About Us
कोंडावार
सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल
Laser Kidney Stone Surgery Center
Advanced Endourology Center & Maternity Home
कोंडावार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल हे शिवाजीनगर, परभणी येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह रुग्णालय आहे. लेझर किडनी स्टोन शस्त्रक्रिया, ॲडव्हान्स एंडोयुरोलॉजी उपचार तसेच मातृत्व सेवांमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित व गुणवत्तापूर्ण उपचार दिले जातात. आधुनिक तंत्रज्ञान, सुसज्ज सुविधा व रुग्णकेंद्रित सेवा हेच आमचे वैशिष्ट्य आहे.
उपलब्ध सुविधा-
युरॉलजी विभाग:
- अत्याधुनिक शस्त्रक्रियागार.
- प्रोस्टेट ग्रंथीचे आजार.
- दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया (TURP)
- लघवीच्या पिशवीतील मुतखड्याचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन.
- किडनीस्टोनचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन (PCNL).
- युरेटेरीक (Ureteric Stone) स्टोनचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन.
- पुरुष वंध्यत्व चिकित्सा व लैंगीक समस्यांचे इलाज.
- किडनी, मुत्राशय व जननेंद्रियांच्या कॅन्सरचे निदान व उपचार.
- मुलांचे मुत्ररोगावर दुर्बिणीने इलाज.
- लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया.
- युरोलॉजी व जनरल सर्जरी सुविधा.
- सी.आर्म फॅसिलिटी.
आजारा संबंधि सुविधा उपलब्ध:
- मुतखडा (Kidney Stone)
- ओटी पोटात दुखणे
- प्रोस्टेट ग्रंथी संबंधी उपचार
- सतत लघवी लागणे
- लघवीची धार कमी होणे
- लघवीसाठी जोर लावावा लागणे
- लघवीवाटे रक्त जाणे
- मुत्र मार्गात जंतू संसर्ग
- लहान मुलांमध्ये मुत्रविकार
- स्त्रीयांमध्ये मुत्रविकार
- आचानक लघवी थांबने
स्त्रीरोग विभाग:
- गरोदरपणात विशेष उपचार आणि सुरक्षित प्रसुती.
- अतिजोखमेचे गरोदरपण आणि प्रसुती, गरोदरपणात रक्तदाब वाढणे.
- गरोदरपणात झटके येणे, डायबेटीज, थायरॉईड, हृदयरोग, काविळ या सर्वांचे उपचार.
- वारंवार होणारे गर्भपात, निदान व उपचार.
- स्त्री रोग-पांढरा पदर, ओटीपोटात दुखणे, मासीक पाळीचे आजार.
- मासीक पाळीत अतिरक्तस्त्राव तपासणी व उपचार.
- गर्भाशयपिशवीचे आजार निदान व उपचार.
- गर्भाशय मुखाचा कॅन्सर निदान व उपचार.
- गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण.
- विवाहपुर्व व विवाहोत्तर मार्गदर्शन.
- स्त्री वंध्यत्व निवारण व उपचार (शुक्राणूंची कमतरता).
- आपोआप लघवी सुटने निदान व उपचार.
- शासनमान्य गर्भपात केंद्र.
शस्त्रक्रिया:
- सिझेरीयन प्रसुती सेवा
- गर्भाशय पिशवी काढणे
- गर्भाशयातील गाठी काढणे
- हिस्टेरोस्कोपीक शस्त्रक्रिया
- लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
- आपोआप लघवी सुटणे थांबवयाचे ऑपरेशन
- गर्भाशय मुखावर टाका देणे
- स्त्रीयांच्या स्तनरोगाचे निदान व उपचार
- सुसज्ज अद्यावत हॉस्पीटल
- सुसज्ज अद्यावत ऑपरेशन थिएटर व लेबर रुम
- प्रसुती अतिदक्षता विभाग
- परिपूर्ण पॅरामेडिकल स्टाफ
Products/Services
कोंडावार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल
डॉ. कौशल उमाकांत कोंडावार
- M.B.B.S., M.S. (General Surgery) D.N.B. (Urology)
- Consultant Urologist & Andrologist
- पोट विकार तज्ञ व मुत्रविकार तज्ञ
डॉ. योगिनी तम्मेवार (कोंडावार)
- M.B.B.S., D.G.O., F.C.P.S.
- स्त्रीरोग विशेषज्ञ आणि प्रसुती तज्ञ

