About Us
"तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी – शस्त्रक्रियेत निपुणता, सेवेत समर्पण!"
OPD TIMING : सकाळी 11 ते 3.00 व संध्या. 5.00 ते 6.00
डॉ. अविनाश तेलगोटे
- एम.बी.बी.एस., एम.एस. (सर्जरी), पुणे.
- जनरल व कॅन्सर सर्जन,
- Reg. No.: 2001/04/1874
डाॅ. अभिजीत अडगावकर
- MBBS, MD.
डाॅ. श्रीकांत काळे
- MBBS, MD. Medicine
डाॅ. अश्विन मापारी
- MBBS,
डाॅ. शलाका अडगांवकर
- MBBS, MS. (Gynea)
डाॅ. पल्लवी ढवळे
- MBBS, DA
डाॅ. जाहाबिया गोघरी
- MBBS, DA
उपलब्ध उपचार :
- पचन संस्थेचे आजार - पोटदुखी, ॲसिडीटी, अल्सर, पित्ताशयाचे आजार, अपेन्डीक्सवरील सूज, लहान व मोठ्या आतड्यांचे विविध आजार, पचन संस्थेच्या विविध भागांचे कॅन्सर
- शरीरातील निरनिराळ्या गाठी व जखमा
- हर्निया, हायड्रोसिल
- मुळव्याध, फिशर, फिश्टुला
- थाईरॉईड ग्रंथीचे आजार
- स्तनातील गाठी, स्तनाचा कॅन्सर
- मुत्ररोग, मुतखडा
AVAILABLE CASHLESS FACILITIES :
- HDFC ERGO General Insurance
- Universal Sompo General Insurance
रुग्णांसाठी सुचना :
- तपासणी वेळ : सकाळी 11 ते 3.00 व संध्या. 5.00 ते 6.00
- कृपया येतांना फोन नं. 8788610650, 9011908500 वर संपर्क करून आपली तपासणी वेळ निश्चित करून येणे.
- पेशंटचे ऑपरेशन सुरू असतांना आपल्या तपासणी साठी वेळ लागू शकतो.
Products/Services
आम्लपित्त (Acidity)
आम्लपित्त म्हणजे ॲसिडीटी. ॲसिडीटीचा त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. या त्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे ही समस्या होत असते. आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातून अन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊ लागतो.
ॲसिडीटीची लक्षणे :
- ॲसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,
- छातीत जलन होणे,
- घशात जळजळणे,
- मळमळ किंवा उलटी होणे,
- तोंडात आंबट पाणी येणे,
- तोंडाची चव बदलणे,
- ढेकर येणे,
- पित्तामुळे डोके दुखणे,
- अपचन होणे,
- बद्धकोष्ठता समस्या होणे अशी प्रामुख लक्षणे आम्लपित्तात असतात.

अल्सर
अल्सर म्हणजे पोटाच्या किंवा लहान आतड्याच्या आतील आवरणास होणारी जखम. पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्या पाचक रसाचा परिणाम या अवयवांच्या आतील आवरणावर होऊन अल्सर होत असतात. योग्य उपचार व पथ्य यांमुळे अल्सर लवकर बरे होऊ शकतात.
अल्सर ची लक्षणे :
- जेवल्यावर लगेच पोट दुखणे,
- पोटात वरच्या बाजूला वारंवार दुखणे,
- रात्री-अपरात्री पोटदुखी चालू होणे.
- पोट फुगल्यासारखे वाटणे,
- ऍसिडिटी (आम्लपित्त) होणे,
- छातीत व पोटात जळजळणे,
- भूक व वजन कमी होणे,
- मळमळ आणि उलट्या होणे असे त्रास अल्सरच्या रुग्णाला वरचेवर होत असतात.

पित्ताशयातील खडे (Gallstones)
अनेक लोकांना पित्ताशयात खडे होण्याचा त्रास असतो. आपल्या शरीरात उजव्या कुशीत यकृताच्या खाली
पित्ताशयाची पिशवी असते. या पित्ताशयात पित्त (Bile) साठवले जाते. या पित्ताचा उपयोग पचनक्रियेसाठी होत असतो.
पित्ताशयात काहीवेळा पित्ताचे खडे धरत असतात. विशेषतः पित्ताशयातील पित्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक झाल्यास पित्ताचे खडे होत असतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो.
लक्षणे :
- पित्ताशयातील खड्यांमुळे पित्ताशयाला सूज येऊन उजव्या कुशीत दुखणे,
- पोटदुखी, जेवणानंतर त्रास वाढलेला जाणवतो,
- ताप येणे, मळमळणे, उलटी होणे, काविळ होणे,
- लघवीला गडद होणे, घाम येणे,
- शौचाचा रंग पांढरट किंवा मातकट असणे,
- पोट गच्च वाटणे व ढेकर येणे अशी लक्षणे या त्रासात जाणवू शकतात.

