About Us

नरवाडे हॉस्पिटल

प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

डॉ. हेमंत शेषराव नरवाडे (पाटील-मोपकर)

  • M.D. Medicine (Ayu)
  • मधुमेह, हृदयरोग, वातरोग व त्वचारोग चिकित्सक
  • कन्सल्टींग फिजिशियन
  • रजि. न.: 1-69424-A 

डॉ. सौ. अश्विनी हेमंत नरवाडे (पाटील-मोपकर)

  • B.A.M.S, M.U.H.S. (नाशिक)
  • स्त्रीरोग व प्रसुती चिकित्सक
  • रजि. न.: 1-89007-A


उपलब्ध सुविधा -

 मेडिसिन विभाग : 

  • हृदयरोग निदान व उपचार.
  • इ.सी.जी. मशिन
  • मधुमेह व रक्तदाब उपचार
  • सांधेवात, वातरोग व पाठीचे आजार.
  • दमा, छातीविकार, न्यूमोनिया
  • किडणी विकार
  • ताप (डेंग्यू, मलेरिया, टायफाईड)
  • कार्डियक मॉनिटर
  • सक्शन मशिन  
  • ऑक्सीजन घेरपी
  • पल्स ऑक्सीमीटर
  • ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

त्वचारोग विभाग :

  • त्वचा रोग व सौंदर्य उपचार
  • केश विकार
  • नखांचे आजार
  • नागीण उपचार
  • पांढरे डाग
  • फंगल इन्फेक्शन
  • सोरायसिस
  • गजकर्ण

स्त्रिरोग विभाग :

  • प्रसुती पूर्व तपासणी
  • नोर्मल डिलीव्हरी सुविधा
  • कॉपर टी
  • मासिक पाळी आजार
  • स्त्रिरोग व वंध्यत्व उपचार

Products/Services

नरवाडे हॉस्पिटल प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

उपलब्ध सुविधा -

  • अतिदक्षता विभाग
  • अंतर रुग्ण विभाग
  • ई.सी.जी.मशिन (हृदयरोग तपासणीसाठी)
  • मल्टीपॅरामॉनिटर
  • सक्शन मशीन (विषबाधा)
  • ऑक्सीजन थेरपी
  • पल्स ऑक्सीमीटर
  • इलेक्ट्रीक कॉटरी
  • डर्मारोलर
  • ट्रॅक्शन थेरपी (मानदुखणे पाठदुखणेसाठी)
  • ऑटोस्कोप
  • ग्लुकोमीटर
  • पॅथॉलॉजी
  • फार्मसी (२४ तास सुविधा)

नरवाडे हॉस्पिटल  प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

नरवाडे हॉस्पिटल प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

डॉ. हेमंत शेषराव नरवाडे (पाटील-मोपकर)

  •  M.D.Medicine (Ayu)
  • मधुमेह, हृदयरोग, वातरोग व त्वचा चिकित्सक
  • कन्सल्टींग फिजिशियन
  • रजि. न.: 1-69424-A 

नरवाडे हॉस्पिटल प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

नरवाडे हॉस्पिटल प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

डॉ. सौ. अश्विनी हेमंत नरवाडे (पाटील-मोपकर)

  • B.A.M.S, M.U.H.S. (नाशिक)
  • स्त्रीरोग व प्रसुती चिकित्सक
  • रजि. न.: 1-89007-A

नरवाडे हॉस्पिटल प्रसुतीगृह ॲन्ड स्किन केअर सेंटर

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack

कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

लक्षणे:

  • छातीत दडपल्यासारखे वाटणे 
  • ‎छातीत दुखायला लागणे 
  • ‎छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी डावा हात यांपर्यंत पोहचतात.
  • ‎बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे
  • ‎अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
  • ‎अशक्तपणा जाणवणे,
  • ‎उलटी किंवा मळमळ होणे
  • ‎चक्कर येणे
  • ‎दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
  • ‎श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack

मधुमेह – शुगर Diabetes mellitus

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.

 लक्षणे:

  • वारंवार लघवीला जावे लागणे
  • वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे
  • अचानकपणे वजन घटणे
  • अशक्तपणा, चक्कर येणे
  • अधिक भूक लागणे
  • हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे
  • डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे
  • मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे
  • जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे
  • मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

मधुमेह – शुगर Diabetes mellitus

उच्च रक्तदाब (High Blood Pressure)

सध्याचे तणावग्रस्त जीवन, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या विकाराचे प्रमाण वृद्धांबरोबरचं तरुणांमध्येही अधिक वाढले आहे. तरुण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. सामान्यतः स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब (Hypertension) असे म्हणतात. 

