About Us

!! स्वस्थ्य स्वास्थ संरक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम् !!

संजीवनी

हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर


डॉ. सागर सु. आंबेकर

  • M.D. (नाग.) आयु.
  • कन्सल्टींग फिजीशियन, मुळव्याध, भगंदर तज्ञ
  • Reg. No. 1-47771-A
  • वेळ : सकाळी १० ते ४, सायं. ६ ते ८

डॉ. सौ. जागृती सा. आंबेकर

  • M.S. (Shalya)
  • जनरल सर्जन मुळव्याध, भगंदर व स्त्रीरोग तज्ञ
  • रजि. क्रमांक 1-47285-अ
  • वेळ : सकाळी ११ ते ५

उपलब्ध सुविधा...

  • आंतर रुग्णविभाग
  • सुसज्ज ऑपरेशन थिएटर
  • ई.सी.जी. (हृदय रुग्णासाठी)
  • ग्लुकोमीटर (रक्त शर्करा तपासणी)
  • पल्स ऑक्सीमीटर
  • सेन्ट्रल ऑक्सीजन सुविधा
  • मल्टीपॅरा मॉनिटर
  • मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, पॅरालीसीस चिकित्सा
  • शरीरावरील गाठी, स्तनातील गाठी इ. साठी शस्त्रक्रीया व उपचार

मुळव्याध, भगंदर, फिशर

यावर पुढील उपचार...

  • औषधाद्वारे उपचार (Medicine)
  • लेझरद्वारे उपचार (Laser Machine)
  • इंजेक्शनद्वारे उपचार (Sclerotherapy)
  • रबर बॅन्डद्वारे उपचार (Rubber Band)
  • ऑपरेशनद्वारे उपचार (Surgery)
  • क्षारसुत्राद्वारे उपचार

हार्निया, अपेंडीक्स इ. साठी शस्त्रक्रीया व उपचार

मूतखडा, पित्ताशयातील खडे यासाठी औषध उपचार

मुळव्याधीच्या सुरुवातीच्या अवस्थेत औषधोपचार Kit उपलब्ध.

खालील कंपन्यांसाठी कॅशलेश उपचार उपलब्ध 

  • केअर  हेल्थ इन्शुरन्स (Care Health insurance)
  • एस.बी.आय. इन्शुरन्स आरोग्य प्लस पॉलीसी(SBI Insurance Aarogya plus policy)
  • SBI जनरल इंशुरन्स
  • टाटा एआयजी
  • इरिक्सन टिपीए
  • निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स

Products/Services

संजीवनी हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर

संजीवनी हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर

कॅशलेश सुविधा

कॅशलेश सुविधा

संजीवनी हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर

डॉ. सागर सु. आंबेकर

  • M.D. (नाग.) आयु.
  • कन्सल्टींग फिजीशियन, मुळव्याध, भगंदर तज्ञ
  • Reg. No. 1-47771-A

संजीवनी हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर

संजीवनी हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर

डॉ. सौ. जागृती सा. आंबेकर

  • M.S. (Shalya)
  • जनरल सर्जन मुळव्याध, भगंदर व स्त्रीरोग तज्ञ
  • रजि. क्रमांक 1-47285-अ

संजीवनी हॉस्पिटल & ॲडव्हान्स पाइल्स केअर सेंटर

मूळव्याध

मूळव्याध (Piles) :-

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास सौचावाटे रक्तस्त्राव होतो.

मुळव्याध होण्याची कारणे (Causes of Piles) :- मुळव्याध त्रास होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. प्रामुख्याने चुकीचे खानपान, बद्धकोष्ठता, सततचे बैठे काम, कुटुंबात पाईल्सची अनुवंशिकता असणे, प्रेग्नन्सी आणि लठ्ठपणा असल्यास पाईल्सची समस्या होऊ शकते.

मूळव्याधची लक्षणे (Symptoms) :- 

  • मूळव्याध समस्येमध्ये गुदाच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात.
  • गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात.
  • शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो.
  • काहीवेळा शौचातुन रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो. अशी मूळव्याधची लक्षणे असतात.

मूळव्याध

फिस्टुला (Fistula)

फिस्टुला म्हणजे शरीरातील दोन भागांमध्ये अनैसर्गिक मार्ग तयार होणे. हे मार्ग दोन अवयवांमध्ये किंवा शरीराच्या दोन पोकळ्यांमध्ये असू शकतात. गुद्द्वार आणि त्वचा किंवा मूत्रमार्ग आणि मलाशय यांच्यात फिस्टुला होऊ शकतो.

