About Us

मुंदडा क्लिनिक

त्वचारोग व सौंदर्य समस्या & मुळव्याध, फिशर, फिश्चुला संबंधित उपचार उपलब्ध

"आरोग्यपूर्ण जीवनाची नवी सुरुवात!"


गव्हाणे रोड, परभणी येथे स्थित मुंदडा क्लिनिक हे त्वचारोग, सौंदर्य समस्या तसेच मुळव्याध, फिशर व फिश्चुला यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ व विश्वासार्ह उपचार देणारे एक प्रगत केंद्र आहे. रुग्णांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत, आम्ही सुरक्षित, परिणामकारक आणि आधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब करतो.

आमच्या क्लिनिकमध्ये अनुभवी व सहकार्यशील स्टाफ असून रुग्णांना आरामदायी आणि विश्वासार्ह वातावरण प्रदान केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑपरेशन थिएटरमुळे अचूक व सुरक्षित उपचार सुनिश्चित होतात. प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक गरजेनुसार उपचार योजना तयार करून उत्तम परिणाम साधण्याचा आमचा प्रयत्न असतो.

मुंदडा क्लिनिक - निरोगी त्वचा आणि वेदनामुक्त जीवनासाठी तुमचा विश्वासू साथी.

उपलब्ध उपचार -

त्वचारोग विभाग :

  • गजकर्ण, इसब, खाज, पुरळ, कोरडी त्वचा, तेलकट त्वचा, चेहऱ्यावरील खड्डे मुरुम, पिंपल्स, मुरुमाचे डाग, मानेवरील त्वचा जाड होणे, त्वचा काळपट/पांढरी होणे किलॉईड यासह सर्व प्रकारच्या त्वचारोगावर मार्गदर्शन व औषधोपचार केले जातील.
  • त्वचेवरील व चेहऱ्यावरील मस्से मशीनद्वारे काढले जातात.
  • त्वचा खोलवर साफ करणे, त्वचेचा टोन वाढवणे व चेहरा चमकदार करण्यासाठी हायड्राफेशीयल मशीन उपलब्ध.
  • तरुण वयात मुला-मुलींना होणारे त्वचारोग, पिंपल्स, मुरुम, तेलकट चेहरा यावर योग्य मार्गदर्शन.
  • अनावश्यक केस काढण्यासाठी, चेहऱ्यावरील डाग, व्रण काडून टाकण्यासाठी लेजर मशीन उपलब्ध.

सर्जिकल विभाग :

  • इंजेक्शन (स्कलेरोथेरपी) द्वारे मुळव्याधीवर उपचार
  • लेझर Treatment
  • इन्फ्रा रेड कोएगुलेशन
  • स्टॅपलर
  • आयुर्वेदिक क्षारसुत्र चिकीत्सा
  • मुळव्याधीच्या रुग्णांना आहार व व्यायाम विषयी योग्य मार्गदर्शन
  • HAL Treatment

कॅशलेस सुविधा उपलब्ध

Products/Services

मुंदडा क्लिनिक

त्वचारोग व सौंदर्य समस्या & मुळव्याध, फिशर, फिश्चुला संबंधित उपचार उपलब्ध

उपलब्ध सुविधेचे ठळक फायदे :-

  • कॅशलेस सुविधा उपलब्ध
  • हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ राहण्याची गरज नाही.
  • संपूर्ण वेदना विरहित
  • रक्तस्त्राव होत नाही.
  •  संडासाचे नियंत्रण जाण्याचा धोका नाही.

मुंदडा क्लिनिक

मुंदडा क्लिनिक

डॉ. सचिन मुंदडा

  • BAMS, KARD.
  • Reg. No. I 39812-A-1

मुंदडा क्लिनिक

मुंदडा क्लिनिक

डॉ. सौ. मेघना मुंदडा

  • BAMS
  • Reg. No. I 42331-A-1

मुंदडा क्लिनिक

TINIA-(गजकर्ण)

टिनिया किंवा गजकर्ण हा त्वचेवर होणारा बुरशीजन्य (फंगल) संसर्ग आहे. हा संसर्ग त्वचा, टाळू, नखे तसेच शरीराच्या ओलसर भागांमध्ये होऊ शकतो. गजकर्ण हा संसर्गजन्य आजार असून संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून, घाम, अस्वच्छता, ओलसर कपडे किंवा टॉवेल वापरण्यामुळे तो पसरू शकतो. त्वचेवर गोलाकार लालसर चट्टे येणे व तीव्र खाज येणे ही याची मुख्य लक्षणे आहेत.