 लक्षणे : रक्तदाब वाढल्यानंतर त्याची लक्षणं प्रत्येकाला कळून येतातच असं नाही. बर्‍याच वेळा रक्तदाब वाढल्यास,

  • वारंवार डोके दुखणे. डोकं जड होणं,
  • थकवा जाणवणे, चक्कर येणे.
  • कानशिलं गरम होणं,
  • निवांत झोप लागत नाही. झोपमोड होते.
  • छातीत धडधडणे, छातीत कळ येणे, हृद्य स्पंदन अधिक जाणवणे.
  • अल्पश्रमानंतरही श्वास, धाप लागणे.
  • वारंवार चिडचिड होणे.
  • अंधूक दिसणं, अचानक नजर कमजोर होणे यांसारखी लक्षणे उच्च रक्तदाबामध्ये दिसून येऊ शकतात.

उच्च रक्तदाब (High Blood Pressure)

सांधेवात

शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदाना होणं याला 'आर्थरायटीस' किंवा संधिवात म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार  आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही.

लक्षण : सांधेदुखी, सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता (stiffness), सूज, सांध्यांजवळचा भाग लाल होणं, चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात येणारा अडथळा etc.

सांधेवात

दमा – Asthma

दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.

लक्षणे:

  • खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
  • ‎खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
  • ‎श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
  • ‎दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

दमा – Asthma

न्यूमोनिया - Pneumonia

न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.

लक्षणे:

  • खोकला येणे, बेडके पडणे.
  • सर्दी होणे,
  • ताप येणे,
  • थंडी वाजून येणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण श्वास जलदपणे घेत असतो.
  • छातीत दुखणे, अंगदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणविणे, भूक मंदावणे, मळमळ व उलट्या, डोकेदुखी ही लक्षणे न्यूमोनियात दिसू लागतात. तसेच काही रुग्णाच्या खोकल्यातून रक्तही येत असते.

न्यूमोनिया - Pneumonia

किडनी संबंधि आजार

किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.

मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.

किडनी खराब झाल्याची लक्षणे :

• भूक कमी होणे.
• वारंवार लघवीस होणे.
• लघवी करताना त्रास होणे, 
• मळमळ,उलट्या होणे.
• चेहऱ्यावर सूज येणे.
• उच्च रक्तदाब, रक्तदाब वाढतो.
• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
• कंबर दुखणे.
• पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.

किडनी संबंधि आजार

नरवाडे हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर सेंटर - सोरायसिस (Psoriasis)

सोरायसिस ही त्वचासंबंधी एक समस्या असून यामध्ये त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे येतात व तेथून पापुद्रे किंवा खवले निघत असतात. याला सोरियाटिक स्केल असे म्हणतात.

सोरायसिसची लक्षणे :

  • त्वचेवर लालसर, सुज असणारे चट्टे येणे
  • चट्ट्याभोवती खाज येणे
  • चट्टे आलेल्या ठिकाणी वेदना किंवा आग होणे
  • त्वचेवरील चट्ट्यांवर पांढरट-चांदी कलरचे पापुद्रे येणे
  • त्वचेवर खाजवल्यास पापुद्रे भुसा होऊन खाली पडणे
  • त्वचा कोरडी होऊन क्रॅक पडून रक्तस्राव होणे
  • सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे वेदना होणे.
    अशी काही लक्षणे सोरायसिस या त्वचाविकारामध्ये असतात.

नरवाडे हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर सेंटर - सोरायसिस (Psoriasis)

गजकर्ण नायटा (Ringworm)

गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते.

ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या बुरशीमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो.

गजकर्ण नायटा (Ringworm)

पांढरे कोड (Vitiligo)

पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.

लक्षणे :  

  • शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
  • प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
  • डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
  • पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
  • या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.

पांढरे कोड (Vitiligo)

नरवाडे हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर सेंटर - डँड्रफ

डोक्यातील कोंडा, ज्याला seborrheic dermatitis म्हणूनही ओळखले जाते, हे टाळू, भुवया किंवा नाकाजवळील त्वचेच्या पेशींचा अतिरेक आहे. हे मृत त्वचेच्या पेशींच्या जलद शेडिंगमुळे होते, परिणामी मोठ्या फ्लेक्स बनतात.

