About Us

साई नेत्रालय

व लेजर सेन्टर

"स्पष्ट दृष्टी, समृद्ध जीवन."


साई नेत्रालय व लेजर सेंटर, सोमेश कॉलनी, नांदेड. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रगत यंत्रसामग्री आणि अनुभवी वैद्यकीय सेवा यांच्या माध्यमातून दर्जेदार नेत्रोपचार दिले जातात. अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णकेंद्रित, विश्वासार्ह व सुरक्षित उपचारांची हमी दिली जाते. काळजीवाहू कर्मचारीवर्ग आणि उत्कृष्ट सेवेमुळे प्रत्येक रुग्णाला समाधानकारक उपचारांचा अनुभव मिळऊण देण्यास आम्ही तत्परआहोत.

उपलब्ध सुविधा -

  • NABH Certified Hospital
  • फेको मशीनद्वारे बिन टाक्याची व बिना इंजेक्शनची
  • फेको शस्त्रक्रिया व फोल्डेबल लेन्स (Foldable IOL)
  • मल्टीफोकल लेन्स (Multifocal)
  • टॉरीक लेन्स (Toric Lens)
  • Yag Laser शस्त्रक्रिया
  • काचबिंदु निदान व शस्त्रक्रिया
  • Zeiss Perimeter 740i-Germany द्वारे Field Analysis
  • Gonioscopy, Applanation Tonometry
  • 90D Examination, Disc Photography
  • Trab, Phaco Trab, Triple Procedure
  • OCT (Huvitz) - Retinal Scanning, Glaucoma, Topography & Pachymetry
  • Fundus Camera (Japan)
  • Retinal Photography, Angiography & Laser Photocoagulation (Green Laser)
  • ऑपरेटींग मायक्रोस्कोप (Zeiss Germany)
  • Optical Scan (Nidek - Japan)
  • इनडायरेक्ट ऑफॉलमोस्कोपी (Heine-Germany) द्वारे नेत्रपटल तपासणी व लेजर उपचार
  • ऑकुलोप्लास्टी
  • Slit Lamp Biomicroscopy
  • Phakic IOL, ICL
  • Corneal Cross Linking For Keratoconus
  • 24 तास तातडीची सेवा

तपासणीची वेळ : स. 9.30 ते 2.30 व सायं. 6.00 ते 8.30 रविवार बंद

Products/Services

साई नेत्रालय व लेजर सेन्टर

NABH Certified Hospital

"स्पष्ट दृष्टी, समृद्ध जीवन."

साई नेत्रालय व लेजर सेन्टर

साई नेत्रालय व लेजर सेन्टर

डॉ. रवी अग्रवाल

  • M.S. (OPhth.) F.A.E.H. (Madurai)
  • Fellow - Arvind Eye Hospital, Madurai
  • Reg. No.: 67936

डॉ. आर. के. अग्रवाल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून एम.बी.बी.एस. व एम.एस. (नेत्ररोग) पदवी संपादन केली आहे.

त्यांची देशातील प्रतिष्ठित अरविंद आय हॉस्पिटल, मदुराई येथे अँटेरियर सेगमेंट व आय.ओ.एल. फेलोशिपसाठी निवड झाली होती.

ते टॉपिकल फेको शस्त्रक्रियेमध्ये (बिना इंजेक्शन, बिना टाका, बिना पट्टी) विशेष प्राविण्य प्राप्त नेत्रतज्ज्ञ आहेत.

मल्टिफोकल, ट्रायफोकल, ई.डी.ओ.एफ. तसेच टोरिक आय.ओ.एल. प्रत्यारोपणामध्ये त्यांना विशेष कौशल्य आहे.

ते नांदेड ऑप्थॅल्मिक सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदांमध्ये त्यांनी अनेक संशोधनपर शोधनिबंध सादर केले आहेत.

साई नेत्रालय व लेजर सेन्टर

कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी

डोळ्याची कॉम्प्युटरद्वारे तपासणी म्हणजे संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने दृष्टीदोष, नंबर, कॉर्निया, रेटिना, डोळ्याचा दाब व इतर विकारांचे अचूक निदान करण्याची आधुनिक पद्धत.