फिस्टुला होण्याची कारणे (Causes) :- फिस्टुला होण्याची मुख्य कारणे म्हणजे जुनाट संसर्ग, गुद्द्वारांच्या आजूबाजूचा एब्सेस, सर्जिकल प्रक्रिया, Crohn's Disease किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दाहक आजार.

फिस्टुलाची लक्षणे (Symptoms) :- 

  •  गुदद्वाराच्या आसपासच्या त्वचेवर सूज येणे, जळजळ, पस बाहेर येणे, तिथे खाज येणे, आणि अस्वस्थता जाणवणे.
  •  दीर्घकाळ ताप येणे, थकवा जाणवणे, आणि अशक्तपणा होणे.

फिस्टुला आजाराचे परिणाम :- फिस्टुला वेळेवर उपचार न केल्यास तीव्र वेदना, आजुबाजू च्या त्वचेला संसर्गहोणे, आणि शरीरातील इतर भागांमध्ये संसर्ग पसरू शकतो.

फिस्टुलाचा उपचार :- लेझर व  क्षारसूत्र उपचार हे फिस्टुलाचा उपचार करण्यासाठी सर्वात सामान्य आणि प्रभावी उपाय आहेत. या उपचाराने शौचाच्या जागेचा ताबा  जात नाही . काही वेळा प्रतिजैविक औषधे आणि इतर उपचारांची आवश्यकता असू शकते.

फिस्टुला (Fistula)

फिशर (Anal Fissure)

फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच आठ आठवड्यानंतरही हा त्रास जाणवत असल्यास त्याला क्रॉनिक प्रकारचा फिशर असे म्हणतात.

फिशरची लक्षणे (Anal Fissure Symptoms) :- 

  • गुदाच्या ठिकाणी चीर पडणे,
  • गुदभागी चीर पडून जखम झाल्याने तेथे वेदना होणे,
  • गुदातून रक्त जाणे,
  • गुदभागी बारीक फोड जाणवणे,
  • गुदभागी आग, जळजळ व खाज होणे अशी लक्षणे फिशरमध्ये जाणवतात.

फिशर होण्याची कारणे (Causes) :-

  • फिशरची समस्या होण्यासाठी बद्धकोष्ठता हे प्रमुख कारणे असते. नियमित पोट साफ न झाल्याने मलाचा खडा धरत असतो आणि शौचावेळी घट्ट झालेला मल बाहेर येताना गुदावर अधिक ताण पडतो. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी चिरा पडून फिशरची समस्या सुरू होते.
  • याशिवाय अतिसार, इन्फ्लामेट्री बोवेल डिसीज (IBD), Crohn’s डिसीज, अल्सरेटिव कोलाइटिस, Syphilis, गुद भागातील अपुरा रक्तपुरवठा, प्रेग्नन्सी, गुदाचा कर्करोग, जास्त टाईट अंडरवेअर किंवा पॅन्ट वापरल्याने, अधिकवेळ एकचठिकाणी बसणे, दुचाकीवरून अतिप्रवास करणे अशा कारणांमुळेही ही समस्या होत असते.

फिशर (Anal Fissure)

लेझर शस्त्रक्रिया

फिस्टुला, फिशरमूळव्याधांसाठी लेझर शस्त्रक्रिया :-  ही एक आधुनिक आणि कमी त्रासदायक प्रक्रिया आहे. यात स्कालपेलच्या ऐवजी विशेष प्रकाश किरणांचा वापर करून मूळव्याधाच्या गाठी काढल्या जातात. विविध प्रकारच्या लेझरचा वापर केला जातो, ज्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि जलद होते.

लेझर सर्जरीचे फायदे :-

  • अक्षरश: वेदनारहित उपचार.
  •  रक्तस्त्राव  लवकर थांबतो.
  • हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही.
  • उच्च यश दर 
  • जलद पुर्नप्राप्ती.
  • रुग्ण 24 तासांच्या आत घरी जाऊ शकतो.

लेझर शस्त्रक्रिया

इंजेक्शन थेरपी

इंजेक्शन थेरपी :- एक साधी आणि प्रभावी प्रक्रिया आहे. यात मूळव्याधाच्या गाठींमध्ये विशेष औषधाचे इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे गाठ सुकून लहान होते. हे उपचार वेदनारहित असून शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. रुग्णालयात राहणे आवश्यक नसल्याने हे उपचार जलद आणि सुरक्षित मानले जातात.

इंजेक्शन थेरपीचे फायदे  :-

  • रक्तस्त्राव  लवकर थांबतो. 
  • अक्षरश: वेदनारहित उपचार.
  • हॉस्पिटलायझेशनची आवश्यता नाही.
  • दररोज ड्रेसिंगची आवश्यक नाही.
  • उच्च यश दर.
  • Early Recovery.
  • रुग्ण 24 तासांच्या आत घरी जाऊ शकतो.

