About Us

!! सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया !!

निरामय हॉस्पीटल

(ॲडव्हान्स्ड कॅन्सर केअर सेंटर)

नमस्कार,

निरामय कॅन्सर हॉस्पिटल, अकोला येथे आपले स्वागत आहे, जिथे करुणामय सेवा आणि अत्याधुनिक कर्करोग उपचार एकत्र येतात. डॉ. प्रसाद सोर यांच्या नेतृत्वाखाली आमचा समर्पित तज्ञांचा संघ आपल्या कर्करोग विषयक आजारांवर लक्ष केंद्रित करत वैयक्तिकृत कर्करोग उपचार प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. अत्याधुनिक सुविधा आणि रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनासह, प्रत्येक व्यक्तीला कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात आशा आणि उपचार मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपले आरोग्य आमची प्राथमिकता आहे.

आम्ही खालील प्रकारच्या कर्करोगासाठी उपचार प्रदान करतो:

  • तोंडाचा कर्करोग
  • जठरांत्रिय कर्करोग
  • लिम्फ नोड कर्करोग
  • फुफ्फुसाचा कर्करोग
  • पोटाचा कर्करोग
  • यकृताचा कर्करोग
  • ल्युकेमिया
  • कोलन कर्करोग
  • मूत्राशयाचा कर्करोग
  • प्रोस्टेट कर्करोग
  • स्तनाचा कर्करोग
  • थायरॉईड कर्करोग
  • गर्भाशयाचा कर्करोग
  • अंडाशयाचा कर्करोग
  • गर्भाशयमुखाचा कर्करोग

कर्करोग फुफ्फुस, स्तन, कोलन, किंवा अगदी रक्तामध्ये देखील सुरू होऊ शकतो. काही बाबतीत कर्करोग सारखे असतात, परंतु ते वाढण्याच्या आणि पसरण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि त्याचे लवकर निदान करणे महत्त्वाचे आहे.

स्क्रीनिंग चाचण्या रुग्णाला कोणतेही चिन्ह किंवा लक्षणे नसतानाच कर्करोग शोधतात. नियमित स्क्रीनिंग केल्यास काही कर्करोग लवकर पकडता येतो, तेव्हा ते लहान असतात, पसरलेले नसतात आणि उपचार करणे सोपे असते.

Products/Services

निरामय हॉस्पीटल

ॲडव्हान्स्ड कॅन्सर केअर सेंटर

निरामय हॉस्पीटल

निरामय हॉस्पीटल

Dr. PRASAD SOR

  • MBBS, MS (General Surgery) FIAGES, MRCS (England) DNB (Surgical Oncology)
  • FUICC, Tata Memorial, Mumbai
  • Consultant Surgical Oncologist 
  • Reg. No. 2008/04/1354

निरामय हॉस्पीटल

निरामय हॉस्पीटल

Dr. SHRADDHA SOR

  • MBBS, DGO
  • FOGSI Fellow Laparoscopy
  • Fellowship in Gynec Oncology (Kolkata)
  • Cenified Palliative Care Specialist Consultant Gynec Oncologist
  • Reg. No. 2010/11/3342

निरामय हॉस्पीटल

तोंडाचा कर्करोग – Oral cancer

आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.

लक्षणे : तोंडाच्या कर्करोगाची सुरवात हळूहळू होत असते. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या तोंडामध्ये सुरवातीला पांढरट चट्टे (ल्यूकोप्लाकिया) किंवा लाल चट्टे (एरिथ्रोप्लाकिया) दिसू लागतात. असे चट्टे दिसल्यानंतरही त्या व्यक्तीने तंबाखूचे व्यसन सुरुचं ठेवल्यास त्या चट्ट्यामध्ये गाठ, व्रण निर्माण होऊन तोंडाचा कर्करोग होतो. कॅन्सरच्या ऍडव्हान्स्ड स्टेजमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.

  • तोंडात जखमा व सूज येऊन वेदना होऊ लागतात.
  • ‎तोंडातून रक्तस्राव होणे.
  • ‎तोंड उघडण्यास त्रास होऊ लागतो.
  • ‎बोलताना किंवा अन्न गिळताना, अन्न चावण्यास त्रास होऊ लागतो.
  • ‎अशक्तपणा, वजन कमी होते.