यात ॲटो रिफ्रॅक्टो मिटर, स्लिट लॅम्प बायो मायक्रोस्कोपी, इमरशन बायोमेट्री, ऑटो लेन्सो मीटर यासारखे उपकरणे वापरली जातात. तपासणी जलद, वेदनारहित व अचूक परिणाम देणारी असते.

कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी

मोतीबिंदुची बिनटाक्याची अद्ययावत फेको शस्त्रक्रिया (PHACO)

मोतीबिंदू हा वयापरत्वे शरीरात घडून येणाऱ्या इतर बदलांसारखाच आहे. उदा. केस पांढरे होणे. शिवाय मधुमेह, मार लागणे किंवा काही आजारांमुळे किंवा जन्मजातही असू शकतो.

लक्षणे : पेशंटला दूरचे अंधुक दिसू लागते, वाचण्यास त्रास होतो, प्रखर प्रकाशाभोवती सप्तरंगी वलय दिसू शकते इत्यादी.

उपचार : मोतीबिंदूला ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही.

शस्त्रक्रियेचा प्रकार :

एक टाक्याची शस्त्रक्रिया दुसरी बिनाटाक्याची शस्त्रक्रिया, टाक्याची शस्त्रक्रिया आता जवळपास कालबाह्य होत आहे. त्यात पेशंटला जास्त दिवस आराम करावा लागतो, डोळ्यात जास्त दिवस त्रास होतो तसेच दृष्टीही पूर्णपणे समाधानकारक येत नाही. बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया ह्या दोन प्रकारच्या असतात. SICS (Small Incision Cataract Surgery) म्हणजे मशीनचा वापर न करता केलेल्या शस्त्रक्रिया. दुसरा प्रकार म्हणजे फेको मशीनने केलेल्या बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया ! (Phaco Surgery)!

या फेको शस्त्रक्रिया सध्याच्या परिस्थितीत अत्याधुनिक आहेत. फेको मशीनच्या साह्याने (Alcon Legion - Ozil Technology) फेकोचा थंड स्रोत (Cold Phaco) चा वापर केला जातो. फेको शस्त्रक्रियेत मोतीबिंदु पिकण्याची आवश्यकता नाही व छेद खूप छोटा असतो, दृष्टी जास्त येते, कामावर लवकर परत जाता येते तसेच चष्मा जवळपास लावावाच लागत नाही किंवा लागल्यास खूप कमी नंबरचा लागतो.

मोतीबिंदुची बिनटाक्याची अद्ययावत फेको शस्त्रक्रिया (PHACO)

काचबिंदु (GLAUCOMA - The Silent Killer of the Eye)

डोळ्यामध्ये सतत पाणी तयार होत असते आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी वेगवेगळ्या मार्गानी निघून जात असते. पण काही कारणांनी जर हे पाणी निघुन जाण्याची प्रक्रीया मंदावली तर आतील दाब वाढतो ह्यालाच आपण काचबिंदु (Glaucoma) असे म्हणतो. दाब (IOP) वाढझाल्यामुळे नस (Optic Nerve) कमजोर होत जाते व फिल्ड डिफेक्ट यायला लागतात ह्यालाच आपण काचबिंदू झाला असे म्हणतो.

  • - वाचनासाठी चष्मा वारंवार बदलावा लागणे, डोके दुखणे, डोळे जड वाटणे, काळे धब्बे दिसणे (Field Defects),
  • - इंद्रधनुष्यासारखे रंग दिसणे (Coloured Halos)

