About Us
AN : ISO 9001:2015 CERTIFIED HOSPITAL
फिनिक्स हॉस्पिटल
एक निश्चित - आरोग्य सेवा
नमस्कार,
आम्ही अभिमानाने आपली सेवा करण्यात कार्यरत असलेल्या रुग्णालयात आपले स्वागत करतो. आमच्या रुग्णालयाचे ध्येय आहे की प्रत्येक रुग्णाला योग्य, तत्पर आणि प्रेमळ सेवा देणे. आम्हाला हे माहीत आहे की आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे, आणि या क्षेत्रात आम्ही आपल्या विश्वासाचे मानकरी ठरावे ही आमची इच्छा आहे.
आमच्या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल डॉक्टर्स , नर्सेस आणि अन्य आरोग्यसेवकांची टीम आहे. आमचे उद्दिष्ट आहे - प्रत्येक रुग्णाला व्यावसायिक आणि कौटुंबिक वातावरणात आरोग्यसेवा पुरविणे. रोग निदान, उपचार आणि पुनर्वसन या सर्व टप्प्यांवर आम्ही रुग्णांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत.
आमच्या कार्यात पारदर्शकता, प्रामाणिकता, आणि सहृदयता यांचा अंतर्भाव आहे. रुग्णांच्या समाधानासाठी सतत प्रयत्नशील असलेले आमचे रुग्णालय समाजातील प्रत्येक घटकाला सर्वोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहे.
आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, हीच आमची सदिच्छा.
धन्यवाद!
✡️ DOCTORS ON PANEL ✡️
डॉ. स्वप्निल देशमुख
- BHMS, Post Graduate Diploma in Skin Asthetics (Germany), CCMP (PDMMC)
- त्वचा, सौंदर्य, केशरोग तज्ञ व फैमिली फिजिशियन
डॉ. सौ. उपज स्व. देशमुख
- B.O.Th,TNMC (Nair Mumbai)
- व्यायाम तज्ञ व फिटनेस एक्सपर्ट
डॉ आशीष सालकर
- MBBS, TDD (Chest Medicine), FCCS (USA)
- छाती, दमा (अस्थमा) क्षयरोग व ॲलर्जी तज्ञ
डॉ. सतीश चव्हाण
- MBBS, DCH, DNB, MNAMS.
- बालरोग व नवजात शिशुरोग तज्ञ
डॉ. प्रवीण दंदी
- MBBS, MS (Gen Surgery)
- जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन
डॉ. सुशील राठी
- MBBS, MS (OBGY)
- प्रसुती व स्त्रीरोग लॅप्रोस्कोपी सर्जन
डॉ. दिपिका राठी
- MBBS, MS (OBGY)
- स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ
उपलब्ध सुविधा :
- 24 x 7 अत्यावश्यक सेवा
- ॲडव्हान्स स्किन केअर ट्रिटमेंटस्
- अॅडव्हान्स लेझर ट्रिटमेंटस्
- परमनंट टॅटु रिमुव्हल
- पि.आर.पी. थेरपी / मेझो थेरपी
- अॅन्टी ओबेसीटी (लठ्ठपणा) क्लिनीक
- फिजीओथेरपी
- सुसज्ज बालरोग विभाग
- सुसज्ज स्त्रीरोग विभाग
- स्पेशल रुम
- जनरल वॉर्ड
- सेन्ट्रल ऑक्सीजन सिस्टीम
- ई.सी.जी.
- सेन्ट्रल मॉनिटरिंग सिस्टम
- 24 * 7 मेडीकल स्टोर्स
- 24 * 7 पॅथोलॉजी लॅब
- 24 * 7 अंबुलन्स सुविधा
Products/Services
फिनिक्स हॉस्पिटल
डॉ. स्वप्निल देशमुख
- Consulting Cosmetologist & Family Physician
- BHMS , PGDCC (Germany ) ,CCMP (PDMMC - Amravati)
- त्वचा, सौंदर्य, केशरोग तज्ञ व फैमिली फिजिशियन
- माजी निवासी वैद्यकिय अधिकारी - शुअरटेक हॉस्पिटल - नागपूर
- माजी निवासी वैद्यकिय अधिकारी - ओझोन हॉस्पिटल - अकोला
- माजी निवासी वैद्यकिय अधिकारी - सहारा हॉस्पिटल - अकोला.
नमस्कार
मी डॉ . स्वप्निल देशमुख गेली १५ वर्षे अविरतपने रुग्णसेवे सोबत फिनिक्स हॉस्पिटल चे संचालन सांभाळत आहे. मी व्यवसायाने कॉस्मेटोलॉजिस्ट व फैमिली फिजिशियन असुन याच सोबत त्वचा, केस, नखे आणि एकूणच सौंदर्यसंबंधित सेवा देतो. या क्षेत्रात प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना सौंदर्यवृद्धीसाठी विशेष कौशल्य असते. चेहऱ्याचे उपचार, केसांची निगा, त्वचेची देखभाल, नखांचे आरोग्य, सर्व गोष्टींमध्ये विशेष पारंगत आहे.
कॉस्मेटोलॉजी ही केवळ ब्युटी क्षेत्राशी संबंधित नसून, रुग्णांना त्यांच्या आत्मविश्वास आणि सौंदर्यदृष्टीत सुधारणा करण्यासाठी मदत करणारी एक कला आहे. मी प्रत्येक रुग्णांची गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी योग्य उत्पादने, उपचार, आणि सल्ला देतो.