लहान मुलांमध्ये मूत्रमार्गाचे विकार
पिढीजात मूत्रमार्गाचे विकार लहान मुलांमध्ये आढळतात. Hypospadias व Epispadias हे लिंगाच्या टोकावरून मूत्रमार्ग बाहेर न येता चुकीच्या जागी असण्याचे विकार आहेत, ज्यामुळे लघवी करताना अडचण येते. Ureteric Reimplantation ही शस्त्रक्रिया अशा मुलांमध्ये केली जाते जेव्हा मुत्र मागे मूत्रपिंडात जातो. PUJ Obstruction म्हणजे मूत्रपिंड व मूत्रवाहिनीच्या जोडेशी अडथळा येणे, तर PU Valve Fulgration ही लहान मुलांमध्ये जन्मतः असलेल्या मूत्रमार्गातील झडप काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. योग्य वेळी उपचार न घेतल्यास मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो, म्हणून वेळेत निदान व उपचार आवश्यक असतात.

मूत्रपिंड व मूत्रमार्गातील खडे काढण्यासाठी आधुनिक व प्रभावी शस्त्रक्रिया
मूत्रपिंड, मूत्रवाहिनी व मूत्रमार्गात खडे होणे ही सामान्य पण वेदनादायक समस्या आहे. लक्षणांमध्ये पाठदुखी, लघवी करताना वेदना, रक्तमिश्रित लघवी, जळजळ आणि उलट्या यांचा समावेश होतो. यावर आधुनिक शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत:
URS (Semi-Rigid/Flexible with Laser) – मूत्रमार्गातील खडे लेसरने फोडण्यासाठी.
PCNL / Miniperc – मोठे मूत्रपिंडातील खडे काढण्यासाठी पाठीवरून छोट्या छिद्राद्वारे.
RIRS (Retrograde Intrarenal Surgery) – लवचिक स्कोप व लेसरच्या साहाय्याने मूत्रपिंडातील लहान खडे काढण्यासाठी.
Laparoscopic Pyelolithotomy/Ureterolithotomy – मोठ्या खड्यांसाठी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया.
या उपचारांशिवाय खडे किडनीचे नुकसान करू शकतात, संसर्ग वाढतो आणि तीव्र वेदना निर्माण होतात, म्हणून वेळेवर उपचार आवश्यक आहे.

मूत्रविकार संबंधित कर्करोग
मूत्रसंस्थेशी संबंधित कर्करोग गंभीर व जीवघेणा असू शकतो. किडनी कॅन्सर मध्ये लक्षणे म्हणजे रक्तमिश्रित लघवी, पाठदुखी, वजन कमी होणे. यावर नेफ्रेक्टोमी (लॅपरोस्कोपिक/ओपन) म्हणजे किडनी काढण्याची शस्त्रक्रिया केली जाते.
मूत्राशयाचा कर्करोगामध्ये वारंवार लघवी, जळजळ, रक्तस्राव ही लक्षणे असून उपचारासाठी TURBT (गाठ काढण्याची प्रक्रिया) आणि रॅडिकल सिस्टेक्टोमी (पूर्ण मूत्राशय काढणे) केली जाते.
प्रोस्टेट कर्करोग मध्ये लघवीला बारबार जावेसे वाटणे, पाठदुखी. उपचार म्हणून रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी (प्रोस्टेट ग्रंथी काढणे), हार्मोनल थेरपी, आणि अँटी-अँड्रोजेन थेरपी दिली जाते.
उपचाराशिवाय कर्करोग शरीरात पसरतो आणि जीवघातक ठरतो, त्यामुळे त्वरित निदान व उपचार आवश्यक आहे.

प्रोस्टेट वाढीवर प्रभावी उपचार
प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यास लघवी करताना अडथळा निर्माण होतो, ज्याला BPH (Benign Prostatic Hyperplasia) म्हणतात. लक्षणांमध्ये लघवी सुरळीत न होणे, वारंवार लघवी येणे, लघवी थांबणे किंवा सांडणे यांचा समावेश होतो. उपचारासाठी TURP (Monopolar/Bipolar) ही पारंपरिक व अत्यंत प्रभावी शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये प्रोस्टेटचा अति वाढलेला भाग काढला जातो.
THULEP (Thulium Laser Prostate Surgery) ही लेसर तंत्रज्ञानावर आधारित अधिक अचूक, कमी रक्तस्त्राव व जलद बरे होणारी प्रक्रिया आहे. योग्य वेळी उपचार न केल्यास किडनीचे नुकसान व संक्रमणाचा धोका वाढतो, म्हणून उपचार अत्यावश्यक असतो.

