About Us

रविदीप
मॅटर्निटी होम

"संपूर्ण स्त्रीआरोग्यासाठी विश्वासार्ह सेवा – प्रसूती, स्त्रीरोग आणि लॅपरोस्कोपी उपचार तुमच्यासाठी!"

तपासणी वेळ : 9 am ते 8 pm

रविवार - सकाळी 10 ते 2

रविदीप मॅटर्निटी होम हे स्त्रीरोग व प्रसूती क्षेत्रातील अत्याधुनिक उपचार सेवा देण्यासाठी ओळखले जाते. आमचा प्राथमिक उद्देश प्रत्येक महिलेला तिच्या जीवनातील विविध टप्प्यांवर सुरक्षित आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा देणे हा आहे. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन आम्ही गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, तसेच वंध्यत्वावर व्यापक उपचार देतो. आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षित आणि वेदनारहित शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. आम्ही उच्च जोखमीच्या प्रसूती आणि वंध्यत्व उपचारांमध्ये उत्कृष्टतेचा ध्यास घेतला आहे. समर्पित वैद्यकीय तज्ञांच्या टीमद्वारे प्रत्येक रुग्णाला वैयक्तिकृत उपचार मिळावेत याची आम्ही खात्री देतो. स्त्रीरोग शस्त्रक्रिया आणि वंध्यत्व उपचार क्षेत्रात रविदीप मॅटर्निटी होम  "स्त्रीशक्तीच्या आरोग्याची विश्वासार्ह साथ" देण्यास तत्पर आहे.

डॉ. सौ. प्रमिला रविंद्र सोळंकी

  • MBBS, MD.
  • स्त्रीरोग तज्ञ, गायनेकोलॉजिस्ट
  • V.M.M.C. Solapur : M.D. Gyn.
  • Hedgewar Hospital : Clinical Assistant
  • Govt. Medical Collage Chh. S. Nagar : Lecturer
  • Hinduja Hospital Mumbai : Clinical Assistant
  • Deepak Hosp. Jalna : Consultant
  • At Buldhana : 14 Year's Private Practice


OUR SERVICES : -

OBSTETRICS :

  • Pre Conceptional Counselling 
  • (गर्भधारणा पूर्व तपासणी व सल्ला)
  • Complete Pregnancy Care (ANC)   
  • (गर्भावस्थानिदान व प्रसुती पूर्व तपासणी व उपचार)
  • Post Pregnancy Care   
  • (प्रसुती पश्चात तपासनी व उपचार)
  • High Risk Pregnancy 
  • (गरोदरपणातील रक्तदाब, मधुमेह थायरॉईड, कावीळ यावर उपचार)
  • Fetal NST (बाळाचे ठोके तपासणी)
  • Painless Labour ( वेदनारहित प्रसुती)
  • Normal Vaginal Delivery (नैसर्गिक प्रसुती)
  • Caesarean Section Delivery (सीझेरियन प्रसुती)

 GYNAECOLOGY :

  • Adolescent Clinic
  • (वयात येणाऱ्या मुला मुलींना मार्गदर्शन)
  • Pre marriage Counselling
  • (विवाहपूर्व समुपदेशन व मार्गदर्शन)
  • Contraception Counselling and Family Planning Clinic
  • (गर्भनिरोधक व कुटुंब नियोजन)
  • Menopause Clinic
  • (रजोनिवृत्ती चिकित्सा)
  • Menstrual problem & Uterine Bleeding
  • (मासिक पाळीचे आजारांवर उपचार)
  • Vaccination (HPV, Rubella, Swine Flu, Tetanus) 
  • (लसीकरण)
  • Cervical Cancer Screening & Pap Smear 
  • (गर्भाशयमुख कर्करोग पासणी)
  • Abdominal & Vaginal  Hysterectomy 
  • (गर्भपिशवी काढणे)

♦️काॅल्पोस्कोपी

♦️सरकार मान्यताप्राप्त गर्भपात क्लिनिक

Products/Services

रविदीप मॅटर्निटी होम

"संपूर्ण स्त्रीआरोग्यासाठी विश्वासार्ह सेवा – प्रसूती, स्त्रीरोग आणि लॅपरोस्कोपी उपचार तुमच्यासाठी!"

