About Us
श्री मंगल कार्यालय लोणार
लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण असतो आणी तो जीवनात एकदाच येतो, प्रत्येकजण तो त्या क्षणाला अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या प्रयत्नाला यशस्वी करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
कार्यालयाची आकर्षक वैशिष्ट्ये :-
- 60000 स्क्वेअर फुट पार्किंगची सोय
- 60000 स्क्वेअर फुट चे प्रशस्त हिरवेगार लॉन्स
- 10000 स्क्वेअर फुटचा प्रशस्त हवेशीर साखरपुडयाचा हॉल
- 5000 स्क्वेअर फुटचा प्रशस्त हवेशीर जेवणाचा हॉल
- हवेशीर , निसर्गरम्य व प्रसन्न वातावरण
- पॅकेजची सुविधा उपल्ब्ध
- आकर्षक विद्युतरोशनाइने सजवलेली राजवाडयाची सजावट
- जनरेटरची सुविधा उपल्ब्ध
- वधु आणि वर यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम अॅटॅच स्वतंत्र खोली
- वधु आणि वरांकडील मंडळींसाठी स्वतंत्र प्रशस्त गेस्ट रूम्स अटॅच्ड टॉयलेट बाथरूम
- जेवणासाठी स्टीलचे स्वच्छ टेबल आणि खुर्ची
- संपुर्ण कार्यालय सीसीटीव्ही अंतर्गत सुरक्षीत
- महीला व पुरषांसाठी स्वच्छतागृह
- सार्वजनीक वाहतुकीने येण्याची सोय .
- लहान मुलांसाठी वाहतुकीपासुन सुरक्षीत ठिकाण
- वधु-वरासाठी आकर्षक भेट वस्तू मंगल कार्यालय तर्फे देण्यात येते
आपणांस खालील गोष्टीची आवश्यकता असल्यास आम्ही त्यांची पूर्तता करू
* सनई चौघडा * आचारी * वाढपी * घोडा * उंट * अक्षदा * स्वागतिका पत्रिका * फुलांचे डेकोरेशन * बर्फ डेकोरेशन * सेंट मशीन व भडजी
Products/Services
लग्न समारंभ
विवाह सोहळा हा दोन आत्म्यांचा, कुटुंबांचा आणि सामाजिक कर्तव्यांचा संयोग आहे. धार्मिक मंत्रोच्चार, अग्निसाक्षी फेरे आणि वचनांच्या माध्यमातून वधू - वर जीवनभराच्या सहवासासाठी एकमेकांना स्विकारतात. हा सोहळा केवळ वैयक्तिक संबंधांचा नाही, तर कर्तव्य, प्रेम, आणि सामंजस्य यांचं प्रतीक आहे. या संस्काराला अविस्मरणीय बनवण्याची जिम्मेदारी स्वीकारायला श्री मंगल कार्यालय, लोणार सदैव तत्पर आहे. आपल्या सेवेची एक संधी देऊनच बघा.

हळद समारंभ
हळद समारंभ हा भारतीय विवाहसोहळ्यात महत्त्वाचा विधी आहे, जिथे वधू-वराच्या अंगावर हळद लावली जाते. हळद शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी, आणि सौंदर्याची भरभराट होते. कुटुंबीय आणि मित्रांच्या साक्षीने हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी श्री मंगल कार्यालय, लोणार ची निवड केल्यास राजशाही थाट, स्नेह आणि उत्साहाची अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही.

डोहाळे कार्यक्रम
श्री मंगल कार्यालय, लोणार तुमचा डोहाळे कार्यक्रम अविस्मरणीय बनवण्यासाठी सर्व उत्कृष्ट सोयी-सुविधांसह सुसज्ज आहे. आम्ही आपल्याला एक आनंदमय आणि स्मरणीय अनुभव देण्यास बांधील आहोत, ज्यामुळे आपला कार्यक्रम सुखकर आणि यशस्वीरीत्या पार पाडता येईल.

नामकरण समारंभ
आपल्या श्री मंगल कार्यालय, लोणार येथे नामकरण समारंभासाठी उत्कृष्ट, सुसज्ज आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी व्यवस्था उपलब्ध आहे. आम्ही आपल्या विशेष सोहळ्याला अधिक आनंदमय आणि स्मरणीय बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आपल्याला आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आमची योजना आखतो, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडतो.

साखरपुडा कार्यक्रम
सुसज्ज स्टेज, डेकोरेशनसाठी फुले, लाईट्स, फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी चांगली व्यवस्था, पाहुण्यांसाठी आरामदायक बैठक व्यवस्था, आणि संगीत, जलपान व भोजनाची उत्तम व्यवस्था. साखरपुडा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची तत्पर सेवा हीच श्री मंगल कार्यालय,लोणार ची खासियत आहे.

वाढदिवस समारंभ
वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वात योग्य स्थान म्हणजे श्री मंगल कार्यालय, लोणार कारण इथे आपणांस मिळेल आकर्षक सजावट, वाढदिवसाचा भव्य केक आणि मनपसंत खाद्यपदार्थांची व्यवस्था, चांगली संगीत व्यवस्था, आणि आरामदायक बैठक व्यवस्था. फोटोसाठी विशेष सेल्फि पॉइंट आणि अतीरिक्त सहाय्यक कर्मचाऱ्यांची वर्ग.

स्नेहसंमेलन कार्यक्रम
श्री मंगल कार्यालय, लोणार आपला स्नेहसंमेलन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जसे कि स्वागत, आदरसत्कार, संवाद, मनोरंजन व भोजन कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने पारपाडण्यास कटिबद्ध आहे.

कॉर्पोरेट मीटिंग
आपली कॉर्पोरेट मीटिंग यशस्वी होण्यासाठी श्री मंगल कार्यालय, लोणार पुढील व्यवस्थायुक्त नियोजन करण्यास तत्पर आहे: प्रोजेक्टर, व्हाईटबोर्ड्स, साऊंड सिस्टम, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, बैठकांना अनुकूल असणारी बैठक व्यवस्था, पुरेशी हावा व प्रकाशयुक्त वातावरण, शुद्ध पेयजल, स्वच्छ प्रसाधनगृह, जनरेटर, भव्य पार्किंग व भोजनाची उत्तम व्यवस्था.

Gallery

