लघवीच्या मार्गातील अडथळ्यावर निश्चित व प्रभावी उपाय
स्ट्रिक्चर म्हणजे मूत्रमार्ग संकुचित होणे, ज्यामुळे लघवी करताना त्रास होतो. लक्षणांमध्ये लघवीचा प्रवाह कमी होणे, वारंवार लघवी लागणे, जळजळ, लघवी पूर्ण न होणे व संसर्गाचा त्रास यांचा समावेश होतो. उपचारासाठी VIU (Visual Internal Urethrotomy) ही एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया वापरली जाते.
जास्त संकुचन असल्यास युरेथ्रोप्लास्टी (BMG - Buccal Mucosa Graft) केली जाते. उपचाराशिवाय मूत्रसंचय, संक्रमण व मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो, त्यामुळे वेळेत उपचार आवश्यक आहे.

पुरुष प्रजनन – अँड्रोलॉजिकल उपचार
ॲन्ड्रोलॉजी म्हणजे पुरुषांच्या लैंगिक व प्रजनन संबंधित समस्यांचे निदान व उपचार. लिंग वक्रता (Penile Curvature) ही लैंगिक संबंधात अडथळा आणणारी समस्या असून शस्त्रक्रियेद्वारे दुरुस्ती केली जाते.
टेसा / पेसा (TESA/PESA) ही तंत्रे शुक्राणू थेट अंडकोशातून काढण्यासाठी वापरली जातात, जेव्हा वीर्यत शुक्राणू नसतात. पुरुष वंध्यत्व (Male Infertility) मध्ये शुक्राणूंची संख्या, हालचाल किंवा गुणवत्ता कमी असते.
यामुळे दांपत्याच्या आयुष्यात ताण निर्माण होतो. वेळेत उपचार घेतल्यास नैसर्गिक गर्भधारणा किंवा ICSI सारख्या उपायांनी पालकत्व शक्य होते.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाशी संबंधित मूत्रपिंडाचा आजार
मधुमेह आणि उच्च रक्तदाब मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे रक्त शुद्धीकरण आणि द्रव संतुलन राखण्याची क्षमता बिघडते आणि क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) होऊ शकतो. उच्च रक्तदाबाचे लक्षणे सहसा दिसत नाहीत, तर मधुमेहामुळे मूत्रपिंडे जास्त काम करतात आणि लघवीतून प्रथिने गमावण्याची समस्या (मायक्रोअल्ब्युमिन्युरिया/मॅक्रोअल्ब्युमिन्युरिया) उद्भवते. यावर वेळेवर उपचार न केल्यास मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते.
योग्य व्यवस्थापनासाठी रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, नियमित व्यायाम, संतुलित आहार, कमी मीठाचे सेवन, तसेच धुम्रपान आणि तंबाखू खाणे टाळणे फायदेशीर ठरते.

नेफ्रोटिक सिंड्रोम
नेफ्रोटिक सिंड्रोम हा मूत्रपिंडांचा विकार आहे ज्यामध्ये ग्लोमेरुली चे नुकसान होऊन मूत्रात प्रथिने, विशेषतः अल्ब्युमिन, मोठ्या प्रमाणात गळतात. यामुळे हायपोअल्ब्युमिनेमिया आणि शरीरात द्रवपदार्थाचे संचय (एडेमा) होते. लक्षणांमध्ये हात पाय व चेहऱ्यावर सूज, फोमयुक्त मूत्र, वजन वाढ, भूक मंदावणे, थकवा आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश असुशक्तो.

ग्लोमेरुलोनेफ्रायटिस
ग्लोमेरुलोनेफ्रायटिस म्हणजे मूत्रपिंडातील ग्लोमेरुलींची (लहान फिल्टर) जळजळ (Inflammation) होय. ग्लोमेरुली रक्तातील घान, टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त द्रव काढण्याचे कार्य करते या संरचनाला जळजळ (inflammation - ग्लोमेरुलोनेफ्रायटिस) झाल्यास लघवीत रक्त व प्रथिनांचा रिसाव होऊ शकतो व त्या मुळे किडनी विकार होऊ शकतो.

स्त्रीवंध्यत्व (Infertility)
स्त्रीवंध्यत्व (Infertility) म्हणजे लग्नानंतर १ वर्ष नियमित संबंध असूनही गर्भधारणा न होणे. हे स्त्री व पुरुष दोघांमध्ये असलेल्या समस्येमुळे होऊ शकते.
लक्षणे –
- मासिक पाळी अनियमित किंवा बंद होणे
- पाळीदरम्यान खूप कमी/जास्त रक्तस्राव
- वारंवार गर्भपात होणे
- हार्मोनल असंतुलनाची लक्षणे
उपचार घेणे का गरजेचे –
- योग्य कारण शोधून उपचार केल्यास गर्भधारणा शक्य
- भविष्यातील गुंतागुंत टाळता येते
- मानसिक व सामाजिक तणाव कमी होतो

