About Us

SmileXpert

दातांचा दवाखाना

Where Experience Meets Excellence.

शाखा नं. 1 - हर्ष संकुल, एस. ए. कॉलेज समोर, सिव्हिल लाईन, अकोला.

  • वेळ - 11:00 am to 4:00 pm

शाखा नं. 2 - अल्फा कॉर्नरजवळ, दीपक चौक, अकोला.

  • वेळ -  07:00 pm to 9:30 pm


Dr. ASIF HALARI

  • BDS, PGFO (MUHS)

Dr. SHAMIMA HALARI

  • BDS, Dental Surgeon 

TREATMENTS WE PROVIDE:

  • Checkup / Consultation
  • Dental X Rays
  • Teeth Cleaning
  • Root Canal Treatment
  • Teeth Whitening 
  • Implants
  • Veneers and Laminates
  • Crowns & Bridges
  • Dentures
  • Wisdom Tooth Removal
  • Tooth Extraction
  • Dental / Oral Surgery
  • Orthodontic Treatment
  • Aligners
  • Crown Lengthening Treatment
  • Gum Depigmentation
  • Kids Dentistry (Pediatric)
  • Lazer Dentistry
  • Periodontal Problems
  • Full Mouth Reconstruction

Products/Services

SmileXpert Dental Clinic

Where Experience Meets Excellence

SmileXpert Dental Clinic

रूट कॅनाल ट्रिटमेंट

"रूट कॅनाल ट्रिटमेंट" म्हणजे दाताच्या आतिल सजीव भागातील संसर्ग किंवा इजा झालेल्या भागाचे उपचार. या प्रक्रियेत, दाताच्या आतल्या नरम भाग (पलप) ला काढून, त्या जागेची स्वच्छता करून, कृत्रिम नस व पक्के सिमेंट टाकून त्यावर मेटल / सिरामिक किंवा झिरकोनियमची कॅप बनवली जाते म्हणजे तो दात नैसर्गिक दातासारखेच काम करतो.

रूट कॅनाल ट्रिटमेंट

डेंटल इम्प्लांट

"दातांचा इम्प्लांट" म्हणजे धातूचा स्क्रू जो जबड्यात ऑपरेशन करून बसवला जातो. हा इम्प्लांट दात नसलेल्या जागेवर फिक्स करून त्यावर कृत्रिम दात किंवा क्राउन बसवला जातो. हा उपचार मिसिंग झालेल्या दातांची जागा भरण्यासाठी आणि दातांची कार्यक्षमता आणि सौंदर्य सुधारण्यासाठी वापरला जातो. इम्प्लांच्या सह्याने लावलेला दांत दीर्घकाल टिकणारा आणि नैसर्गिक दातासारखा असतो.

डेंटल इम्प्लांट

क्राउन व ब्रिजस्

"क्राउन" म्हणजे दाताच्या वरच्या भागावर बसवले जाणारे कव्हर, जे दाताला संरक्षित करते आणि त्याचा आकार आणि कार्य सुधारते. "ब्रिज" म्हणजे दोन किंवा अधिक दांताचा आधार घेऊन कृत्रिम दात बसवला जातो, जो मिसिंग दांत लावण्यासाठी वापरला जातो. क्राउन आणि ब्रिज दोन्ही दातांच्या रूप आणि कार्यक्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी वापरले जातात.

क्राउन व ब्रिजस्

ओरल ऑन्ड मॅक्सिलोफेसिएल सर्जरी

"ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी" म्हणजे तोंड, जबडा आणि चेहऱ्याच्या भागातील शस्त्रक्रिया. यामध्ये दातांची काढणी, जबड्याचे असमान किंवा त्रासदायक स्थितीचे उपचार आणि चेहऱ्याच्या इजा किंवा विकाराचे शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत. हा प्रकार दात आणि चेहरा यांच्यातील संरचनात्मक आणि कार्यात्मक समस्यांचे निराकरण करतो, अपघाताने जबड्याचे हाड फॅक्चर झाल्यास त्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया.ज्यामुळे तोंडाची आणि चेहऱ्याची कार्यक्षमता आणि सौंदर्य सुधारते.

ओरल ऑन्ड मॅक्सिलोफेसिएल सर्जरी

फ्लॅप सर्जरी व बोन ग्राफ्टिंग

"फ्लॅप सर्जरी" म्हणजे दाताच्या आजुबाजूच्या हिरड्यांचे आणि हड्डीच्या समस्यांचे उपचार करण्यासाठी त्या भागातील हिरड्या उचलून, त्याखालच्या भागाची स्वच्छता आणि उपचार करणे. "बोन ग्राफ्टिंग" म्हणजे मिसिंग झालेल्या हड्डीच्या जागी नवीन हड्डी किंवा कृत्रिम पदार्थाचा वापर करून हड्डीची पुनर्रचना करणे. या प्रक्रियांनी दात आणि जबड्याच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते.