रविदीप मॅटर्निटी होम

काॅल्पोस्कोपी

काॅल्पोस्कोपी ही एक वैद्यकीय तपासणीची पद्धत आहे ज्याद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्विक्स) आणि योनीच्या आतील भागाचे बारकाईने निरीक्षण केले जाते. यासाठी काॅल्पोस्कोप नावाचे यंत्र वापरले जाते, ज्यामध्ये प्रकाश आणि लेंसचा वापर करून डॉक्टर सर्विक्स आणि योनीच्या भागाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करतात. ही तपासणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची किंवा त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतील बदलांची लवकर ओळख करून त्यावरील उपचार करण्यासाठी उपयुक्त असते.

काॅल्पोस्कोपीचे फायदे : गर्भाशयाच्या मुखावरील असामान्य पेशींची लवकर ओळख करून त्यावरील वेळीच उपचार होऊ शकतात, कर्करोगाचा धोका कमी होतो, आणि या तपासणीमुळे बायोप्सी घ्यायला मदत होते, ज्यामुळे अचूक निदान करता येते.

काॅल्पोस्कोपी

अल्ट्रासोनोग्राफी

गरोदरपणात गर्भाची कमीत कमी ४ वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार सोनोग्राफीचा गर्भावर कोणाताही दुष्परिणाम होत नाही. कलर डॉप्लर सोनोग्राफी आवश्यक असेल तरच करावी. सोनोग्राफीमुळे खालील माहिती मिळते.

पहिली सोनोग्राफी: शेवटच्या पाळीच्या तारखेपासून ०८ आठवड्यात म्हणजेच २ महिन्याच्या आत.

  • गर्भ हा गर्भाशयातच वाढ आहे का ?
  • गर्भाची वाढ
  • एका पेक्षा जास्त गर्भ
  • द्राक्षगर्भ / निर्जीव गर्भ

दुसरी सोनोग्राफी (NT Scan) : शेवटच्या पाळीच्या तारखेपासून 13  आठवडे व 6 दिवसात म्हणजेच तिसऱ्या महिन्यात 

  • गर्भाची वाढ 
  • गर्भाला मतिमंदता (Down Syndrome) याचे निदान करणरी Sonography
  • गर्भामध्ये काही व्यंग (NT Scan)

तिसरी सोनोग्राफी (Anomaly Scan): 18 ते 22 आठवड्यांपयंत (५ व्या महिन्यामध्ये)

  • गर्भाची वाढ
  • गर्भामध्ये काही व्यंग
  • गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
  • गर्भाशयातील वारेची (Placenta) स्थिती

चौथी सोनोग्राफी: शेवटच्या पाळीपासून 28 ते 36 आठवड्यांपर्यंत (9 व्या महिन्यात).

  • गर्भाची वाढ
  • गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
  • गर्भाला होणारा रक्त पुरवठा कलर डॉप्लर सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार)

अल्ट्रासोनोग्राफी

स्त्री वंध्यत्व

गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे :

  • स्त्री-प्रजनन अवयवांतील दोष,
  • PCOS ची समस्या असणे,
  • हार्मोन्समधील असंतुलन,
  • pelvic inflammatory disease (PID) मुळे,
  • एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) यासारख्या आजारांमुळे,
  • स्त्रीचे वय अधिक असणे,
  • स्त्रीचे वजन जास्त असणे, लठ्ठपणा,
  • हायपोथायरॉडिजमची समस्या,
  • सिगारेट स्मोकिंग व अल्कोहोलचे व्यसन,
  • मानसिक तणाव,
  • कुपोषण किंवा शारीरिक दुर्बलता,
  • लैंगिक आजार,
  • किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम,
  • वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधांचा अतिवापर,
  • गर्भनिरोधक गोळ्या औषधांचा चुकीचा वापर, यासारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होत असते.