कारणे : 

  • वयाच्या 40शी नंतर तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • ‎तंबाखू, गुटका, पानमसाला, सुपारी, सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, मद्यपान, यांचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
  • ‎तोंडाचा कर्करोग जर कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळेही तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

तोंडाचा कर्करोग – Oral cancer

पोटाचा कॅन्सर - Stomach cancer

पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते.

लक्षणे :  पोटातील कॅन्सरची लक्षणे ही अनेकदा सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावरचं अधिक जाणवतात.

  • पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे,
  • भुक कमी होणे,
  • अपचनाच्या तक्रारी उद्भवणे,
  • जेवणानंतर अस्वस्थ वाटणे,
  • मळमळ किंवा उलटी होणे,
  • उलटीमध्ये रक्त आढळणे,
  • शौचामधून रक्त पडणे,
  • वजन कमी होणे,
  • अशक्तपणा जाणविणे,

कारणे : असे काही घटक (Risk factors) आहेत की ज्यामुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. 

  • अनुवंशिक कारणामुळे, रक्तातील नात्यामध्ये जसे आईवडील, भाऊबहिण यांच्यापैकी कोणास पोटाचा कॅन्सर झालेला असल्यास पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक असू शकतो.
  • जुनाट पेप्टिक अल्सर, Pernicious anemia (B-12 Vitamin च्या कमतरतेने होणारा अनेमिया) या रोगांच्या दुष्परिणामातून पोटाचा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.
  • धुम्रपान, तंबाखू आणि मद्यपान यांच्या व्यसनामुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.
  • पोटाचा क्रोनिक इरिटेशन झाल्याने, मुख्यतः अत्यधिक मद्यपान, वेदनाशामक औषधांचा अतिवापर, अतिगरम, तीक्ष्ण पदार्थांच्या सेवनाने पोटात Irritation होत असते.
  • Helicobacter Pylori या बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळे पोटाला सूज येते व अशावेळी पोटातील कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
  • अतिखारट पदार्थ, अतितिखट, मसालेदार आहाराच्या अधिक सेवनाने पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक वाढते.
  • आहारातील तंतुमय पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांच्या कमतरतेमुळे पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका अधिक निर्माण होतो.

पोटाचा कॅन्सर - Stomach cancer

लिव्हर कॅन्सर - Liver cancer

यकृतात दोन प्रकारे कँसर होत असतो.
1) जेंव्हा यकृतामधील पेशींमध्ये बदल होऊन त्यांची वाढ आणि विभाजन अनियंत्रित स्वरुपात होऊ लागते तेंव्हा यकृतामध्ये स्वतःहूनच कॅन्सर निर्माण होतो त्यास Primary liver cancer असे म्हणतात. वेळीच योग्य उपचार न केल्यास प्राईमरी लिव्हर कॅन्सरचा प्रसार फुफ्फुस आणि हाडांमध्येही होऊ शकतो.

2) अन्य ठिकाणच्या कॅन्सरचा यकृतामध्ये प्रसार झाल्याने होणारा यकृत कॅन्सर. शरीरातील इतर भागात झालेल्या कर्करोगाच्या काही पेशी यकृतात येतात व यकृताच्या ठिकाणी त्यांची वाढ होऊन गाठी तयार होतात. या कँसर प्रकारास Metastatic Liver Cancer असे म्हणतात.

कारणे : 

  • हिपेटायटीस ‘बी’ आणि ‘सी’ विषाणूंचा प्रादुर्भाव,
  • यकृताचा सिरोसिस हा आजार झाल्यामुळे,
  • पित्तवाहिनीत झालेली विकृतीमुळे,
  • लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव,
  • अति मद्यपान (दारूचे व्यसन), धुम्रपान सिगारेटची व्यसने

लक्षणे :

  • यकृत कॅन्सरमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तिंच्या पचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होते.
  • भुख मंदावणे,
  • उलटी होणे, मळमळणे,
  • वजन कमी होणे,
  • यकृताचा आकार वाढणे, यकृताच्या ठिकाणी स्पर्शास गाठ जाणवणे,
  • पोटात पाणी होणे,
  • पोटाच्या उजव्या कुशीत दुखणे, जडपणा जाणवणे अशी लक्षणे अधिक दिवस दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते.