गजकर्णची लक्षणे (Symptoms):

  • त्वचेवर गोलाकार लालसर चट्टे येणे,
  • चट्ट्यांच्या कडांना उठाव येणे,
  • प्रभावित भागात तीव्र खाज येणे,
  • त्वचेवर पापुद्रे किंवा खवले तयार होणे,
  • त्वचा कोरडी पडणे व जळजळ होणे,
  • घाम आल्यावर खाज वाढणे,
  • त्वचेचा रंग बदलणे किंवा काळपट होणे,
  • टाळूवर संसर्ग झाल्यास केस गळणे,
  • नखांमध्ये संसर्ग झाल्यास नखे जाड, पिवळी किंवा ठिसूळ होणे.

TINIA-(गजकर्ण)

Acne Vulgaris - मुरमू

कारणे (Causes):  

  • हार्मोन्समध्ये बदल: वयात येताना हार्मोनल बदलांमुळे तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे मुरुमं तयार होतात.
  • आनुवंशिकता: कुटुंबात जर मुरुमांची समस्या असेल तर ती वारशाने मिळू शकते.
  • तेलकट त्वचा: तेलकट त्वचेच्या प्रकारामध्ये मुरुमं होण्याची शक्यता जास्त असते.
  • आहार: उच्च गोड आणि फॅटयुक्त आहारामुळे देखील मुरुमं वाढू शकतात.
  • ताण: मानसिक ताणामुळे हार्मोन्समध्ये बदल होऊन मुरुमं होऊ शकतात.

लक्षणे (Symptoms): 

  • मुरुमं, पुटकुळ्या, किंवा ब्लॅकहेड्स
  • त्वचेवर लालसरपणा आणि सूज
  • चेहऱ्यावर किंवा पाठीवर तीव्र संवेदनशीलता
  • त्वचेमध्ये दाणे येणे आणि रंग बदलणे

Acne Vulgaris - मुरमू

SCABIES - खरुज

खरुज हा त्वचेचा संसर्गजन्य आजार असून तो अतिशय सूक्ष्म जंतूंमुळे (माइट्स) होतो. हे जंतू त्वचेच्या वरच्या थरात बिळे करून राहतात, त्यामुळे तीव्र खाज व त्वचेवर पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून, कपडे, टॉवेल किंवा अंथरुण वापरल्याने हा आजार इतरांमध्ये पसरू शकतो. लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच गर्दीच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.

खरुजची लक्षणे (Symptoms):

  • त्वचेवर तीव्र खाज येणे, विशेषतः रात्री खाज वाढणे,
  • त्वचेवर लालसर पुरळ किंवा छोटे पाण्याचे फोड येणे,
  • बोटांच्या मधे, मनगट, काख, कंबर, जांघ किंवा गुप्तांगाजवळ खाज येणे,
  • त्वचेवर बारीक रेषांसारखे खुणा दिसणे,
  • खाजवल्यामुळे त्वचा जखमी होणे किंवा खरचटणे,
  • त्वचेवर जळजळ किंवा आग होणे,
  • त्वचेवर खपल्या तयार होणे,
  • लहान मुलांमध्ये हात, पाय व टाळूवर पुरळ येणे.
  • अशी काही लक्षणे खरुज या त्वचारोगामध्ये दिसून येतात.

SCABIES - खरुज

PIGMENTATION (MELASMA) - त्वचेवरील काळे डाग / मेलाझ्मा

पिग्मेंटेशन किंवा मेलाझ्मा ही त्वचेवरील रंगद्रव्य (मेलेनिन) वाढल्यामुळे निर्माण होणारी त्वचासंबंधी समस्या आहे. यामध्ये चेहरा किंवा त्वचेच्या काही भागांवर काळपट किंवा तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सूर्यप्रकाशाचा अति संपर्क, हार्मोन्समधील बदल, गर्भधारणा, ताणतणाव, अनुवंशिक कारणे किंवा काही औषधांच्या परिणामामुळे ही समस्या उद्भवू शकते. मेलाझ्मा हा संसर्गजन्य आजार नसून स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

पिग्मेंटेशन / मेलाझ्माची लक्षणे (Symptoms):

  • चेहऱ्यावर तपकिरी किंवा काळपट डाग दिसणे,
  • विशेषतः गाल, नाक, कपाळ व हनुवटीवर डाग येणे,
  • त्वचेचा रंग असमान दिसणे,
  • सूर्यप्रकाशात डाग अधिक गडद होणे,
  • त्वचेवर निस्तेजपणा जाणवणे,
  • त्वचेची चमक कमी होणे,
  • काही वेळा त्वचा कोरडी किंवा संवेदनशील होणे,
  • दीर्घकाळ डाग कायम राहणे.
  • अशी काही लक्षणे पिग्मेंटेशन (मेलाझ्मा) या त्वचासंबंधी समस्येमध्ये दिसून येतात.