अपेंडिक्सला सूज येणे (Appendicitis)
अपेंडिक्स हा अवयव आपल्या पोटात उजव्या बाजूला मोठ्या आतड्याशी जोडलेले असतो. या अपेंडिक्सची रचना ही एकाद्या पिशवीसारखी असते. याचे एक टोक मोठ्या आतड्याशी जोडलेले असते तर दुसरे पलीकडचे टोक मात्र बंद असते. जेंव्हा अपेंडिक्स ह्या अवयवाला सुज येते त्या स्थितीला अॅपेंडिसाइटिस (Appendicitis) असे म्हणतात.
अशा या अपेंडिक्समध्ये आतडय़ांतील अन्न काही कारणामुळे शिरते. अपेंडिक्सचे दुसरे टोक बंद असल्याने एकदा आत शिरलेले अन्न पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते अन्न अपेंडिक्सच्या आतच पडून राहते व त्यात कुजण्याची प्रक्रिया सुरु होते. यामुळे पुढे जंतुसंसर्ग होऊन अपेंडिक्सला सूज येते व दुखणं सुरू होते. या त्रासाला अपेंडिसायटिस असे म्हणतात. अपेंडिक्सला सूज येऊन ते फुटूही शकते त्यामुळे इन्फेक्शन पूर्ण पोटात पसरून धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. हा त्रास प्रामुख्याने 10 ते 30 वर्ष वयामध्ये अधिक आढळतो.

लहान व मोठ्या आतड्यांचे विविध आजार
लहान आणि मोठ्या आतड्यांचे विविध आजारांमध्ये बद्धकोष्ठता, अतिसार, आम्लपित्त, क्रोहन रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS), आतड्यांचे संसर्ग, ट्युमर, आणि कर्करोग यांचा समावेश होतो.
उपचारात आहारातील बदल, औषधे, प्रोबायोटिक्स, जीवनशैली सुधारणा, तसेच गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया यांचा समावेश असतो. वेळेवर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास बहुतेक आजार प्रभावीपणे नियंत्रित करता येतात.

पोटाचा कॅन्सर - Stomach cancer
पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते.
लक्षणे : पोटातील कॅन्सरची लक्षणे ही अनेकदा सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावरचं अधिक जाणवतात.
- पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे,
- भुक कमी होणे,
- अपचनाच्या तक्रारी उद्भवणे,
- जेवणानंतर अस्वस्थ वाटणे,
- मळमळ किंवा उलटी होणे,
- उलटीमध्ये रक्त आढळणे,
- शौचामधून रक्त पडणे,
- वजन कमी होणे,
- अशक्तपणा जाणविणे

स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer)
आपल्या शरीरातील स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातील पेशींमध्ये होणाऱ्या कॅन्सरला स्वादुपिंडाचा कर्करोग (Pancreatic Cancer) असे म्हणतात. बहुतेकवेळा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान हे गंभीर स्थितीमध्ये कॅन्सर गेल्यावरच दिसून येते तसेच इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो त्यामुळे स्वादुपिंडाच्या कॅन्सरमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे.
लक्षणे : स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये सुरवातीच्या अवस्थेत खालील लक्षणे जाणवू शकतात.
- भूक न लागणे,
- वजन कमी होणे,
- पोटाच्या मधल्या व आजूबाजूला वरच्या भागात दुखते, तेव्हा पाठही दुखते.
- कावीळ होणे, डोळे व त्वचा पिवळी होणे,
- डिप्रेशन नैराश्य जाणवणे अशी काही लक्षणे सुरवातीला असू शकतात.

यकृताचा कर्करोग (Liver cancer)
यकृताच्या कॅन्सरमध्ये यकृतातून अपायकारक विषारी घटकांचा निचरा होण्यास अडथळा होतो. पर्यायाने रक्तातील अपायकारक विषारी घटकांची वाढ होते. अशावेळी योग्य उपचार केले गेले नाही तर यकृत निकामी होऊन रुग्ण दगावण्याचाही धोका अधिक असतो. यकृताचा कर्करोग हा यकृत आजारातील दुसऱ्या क्रमांकाचा आजार मानला जातो. यकृत कॅन्सरचे प्रमाण स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे. तर वयाचा विचार केल्यास 30 वर्षानंतरच्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते.
लक्षणे :
- यकृत कॅन्सरमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तिंच्या पचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होते.
- भुख मंदावणे,
- उलटी होणे, मळमळणे,
- वजन कमी होणे,
- यकृताचा आकार वाढणे, यकृताच्या ठिकाणी स्पर्शास गाठ जाणवणे,
- पोटात पाणी होणे,
- पोटाच्या उजव्या कुशीत दुखणे, जडपणा जाणवणे अशी लक्षणे अधिक दिवस दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते.