फिनिक्स हॉस्पिटल
डॉ. उपज स्व. देशमुख
- B.O.Th,TNMC (Nair Hospital Mumbai)
- व्यायाम तज्ञ व फिटनेस एक्सपर्ट
- माजी विभाग प्रमुख संत तुकाराम हॉस्पिटल - अकोला
- मानद विभाग प्रमुख दी.ज.क.को. बँक, अकोला
.jpeg)
Acne Vulgaris - मुरमू
कारणे (Causes):
- हार्मोन्समध्ये बदल: वयात येताना हार्मोनल बदलांमुळे तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे मुरुमं तयार होतात.
- आनुवंशिकता: कुटुंबात जर मुरुमांची समस्या असेल तर ती वारशाने मिळू शकते.
- तेलकट त्वचा: तेलकट त्वचेच्या प्रकारामध्ये मुरुमं होण्याची शक्यता जास्त असते.
- आहार: उच्च गोड आणि फॅटयुक्त आहारामुळे देखील मुरुमं वाढू शकतात.
- ताण: मानसिक ताणामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन मुरुमं होऊ शकतात.
लक्षणे (Symptoms):
- मुरुमं, पुटकुळ्या, किंवा ब्लॅकहेड्स
- त्वचेवर लालसरपणा आणि सूज
- चेहऱ्यावर किंवा पाठीवर तीव्र संवेदनशीलता
- त्वचेमध्ये दाणे येणे आणि रंग बदलणे
आधुनिक कॉस्मेटिक उपचार (Modern Cosmetic Treatments) :
- केमिकल पील्स: त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी खास रासायनिक घटक वापरतात. यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते.
- मायक्रोडर्माब्रेशन: त्वचेला नूतनीकरण करण्यासाठी त्वचेमधील बाह्य स्तर काढून टाकतात.
- लेसर थेरपी: त्वचेतील मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी लेसर किरणांचा वापर करतात.
- रेटिनोइड्स: हे औषध त्वचेला नवी पेशी निर्माण करण्यास मदत करते आणि मुरुमं कमी करते.
- ब्लू लाईट थेरपी: यामध्ये विशेष निळ्या रंगाचे प्रकाश दिला जातो, ज्यामुळे त्वचेमधील जीवाणू नष्ट होतात आणि मुरुमं कमी होतात.
Acne Vulgaris:
Causes:
- Hormonal Changes: During adolescence, hormonal shifts make oil glands more active, leading to acne formation.
- Genetics: If there is a family history of acne, it can be inherited.
- Oily Skin: Those with oily skin are more prone to developing acne.
- Diet: A diet high in sugar and fats can also contribute to acne.
- Stress: Mental stress can cause hormonal imbalances, leading to breakouts.
Symptoms:
- Pimples, pustules, or blackheads
- Redness and swelling on the skin
- Sensitivity, especially on the face or back
- Bumps on the skin and skin discoloration
Modern Cosmetic Treatments:
- Chemical Peels: Special chemical solutions are applied to remove dead skin cells, leaving the skin refreshed.
- Microdermabrasion: The outer layer of the skin is exfoliated to promote skin renewal.
- Laser Therapy: Laser beams are used to reduce acne scars and dark spots.
- Retinoids: These medications help the skin regenerate cells and reduce acne.
- Blue Light Therapy: A special blue light is used to target and kill acne-causing bacteria, reducing breakouts.

Psoriasis - सोरायसिस
सोरायसिस ही त्वचासंबंधी एक समस्या असून यामध्ये त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे येतात व तेथून पापुद्रे किंवा खवले निघत असतात. याला सोरियाटिक स्केल असे म्हणतात.
सोरायसिसमध्ये त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन तेथे प्रचंड खाज सुटते. तेथील त्वचा ही जाड होते व त्वचेत पांढरट-चंदेरी रंगाचे पापुद्रे निर्माण होतात. पापुद्रे असणाऱ्या ठिकाणी खाजवल्यास भुसा होऊन पापुद्रे खाली पडत असतात.
सोरायसिसचे चट्टे प्रामुख्याने कोपरा, गुडघे अशा सांध्यांच्या ठिकाणी झालेले आढळतात. याशिवाय ते शरीराच्या डोके, चेहरा, कानाच्या मागे, मान, हात, पाय, पाठ अशा भागावरही होऊ शकतात.
सोरायसिसची लक्षणे (Symptoms) :
- त्वचेवर लालसर, सुज असणारे चट्टे येणे,
- चट्ट्याभोवती खाज येणे,
- चट्टे आलेल्या ठिकाणी वेदना किंवा आग होणे,
- त्वचेवरील चट्ट्यांवर पांढरट-चांदी कलरचे पापुद्रे येणे,
- त्वचेवर खाजवल्यास पापुद्रे भुसा होऊन खाली पडणे,
- त्वचा कोरडी होऊन क्रॅक पडून रक्तस्राव होणे,
- सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे.
अशी काही लक्षणे सोरायसिस या त्वचाविकारामध्ये असतात.