PIGMENTATION (MELASMA) - त्वचेवरील काळे डाग / मेलाझ्मा

HERPES ZOSTER - नागीण आजार

नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजण्या आजार होत असतो.

लक्षणे : 

  • ‎नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होतात. त्याठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवितात.
  • ‎तेथील त्वचेची आग होते.
  • ‎दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके येतात व त्यानंतर त्यात पाणी धरते.
  • ‎पाच ते सहा दिवसात खपल्या धरतात व फोडही जातात. फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.

HERPES ZOSTER - नागीण आजार

WARTS - चामखीळ

Warts (चामखिळ) म्हणजे त्वचेवर येणारे छोटे, कठीण, गाठेसारखे फोड. हे मुख्यतः मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतात. हे त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर येऊ शकतात, जसे हात, पाय, चेहरा, किंवा बोटे.

लक्षणे:

  • त्वचेवर छोटे, गोलाकार, कठीण गाठेसारखे फोड.
  • वारंवार घासल्याने वेदना होऊ शकते.
  • काही वेळा फोडांचा रंग त्वचेच्या रंगासारखा असतो तर काही वेळा गडद रंगाचे दिसू शकतात.
  • अनेक प्रकारचे वॉर्ट्स असतात, जसे सामान्य वॉर्ट्स, फ्लॅट वॉर्ट्स, प्लांटर वॉर्ट्स, ज्यामुळे लक्षणे बदलू शकतात.

WARTS - चामखीळ

SKIN TAG - त्वचेवरील मांस वाढणे

स्किन टॅग ही त्वचेवर दिसणारी लहान, मऊ व मांसल गाठीसारखी वाढ असते. ही समस्या सामान्यतः मान, काख, पापण्या, छातीखाली, जांघांच्या भागात किंवा त्वचेच्या घर्षण होणाऱ्या ठिकाणी दिसून येते. स्किन टॅग हा कर्करोगजन्य किंवा संसर्गजन्य आजार नसतो. वजन वाढणे, मधुमेह, हार्मोन्समधील बदल, वाढते वय किंवा त्वचेतील सतत घर्षण यामुळे स्किन टॅग निर्माण होऊ शकतात.

स्किन टॅगची लक्षणे (Symptoms):

  • त्वचेवर लहान मांसल गाठी दिसणे,
  • गाठीचा रंग त्वचेप्रमाणे किंवा किंचित तपकिरी असणे,
  • मान, काख, पापण्या किंवा जांघांच्या भागात वाढ दिसणे,
  • स्पर्शास मऊ व हलणारी गाठ जाणवणे,
  • कपडे किंवा दागिन्यांच्या घर्षणामुळे त्रास होणे,
  • कधी कधी खाज किंवा जळजळ जाणवणे,
  • गाठ वळल्यास वेदना किंवा सूज येणे,
  • काही वेळा स्किन टॅगचा आकार हळूहळू वाढणे.

SKIN TAG - त्वचेवरील मांस वाढणे

कॉस्मेटिक उपचार (COSMETIC TREATMENTS)

हायड्राफेशियल, मायक्रो डर्माब्रेशन (MDA), एजिंगसाठी लेझर उपचार व केमिकल पिलिंग हे त्वचेचे सौंदर्य वाढविणारे आधुनिक उपचार आहेत. या उपचारांमुळे त्वचा स्वच्छ, मऊ, तजेलदार व निरोगी दिसण्यास मदत होते. मुरुमांचे डाग, टॅनिंग, पिग्मेंटेशन, सुरकुत्या व निस्तेजपणा कमी करण्यासाठी हे उपचार उपयुक्त ठरतात.

कॉस्मेटिक उपचार (COSMETIC TREATMENTS)

केसांशी संबंधित समस्या

केस गळणे, कोंडा होणे, अकाली केस पांढरे होणे, टाळूवरील संसर्ग तसेच केस रुक्ष व कोरडे होणे या सामान्य समस्या आहेत. चुकीचा आहार, ताणतणाव, हार्मोन्समधील बदल, प्रदूषण, अपुरी झोप किंवा योग्य निगा न राखल्यामुळे या समस्या वाढू शकतात. यामध्ये खाज येणे, केस तुटणे, केस पातळ होणे, टाळू कोरडी पडणे व केसांची चमक कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.