लिव्हर कॅन्सर - Liver cancer

रक्ताचा कर्करोग – Blood cancer

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया (Leukemia) असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो मात्र 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. रक्ताचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे.

लक्षणे : 

  • थंडी वाजून ताप येणे.
  • ‎रात्रीचा घाम अधिक प्रमाणात येणे.
  • ‎अशक्तपणा, अंगदुखी, सतत थकल्यासारखे, हात-पाय गळून गेल्यासारखे वाटते.
  • ‎रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झाल्याने वारंवार इन्फेक्शन होऊन आजारी पडणे.
  • ‎भूक न लागणे, वजन कमी होणे.
  • ‎लिम्फ नोडस्, यकृत किंवा प्लीहामध्ये सूज येणे.
  • ‎शरीरावर लाल-लाल चकते उटणे.
  • ‎नाकातून रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणे रक्ताच्या कॅन्सरमध्ये दिसू शकतात.

कारणे : 

  • जेनेटिक कारणांमुळे, शरीरातील जीन्स किंवा गुणसूत्रांमधील बदलांमुळे विकृत पेशी निर्माण होऊन ब्लड कॅन्सर होऊ शकतो.
  • ‎अनुवंशिक कारणांमुळे, रक्ताचा कर्करोग जर कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळेही ब्लड कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
  • ‎किरणोत्सर्गाशी संपर्क, रेडिएशन किंवा एक्सरे किरणांच्या दुष्प्रभावातूनही रक्ताचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
  • ‎रासायनिक द्रव्यांशी सततचा संपर्क, भेसळयुक्त अन्न, केमिकलयुक्त आहारातून, विषारी वायूच्या संपर्कामुळे.
  • ‎धूम्रपान, तंबाखू, मद्यपान यांच्या व्यसनामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

 

रक्ताचा कर्करोग  – Blood cancer

स्तनाचा कर्करोग - Breast cancer

स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.

लक्षणे : स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्‍या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.

  • स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
  • ‎अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
  • ‎बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
  • ‎स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

कारणे :

  • स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. कुटुंबातील आई, बहिणीमध्ये जर स्तन कॅन्सर असल्यास अनुवंशिक कारणांद्वारे स्तन कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते. अशावेळी कुटुंबातील व्यक्तींमध्ये जर स्तन कॅन्सरची लक्षणे जाणवल्यास खबरदारी म्हणून स्वतः देखिल स्तन परिक्षण करुन घेणे आवश्यक असते.
  • ‎वयाच्या 12 व्या वर्षापुर्वीच मासिक पाळी सुरु झालेली असल्यास,
  • ‎वयाच्या 55 व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास,
  • ‎निसंतती, वंधत्वाची समस्या असणे,
  • ‎प्रथम अपत्य जर वयाच्या 30 वर्षानंतर झाल्यास,
  • ‎कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकामुळे,
  • ‎आपल्या बाळास स्तनपान न करणाऱ्‍या महिला,
  • ‎व्यसनाधिनतेमुळे जसे, तंबाखू, मद्यपान इ.

 

स्तनाचा कर्करोग - Breast cancer

गर्भाशय मुखाचा कॅन्सर - Cervical cancer

स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्‍या कॅन्सरच्या यादीमध्ये याचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.

