About Us

समर्थ डेन्टल क्लिनीक

"Crafting Confident Smiles."

वेळ:- सकाळी १० ते ५ & संध्याकाळी ६ ते ९



डॉ. शिवाजी कचरे

  • B.D.S. (Dental Surgeon)
  • Reg No.: A-26900.

उपलब्ध सुविधा :

  • मुख रोग तपासणी.
  • डिजीटल एक्स-रे
  • सिंगल सिटींग रुट कॅनल ट्रीटमेंट
  • फुल माऊथ रिहॅबीलिटेशन (झिजलेल्या / खराब सर्व दातांचे पुनर्वसन)
  • दात काढणे व फिक्स दात बसविणे.
  • अक्कल दाढ काढणे व शस्त्रक्रिया करणे.
  • मशिनद्वारे दात साफ करणे.
  • पूर्ण व अंशतः कवळी बसविणे.
  • वेडेवाकडे दात सरळ करणे.
  • कृत्रिम दंतरोपण करणे.
  • लहान मुलांच्या दातांचे निदान व उपचार.
  • हिरड्यांचे आजार व त्यावरील उपाय

Products/Services

समर्थ डेन्टल क्लिनीक

डॉ. शिवाजी कचरे

  • B.D.S. (Dental Surgeon)
  • Reg No.: A-26900.

समर्थ डेन्टल क्लिनीक

डेंटल इम्प्लांट

"दातांचा इम्प्लांट" म्हणजे धातूचा स्क्रू जो जबड्यात ऑपरेशन करून बसवला जातो. हा इम्प्लांट दात नसलेल्या जागेवर फिक्स करून त्यावर कृत्रिम दात किंवा क्राउन बसवला जातो. हा उपचार मिसिंग झालेल्या दातांची जागा भरण्यासाठी आणि दातांची कार्यक्षमता आणि सौंदर्य सुधारण्यासाठी वापरला जातो. इम्प्लांच्या सह्याने लावलेला दांत दीर्घकाल टिकणारा आणि नैसर्गिक दातासारखा असतो.

डेंटल इम्प्लांट

इम्प्लांटच्या सहाय्याने फुल माउथ रिहॅबिलिटेशन

"फुल माउथ रिहॅबिलिटेशन" म्हणजे तोंडाच्या संपूर्ण दातांची पुनर्बांधणी / पुनर्वसन करणे. यामध्ये  विशेषत: किडलेल्या, झिजलेल्या दांताचे उपचार करून चावण्याची प्रणाली व जबड्याच्या कार्यक्षमतेचा समावेश असतो. हे आवश्यक असते जेव्हा दातांमध्ये गंभीर समस्या, अपघात, किंवा दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्यामुळे तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो. याचे फायदे म्हणजे चांगले दातांचे आरोग्य, सुधारलेली चावण्याची क्षमता, सौंदर्यदृष्ट्या आकर्षक स्माईल, व एकूण जीवनमानात सुधारणा होन्यास मदत होते.

इम्प्लांटच्या सहाय्याने फुल माउथ रिहॅबिलिटेशन

इम्प्लांटच्या सहाय्याने फिक्स कवळी बसविणे

आंशिक आणि पूर्ण कृत्रिम दात हे दात गमावलेल्या लोकांसाठी बनवलेले कृत्रिम दात आहेत. आंशिक कृत्रिम दात काही दातांच्या गमावल्या जागी काढ-घाल करता येणारे कृत्रिम दात संपूर्ण तोंडात बसवले जातात. यामुळे अन्न चावण्यास, बोलण्यास मदत होते, चेहऱ्याचे स्वरूप सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो. ते तोंडाचे आरोग्य टिकवण्यास मदत करतात आणि जीवनमान उंचावतात.

इम्प्लांटच्या सहाय्याने फिक्स कवळी बसविणे

रूट कॅनाल ट्रिटमेंट

"रूट कॅनाल ट्रिटमेंट" म्हणजे दाताच्या आतिल सजीव भागातील संसर्ग किंवा इजा झालेल्या भागाचे उपचार. या प्रक्रियेत, दाताच्या आतल्या नरम भाग (पलप) ला काढून, त्या जागेची स्वच्छता करून, कृत्रिम नस व पक्के सिमेंट टाकून त्यावर मेटल / सिरामिक किंवा झिरकोनियमची कॅप बनवली जाते म्हणजे तो दात नैसर्गिक दातासारखेच काम करतो.