खालील तपासण्या नेत्रतज्ज्ञांकडून करून घेणे चांगले -

  • डोळ्याच्या पूर्ण तपासणी बरोबर (Intra Ocular Pressure) मोजणे (अप्लानेशन टोनोमेट्री)
  • OCT (Optical Coherence Tomography) ह्या अत्याधुनिक मशिन द्वारे डोळ्याचे लेजर किरणांद्वारे स्कॅनिंग करणे व दृष्टीपटलाच्या प्रत्येक लेअरची जाडी (Nerve Fibre Layer Thikness- RNLF) मोजने व त्याप्रमाणे
  • काचबिंदूचे लक्षणे सुरु होण्या अगोदर काचबिंदूचे निदान करते (Pre Glaucoma Stage).
  • Gonioscopy डोळ्याच्या आतून जिथुन पाण्याचा निचरा होतो (Angle of A.C.) त्या जागेची मशीनद्वारेतपासणी.
  • 78 D लेन्स व 90 D लेन्सद्वारे डोळ्याची ऑप्टीक नर्व्ह (नस) तपासणी.
  • ॲटोमेटेड फिल्ड ॲनालिसीस करणे (नस) तपासणी.

काचबिंदु  (GLAUCOMA - The Silent Killer of the Eye)

डोळ्याची सोनोग्राफी

डोळ्याची सोनोग्राफी (Ocular Ultrasound) म्हणजे अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाच्या मदतीने डोळ्याच्या आतील रचना तपासण्याची सुरक्षित व वेदनारहित प्रक्रिया. यात उच्च वारंवारतेच्या ध्वनिलहरी वापरून डोळ्याचा मागचा भाग, रेटिना, व्हिट्रियस, ऑप्टिक नर्व्ह व डोळ्याभोवतीच्या संरचना स्पष्ट दिसतात.

या तपासणीची गरज मोतीबिंदूमुळे डोळ्याची पारदर्शकता कमी झालेली असताना, रेटिनाचे आजार, डोळ्यातील गाठी, रक्तस्राव, डिटॅचमेंट किंवा दुखापत ओळखण्यासाठी भासते.

याचे फायदे म्हणजे अचूक निदान मिळणे, योग्य उपचारयोजना आखणे, शस्त्रक्रियेपूर्वी डोळ्याची स्थिती समजणे व गुंतागुंत टाळणे. ही प्रक्रिया सुरक्षित, जलद व सर्व वयोगटातील रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

डोळ्याची सोनोग्राफी

ॲटोमेटेड फिल्ड ॲनालिसीस (Perimetry)

Humphery Field Analyser (Zeiss Germany) हे फिल्ड ऑफ व्हिजन (दृष्टीक्षेप) तपासणीची सर्वात अत्याधुनिक उपकरण आहे. ही दृष्टीक्षेत्राची तपासणी आहे ज्यात तुमच्या संपूर्ण दृष्टीक्षेपाचा एक नकाशा तयार केला जातो. ज्यामुळे आजाराचा तुमच्या दृष्टीवरील परिणाम शोधण्यास मदत होते.

काचबिंदुचे लक्षणे समजण्या अगोदर काचबिंदूचे निदान करणे शक्य होते. शिवाय काचबिंदु निदान झालेले असेल तर त्या आजाराची प्रगत (Progress of Glaucoma) कळते. तसेच मेंदुतील काही विशिष्ट आजारांच्या परिणामाच्या तपासणीसाठीही ह्याचा उपयोग होतो.

ॲटोमेटेड फिल्ड ॲनालिसीस (Perimetry)

डायबेटीक रेटीनो पॅथी (DIABETIC RETINOPATHY)

रक्तातील साखर प्रमाणाबाहेर वाढल्याने डोळा, किडनी व हृदय अशा जवळजवळ सर्व महत्त्वाच्या अवयवांवर मधुमेहामुळे दुष्परीणाम होऊ शकतो. सामान्य लोकांपेक्षा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये नेत्र विकारांचे प्रमाण खुप जास्त असते. मेदद्रव्याचे आहारातील वाढते प्रमाण बदललेली जीवन व्यवस्था त्याजोगे बैठे काम करण्याची वाढलेली प्रवृती, नियमीत व्यायामाचा अभाव आणि वाढलेले वजन या घटकांमुळे मधुमेहापासून होणाऱ्या गुंतागुंतीस मदत होते.