इंजेक्शन थेरपी

रबर बॅन्डद्वारे उपचार

बॅरन बँड ऍप्लिकेशन :- हा मूळव्याध उपचारांचा एक साधा आणि कमी त्रासदायक प्रकार आहे. यात, मूळव्याधाच्या गाठीच्या मुळाशी रबर बँड लावला जातो, ज्यामुळे त्या गाठीचा रक्तपुरवठा थांबतो. काही दिवसांत गाठ सुकून पडते. ही प्रक्रिया जलद, प्रभावी, आणि सामान्यत: रुग्णालयात राहण्याची गरज नसलेली असते.

रबर बॅन्डद्वारे उपचार

पाइल्स, फिस्टुला आणि फिशर यावर ऑपरेशन द्वारे उपचार

पाइल्स, फिस्टुला आणि फिशर यांच्या शस्त्रक्रियात्मक उपचारांचे महत्त्व खूप वाढले आहे कारण हे विकार जास्त त्रासदायक आणि वेदनादायक असू शकतात. शस्त्रक्रियेने हे विकार कायमस्वरूपी बरे करता येतात, त्यामुळे पुन्हा त्रास होण्याची शक्यता कमी असते. शस्त्रक्रियेचे फायदे म्हणजे जलद बरे होणे, दीर्घकाळ आराम मिळणे आणि दैनंदिन जीवनात होणाऱ्या व्यत्ययांना आळा घालणे. या उपचारांमुळे रुग्णाला वेदनांपासून आणि इतर गुंतागुंतीच्या समस्या जसे रक्तस्राव, संक्रमण यापासून मुक्ती मिळते, ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारते.

पाइल्स, फिस्टुला आणि फिशर यावर ऑपरेशन द्वारे उपचार

मधुमेह

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.

मधुमेह किंवा डायबेटीसमध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही किंवा इन्सुलिनचा वापर करण्यासाठीची यंत्रणा असमर्थ ठरते. यामुळे मधुमेहात रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण वाढते.

मधुमेहाची लक्षणे (Diabetes symptoms) :

वारंवार लघवीला जावे लागणे,
वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
अचानकपणे वजन घटणे,
अशक्तपणा,चक्क येणे,
अधिक भूक लागणे,
हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

मधुमेह

उच्च रक्तदाब

स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब (Hypertension) असे म्हणतात.

अतिरक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने याला Silent Killer असेही संबोधले जाते. कारण उच्च रक्तदाब छुप्या स्वरुपात बराच काळ राहिल्यास आपले हृद्य, किडन्या (मुत्रपिंडे), डोळे, मेंदू या अवयवांवर घातक परिणाम होतो त्यामूळे ,हृद्यविकाराचा झटका येणे, किडन्या निकामी होणे, दृष्टी जाणे, पक्षाघात यासारखे गंभीर विकार रक्तदाबामूळे उत्पन्न होतात.

उच्च रक्तदाबाची कारणे (High blood pressure causes) :

‎मिठाचा आहारातील अधिक वापर,
स्थूल शरीर
व्यायामाचा अभाव. बैठ्या आरामदायी जीवनशैलीमुळे,
सिगरेट, तंबाखू, दारूचे व्यसन,
मानसिक ताणतणाव, अपुरी झोप, अपुरी विश्रांती

उच्च रक्तदाब

हृदयविकार

कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक (risk factors) :

वयाच्या 25 वर्षानंतरच्या व्यक्ती,
Fatty Body‎,धमनीकाठिन्यता, High BP, हाय ब्लड कोलेस्टेरॉल, मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये,
‎हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे, कुटुंबातील आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो.
‎Smoking, Alcohole Consumption, तंबाखु, अमली पदार्थ इ. च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.

हार्ट अटॅकची लक्षणे (Heart attack symptoms) :

छातीत दडपल्यासारखे वाटते,
‎छातीत दुखायला लागते,
‎छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
‎बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
‎अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
‎अशक्तपणा जाणवणे,
‎उलटी किंवा मळमळ होणे,
‎चक्कर येणे,
‎दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
‎श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

हृदयविकार

पक्षाघात - Paralysis

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते.

पक्षाघाताची लक्षणे (Paralysis symptoms) :

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
* एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
* ‎हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.
* ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
* ‎अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
* ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
* ‎चक्कर येणे, तोल जाणे,
* चेतना कमी होणे
* तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

पक्षाघात होण्याची सहाय्यक कारणे :

High BP, Heart Problems, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेहाचे प्रमाण  मधुमेहाचे प्रमाण  जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये पक्षाघाताचा अधिक धोका संभवतो.

पक्षाघात - Paralysis

Gallery

Videos

Rate Us

Contact Us