स्त्री वंध्यत्व

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शनामधे गर्भधारणा करण्याची योजना आखणाऱ्या व्यक्ती किंवा जोडप्यांना आरोग्य, जीवनशैली, आणि वैद्यकीय घटकांविषयी चर्चा आणि मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला जातो. याचे फायदे म्हणजे संभाव्य जोखीम ओळखणे व त्याचे व्यवस्थापन करणे, प्रजनन क्षमता सुधारणे आणि यशस्वी आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करणे.

 

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन

प्रसुतीपूर्व तपासणी व उपचार

एएनसी तपासणी म्हणजे प्रसवपूर्व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या सल्लामसलतीमुळे आई आणि वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याची नियमित देखरेख होते आणि संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते. एएनसीमध्ये विविध तपासण्या, पोषणाविषयी सल्ला आणि निरोगी गर्भधारणेसाठी मार्गदर्शन समाविष्ट असते, ज्यामुळे सुखद प्रसूती अनुभवास प्रोत्साहन दिले जाते.

प्रसुतीपूर्व तपासणी व उपचार

प्रसव (सामान्य व सिझेरियन)

सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.

प्रसव (सामान्य व सिझेरियन)

प्रसुति नंतर उपचार व मार्गदर्शन

प्रसवोत्तर काळात मातेस शारीरिक आणि मानसिक पुनर्बल आवश्यक असते. योग्य आहार, स्वच्छता, विश्रांती आणि स्तनपानाविषयी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. डॉक्टर व तज्ञांचा सल्ला घेऊन टाक्यांची काळजी, हार्मोनल बदल, मानसिक आरोग्य आणि नवजात बालकाच्या निगेसाठी योग्य उपचार व सल्लामसलत आवश्यक आसते.

प्रसुति नंतर उपचार व मार्गदर्शन

स्तनपान संबंधी माहिती व मार्गदर्शन

पहिल्या सहा महिन्यापर्यंत बाळाचे पोषण हे आईच्या दुधावरच होत असते. त्यामुळे बाळाला योग्यप्रकारे स्तनपान करणे आवश्यक असते. बाळाला स्तनपान कसे करावे, दूध पाजताना बाळाला कसे पकडावे याची माहिती येथे दिली आहे.

बाळाईचे दूध पाला आजण्याची पद्धत :

  • आईने शक्यतो बाळाला बसून किंवा आरामदायी झोपून दूध पाजावे.
  • दूध पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर स्तनाग्रे ओल्या कापसाच्या बोळ्याने पुसावीत.
  • स्तनपान करण्यासाठी बाळास योग्य प्रकारे पकडावे.
  • स्तनपान करताना निप्पलचा जास्तीत जास्त काळा भाग बाळाच्या तोडात गेला पाहिजे व बाळाची हनुवटी स्तनाला चिकटलेली असावी.
  • बाळाची इच्छा नसताना बाळाला बळजबरीने दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये. बाळाच्या रडण्याचे दुसरे काही कारण असू शकते, केवळ भूकच नव्हे.

स्तनपान संबंधी माहिती व मार्गदर्शन

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते. हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात.

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

श्वेतपदर (Leukorrhea)

मासिकपाळी येण्याच्या काही दिवस आधी काही स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे किंवा गर्भधारण झाली असताना किंवा संभोगानंतर असा योनीमार्गातून पांढरा चिकट स्राव कळतनकळत जाणं नॉर्मल असतं. पण जाणवण्याइतपत सतत योनीमार्गातून स्त्राव जाणं, त्याचं प्रमाण वाढणं, त्या स्त्रावाला वास येणं, त्याबरोबर कंबरदुखी, योनीमार्गाच्या आत आणि बाहेरील बाजूस खाज सुटणं यासारख्या तक्रारींकडे स्त्रीयांनी निश्‍चितच दुर्लक्ष करू नये.