फ्लॅप सर्जरी व बोन ग्राफ्टिंग

दंत व्यंगोउपचार (वेडेवाकडे दात सरळ करणे)

ऑर्थोडोंटिक (दंत व्यंग) उपचार हा दातांची  रचना जसे - वेडेवाकडे, समोर आलेले, गॅप असलेले दात तार लाऊन सरळ करण्यासाठी असते. या उपचारांमध्ये ब्रेसिस, अलाइनर्स, आणि इतर उपकरणांचा वापर होतो. यामुळे दात सरळ होतात, चावण्याची क्षमता सुधारते, दातांची स्वच्छता सुलभ होते, आणि सौंदर्यदृष्ट्या चेहऱ्याचे आकर्षण वाढते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि दंत आरोग्य सुधारते.

दंत व्यंगोउपचार (वेडेवाकडे दात सरळ करणे)

काॅस्मेटिक डेंटिस्ट्री

"कॉस्मेटिक दंतचिकित्सा" म्हणजे दातांचे स्वरूप सुधारण्यासाठी केलेले उपचार. यात दात पांढरे करणे, व्हीनीयर, दातांची पुनर्बांधणी आणि दातांची रचना सुधारणे यांचा समावेश होतो. या उपचारांमुळे स्मित अधिक आकर्षक होते, आत्मविश्वास वाढतो, आणि दातांचे आरोग्य सुधारते आणि संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते.

काॅस्मेटिक डेंटिस्ट्री

पार्शियल ऑन्ड कम्प्लीट डेंचर

आंशिक आणि पूर्ण कृत्रिम दात हे दात गमावलेल्या लोकांसाठी बनवलेले कृत्रिम दात आहेत. आंशिक कृत्रिम दात काही दातांच्या गमावल्या जागी काढ-घाल करता येणारे कृत्रिम दात संपूर्ण तोंडात बसवले जातात. यामुळे अन्न चावण्यास, बोलण्यास मदत होते, चेहऱ्याचे स्वरूप सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो. ते तोंडाचे आरोग्य टिकवण्यास मदत करतात आणि जीवनमान उंचावतात.

पार्शियल ऑन्ड कम्प्लीट डेंचर

ओरल प्रोफिलॅक्सिस

"ओरल प्रोफिलॅक्सिस" म्हणजे दात व तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी केलेली सफाई. यात दातांची डीप क्लीनिंग, पॉलिशिंग, आणि टार्टर काढणे यांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे गम रोग, दातांचे पोकळ्या, आणि दुर्गंधी टाळता येते. दातांचे आरोग्य सुधारते, तोंडातील स्वच्छता वाढते, आणि एकूणच तोंडाच्या आरोग्याचे रक्षण होते.

ओरल प्रोफिलॅक्सिस

लेझर दंतचिकित्सा

"लेझर दंतचिकित्सा" ही केंद्रित प्रकाश किरणांचा वापर करून अचूक दंत उपचार करणारी आधुनिक पद्धत आहे. या तंत्रज्ञानामुळे वेदना, रक्तस्राव आणि सूज कमी होते. दातांची कॅव्हिटी काढणे, हिरड्यांचे आकार सुधारणे आणि दात साफ/पांढरे करणे यासारख्या उपचारांमध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते. यामुळे भूल कमी काळासाठी द्यावी लागते, हेलिंगस् वेगाने भरून येतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. पारंपरिक दंत उपचारांच्या तुलनेत ही पद्धत अधिक सोयीस्कर आणि प्रभावी आहे.

लेझर दंतचिकित्सा

अक्कलदाढ काढणे

"अक्कलदाढ काढणे" ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये अडकलेले, विसंगत किंवा वेदना व समस्या निर्माण करणारे अक्कलदाढीचे दात काढले जातात. हा उपचार स्थानिक किंवा सर्वसाधारण भूल देऊन केला जातो, ज्यामुळे वेदनारहित अनुभव मिळतो. हा उपचार संसर्ग, सूज, हिरड्यांचे आजार आणि इतर दातांचे नुकसान टाळून दीर्घकालीन आरोग्य आणि आराम सुनिश्चित करतो.

अक्कलदाढ काढणे

फुल माउथ रिहॅबिलिटेशन

"फुल माउथ रिहॅबिलिटेशन" म्हणजे तोंडाच्या संपूर्ण दातांची पुनर्बांधणी / पुनर्वसन करणे. यामध्ये  विशेषत: किडलेल्या, झिजलेल्या दांताचे उपचार करून चावण्याची प्रणाली व जबड्याच्या कार्यक्षमतेचा समावेश असतो. हे आवश्यक असते जेव्हा दातांमध्ये गंभीर समस्या, अपघात, किंवा दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. याचे फायदे म्हणजे चांगले दातांचे आरोग्य, सुधारलेली चावण्याची क्षमता, सौंदर्यदृष्ट्या आकर्षक स्माईल, व एकूण जीवनमानात सुधारणा होन्यास मदत होते.

फुल माउथ रिहॅबिलिटेशन

Gallery

Rate Us

Contact Us