About Us
मानधणे
हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर क्लिनिक
"आरोग्याचा समतोल, सौंदर्याचा नवा अध्याय!"
मानधणे हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर क्लिनिक हे हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, छातीरोग, त्वचा व केसांच्या तक्रारींसाठी संपूर्ण समाधान देणारे केंद्र आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक रुग्णासाठी अद्वितीय उपचार देतो. त्वचा व केसांसाठी लेझर तंत्रज्ञानावर आधारित उपचार, तसेच हृदय व छातीरोगांसाठी अद्ययावत निदान आणि उपचार येथे उपलब्ध आहेत. रुग्णांच्या समाधानाला आणि गुणवत्तापूर्ण सेवेला आमचे प्राधान्य आहे.
डॉ. नवल द्वा. मानधणे
- एम.डी. (मेडिसिन), जे.जे. हॉस्पिटल, मुंबई
- कंन्सल्टंट फिजीशियन
- वेळ : सकाळी 11 ते 5
डॉ. श्वेता न. मानधणे
- एमबीबीएस, डी.डी.व्ही. (मुंबई)
- त्वचारोग व सौंदर्य विशेषज्ञ
- वेळ : 12 PM ते 3 PM
खालील आजाराचे निदान व उपचार -
मेडिसीन विभाग:
- हृदयरोग (हार्ट अटॅक)
- थायरॉईड
- मधुमेह (शुगर )
- पॅरालेसीस (पक्षघात/लखवा)
- उच्च रक्तदाब (बी पी )
- किडनी विकार
- क्षयरोग (टि.बी.)
- छातीरोग
- दमा (अस्थमा)
- कावीळ, संधीवात, थायरॉईड, सर्पदंश व विषबाधा तज्ञ
उपलब्ध सुविधा: इसीजी, नेब्युलायझर, ग्लुकोमिटर, पल्स ऑक्सिमीटर, इन्फ्युजन पंप, कार्डियक मॉनिटर, डिफिब्रिलेटर 2 D Eco सुविधा उपलब्ध
सौंदर्य व त्वचारोग विभाग:
- पिंपल्स (मुरुम), सोरीयासीस, स्किन ॲलर्जी, पांढरे डाग (कोड), काळे डाग, वांग, नायटा (गजकर्ण), खरुज इ.
- केस गळणे, कोंडा, टक्कल पडणे, चाई पडणे
- नखांचे विकार : फंगल इन्फेक्शन
- सौंदर्य सल्ला : डोळ्याभोवती काळे डाग
उपलब्ध सुविधा: अत्याधुनिक लेझर सुविधा, स्किन न व बॉडी पॉलिशिंग, मुरुमांच्या खड्ड्यांवर शस्त्रक्रिया व डर्मारोलर, डर्माप्लॅनिंग, चामखिळ, मस, तिळ मशिनव्दारे काढणे, कॉर्न (कुरुप), वॉर्ट काढप केमीकल पिलींग etc.
Products/Services
हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.
लक्षणे:
- छातीत दडपल्यासारखे वाटणे
- छातीत दुखायला लागणे
- छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी डावा हात यांपर्यंत पोहचतात.
- बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे
- अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
- अशक्तपणा जाणवणे,
- उलटी किंवा मळमळ होणे
- चक्कर येणे
- दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
- श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

मधुमेह – शुगर Diabetes mellitus
स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.
लक्षणे:
- वारंवार लघवीला जावे लागणे
- वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे
- अचानकपणे वजन घटणे
- अशक्तपणा, चक्कर येणे
- अधिक भूक लागणे
- हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे
- डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे
- मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे
- जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे
- मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

थायरॉइड संबंधि आजार
आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.
मात्र जेंव्हा थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास किंवा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास थायरॉइडचा त्रास सुरू होतो. त्या त्रासाला thyroid disease असे म्हणतात. थायरॉइडच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. * थायरॉइड ग्रंथी रक्तप्रवाहात थायरॉइड संप्रेरकांची पातळी नियंत्रित करते. थायरॉइड ग्रंथी पुरेशी हार्मोन्स तयार करत नसेल तर हायपोथायरॉइडिझम होते. तर थायरॉइड ग्रंथी जास्त हार्मोन्स तयार करत असेल तर हायपरथायरॉइडिझम होते.
थायरॉईड ची लक्षणे:
- सतत थकवा आणि अशक्तपणा
- वजन वाढणे किंवा कमी होणे
- मूड स्विंग्स
- थंडी किंवा उष्णता जाणवणे
- पाचक समस्या
- स्नायू आणि सांधेदुखी
- मासिक पाळीची अनियमितता
- चेहऱ्यावर सूज येणे
- टोन बदलणे
- केस गळणे

उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
सध्याचे तणावग्रस्त जीवन, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या विकाराचे प्रमाण वृद्धांबरोबरचं तरुणांमध्येही अधिक वाढले आहे. तरुण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. सामान्यतः स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब (Hypertension) असे म्हणतात.
लक्षणे : रक्तदाब वाढल्यानंतर त्याची लक्षणं प्रत्येकाला कळून येतातच असं नाही. बर्याच वेळा रक्तदाब वाढल्यास,
- वारंवार डोके दुखणे. डोकं जड होणं,
- थकवा जाणवणे, चक्कर येणे.
- कानशिलं गरम होणं,
- निवांत झोप लागत नाही. झोपमोड होते.
- छातीत धडधडणे, छातीत कळ येणे, हृद्य स्पंदन अधिक जाणवणे.
- अल्पश्रमानंतरही श्वास, धाप लागणे.
- वारंवार चिडचिड होणे.
- अंधूक दिसणं, अचानक नजर कमजोर होणे यांसारखी लक्षणे उच्च रक्तदाबामध्ये दिसून येऊ शकतात.