केसांशी संबंधित समस्या

मिलिया (MILIA)

मिलिया ही त्वचेवर दिसणारी लहान पांढरट किंवा पिवळसर दाण्यासारखी गाठ असते. त्वचेखाली केराटिन साचल्यामुळे ही समस्या निर्माण होते. ही गाठी प्रामुख्याने चेहरा, डोळ्यांभोवती, नाक किंवा गालांवर दिसून येतात. मिलिया ही संसर्गजन्य समस्या नसून नवजात बाळांमध्ये तसेच प्रौढांमध्येही आढळू शकते. त्वचेवर छोटे कठीण दाणे दिसणे, त्वचा खडबडीत वाटणे व सौंदर्यावर परिणाम होणे अशी याची सामान्य लक्षणे आहेत.

मिलिया (MILIA)

झॅन्थेलाझ्मा (XANTHELASMA)

झॅन्थेलाझ्मा ही डोळ्यांच्या आसपास दिसणारी पिवळसर, मऊ व सपाट गाठीसारखी त्वचेची समस्या आहे. शरीरातील कोलेस्टेरॉल किंवा चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. ही गाठ प्रामुख्याने वरच्या किंवा खालच्या पापण्यांजवळ दिसून येते. साधारणतः वेदना नसतात, परंतु चेहऱ्याच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. डोळ्यांभोवती पिवळसर पट्टे किंवा गाठी दिसणे हे याचे मुख्य लक्षण मानले जाते.

झॅन्थेलाझ्मा (XANTHELASMA)

VITILIGO- पांढरे कोड

पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.

VITILIGO- पांढरे कोड

PILES - मूळव्याध

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास  सौच्यावाटे रक्त  जात असते.

मूळव्याधची लक्षणे (Symptoms) :- 

  • मूळव्याध समस्येमध्ये गुदाच्या शिरांना सूज येते, त्याठिकाणी कोंब किंवा मोड येतात.
  • गुदाच्या ठिकाणी भयंकर वेदना होणे, खाज येणे, जळजळ व आग होणे अशी लक्षणे असतात.
  • शौचाच्या वेळी त्रास अधिक वाढतो.
  • काहीवेळा शौचातुन रक्तही जात असते. अधिक प्रमाणात रक्त जाण्यामुळे ऍनिमिया होऊ शकतो. अशी मूळव्याधची लक्षणे असतात.

PILES - मूळव्याध

ANAL FISSURE - फिशर

फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच आठ आठवड्यानंतरही हा त्रास जाणवत असल्यास त्याला क्रॉनिक प्रकारचा फिशर असे म्हणतात.

फिशरची लक्षणे (Anal Fissure Symptoms) :- 

  • गुदाच्या ठिकाणी चीर पडणे,
  • गुदभागी चीर पडून जखम झाल्याने तेथे वेदना होणे,
  • गुदातून रक्त जाणे,
  • गुदभागी बारीक फोड जाणवणे,
  • गुदभागी आग, जळजळ व खाज होणे अशी लक्षणे फिशरमध्ये जाणवतात.

ANAL FISSURE - फिशर

FISTULA - फिस्टुला

फिस्टुला म्हणजे शरीरातील दोन भागांमध्ये अनैसर्गिक मार्ग तयार होणे. हे मार्ग दोन अवयवांमध्ये किंवा शरीराच्या दोन पोकळ्यांमध्ये असू शकतात. गुद्द्वार आणि त्वचा किंवा मूत्रमार्ग आणि मलाशय यांच्यात फिस्टुला होऊ शकतो.

फिस्टुलाची लक्षणे (Symptoms) :- 

  •  गुदद्वाराच्या आसपासच्या त्वचेवर सूज येणे, जळजळ, पस बाहेर येणे, तिथे खाज येणे, आणि अस्वस्थता जाणवणे.
  •  दीर्घकाळ ताप येणे, थकवा जाणवणे, आणि अशक्तपणा होणे.

FISTULA - फिस्टुला

CONSTIPATION - बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता म्हणजे शौचास साफ न होणे किंवा शौचास खूप वेळ लागणे ही पचनसंस्थेशी संबंधित सामान्य समस्या आहे. चुकीचा आहार, कमी पाणी पिणे, व्यायामाचा अभाव, ताणतणाव किंवा अनियमित जीवनशैली यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे पोट साफ न होणे, पोट फुगणे व अस्वस्थता जाणवते.