Skin Rashes - अंगावर पुरळ उठणे
काहीवेळा अंगावर पुरळ येत असतात. यावेळी त्वचेवर बारीक, लालसर किंवा इतर रंगाचे फोड येत असतात. त्यामुळे त्याठिकाणी खाज येत असते.
काजण्या , गोवर, नागीण अशा अनेक रोगांमध्ये पुरळ उठणे हे लक्षण असू शकते. तसेच पुरळाचे अनेक प्रकारही असू शकतात.
अंगावर पुरळ येण्याची कारणे (causes) :
इन्फेक्शन हे प्रमुख कारण आहे. पुरळ हे खालील रोगांमध्ये जंतुसंसर्गमुळे अंगावर उठतात.
• विषाणूजन्य आजार जसे गोवर, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण यांमुळे,
• जिवाणूजन्य आजार जसे इंपेटिगो, स्कार्लेट फीवर यांमुळे,
• बुरशीजन्य आजार गजकर्ण, नायटा इ.,
• ॲलर्जीमूळे
• औषधांच्या साईड इफेक्टमुळे,
• कीटकदंश,
• काही विशिष्ट वनस्पती, प्रदूषण, केमिकल्स यांचेशी संपर्क आल्यानेदेखील पुरळ उठते.
तसेच ल्युपस, डरमॅटोमायोसायटिस इ. काही गंभीर आजारांमध्येही त्वचेवर पुरळ येत असते.

Urticaria - अंगावर पित्त उठणे
अंगावर पित्त उठणे या समस्येला आयुर्वेदात ‘शीतपित्त’ ह्या नावाने संबोधलेले आहे. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला ‘शीतपित्त’ असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया (Urticaria) किंवा Hives असे म्हणतात तर बोलीभाषेत ‘अंगावर पित्त उठणे’ असे म्हंटले जाते.
प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात.

Herpes Zoster - नागीण आजार
नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजण्या आजार होत असतो.
कारणे : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना कांजिण्या झालेला असतो त्यांच्या शरीरात मज्जारज्जूमध्ये कांजिण्याचा विषाणू लपून बसलेले असतात. आणि जेंव्हा केंव्हा त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ति कमी होते तेव्हा हे लपलेले विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर प्रचंड वेदना असणारे पुरळ निर्माण करतात त्याला नागीण होणे असे म्हणतात.
नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते. या विषाणूची एका किंवा दोन-तीन नसांनाही याची लागण होऊ शकते. नागीण शरीवरील कोणत्याही भागावर होऊ शकतो. काहीवेळा नागीण डोळ्यांमध्येही होऊ शकते. डोळ्यांमध्ये नागीण झाल्यास परिणामी अंधत्वही येऊ शकते.
लक्षणे :
- नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होतात. त्याठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवितात.
- तेथील त्वचेची आग होते.
- दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके येतात व त्यानंतर त्यात पाणी धरते.
- पाच ते सहा दिवसात खपल्या धरतात व फोडही जातात. फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.

Vitiligo - पांढरे कोड
पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.
लक्षणे :
- शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
- प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
- डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
- पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
- या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.
कारणे : पांढरे कोड ह्या त्रासाला जेनेटिक दोष प्रामुख्याने कारणीभूत असतात. या समस्येत जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणाऱ्या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. त्यामुळे मेलॅनीनच्या कमतरतेमुळे त्वचेवर पांढरे डाग होतात.

Warts - चामखीळ
Warts ( चामखिळ ) म्हणजे त्वचेवर येणारे छोटे, कठीण, गाठेसारखे फोड. हे मुख्यतः मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतात. हे त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर येऊ शकतात, जसे हात, पाय, चेहरा, किंवा बोटे.
लक्षणे
1. त्वचेवर छोटे, गोलाकार, कठीण गाठेसारखे फोड.
2. वारंवार घासल्याने वेदना होऊ शकते.
3. काही वेळा फोडांचा रंग त्वचेच्या रंगासारखा असतो तर काही वेळा गडद रंगाचे दिसू शकतात.
4. अनेक प्रकारचे वॉर्ट्स असतात, जसे सामान्य वॉर्ट्स, फ्लॅट वॉर्ट्स, प्लांटर वॉर्ट्स, ज्यामुळे लक्षणे बदलू शकतात.
उपचार
1.स्वतःहून उपचार न करणे: वॉर्ट्सला तोडणे, फोडणे किंवा कापण्याचा प्रयत्न करू नका कारण त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता असते.
2.औषधोपचार: डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम वापरू शकता. हे वॉर्ट्स कमी करण्यास मदत करते.
3.क्रायोथेरपी: डॉक्टर लिक्विड नायट्रोजन वापरून वॉर्ट्स फ्रीज करून काढून टाकतात.
4.लेझर उपचार: काही वेळा लेझरने वॉर्ट्स काढण्यासाठी उपचार केला जातो.
जर वॉर्ट्स वाढत असतील किंवा त्रास होत असेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Dermascopy - केसांची दुर्बीणीने तपासणी
केसांची दुर्बीनीने तपासनी केल्याने केसांच्या मूळ समस्यांचा शोध घेता येतो. योग्य उपचार मिळवून केस गळती, दुभंग, आणि अन्य केसांच्या समस्या टाळता येतात.
- केसांची मजबुती, आरोग्य आणि पोषण याविषयी माहिती मिळते.
- विशिष्ट समस्या ओळखून त्यावर योग्य उपचार निवडता येतात.
- केसांच्या मूळ समस्या सोडवून नवीन केसांची वाढ सुधारता येते.
- वेळेवर निदान करून केसांचे अधिक नुकसान टाळता येते.
- केसांच्या आरोग्याचा संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण आरोग्य साधता येते.