हर्निया (Hernia)
हर्निया आजारात पोटाजवळील एखादा अवयव हा मांसपेशीच्या कमजोर छिद्रातून बाहेर येतो त्यामुळे हर्नियामुळे त्याठिकाणी फुगवटा आल्याचे दिसते. हर्नियाचे अनेक प्रकार आहेत. हर्निया हा आजार लहान मुलांपासून ते वृद्ध अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो. हर्निया हे ओटीपोटातील भागात, जांघेत, कमरेत झालेला आढळतो.
लक्षणे :
- हर्नियाचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे प्रभावित भागात फुगवटा किंवा गाठ आल्यासारखे आढळते.
- उभे असताना, खाली वाकताना किंवा खोकताना स्पर्शाला हर्नियाची गाठ जाणवते.
- झोपल्यावर त्याठिकाणी स्पर्श केल्यास हर्नियाचा फुगवटा नाहीसा झाल्याचे जाणवते.
- हर्नियाच्या ठिकाणी वेदना जाणवू शकतात.
- इनगिनल हर्नियामुळे जांघेत हर्नियाचा फुगवटा येतो.
- इनगिनल हर्नियामुळे पुरुषांच्या स्क्रोटममध्ये (वृषणकोशात) सूज किंवा गाठ येते.
- हायटल हर्नियामध्ये छातीत जळजळ होणे, गिळताना त्रास होणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे जाणवतात.
- अंबिलीकल हर्नियामुळे बेंबीच्या ठिकाणी हर्नियाचा फुगवटा येतो.

थायरॉईड संबंधित आजार
थायरॉईड ही मानेला समोरच्या बाजूस असलेला ग्रंथी आहे, जी हार्मोन्स तयार करून शरीराच्या चयापचय (मेटाबॉलिझम) नियंत्रित करते.
कारणे :
- आयोडीनची कमतरता
- ऑटोइम्यून विकार (जसे की हाशिमोटो रोग किंवा ग्रेव्ह्स डिसीज)
- आनुवंशिक कारणे
- हार्मोन्सचे असंतुलन
- थायरॉईड ग्रंथीवर सूज किंवा ट्यूमर
लक्षणे :
- वजन वाढणे किंवा कमी होणे
- थकवा व अशक्तपणा
- केस गळणे
- त्वचा कोरडी पडणे
- चिडचिड किंवा ताण जाणवणे
- हृदयाचे ठोके वेगाने होणे किंवा मंदावणे
उपचार : थायरॉईडच्या उपचारांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या प्रमाणानुसार औषधे दिली जातात (हायपोथायरॉईडसाठी थायरॉक्सिन, हायपरथायरॉईडसाठी अँटी-थायरॉईड औषधे). काही प्रकरणांमध्ये रेडिओआयोडीन थेरपी किंवा शस्त्रक्रिया केली जाते.

स्तनाचा कर्करोग - Breast cancer
स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.
लक्षणे : स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.
- स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
- अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
- बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
- स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

किडनी स्टोन
किडनी स्टोन किंवा रेनल कॅल्क्युली हे क्रिस्टल्सने बनलेले घट्ट द्रव्यमान (खडे) आसतात. ते तुमच्या किडनीमध्ये तयार होतात आणि तुमच्या मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात, ज्यामध्ये किडनी, युरेटर्स, मूत्राशय आणि मूत्रमार्ग यांचा समावेश आहे, विकसित होऊ शकतात. किडनी स्टोन वेगवेगळ्या आकारांचे असतात किडनी स्टोनवर उपचार हा स्टोनचा प्रकार, आकार व ठिकाण यावर अवलंबून असतो.
किडनी स्टोनच्या लक्षणांमध्ये तीव्र वेदना, सतत लघवी आल्यासारखे वाटणे, मूत्रात रक्त, मळमळ, उलट्या, भकाळीत दुखणे, ताप येणे, लघवीला जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर किडनी स्टोन मूत्रमार्गातील प्रवाहात अडकल्यास, ते मूत्र मार्गावर दाब निर्माण करू शकतात आणि मूत्रासाठी मार्गात अडथळा बनू शकतात. यामुळे मूत्र रोखले जाऊ शकते आणि किडनीला नुकसान होऊ शकते.

Gallery