डोक्यातील कोंडा कशामुळे होतो?

  • बुरशीजन्य अतिवृद्धी: टाळूवर मालासेझिया बुरशीची भरभराट होते.
  • स्कॅल्पचे अतिरिक्त तेल: परिणामी चिकट, तेलकट कोंडा होतो.
  • अनियमित ब्रशिंग आणि केस धुणे.
  • शैम्पूचा क्वचित वापर.
  • तणाव आणि मानसिक आरोग्य स्थिती.

नरवाडे हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर सेंटर - डँड्रफ

केस गळती

कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते.

केस गळती

प्रसुतीपूर्व तपासणी व उपचार

एएनसी तपासणी म्हणजे प्रसवपूर्व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या सल्लामसलतीमुळे आई आणि वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याची नियमित देखरेख होते आणि संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते. एएनसीमध्ये विविध तपासण्या, पोषणाविषयी सल्ला आणि निरोगी गर्भधारणेसाठी मार्गदर्शन समाविष्ट असते, ज्यामुळे सुखद प्रसूती अनुभवास प्रोत्साहन दिले जाते.

प्रसुतीपूर्व तपासणी व उपचार

सामान्य प्रसूती

सामान्य प्रसूती (नॉर्मल डिलिव्हरी) ही नैसर्गिकरित्या होणारी प्रसूती प्रक्रिया आहे, जिथे गर्भाशयाच्या आकुंचनांमुळे बाळ जन्म घेतो. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत होते – प्रसवपूर्व वेदना, गर्भाशय ग्रीवेचा प्रसार व बाळाचा जन्म, आणि शेवटी अपरा (प्लेसेंटा) बाहेर पडणे. योग्य आहार, व्यायाम आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने सुरक्षित प्रसूती शक्य होते.

सामान्य प्रसूती

प्रसुति नंतर उपचार व मार्गदर्शन

प्रसवोत्तर काळात मातेस शारीरिक आणि मानसिक पुनर्बल आवश्यक असते. योग्य आहार, स्वच्छता, विश्रांती आणि स्तनपानाविषयी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. डॉक्टर व तज्ञांचा सल्ला घेऊन टाक्यांची काळजी, हार्मोनल बदल, मानसिक आरोग्य आणि नवजात बालकाच्या निगेसाठी योग्य उपचार व सल्लामसलत आवश्यक आसते.

प्रसुति नंतर उपचार व मार्गदर्शन

स्त्री वंध्यत्व

गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.

स्त्री वंध्यत्व

पॅरॅलायसिस /लकवा/अर्धांगवायु (Cerebrovascular Accident/CVA)

पॅरॅलायसिस /लकवा/अर्धांगवायु (Cerebrovascular Accident/CVA)

मेंदूमधील  रक्त पुरवठा काही अंशी किंवा पूर्णतः बंद झाल्यास होणारा आजार म्हणजे 'अर्धांगवायु' किंवा 'पॅरॅलायसिस '.वैद्यकीय भाषेत त्यालाच Cerebro Vascular Accident (CVA) म्हणतात. ह्या आजारांमध्ये औषध नियमित घेणे हे सर्वात  मोठे पथ्य असते. अन्यथा पुन्हा हा आजार  आधीपेक्षा तीव्र होतो 
 व रुग्णाचे विविध स्तरांवर नुकसान करतो. 
सदर 85 वर्षीय रुग्ण डावा हात व पाय न उचलता येणे, बोलण्यात अडथळा ,तोल जाणे ह्या लक्षणा सोबत ॲडमीट झाला व 4 दिवसांमध्ये पूर्णतः ठिक झाला. म्हणून वैद्यकीय सल्ल्यानुसार नियमित औषध घेणे अत्यावश्यक आहे. धुम्रपान, तंबाखू व तंबाखूजन्य घुटका यांचे सेवन टाळावे.
        अर्धांगवायु ह्या आजारावर त्वरित उपचार झाल्यास रुग्ण पूर्णतः ठिक होतो. वरील लक्षण आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा होणारी शारीरिक हाणी टाळावी.

पॅरॅलायसिस /लकवा/अर्धांगवायु (Cerebrovascular Accident/CVA)

Gallery

Rate Us

Contact Us