Alopecia - केस गळती
कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते.
प्रमुख कारणे : अनुवांशिकता, पोषक तत्वांची कमी, नैसर्गिक, आजारपणा, पर्यावरण
लक्षणे : केस गळणे,कोंडा (डॅन्ड्रफ), केस तुटणे, टक्कल पडणे
उपचार : औषधोपचार, व्यायाम / आहार, पिआरपी थेरपी, मेझो थेरपी, केस प्रत्यारोपण
पिआरपी थेरपी / मेझो थेरपी : या थेरपीमध्ये आपण आपल्याच शरीरामधील Platelets मशिनद्वारे वेगळे करुन Mezogun च्या सहाय्याने आपल्या टाळुवर (Scalp) इंजेक्ट करतो. त्यामुळे केसांच्या मुळांना पोषक तत्वे मिळुन केस गळती / कोंडा / टक्कल पडणे यावरती आपण प्रभावीपणे उपचार करु शकतो.

Hirsutism - चेहऱ्यावर नको असलेले केस
चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
चेहऱ्यावर नको असलेले केस येण्याची कारणे अनेक असू शकतात. प्रामुख्याने, स्त्रियांमध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे PCOD मुळे यामुळे हार्मोन्समध्ये बदल झाल्याने चेहऱ्यावर केस येतात. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात.
- अनुवांशिक घटक,
- सौंदर्य प्रसाधनांच्या चुकीच्या वापरामुळे,
- गर्भ निरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येऊ शकतात.
- याशिवाय मानसिक तणाव ह्यासारख्या कारणांनी चेहऱ्यावर केस येऊ शकतात.

Seborrheic Dermatitis - डँड्रफ
डोक्यातील कोंडा, ज्याला seborrheic dermatitis म्हणूनही ओळखले जाते, हे टाळू, भुवया किंवा नाकाजवळील त्वचेच्या पेशींचा अतिरेक आहे. हे मृत त्वचेच्या पेशींच्या जलद शेडिंगमुळे होते, परिणामी मोठ्या फ्लेक्स बनतात
डोक्यातील कोंडा कशामुळे होतो?
- बुरशीजन्य अतिवृद्धी: टाळूवर मालासेझिया बुरशीची भरभराट होते.
- स्कॅल्पचे अतिरिक्त तेल: परिणामी चिकट, तेलकट कोंडा होतो.
- अनियमित ब्रशिंग आणि केस धुणे.
- शैम्पूचा क्वचित वापर.
- तणाव आणि मानसिक आरोग्य स्थिती.

Tattoo Removal - टैटू रिमूवल
टॅटू काढणे (टॅटू रिमूवल) एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये त्वचेवरील नकोसे टॅटू काढून टाकले जातात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे टॅटू रिमूवल प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित झाली आहे.
टॅटू रिमूवलचे प्रकार
- लेसर ट्रीटमेंट: हे सर्वात सामान्य आणि प्रभावी तंत्र आहे. लेसरच्या सहाय्याने टॅटूच्या शाईवर प्रकाश टाकला जातो, ज्यामुळे शाईचे कण तुटून लहान होतात आणि शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेने ते हळूहळू बाहेर टाकले जातात.
- सर्जिकल एक्ससिजन: लहान टॅटू काढून टाकण्यासाठी सर्जिकल एक्ससिजन वापरली जाते, ज्यात टॅटू असलेली त्वचा शस्त्रक्रियेने काढली जाते आणि त्वचेवर टाके घेतले जातात.
- डर्माब्रेशन: या प्रक्रियेमध्ये त्वचेचा बाहेरील थर काढला जातो, पण हा उपाय कमी प्रभावी आणि त्रासदायक ठरू शकतो.
लेसर टॅटू रिमूवल प्रक्रिया कशी कार्य करते
- Q-Switched लेसर: या प्रकारातील लेसर टॅटूच्या शाईवर प्रकाशाचा तीव्र किरण सोडतो. तो शाईचे कण तुकडे करून त्यांना त्वचेमध्ये वितळवतो, ज्यामुळे शरीर त्यांना हळूहळू नष्ट करते.
- पोर्टेबल ट्रीटमेंट्स: अनेक सत्रांमध्ये ही प्रक्रिया केली जाते, कारण प्रत्येक सत्रानंतर टॅटू हळूहळू फिका होतो.
- बिनधोक आणि कमी जखम: लेसर प्रक्रियेमुळे त्वचेवर कमी प्रमाणात जखम येते आणि साइड इफेक्ट्स कमी असतात.
प्रक्रिया करण्याचे फायदे
- अधिक सुरक्षितता: लेसर ट्रीटमेंट सुरक्षित असून त्वचेवर दीर्घकालीन परिणाम होत नाहीत.
- सर्व प्रकारच्या टॅटूंसाठी उपयुक्त: रंगीत आणि काळ्या टॅटूंसाठी प्रभावी.
- लहान जखम आणि कमी वेदना: इतर पद्धतींशी तुलना करता लेसरने केलेली प्रक्रिया वेदनारहित आणि त्वचेला सुरक्षित असते.