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज
लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज म्हणजे पोटावर छोट्या छिद्रांद्वारे कॅमेरा व विशेष साधनांनी केलेली शस्त्रक्रिया. या तंत्रामुळे उघडी मोठी कापणी न करता स्त्रीरोगांचे निदान केले जाते.
लक्षणे ज्यामुळे शस्त्रक्रिया गरजेची ठरते –
- गर्भाशयातील गाठ (Fibroid)
- पोटदुखी व मासिक पाळीतील त्रास
- पोटात गाठ, ट्यूमर किंवा सिस्ट
- वंध्यत्वाशी संबंधित समस्या
उपचार घेणे का गरजेचे –
- आजाराचे अचूक निदान व पूर्ण उपचार
- भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळणे

हिस्टरोस्कोपी
हिस्टरोस्कोपी (ObGy) सर्जरी म्हणजे गर्भाशयाच्या आत कॅमेर्याद्वारे पाहून निदान व उपचार करण्याची आधुनिक पद्धत. ही शस्त्रक्रिया योनीमार्गे केली जाते, त्यामुळे पोटावर कोणतीही कापणी लागत नाही.
लक्षणे –
- अनियमित मासिक पाळी
- खूप जास्त रक्तस्राव किंवा कमी रक्तस्राव
- गर्भाशयात गाठ/पॉलिप
- वारंवार गर्भपात होणे
- वंध्यत्वाच्या समस्या
उपचार घेणे का गरजेचे –
- आजाराचे अचूक कारण शोधले जाते
- योग्य वेळी उपचार करून गुंतागुंत टाळता येते

प्रसव (सामान्य व सिझेरियन)
सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.
लक्षणे / प्रसव सुरू होण्याची चिन्हे –
- पोटदुखी व वारंवार वेदना येणे
- पाणी फुटणे
- रक्तस्त्राव सुरू होणे
- बाळाच्या हालचालीत बदल
उपचार/वैद्यकीय देखरेख का गरजेची –
- आई व बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी
- प्रसवदरम्यान येणाऱ्या गुंतागुंती हाताळण्यासाठी

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया
कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया म्हणजे आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलांनंतर पुढील गर्भधारणा टाळण्यासाठी केलेली कायमस्वरूपी शस्त्रक्रिया. यात स्त्री व पुरुष दोघांसाठीही सोप्या पद्धती उपलब्ध आहेत.
लक्षणे / गरज ओळखण्याची कारणे –
- आधीच अपेक्षित मुलांची संख्या पूर्ण होणे
- वारंवार गर्भधारणेमुळे आरोग्यावर परिणाम होणे
- आर्थिक व सामाजिक कारणे
उपचार का गरजेचे –
- अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी
- आईच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी

PCOD
PCOD (Polycystic Ovarian Disease) म्हणजे स्त्रियांच्या अंडाशयात लहान लहान गाठी (सिस्ट) तयार होऊन हार्मोन्सचे असंतुलन होणे. यामुळे प्रजनन व मासिक पाळीच्या तक्रारी उद्भवतात.
लक्षणे –
- मासिक पाळी अनियमित होणे
- वजन वाढणे व लठ्ठपणा
- चेहऱ्यावर केस/पिंपल्स येणे
- केस गळणे
- गर्भधारणेत अडचण येणे
उपचार का गरजेचे –
- भविष्यात वंध्यत्व, मधुमेह, हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी
- हार्मोनल संतुलन राखण्यासाठी

श्वेतपदर (Leukorrhea)
श्वेतपदर (Leukorrhea) म्हणजे स्त्रीच्या योनीतून सतत किंवा जास्त प्रमाणात पांढरा स्त्राव होणे. कधीकधी हा नैसर्गिक असतो, परंतु जास्त व त्रासदायक झाल्यास तो आजाराचे लक्षण असू शकतो.
लक्षणे –
- सतत पांढरा, पिवळसर किंवा दुर्गंधीयुक्त स्त्राव
- खाज सुटणे व जळजळ होणे
- कमरेत/पोटात दुखणे
- अशक्तपणा व थकवा येणे
उपचार का गरजेचे –
- संक्रमण व इतर गंभीर आजार टाळण्यासाठी
- दीर्घकाळ रक्ताल्पता व कमजोरी टाळण्यासाठी
उपचाराचे फायदे –

गर्भाशय व गर्भाशय मुखाचा कर्करोग
स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या कॅन्सरच्या यादीमध्ये गर्भाशय व गर्भाशय मुखाचा कर्करोगाचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.
लक्षणे :
- योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे.
- गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
- लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
- रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
- याशिवाय भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

Gallery














