About Us

नारायणा

स्पेशालिटी हॉस्पीटल

"हृदय, मेंदू, मधुमेह, किडनी आणि त्वचा-केसांच्या संपूर्ण उपचारांसाठी, तुमच्या विश्वासाचे ठिकाण म्हणजे - नारायणा स्पेशालिटि हाॅस्पीटल!"

डॉ. सुमेध धुळधुळे

  • एम.बी.बी.एस., एम.डी., मेडिसीन (दिल्ली)
  • हृदयरोग, मधुमेह, मेंदु व किडनी रोग तज्ञ

डॉ. प्रियंका धुळधुळे (प्रधान)

  • बी.ए.एम.एस., (पुणे)
  • आयुर्वेद सौंदर्य चिकित्सक


मेडिसीन विभाग :

खालील आजारांचे निदान, उपचार व योग्य सल्ला दिला जातो.

  • बी.पी., हार्ट अटॅक व सर्व प्रकारचे हृदयरोग
  • दमा, ॲलर्जी, न्युमोनिया व फुफ्फुसांचे आजार
  • मधुमेह व थायरॉईडचे आजार
  • पॅरालिसिस / लकवा, फिट, इतर मेंदु विकार
  • पोस्ट  कोविड-१९ कन्सलटेशन
  • काविळ, लिव्हर सिर्होसिस, पोटात पाणी भरणे, ॲसिडीटी व इतर पचन क्रियेचे आजार
  • सर्व प्रकारचे ताप/हिवताप, डेंग्यु, मलेरीया
  • किडनी चे आजार
  • संधिवात

उपलब्ध सुविधा -

  • नेब्युलायझर
  • मल्टीपॅरा मॉनिटर
  • सिरींज पंम्प
  • ग्लुकोमिटर
  •  इ.सी.जी.
  • ए.सी. डिलक्स रूम
  • सेमी डिलक्स
  • स्पेशल रूम
  • जनरल वॉर्ड

स्किन, हेअर, काॅस्मेटिक, लेझर विभाग :

उपलब्ध उपचार : 

  • पिंपल्स, पिंपल्सचे डाग व खड्डे
  • काळ्या डागांवर उपचार
  • डोळ्यावरचे काळे डाग
  • मस चामखीळ, वांग
  • स्किन रिज्युव्हीनेशन
  • मायक्रोडर्मा ॲब्रेजन
  • स्किन व्हाईटनींग ट्रिटमेंट
  • केमिकल पिल चेहरा उजळण्यासाठी
  • स्ट्रेच मार्क काढणे
  • त्वचा आणि केसांसाठी ट्रिटमेंट
  • त्वचा पॉलिशिंग
  • केस गळणे, टक्कल पडणे यावर उपचार
  • गोंदन काढून टाकणे
  • शरीरावरील कोणत्याही भागावरील अनावश्यक केस काढणे.
  • केसांमधील कोंडा नष्ट करणे
  • आहारा विषयी योग्य सल्ला मिळेल.

Products/Services

नारायणा स्पेशालिटी हॉस्पीटल

"हृदय, मेंदू, मधुमेह, किडनी आणि त्वचा-केसांच्या संपूर्ण उपचारांसाठी, तुमच्या विश्वासाचे ठिकाण म्हणजे - नारायणा स्पेशालिटि हाॅस्पीटल!"

नारायणा  स्पेशालिटी हॉस्पीटल

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack

हार्ट अटॅक का व कशामुळे येतो..?

कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

लक्षणे:

  • छातीत दडपल्यासारखे वाटते,
  • ‎छातीत दुखायला लागते,
  • ‎छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
  • ‎बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
  • ‎अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
  • ‎अशक्तपणा जाणवणे,
  • ‎उलटी किंवा मळमळ होणे,
  • ‎चक्कर येणे,
  • ‎दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
  • ‎श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack

दमा – Asthma

दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.

लक्षणे:

  • खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
  • ‎खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
  • ‎श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
  • ‎दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

दमा – Asthma

न्यूमोनिया - Pneumonia

न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) आजार असून यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे फुफ्फुसाला इन्फेक्शन होत असते. न्युमोनियामध्ये एक किंवा दोन्हीही फुफ्फुसांना संसर्ग होऊ शकतो.