Obesity - लठ्ठपणा
प्रमुख कारणे : अनुवांशिकता, आहाराची अनियमितता, हार्मोन्सचे असंतुलन, व्यायामाची कमतरता, पर्यावरण
उपचार : संतुलित आहार, नियमित व्यायाम, हार्मोन्स पिल्स, RF Lipolysis, Steam Therapy
RF लिपोलिसिस : या थेरपीमध्ये आपल्या त्वचेच्या वरती Radio Frequency च्या मदतीने प्रभावीपणे उपचार करुन लठ्ठपणा भरपूर प्रमाणात कमी करु शकतो.
स्टीम थेरपी : या थेरपीमध्ये वाफेच्या सहाय्याने Fatcells वरती आपण प्रभावीपणे उपचार करुन लठ्ठपणा भरपूर प्रमाणात कमी करु शकतो.

चेस्ट मेडिसीन विभाग
फिनिक्स हॉस्पिटलचा चेस्ट मेडिसीन विभाग फुफ्फुस, श्वासोच्छवास, अॅलर्जी आणि झोपेच्या विकारांशी संबंधित सर्व आजारांसाठी सर्वोत्कृष्ट प्रगत सुविधा उपलब्ध करून देतो. वरिष्ठ छाती तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील हा विभाग रुग्णांचे सखोल परीक्षण करतो आणि ब्रॉन्कियल अस्थमा, सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज), आयएलडी (इंटरस्टिशियल लंग डिसीज), क्षयरोग (टीबी) आणि इतर छातीच्या आजारांचे उपचार करण्यासाठी प्रगत चाचण्यांची सुविधा उपलब्ध आहे.
हा विभाग पल्मोनरी फंक्शन टेस्ट, ब्रॉन्कोस्कोपी, थोराकोस्कोपी, त्वचेची अॅलर्जी चाचणी, झोपेचे विश्लेषण यासारख्या चाचण्या करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. याशिवाय, क्रॉनिक फुफ्फुस आजार असलेल्या रुग्णांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी एक पल्मोनरी पुनर्वसन कार्यक्रम देखील उपलब्ध आहे.

बालरोग विभाग
फिनिक्स हॉस्पिटलचा बालरोग विभाग हा अकोला शहरातील सर्वोत्कृष्ट बालरोग तज्ञांसह सुसज्ज आहे. येथे खालील उपचार उपलब्ध आहेत :
- पेडियाट्रिक कन्सल्टेशन
- पेडियाट्रिक इमर्जन्सी केअर
- नवजात आपत्कालीन देखभाल
- बाल लसीकरण आणि रोगप्रतिकारक्ता
- बाळाच्या त्वचेचे आजार
- चाईल्ड नेब्युलायझेशन
- बाल पोषण आणि सल्ला
- सुदृढ बालक मार्गदर्शन व सल्ला

स्त्रीरोग विभाग
फिनिक्स हॉस्पिटलचा स्त्रीरोग विभाग सर्व वयोगटातील महिलांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करतो, ज्यात किशोरवयीन मुलींपासून ते रजोनिवृत्त महिलांपर्यंत समाविष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या कौशल्याने सुसज्ज असलेला हा विभाग अकोल्यातील सर्वोत्कृष्ट विभागांपैकी एक आहे.
आम्ही खालील सेवा प्रदान करतो :
- नियमित स्त्रीरोग तपासणी
- स्तन शस्त्रक्रिया
- गर्भाशय काढणे (हिस्टेरेक्टॉमी)
- प्रोलॅप्सची दुरुस्ती
- अंडाशयातील गाठी, ट्युमर, फायब्रॉइड्स काढणे
- प्रगत एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
- यूरो-स्त्रीरोग शस्त्रक्रिया
- किशोरवयीन मुलींच्या स्त्रीरोगाच्या समस्या
- पीसीओडी, अनियमित मासिक पाळी यांचे उपचार
- कर्करोग तपासणी
- स्तन, गर्भाशयाचा कर्करोग यांसाठी स्त्रीरोग कर्करोग शस्त्रक्रिया

Microdermabrasion - Skin polishing
मायक्रोडर्माब्रेशन ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे त्वचेचा बाहेरील मृत पेशींचा थर काढला जातो. यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते आणि त्यातील दोष कमी होतात. मायक्रोडर्माब्रेशन सामान्यतः सौम्य असते आणि कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसते.
मायक्रोडर्माब्रेशनच्या उपयोगाचे फायदे
- त्वचा उजळवणे: मृत पेशी काढून टाकल्याने त्वचा अधिक उजळ, चमकदार आणि ताजीतवानी दिसते.
- छोट्या सुरकुत्या आणि सल कमी करणे: सूक्ष्म जखम तयार करून त्वचा स्वतःच नव्या पेशी निर्माण करते, ज्यामुळे लहान सुरकुत्या आणि सल कमी होतात.
- डाग आणि पिंपल्सच्या खुणा कमी करणे: ही प्रक्रिया चेहऱ्यावरील ॲक्नेचे डाग, पिंपल्सच्या खुणा आणि असमान त्वचा रंग सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
- पोरांचा आकार कमी करणे: त्वचेच्या पोरांमधील मळ काढून टाकल्याने पोरांचा आकार लहान दिसतो.
- असमान त्वचा रंग आणि पोत सुधारणे: त्वचेवर असलेला असमान रंग, ओलसरपणा किंवा खडबडीतपणा कमी करण्यासाठी मायक्रोडर्माब्रेशन प्रभावी ठरते.
प्रक्रिया कशी कार्य करते
- बारीक क्रिस्टल्स वापर: या प्रक्रियेमध्ये बारीक क्रिस्टल्स किंवा हिऱ्याच्या टिप्सचा वापर करून त्वचेच्या बाहेरील थराला हळुवारपणे काढले जाते.
- सक्शन उपकरण: मृत पेशी काढल्यानंतर सक्शन उपकरणाने त्वचेवर उरलेले कण साफ केले जातात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते.
- त्वचा मऊ आणि उजळ होते: प्रक्रिया झाल्यानंतर त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेचे पोषण चांगले होते.

