दूध पाजावे. एका बाजूचे दूध पाजताना ते संपूर्ण दूध प्यायल्यावरच दुसऱ्या बाजूला दूध पाजावे; कारण सुरुवातीस पाण्यासारखे पातळ दूध येते. हे दूध बाळाची तहान भागविते व नंतरचे दूध दाट (हाईड मिल्क) येते. हे दूध बाळाची भूक भागविते व बाळाचे पोषण करत असते.

मात्र जर आईने बाळाला दूध पाजण्यास सुरुवात केल्यावर लगेचच दुसऱ्या बाजूला पाजल्यास बाळाला केवळ पाण्यासारखे दूध (फोअर मिल्क) मिळते, त्यामुळे त्याची तहान भागते; पण भूक भागत नाही. म्हणून बाळ सारखे रडत राहते. तसेच यामुळे बाळाचे पोषण न झाल्याने त्याचे योग्यप्रकारे वजनही वाढत नाही. यासाठी बाळाला दूध पाजताना एकावेळी एका बाजूच्या स्तनानेच पाजले पाहिजे.

नवजात बाळाचे वजन वाढवणे

लहान बाळाचे लसीकरण (Vaccination)

बाळांना नियमित लसीकरण केल्यामुळे बाळाचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. आपल्या लहान मुलास वेळच्यावेळी लसीकरण करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. 

Age of Child (0-15 day) : Vaccination - HBV 0, BCG, OPV.

Age of Child (1 1/2 Months) : Vaccination - DPT 1, HBV 1, HIB 1, IPV 1, Rotavirus 1, Pneumococcal 1.

Age of Child (2 1/2 Months) : Vaccination - DPT 2, HBV 2, HIB 2, IPV 2, Rotavirus 2, Pneumococcal 2.

Age of Child (3 1/2 Months) : Vaccination - DPT 3, HBV 3, HIB 3, IPV 3, Rotavirus 3, Pneumococcal 3.

Age of Child (6 Months) : Vaccination - Influenza 1

Age of Child (7 Months) : Vaccination - Influenza 2

Age of Child (9 Months) : Vaccination - MMR 1, Typhoid Conjugate Vaccine.

Age of Child (12 Months) : Vaccination - Hepatitis A1, JE 1

Age of Child (13 Months) : Vaccination - JE 2

Age of Child (15 Months) : Vaccination - MMR 2, Chicken Pox 1, Pneumococcal Booster

Age of Child (18 Months) : Vaccination - DPT Booster 1, HIB Booster, IPV Booster 1, Hepatitis A 2.

Age of Child (2 years) : Vaccination - Chicken Pox 2, MCV.

Age of Child (5 years) : Vaccination - DPT Booster 2, IPV Booster 2, MMR 3

Age of Child (5 years) : Vaccination - Tdap / Td, 10-12 Years, HPV.

लहान बाळाचे लसीकरण (Vaccination)

लहान बाळाला ताप (Fever)

बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असल्याने त्याला वरचेवर ताप, सर्दी, खोकला असे त्रास होत असतात. जेंव्हा शरीराचे तापमान हे 98.6 डिग्री फारेनहाइटपेक्षा अधिक असते तेंव्हा ताप येत असतो.सामान्यतः वातावरणातील बदल, इन्फेक्शन, सर्दी, खोकला किंवा जुलाबमुळेही बाळांना ताप येऊ शकतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तापावरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. बाळाला तापाचा अधिक त्रास होत असल्यास त्याला आपल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे.

लहान बाळाला ताप (Fever)

बाळाला उलटी होणे

काहीवेळा बाळाला दूध प्यायल्याबरोबर लगेच उलटी होऊ शकते. नवजात बाळास दूध पिल्यानंतर होणारी उलटी हे फारसे काळजीचे कारण असत नाही. मात्र जर बाळास वारंवार उलट्या व जुलाब होत असतील तर ते मात्र काळजीचे कारण असू शकते, अशावेळी त्यावर उपचार करणे आवश्यक असते.

लहान बाळाला उलटी का होते..?

  • बाळाला अधिक प्रमाणात दूध किंवा आहार दिल्यामुळे,
  • दुधाची ऍलर्जी असल्यास,
  • पोटातील इन्फेक्शनमुळे,
  • बाळास न आवडणारे पदार्थ भरवल्याने,
  • तसेच गॅस रिफ्लेक्समुळेही बाळ उलटी करु शकते.
    अशा कारणांमुळे बाळाला उलटी होऊ शकते.

बाळाला उलटी होणे

बाळाला जुलाब होणे

अनेक कारणांमुळे बाळाला पातळ जुलाब होत असते. प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे असा त्रास बाळाला होत असतो. बाळाला पातळ जुलाब होत असल्यास डिहायड्रेशन होऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.

जुलाबामुळे बाळास सतत पातळ संडासला होत राहिल्यास डिहायड्रेशन होण्याचा अधिक धोका असतो. डिहायड्रेशनमुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होत असते. यासाठी जुलाबमध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तरल द्रव्यपदार्थ बाळास देणे व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जुलाबवरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळास देऊ नये.

बाळाला जुलाब होणे

बाळाला सर्दी पडस्याचा त्रास

बाळाला सर्दी पडस्याचा त्रास अनेक कारणांनी होऊ शकतो. विशेषतः थंड वातावरण, इन्फेक्शन यांमुळे बाळांना वरचेवर सर्दी होत असते. सर्दी झाल्यास बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो तसेच सर्दीवाटे शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनही होऊ शकते. त्यामुळे बाळाची सर्दी सामान्य वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नये.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्दीवरील कोणतीही औषधे मेडिकलमधून आणून बाळास घालू नयेत. तसेच नाकात घालणारे ड्रॉप्स किंवा स्प्रेसुद्धा बाळासाठी वापरू नयेत. बाळास सर्दीचा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे बाळाला घेऊन जावे.

बाळाला सर्दी पडस्याचा त्रास

बाळाचे पोट दुखणे

लहान बाळांना होणारे त्रास समजणे हे अवघड असते. कारण मोठ्यांप्रमाणे कुठे दुखते ते काही लहान बाळ सांगू शकत नाहीत. इन्फेक्शनमुळे प्रामुख्याने बाळाला पोटदुखी होत असते. 

बाळाच्या पोटात दुखत असल्यास अशी काही लक्षणे असतात :

  • बाळ दूध पिण्यास टाळाटाळ करते.
  • बाळ आपला हात पोटाच्या ठिकाणी लावत राहते.
  • बाळाच्या पोटाला हात लावल्यास त्याला अधिक त्रास झालेला जाणवतो.
  • बाळ सारखे रडू लागते.

बाळाचे पोट दुखणे

डॉ. मनोज एस. ठोकळ

  • M.B.B.S., D.C.H.
  • बालरोग व नवजात शिशु तज्ञ.
  • Reg. No.: 2003/07/2528

डॉ. मनोज एस. ठोकळ

Gallery

rdgs

Rate Us

Contact Us