रूट कॅनाल ट्रिटमेंट

अक्कलदाढ काढणे

"अक्कलदाढ काढणे" ही एक शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये अडकलेले, विसंगत किंवा वेदना व समस्या निर्माण करणारे अक्कलदाढीचे दात काढले जातात. हा उपचार स्थानिक किंवा सर्वसाधारण भूल देऊन केला जातो, ज्यामुळे वेदनारहित अनुभव मिळतो. हा उपचार संसर्ग, सूज, हिरड्यांचे आजार आणि इतर दातांचे नुकसान टाळून दीर्घकालीन आरोग्य आणि आराम सुनिश्चित करतो.

अक्कलदाढ काढणे

दंत व्यंगोउपचार (वेडेवाकडे दात सरळ करणे)

"ऑर्थोडोंटिक (दंत व्यंग) उपचार" हा दातांची  रचना जसे - वेडेवाकडे, समोर आलेले, गॅप असलेले दात तार लाऊन सरळ करण्यासाठी असते. या उपचारांमध्ये ब्रेसिस, अलाइनर्स, आणि इतर उपकरणांचा वापर होतो. यामुळे दात सरळ होतात, चावण्याची क्षमता सुधारते, दातांची स्वच्छता सुलभ होते, आणि सौंदर्यदृष्ट्या चेहऱ्याचे आकर्षण वाढते. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि दंत आरोग्य सुधारते.

दंत व्यंगोउपचार (वेडेवाकडे दात सरळ करणे)

काॅस्मेटिक डेंटिस्ट्री

"कॉस्मेटिक दंतचिकित्सा" म्हणजे दातांचे स्वरूप सुधारण्यासाठी केलेले उपचार. यात दात पांढरे करणे, व्हीनीयर, दातांची पुनर्बांधणी आणि दातांची रचना सुधारणे यांचा समावेश होतो. या उपचारांमुळे स्मित अधिक आकर्षक होते, आत्मविश्वास वाढतो, आणि दातांचे आरोग्य सुधारते आणि संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते.

काॅस्मेटिक डेंटिस्ट्री

लेझर दंतचिकित्सा

"लेझर दंतचिकित्सा" ही केंद्रित प्रकाश किरणांचा वापर करून अचूक दंत उपचार करणारी आधुनिक पद्धत आहे. या तंत्रज्ञानामुळे वेदना, रक्तस्राव आणि सूज कमी होते. दातांची कॅव्हिटी काढणे, हिरड्यांचे आकार सुधारणे आणि दात साफ/पांढरे करणे यासारख्या उपचारांमध्ये ही पद्धत उपयुक्त ठरते. यामुळे भूल कमी काळासाठी द्यावी लागते, हेलिंगस् वेगाने भरून येतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो. पारंपरिक दंत उपचारांच्या तुलनेत ही पद्धत अधिक सोयीस्कर आणि प्रभावी आहे.

लेझर दंतचिकित्सा

ओरल प्रोफिलॅक्सिस

"ओरल प्रोफिलॅक्सिस" म्हणजे दात व तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी केलेली सफाई. यात दातांची डीप क्लीनिंग, पॉलिशिंग, आणि टार्टर काढणे यांचा समावेश होतो. या प्रक्रियेमुळे गम रोग, दातांचे पोकळ्या, आणि दुर्गंधी टाळता येते. दातांचे आरोग्य सुधारते, तोंडातील स्वच्छता वाढते, आणि एकूणच तोंडाच्या आरोग्याचे रक्षण होते.

ओरल प्रोफिलॅक्सिस

Payment

Account Details
Account Name
Account Number
IFSC Code
Bank Name Union Bank of India
Bank Branch
Account Details
Account Name Samarth dental clinic
Account Number 323001010035255
IFSC Code
Bank Name Union Bank of India
Bank Branch

Gallery

Rate Us

Contact Us