MNRF - Face Laser
मायक्रो नीडल रेडिओ फ्रिक्वेन्सी (MNRF) ही एक आधुनिक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे जी त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरली जाते. यामध्ये सूक्ष्म सुया (मायक्रो नीडल्स) आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जीचा वापर केला जातो. ही प्रक्रिया त्वचेच्या आतील थरावर परिणाम करते आणि त्वचेच्या ताणतणावासह नव्याने पेशी निर्माण करण्यास मदत करते.
मायक्रो नीडल रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या वापराचे फायदे
- त्वचेचे पुनरुज्जीवन: त्वचेच्या खालच्या थरात कोलेजेनचे उत्पादन वाढवून त्वचेचे पुनरुज्जीवन होते.
- सल आणि सुरकुत्या कमी करणे: या प्रक्रियेने चेहऱ्यावरील सल, लहान सुरकुत्या आणि वयामुळे आलेले बदल कमी होऊ शकतात.
- पिंपल्सचे खड्डे आणि ॲक्नेच्या खुणा कमी करणे: ही प्रक्रिया त्वचेमधील खड्डे आणि ॲक्नेच्या खुणा कमी करण्यास मदत करते.
- त्वचा घट्ट करणे: त्वचेमध्ये ताण आणून ती घट्ट करण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचेचे लूजपणा कमी होतो.
- त्वचेचा रंग सुधारणे: असमान त्वचेचा रंग आणि डाग कमी करण्यात ही प्रक्रिया प्रभावी ठरते.
प्रक्रिया कशी कार्य करते
- मायक्रो नीडल्स वापर: सूक्ष्म सुया त्वचेच्या आत जाऊन कमी प्रमाणात जखम निर्माण करतात, ज्यामुळे त्वचेचा नैसर्गिक पुनरुज्जीवन प्रक्रियेचा भाग म्हणून कोलेजेन निर्माण होतो.
- रेडिओ फ्रिक्वेन्सी एनर्जी: रेडिओ फ्रिक्वेन्सी त्वचेच्या आतील थरांमध्ये उष्णता निर्माण करते, ज्यामुळे कोलेजेनचे उत्पादन वाढते.
- कोणतीही जखम न ठेवता त्वचा उपचार: यामध्ये बाहेरील त्वचेला कोणतीही मोठी जखम नसल्यामुळे वेगाने बरे होण्यास मदत होते.

Melasma - वांग
मेलॅस्मा म्हणजे त्वचेवर गडद डाग येणे, विशेषत: चेहऱ्यावर. हे सामान्यतः गाल, नाक, कपाळ आणि ओठांच्या वरच्या भागात दिसते. याच्या कारणे, लक्षणे, आणि उपचार पुढीलप्रमाणे आहेत:
कारणे
- हार्मोनल बदल: गरोदरपणा, गर्भनिरोधक गोळ्या, आणि हार्मोन थेरपीमुळे हार्मोन्समध्ये बदल होतो, ज्यामुळे मेलॅस्मा होऊ शकतो.
- सूर्यप्रकाश: सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे त्वचेतील मेलानिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचेवर गडद डाग पडतात.
- अनुवंशिकता: कुटुंबातील इतर सदस्यांना मेलॅस्मा असल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो.
- औषधे: काही औषधे, विशेषत: ज्यामुळे त्वचेची संवेदनशीलता वाढते, मेलॅस्माचे कारण होऊ शकतात.
लक्षणे
- चेहऱ्यावर गडद, असमान रंगाचे डाग येणे.
- हे डाग बहुधा तपकिरी किंवा राखाडी रंगाचे असतात.
- डाग गालांवर, कपाळावर, नाकावर, आणि ओठांच्या वरच्या भागात दिसतात.
उपचार (कॉस्मेटिक)
- सन्स्क्रीन वापरणे: मेलॅस्मा कमी करण्यासाठी नियमितपणे SPF 30 किंवा त्याहून अधिक सन्स्क्रीन वापरावा.
- केमिकल पील्स: ग्लायकॉलिक, सॅलिसिलिक, आणि मॅन्डेलिक आम्लयुक्त केमिकल पील्स मेलॅस्मा कमी करण्यास मदत करतात.
- लेजर थेरपी: त्वचेमधील गडद रंग कमी करण्यासाठी कमी-स्तरीय लेजर थेरपीचा वापर केला जातो.
- मायक्रोनीडलिंग: यामध्ये त्वचेवर सूक्ष्म सुरकुत्या बनवल्या जातात, ज्यामुळे त्वचा नवीन पेशी निर्माण करते.