कारणे : 

  • एचपीव्ही (पॅपिल्लोमा व्हायरस) बाधित स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला मुख्य कारण एचपीव्ही ट्रान्समिशन हे आहे, हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो.
  • ‎हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे – Estrogen स्त्रावाचे अधिक स्त्रवण झाल्याने आणि Progesterone स्त्रावाद्वारे त्याचे नियंत्रण न झाल्याने.
  • ‎अति स्थुलता – लठ्ठपणा हे एक गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरते. Fat cell मुळे Estrogen स्त्रावाची अधिक निर्मिती होते.
  • ‎मौखिक गर्भनिरोधक गोळ्या (ओसीज) दीर्घकाळासाठी घेतल्या तर सर्वायकल कँसरचा धोका वाढू शकतो. संशोधन सुचवते की, ओसीज घेणा-या स्त्रियांमध्ये सर्वायकल कँसरचा धोका अधिकच वाढतो पण ओसीज घ्यायच्या बंद केल्या की धोका कमी होतो.
  • ‎निसंतती, वंधत्वाची समस्या असणे, संतती संख्या कमी असणाऱ्‍या महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो. त्यामानाने अधिक मुले-मुली असणाऱ्‍यांमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्सर कमी आढळतो.
  • ‎उशीरा रजोनिवृत्ती (मेनोपॉज) झाल्याने – म्हणजे वयाच्या 55 वर्षानंतर ज्या स्त्रीयांमध्ये रजोनिवृत्ती होते, त्यांमध्ये हा कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.
  • ‎अनुवंशिकता – सर्वायकल कँसर हा काही कुटुंबांमध्ये अनुवंशिक असू शकतो. जर स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशय मुखाच्या कर्करोग असेल तर कुटुंबामध्ये कुणालाही कर्करोग नसणा-या स्त्रीपेक्षा या स्त्रीमध्ये रोग होण्याची शक्यता 2 ते 3 पट जास्त असते.
  • ‎स्तनांचा कर्करोग किंवा Ovaries कॅन्सर असल्यास सर्वायकल कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.

लक्षणे :

  • योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे.
  • ‎गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
  • लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
  • ‎रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
  • ‎याशिवाय भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

गर्भाशय मुखाचा कॅन्सर - Cervical cancer

फुफ्फुसाचा कॅन्सर - Lung Cancer

फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरवात अगदी हळूहळू होत असते. फुफ्फुसाच्या कर्करोगाची वाढ होत असताना कोणतीही लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय फुफ्फुस कॅन्सर अधिक वाढलेला असतो, त्याची लागण शरीरातील इतर अवयवांना देखील झालेली असते, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कर्करोगाचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते.

कारणे : 

  • धूम्रपान करण्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो. सिगारेट-बिडी-चिलीम-तंबाखू यांचे व्यसन हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण बनले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना होण्याचे प्रमाण हे 90% इतके आहे.
  • ‎सेकंडहँड स्मोकमुळेही याचा धोका संभवतो. म्हणजे जर आपण धूम्रपान करत नसाल आणि आपल्या आजूबाजूची व्यक्ती धूम्रपान करीत असल्यास त्या धुराच्या संपर्कात आल्यानेही याचा आपणास धोका संभवतो.
  • ‎हवेच्या प्रदूषणामुळेही फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. विषारी धूर ओखणारे कारखाने, वाढलेली वाहने, शहरीकरण आणि बेसुमार केलेली वृक्षतोड यांमुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. हवेमध्ये विविध अपायकारक घटक मिसळलेले आहेत.
  • ‎फुफ्फुसांशी संबंधित COPD किंवा TB यासारखे गंभीर आजार झाल्यामुळे.
  • ‎अनुवंशिकतेमुळे ही फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो. कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास फुफ्फुस कॅन्सर होण्याची धोका अधिक असतो.
  • ‎तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेल्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो.

लक्षणे :

  • दीर्घकाळ खोकला असणे. दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकल्याचा त्रास होत असणे.
  • ‎खोकताना छातीतून वेदना होणे.
  • ‎खोकल्यातून रक्त येणे.
  • ‎श्वास घेताना त्रास होणे, श्वासावेळी छातीत दुखणे.
  • ‎भूक न लागणे,
  • ‎वजन कमी होणे.
  • ‎आवाजामध्ये बदल होणे ही फुफ्फुस कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

फुफ्फुसाचा कॅन्सर - Lung Cancer

Gallery

Videos

Rate Us

Contact Us