क्षयरोग – Tuberculosis
क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.
लक्षणे:
- तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
- बेडकायुक्त खोकला येणे,
- थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
- खोकताना छातीत दुखणे,
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- अशक्तपणा,
- भूक व वजन कमी होणे,
- रात्री झोपल्यावर घाम येणे,
- सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

दमा – Asthma
दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.
लक्षणे:
- खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
- खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
- श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
- दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

पक्षाघात - Paralysis
मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते.
लक्षणे : मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
• एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
• हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.
• तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
• अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
• एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
• चक्कर येणे, तोल जाणे,
• चेतना कमी होणे
• तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.
कारणे : High BP, Heart Problems, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेहाचे प्रमाण मधुमेहाचे प्रमाण जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये पक्षाघाताचा अधिक धोका संभवतो.

किडनी संबंधि आजार
किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.
मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.
किडनी खराब झाल्याची लक्षणे :
• भूक कमी होणे.
• वारंवार लघवीस होणे.
• लघवी करताना त्रास होणे,
• मळमळ,उलट्या होणे.
• चेहऱ्यावर सूज येणे.
• उच्च रक्तदाब, रक्तदाब वाढतो.
• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
• कंबर दुखणे.
• पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.

मानधणे स्किन केअर क्लिनिक - मुरुम
मुरुम (Acne Vulgaris) ही सामान्य त्वचारोगाची स्थिती आहे जी केसांच्या रोमछिद्रांमध्ये तेल आणि मृत पेशी साचल्यामुळे होते, ज्यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि सूज येते.
लक्षणे (Symptoms):
- मुरुमं, पुटकुळ्या, किंवा ब्लॅकहेड्स
- त्वचेवर लालसरपणा आणि सूज
- चेहऱ्यावर किंवा पाठीवर तीव्र संवेदनशीलता
- त्वचेमध्ये दाणे येणे आणि रंग बदलणे

मानधणे स्किन केअर क्लिनिक - सोरायसिस (Psoriasis)
सोरायसिस ही त्वचासंबंधी एक समस्या असून यामध्ये त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे येतात व तेथून पापुद्रे किंवा खवले निघत असतात. याला सोरियाटिक स्केल असे म्हणतात.
सोरायसिसची लक्षणे (Symptoms) :
- त्वचेवर लालसर, सुज असणारे चट्टे येणे
- चट्ट्याभोवती खाज येणे
- चट्टे आलेल्या ठिकाणी वेदना किंवा आग होणे
- त्वचेवरील चट्ट्यांवर पांढरट-चांदी कलरचे पापुद्रे येणे
- त्वचेवर खाजवल्यास पापुद्रे भुसा होऊन खाली पडणे
- त्वचा कोरडी होऊन क्रॅक पडून रक्तस्राव होणे
- सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे वेदना होणे.
अशी काही लक्षणे सोरायसिस या त्वचाविकारामध्ये असतात.

मानधणे स्किन केअर क्लिनिक - पांढरे कोड (Vitiligo)
पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.
लक्षणे :
- शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
- प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
- डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
- पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
- या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.

मानधणे स्किन केअर क्लिनिक - गजकर्ण नायटा (Ringworm)
गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते.
ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या बुरशीमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो.

मानधणे स्किन केअर क्लिनिक - चामखीळ (Warts)
त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.
कारणे : चामखीळ हे प्रामुख्याने ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे (HPV) होत असतात. चेहरा, मान, हात, पाठ, छाती आणि पोटावरही चामखीळ येऊ शकतात. चामखीळला English मध्ये Warts असे म्हणतात. तसेच चामखिळीला अंगावर मोस किंवा मस येणे असेही म्हणतात.

केस गळती
कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते.

मानधणे स्किन केअर क्लिनिक - डँड्रफ
डोक्यातील कोंडा, ज्याला seborrheic dermatitis म्हणूनही ओळखले जाते, हे टाळू, भुवया किंवा नाकाजवळील त्वचेच्या पेशींचा अतिरेक आहे. हे मृत त्वचेच्या पेशींच्या जलद शेडिंगमुळे होते, परिणामी मोठ्या फ्लेक्स बनतात.
डोक्यातील कोंडा कशामुळे होतो?
- बुरशीजन्य अतिवृद्धी: टाळूवर मालासेझिया बुरशीची भरभराट होते.
- स्कॅल्पचे अतिरिक्त तेल: परिणामी चिकट, तेलकट कोंडा होतो.
- अनियमित ब्रशिंग आणि केस धुणे.
- शैम्पूचा क्वचित वापर.
- तणाव आणि मानसिक आरोग्य स्थिती.

Gallery