Tinea Infection - फंगल इन्फ़ेक्शन
टिनिया क्रुरिस म्हणजे काय?
टिनिया क्रुरिस (Tinea Cruris) ही एक बुरशीजन्य त्वचाविकार आहे जी त्वचेच्या ओलसर आणि गरम ठिकाणी होते, विशेषतः मांडीच्या भागात (जांघांच्या भागात). याला सामान्यतः "जॉकी इच" असेही म्हटले जाते.
कारणे
- बुरशीजन्य संसर्ग (Dermatophyte Fungi)
- जास्त घाम येणे
- स्वच्छता न राखणे
- ओलसर कपडे किंवा घट्ट कपडे घालणे
- आजारपण जसे की मधुमेह,अस्थमा
लक्षणे
1. जांघांच्या किंवा मांडीच्या भागात खाज येणे
2. लालसर किंवा तपकिरी रंगाचे चट्टे पडणे
3. त्वचेवर खवले उठणे किंवा उकळणे
4. खाजवल्यावर जळजळ होणे
5. वेदना किंवा अस्वस्थता
उपचार
1.प्रतिबंधक मलम (Antifungal Creams): बुरशीजन्य मलम दिवसातून १-२ वेळा लावावे.
2.तोंडी औषधे (Oral Medications): जास्त प्रमाणात संक्रमण झाल्यास डॉक्टर तोंडाने घेण्याचे औषधे लिहून देऊ शकतात.
3.स्वच्छता राखणे: दररोज प्रभावित भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे आवश्यक आहे.
4.कापडी कपडे घालणे: हलक्या कापडाचे आणि सैल कपडे घालावेत.
5.औषधोपचाराच्या सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा: जर लक्षणे कमी झाली नाहीत तर त्वचारोगतज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सावधानता: स्वच्छता राखणे, दररोज आंघोळ करणे, आणि घाम झाल्यास तो लगेच पुसणे ह्या सवयींमुळे टिनिया क्रुरिसपासून बचाव करता येऊ शकतो.

Tinea Versicolor - शेरण्या
Tinea Versicolor ( शेरण्या ) म्हणजे त्वचेवर होणारा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे. यामध्ये त्वचेवर पांढरे, तपकिरी, किंवा गुलाबी रंगाचे छोटे डाग येतात, जे उन्हात अधिक स्पष्ट दिसतात.
लक्षणे
1. त्वचेवर छोटे, गोल, पांढरे किंवा तपकिरी रंगाचे डाग.
2. या डागांवर खाज येऊ शकते.
3. उन्हात किंवा घाम आल्यावर डाग अधिक उठून दिसतात.
4. त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊ शकते.
उपचार
1.प्रतिबंधक उपाय: नियमितपणे स्वच्छता ठेवणे, स्वच्छ कपडे घालणे.
2.औषधोपचार: डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटी-फंगल मलम वापरणे.
3.गोळ्या: काही जास्त प्रमाणात झालेल्या संसर्गासाठी अँटी-फंगल गोळ्या दिल्या जातात.
4.घरगुती उपाय: नारळाचे तेल, लिंबाचा रस किंवा ऍप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने आराम मिळतो.

Premature Greying Of Hair - केस पांढरे होने
PGH - केस पांढरे होने
कारणे (Causes):
1.अनुवांशिकता: कुटुंबात केस लवकर पांढरे होण्याची परंपरा असल्यास तुम्हाला देखील हा त्रास होऊ शकतो.
2.ताणतणाव (Stress): दीर्घकालीन ताणामुळे केसांच्या रंगद्रव्यावर परिणाम होतो.
3.पोषणाचा अभाव (Nutreitional Deficincy): व्हिटॅमिन बी12, फॉलिक अॅसिड, आणि लोह यांची कमतरता.
4.जास्त केमिकल वापरणे (Chemical Use): केसांना कलर, डाई किंवा स्ट्रेटनिंग केल्यामुळे केसांची गुणवत्ता कमी होते.
5.हार्मोनल बदल (Hormonal Changes): थायरॉईड विकार यामुळे केस लवकर पांढरे होऊ शकतात.
6.धूम्रपान आणि मद्यपान (Smoking & Alcohol): हे केसांवर विपरीत परिणाम करतात.
लक्षणे (Symptoms):
1.केसांचा रंग लवकर पांढरा होणे (काळ्या केसांमध्ये पांढऱ्या केसांचे प्रमाण वाढणे).
2.केस कोरडे, निस्तेज आणि कमजोर होणे.
3.केस गळण्याचे प्रमाण वाढणे.
4.डोक्याच्या विशिष्ट भागात पांढऱ्या केसांची घनता दिसणे.
उपचार (Treatment):
1.आहार बदल:पालेभाज्या, फळे, अंडी, दूध, कडधान्ये यांचा समावेश करा,व्हिटॅमिन बी12 आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार घ्या.
2.योग आणि तणाव व्यवस्थापन:नियमित योगासने, ध्यान (मेडिटेशन) करा , पुरेशी झोप घ्या.
3.डॉक्टरांचा सल्ला घ्या: थायरॉईड चाचणी करून घ्या , व्हिटॅमिन बी12 सप्लिमेंट्स घ्या,केसांचे ट्रीटमेंट जसे की लेझर किंवा प्रोटीन ट्रीटमेंटचा विचार करा .
केस पांढरे होणे पूर्णपणे थांबवणे कठीण असले तरी योग्य उपचारांमुळे ते कमी प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला नेहमी आवश्यक आहे.