या आजारात फुफ्फुसांच्या आतील अल्विओली म्हणजे श्वसनसंस्थेच्या अगदी बारीक नलिका ज्या फुफ्फुसांमध्ये हवेच्या हस्तांतरणाचे काम करतात त्या न्युमोनियाकोकस जीवाणूच्या संसर्गास बळी पडतात आणि परिणामी फुफ्फुसांमध्ये कफसारखा द्रव साठू लागतो. ह्या द्रवामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते.

लक्षणे:

  • खोकला येणे, बेडके पडणे.
  • सर्दी होणे,
  • ताप येणे,
  • थंडी वाजून येणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे, रुग्ण श्वास जलदपणे घेत असतो.
  • छातीत दुखणे, अंगदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा जाणविणे, भूक मंदावणे, मळमळ व उलट्या, डोकेदुखी ही लक्षणे न्यूमोनियात दिसू लागतात. तसेच काही रुग्णाच्या खोकल्यातून रक्तही येत असते.

न्यूमोनिया - Pneumonia

क्षयरोग – Tuberculosis

क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.

लक्षणे:

  • तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
  • बेडकायुक्त खोकला येणे,
  • थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
  • खोकताना छातीत दुखणे,
  • श्वास घेण्यास त्रास होणे,
  • अशक्तपणा,
  • भूक व वजन कमी होणे,
  • रात्री झोपल्यावर घाम येणे,
  • सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

क्षयरोग – Tuberculosis

मधुमेह – Diabetes mellitus

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.

 लक्षणे:

  • वारंवार लघवीला जावे लागणे,
  • वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
  • अचानकपणे वजन घटणे,
  • अशक्तपणा, चक्कर येणे,
  • अधिक भूक लागणे,
  • हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
  • डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
  • मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
  • जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
  • मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

मधुमेह – Diabetes mellitus

थायरॉइड संबंधि आजार

आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.

मात्र जेंव्हा थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास किंवा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास थायरॉइडचा त्रास सुरू होतो. त्या त्रासाला thyroid disease असे म्हणतात. थायरॉइडच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. यामध्ये हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम असे थायरॉइडचे विविध आजार होऊ शकतात.

थायरॉइड संबंधि आजार

पक्षाघात - Paralysis

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते.

लक्षणे :

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
• एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
• ‎हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.
• ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
• ‎अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
• ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
• ‎चक्कर येणे, तोल जाणे,
• चेतना कमी होणे
• तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

पक्षाघात होण्याची सहाय्यक कारणे :

High BP, Heart Problems, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेहाचे प्रमाण  मधुमेहाचे प्रमाण  जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये पक्षाघाताचा अधिक धोका संभवतो.

पक्षाघात - Paralysis

किडनी संबंधि आजार

किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.

मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.

किडनी खराब झाल्याची लक्षणे (symptoms):

• भूक कमी होणे.
• वारंवार लघवीस होणे.
• लघवी करताना त्रास होणे, 
• मळमळ,उलट्या होणे.
• चेहऱ्यावर सूज येणे.
• उच्च रक्तदाब, रक्तदाब वाढतो.
• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
• कंबर दुखणे.
• पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.

किडनी संबंधि आजार

स्किन, हेअर, काॅस्मेटिक, लेझर क्लिनीक

उपलब्ध उपचार: 

  • पिंपल्स, पिंपल्सचे डाग व खड्डे
  • काळ्या डागांवर उपचार
  • डोळ्यावरचे काळे डाग
  • मस चामखीळ, वांग
  • स्किन रिज्युव्हीनेशन
  • मायक्रोडर्मा ॲब्रेजन
  • स्किन व्हाईटनींग ट्रिटमेंट
  • केमिकल पिल चेहरा उजळण्यासाठी
  • स्ट्रेच मार्क काढणे
  • त्वचा आणि केसांसाठी ट्रिटमेंट
  • त्वचा पॉलिशिंग
  • केस गळणे, टक्कल पडणे यावर उपचार
  • गोंदन काढून टाकणे
  • शरीरावरील कोणत्याही भागावरील अनावश्यक केस काढणे.
  • केसांमधील कोंडा नष्ट करणे
  • आहारा विषयी योग्य सल्ला मिळेल.

स्किन, हेअर, काॅस्मेटिक, लेझर क्लिनीक

Gallery

Rate Us

Contact Us