 कारणे :

  • योनी आणि गर्भाशयातील इंन्फेक्शन (जंतूप्रादूर्भाव) हे याचे प्रमुख कारण असते,
  • ‎याशिवाय गर्भाशयाला सूज आल्याने,
  • ‎गर्भाशयाच्या मुखाला जखमा झाल्यामुळे,
  • ‎सतत गर्भपात झाल्याने,
  • ‎गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशयाचा कॅन्सर, बीजकोषाचा ट्यूमर, गुप्तरोग, अंग बाहेर येणे या विकारांमुळेही अंगावरून पांढरे जाऊ शकते.
  • ‎मानसिक ताण-तणावामुळे स्त्रीयांमध्ये पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढते.

श्वेतपदर (Leukorrhea)

गर्भाशय व गर्भाशय मुखाचा कर्करोग

स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्‍या कॅन्सरच्या यादीमध्ये गर्भाशय व गर्भाशय मुखाचा  कर्करोगाचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.

लक्षणे :

  • योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे.
  • ‎गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
  • लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
  • ‎रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
  • ‎याशिवाय भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

गर्भाशय व गर्भाशय मुखाचा कर्करोग

PCOD

 पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने हार्मोन्समधील असंतुलनामुळे उद्भवते. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनची पातळी वाढत असते. एंड्रोजन हे पुरुष हार्मोन असून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक झाल्यास ही समस्या होत असते. यामुळे स्त्रीमध्ये अंडाशयावर गाठी तयार होऊ लागतात. तसेच यामुळे अंडाशयाच्या आकारात वाढ होऊन त्याभोवती फॉलिकल्स साठू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर याचा परिणाम होतो. अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवू शकते.

PCOD ची लक्षणे : 

  • मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे
  • स्त्रियांमध्ये नको त्या ठिकाणी केसांची वाढ होणे – चेहरा, हनुवटी, स्तन, पोट 
  • चेहऱ्यावर मुरुम अधिक येणे तसेच तेलकट त्वचेची समस्या वाढते
  • डोक्याचे केस पातळ होऊ शकतात आणि त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.
  • पीसीओडीमुळे स्त्रियांचे वजन जास्त वाढू लागते.
  • हार्मोनल बदलामुळे डोकेदुखी, थकवा असे त्रास होऊन झोपेच्या तक्रारी सुरू होतात.
  • गर्भवती होण्यास अडचणी येणे

PCOD

सरकारमान्य गर्भपात केंद्र

सरकारमान्य गर्भपात केंद्र

रविदीप मॅटर्निटी होम

PATIENT'S REVIEW -

नऊ  महिन्यांचे चेकअप आणि गाईडलाईन यामुळे डिलिव्हरी टाईम ला कुठलाही त्रास न होता नॉर्मल डिलिव्हरी झाली. मॅडम आणि स्टाफ खूप छान आहे. Thank you 😊

रविदीप मॅटर्निटी होम

रविदीप मॅटर्निटी होम

डॉ. सौ. प्रमिला रविंद्र सोळंकी

  • MBBS, MD.
  • स्त्रीरोग तज्ञ, गायनेकोलॉजिस्ट
  • V.M.M.C. Solapur : M.D. Gyn.
  • Hedgewar Hospital : Clinical Assistant
  • Govt. Medical Collage Chh. S. Nagar : Lecturer
  • Hinduja Hospital Mumbai : Clinical Assistant
  • Deepak Hosp. Jalna : Consultant
  • At Buldhana : 14 Year's Private Practice

रविदीप मॅटर्निटी होम

Gallery

Rate Us

Contact Us