Routine skincare - दैनंदिन त्वचेची निगा
दैनंदिन त्वचा काळजी घेण्याची दिनचर्या
१.सकाळची त्वचा काळजी
1.चेहरा स्वच्छ करणे (Cleansing): सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. तेलकट किंवा कोरड्या त्वचेसाठी योग्य क्लेंझर निवडा.
2.टोनिंग (Toning): त्वचेला टोन करण्यासाठी गुलाबपाणी किंवा हलका टोनर वापरा.
3.मॉइस्चरायझिंग (Moisturizing): त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचा मॉइस्चरायझर लावा.
4.सनस्क्रीन (Sunscreen): उन्हाच्या किरणांपासून त्वचेला संरक्षण देण्यासाठी SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा.
२.रात्रीची त्वचा काळजी
1.मेकअप काढणे (Makeup Removal): मेकअप काढण्यासाठी सौम्य मेकअप रिमूव्हर वापरा.
2.क्लेंझिंग (Cleansing): दिवसभराचा घाम, घाण आणि तेल काढण्यासाठी चेहरा स्वच्छ करा.
3.टोनिंग (Toning): टोनर वापरून त्वचेला ताजेतवाने करा.
4.सीरम किंवा नाइट क्रीम (Serum or Night Cream): त्वचेच्या गरजेनुसार पोषणासाठी सीरम किंवा नाइट क्रीम लावा.
३.आठवड्याची विशेष काळजी
1.स्क्रबिंग (Scrubbing): आठवड्यातून १-२ वेळा सौम्य स्क्रबने मृत त्वचेची त्वचा काढा.
2.फेस मास्क (Face Mask): आठवड्यातून एकदा नैसर्गिक किंवा चांगल्या दर्जाचा फेस मास्क लावा.
४.सामान्य टिपा
•दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या.
•झोप पुरेशी घ्या (७-८ तास).
•ताजे फळे व भाज्या आहारात समाविष्ट करा.
•जास्त तेलकट व तिखट अन्न टाळा.
•दर तीन महिन्यांनी त्वचेचा तज्ञांचा सल्ला घ्या.
ही दिनचर्या नियमितपणे पाळल्यास त्वचा ताजेतवाने, स्वच्छ आणि चमकदार राहील.

Hair care - केसांची निगा
केस गळती थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी आरोग्यदायी आहार
१.प्रथिनेयुक्त आहार (Protein-Rich Diet)
केसांची वाढ प्रथिनांवर अवलंबून असते. आहारात खालील प्रथिने समाविष्ट करा:
•अंडी: बायोटीन आणि प्रथिनेयुक्त.
•डाळी आणि कडधान्ये: मसूर, चणे, आणि राजमा.
•मांस आणि मासे: चिकन, मासे (विशेषतः सॅल्मन किंवा मॅक्रेल).
•दूध आणि दुग्धजन्य पदार्थ: लोणी, दही, चीज.
२.लोहयुक्त आहार (Iron-Rich Diet)
लोहाची कमतरता केस गळतीचे एक मुख्य कारण असते.
•पालक: आयरन आणि फोलेटयुक्त.
•ब्रोकोली आणि मेथी: हिरव्या पालेभाज्या.
•डाळी आणि बदाम: लोहासाठी उत्कृष्ट.
•किशमिश आणि खजूर: लोहाचे नैसर्गिक स्त्रोत.
३.ओमेगा-३ फॅटी अॅसिड (Omega-3 Fatty Acids)
केसांना मजबूत आणि चमकदार ठेवण्यासाठी:
•मासे: सॅल्मन, मॅक्रेल, आणि टूना.
•अक्रोड आणि फ्लॅक्स सीड्स (जवसाचे बी).
४.व्हिटॅमिन्स आणि खनिजे (Vitamins and Minerals)
•व्हिटॅमिन ए: गाजर, गोड बटाटे, आणि पालक.
•व्हिटॅमिन ई: बदाम, सूर्यफुलाचे बी.
•व्हिटॅमिन सी: लिंबू, आवळा, संत्री, आणि पेरू.
•झिंक आणि सेलेनियम: भोपळ्याच्या बिया, बदाम, आणि मासे.
५.पाणी आणि हायड्रेशन (Hydration)
•दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या.
•नारळ पाणी आणि ताक नियमित प्या.
६.टाळा:
•जास्त साखर, तिखट पदार्थ, आणि तळकट अन्न.
•अल्कोहोल आणि धूम्रपान.
७.घरगुती उपाय:
•दर आठवड्याला आवळ्याचा रस किंवा लिंबाचा रस घ्या.
•सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या जवसाचे बी (Flax Seeds) खा.
८.नियमित सल्ला:
जर केस गळती अधिक असेल, तर डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
योग्य आहारासोबत नियमित व्यायाम आणि ताणतणाव नियंत्रणामुळे केस गळती कमी होईल आणि केसांची गुणवत्ता सुधारेल.

Gallery
