मधुमेहामुळे मोतीबिंदु, वारंवार चष्म्याचा नंबर बदलणे, रांजनवाडी येणे, नेत्रपटलवारी रक्तवाहिन्या बंद पडणे नेत्रपटलावर मेद (CRVO/BRVO), आणि रक्त उतरल्याने सुज व दृष्टी कमी होणे.

Stages of Diabetic Retinopathy -

  • Background D R (BDR)
  • Macular Edema / CSME
  • NPDR
  • PDR

Retinal Examination -

  • Slit Lamp Biomicroscopy
  • Retinal Laser Scaning
  • Fluorescein Angiography
  • B Scan

डायबेटीक रेटीनो पॅथी (DIABETIC RETINOPATHY)

लेजर उपचार

डायबेटीक रेटिनोपॅथीवर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. अँजिओग्राफी केल्यानंतर लेजर उपचार करावा किंवा नाही याचा निर्णय होतो. लेसर किरणांच्या उपचारामुळे डोळ्याच्या पडद्यावरील रक्तवाहिन्यांचे दोष आटोक्यात ठेवण्यास मदत होते. नविन रक्तवाहिन्यांचे जाळे सुकवणे, पीतबिंदुची सुज कमी करणे किंवा वारंवार होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी प्रामुख्याने लेजरचा उपयोग होतो. लेजर मशीन द्वारे लेजर किरणांचा थंड स्रोताद्वारे नेत्रपटलावर शेक दिला जातो.

या उपचार पद्धतीने मधमेहातील अंतरपटलावरील लागन पुर्ण बरी होत नसुन ती आटोक्यात ठेवता येते. ज्यावेळी ही पुर्ण उपचार पद्धती करूनही वारंवार रक्तस्त्राव होतो किंवा पडदा फाटतो तेव्हा शस्त्रक्रीया (Vitrectomy /RD Surgery) करण्याची गरज भासते.

लेजर उपचार

लहाण मुलांचे नेत्रविकार व तिरळेपणासाठी शस्त्रक्रिया (SQUINT)

लहान मुलांमध्ये डोळ्यांचे काही नेहमी आढळणारे विकार म्हणजे डोळे तिरळे होणे (Squint), दूर किंवा जवळ दिसण्यात अडचण, आळशी डोळा (Lazy Eye), जन्मजात मोतीबिंदू, डोळ्यांना पाणी येणे इत्यादी. यापैकी तिरळेपणा म्हणजे दोन्ही डोळे एका दिशेला न पाहणे.

लहाण मुलांचे नेत्रविकार व तिरळेपणासाठी शस्त्रक्रिया (SQUINT)

नासुरची शस्त्रक्रिया (PROBIN, DCR & ENDONASAL DCR)

नासुरची शस्त्रक्रिया म्हणजे डोळ्यापासून नाकापर्यंत असलेल्या नलिकेत (Lacrimal Duct) अडथळा किंवा संसर्ग दूर करण्यासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया. यात Probing द्वारे नलिका मोकळी केली जाते, DCR (Dacryocystorhinostomy) मध्ये नाकाशी नवीन मार्ग तयार करून अशुद्ध पाणी बाहेर काढले जाते, आणि Endonasal DCR मध्ये नाकाच्या आतून आधुनिक सूक्ष्म तंत्र वापरून शस्त्रक्रिया केली जाते.

उपचार करणे आवश्यक आहे कारण अडथळ्यामुळे डोळे सतत पाणावतात, डोळ्याभोवती सूज व संसर्ग होतो. शस्त्रक्रियेमुळे डोळ्याचे आरोग्य टिकते, वेदना कमी होतात, दृष्टीला धोका टळतो व दैनंदिन कामे सहज करता येतात.

नासुरची शस्त्रक्रिया (PROBIN, DCR & ENDONASAL DCR)

ऑकुलोप्लास्टी सर्जरीज

डोळ्यांच्या पापण्यांच्या विविध शस्त्रक्रिया

ऑकुलोप्लास्टी सर्जरीज

Gallery

dfgzdf
Hccjgd

Rate Us

Contact Us