बद्धकोष्ठतेची लक्षणे (Symptoms):

  • शौचास साफ न होणे,
  • शौचास खूप वेळ लागणे किंवा जोर लावावा लागणे,
  • पोट फुगणे किंवा जड वाटणे,
  • पोटात दुखणे किंवा मुरडा येणे,
  • भूक कमी लागणे,
  • तोंडाला दुर्गंधी येणे,
  • वारंवार गॅसेस होणे,
  • शौचानंतरही पोट पूर्ण साफ न झाल्याची भावना राहणे.

CONSTIPATION - बद्धकोष्ठता

IBS (IRRITABLE BOWEL SYNDROME)

इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) हा पचनसंस्थेशी संबंधित दीर्घकालीन विकार आहे. यामध्ये आतड्यांच्या कार्यामध्ये बिघाड होऊन पोटदुखी, शौचाच्या सवयींमध्ये बदल तसेच पोट फुगणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. ताणतणाव, चुकीचा आहार, अनियमित जीवनशैली किंवा पचनसंस्थेची संवेदनशीलता वाढल्यामुळे IBS ची समस्या उद्भवू शकते.
IBS ची लक्षणे (Symptoms):

  • पोटात दुखणे किंवा मुरडा येणे,
  • पोट फुगणे व गॅसेस होणे,
  • वारंवार जुलाब होणे किंवा बद्धकोष्ठता होणे,
  • कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठता अशी समस्या होणे,
  • शौचानंतरही पोट पूर्ण साफ न झाल्यासारखे वाटणे,
  • भूक कमी लागणे,
  • पोटात अस्वस्थता जाणवणे,
  • ताणतणावामुळे लक्षणे वाढणे.

IBS (IRRITABLE BOWEL SYNDROME)

बिना शस्त्रक्रिया उपचार पद्धती

पाईल्स (मुळव्याध), फिशर व फिस्टुला यांसारख्या गुदरोगांवर बिना शस्त्रक्रिया आधुनिक औषधी, मलम व विशेष तेल उपचारांच्या माध्यमातून प्रभावी उपचार केले जातात. अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेदना, आग, सूज, रक्तस्राव व शौचास होणारा त्रास कमी करण्यासाठी सुरक्षित व परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत. स्वच्छता, गोपनीयता व रुग्णांच्या आरामाला प्राधान्य देऊन योग्य उपचारपद्धतीद्वारे रोगमुक्त होण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते.

बिना शस्त्रक्रिया उपचार पद्धती

लेझर शस्त्रक्रिया

मूळव्याधांसाठी लेझर शस्त्रक्रिया :-  ही एक आधुनिक आणि कमी त्रासदायक प्रक्रिया आहे. यात स्कालपेलच्या ऐवजी विशेष प्रकाश किरणांचा वापर करून मूळव्याधाच्या गाठी काढल्या जातात. विविध प्रकारच्या लेझरचा वापर केला जातो, ज्यामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि जलद होते.

लेझर सर्जरीचे फायदे :-

  • अक्षरश: वेदनारहित उपचार.
  •  रक्तस्त्राव  लवकर थांबतो.
  • हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नाही.
  • उच्च यश दर 
  • जलद पुर्नप्राप्ती.
  • रुग्ण 24 तासांच्या आत घरी जाऊ शकतो.

लेझर शस्त्रक्रिया

इंजेक्शन थेरपी

इंजेक्शन थेरपी :- एक साधी आणि प्रभावी प्रक्रिया आहे. यात मूळव्याधाच्या गाठींमध्ये विशेष औषधाचे इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे गाठ सुकून लहान होते. हे उपचार वेदनारहित असून शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. रुग्णालयात राहणे आवश्यक नसल्याने हे उपचार जलद आणि सुरक्षित मानले जातात.

इंजेक्शन थेरपीचे फायदे :

  • रक्तस्त्राव  लवकर थांबतो. 
  • अक्षरश: वेदनारहित उपचार.
  • हॉस्पिटलायझेशनची आवश्यता नाही.
  • दररोज ड्रेसिंगची आवश्यक नाही.
  • उच्च यश दर.
  • Early Recovery.
  • रुग्ण 24 तासांच्या आत घरी जाऊ शकतो.

इंजेक्शन थेरपी

SURGERY

SURGERY

Gallery

Rate Us

Contact Us