About Us

लोटे हॉस्पीटल

 हृदयरोग, मधुमेह, थायरॉईड, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, प्रसूती, लॅप्रोस्कोपी

"विश्वास, सेवा आणि उत्तम आरोग्य!"

PH. No. : 0724-2450200



डॉ. दीपक श. लोटे

  • एम.बी.बी.एस., एम.डी. (जनरल मेडिसीन)
  • हृदयरोग व मधुमेह तज्ञ थायरॉईड रोगतज्ञ
  • माजी विभाग प्रमुख - मेडिसीन जमनलाल गोएनका डेंटल कॉलेज, अकोला.
  • माजी लेक्चरर मेडीसीन, गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज, अकोला.
  • दवाखाना : रतनलाल प्लॉट चौक, अकोला.
  • वेळ : सकाळी 10:00 ते 3:00

डॉ. सौ. साधना दी. लोटे

  • एम.बी.बी.एस., एम.एस. (जनरल सर्जरी)
  • डी.जी.ओ. शल्यचिकित्सक, स्त्रीरोग व प्रसूती रोग तज्ञ, लॅप्रोस्कोपीक सर्जन 
  • माजी विभाग प्रमुख-शल्यचिकित्सा जमनलाल गोएनका डेंटल कॉलेज, अकोला.
  • माजी मेडीकल ऑफीसर - जिल्हा रुग्णालय, अकोला. 
  • माजी मेडीकल ऑफीसर - जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.
  • माजी मेडीकल ऑफीसर - आयुर्वेद रुग्णालय, अकोला
  • दवाखाना : अमानखाँ प्लॉट्स, शास्त्री नगर,
  • वेळ : सकाळी 10:00 ते 4:00

उपलब्ध उपचार व सुविधा :

  • इसीजी, ब्लड ग्लुकोज, पॅथॉलॉजी
  • कार्डीॲक, मॉनिटर व डिफिब्रिलेटर, नेबुलाईजर
  • लॅपरॉस्कोपी दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, पित्ताशय, गर्भाशय व गाठीचे ऑपरेशन व चिकित्सा
  • सुसज्ज प्रसुतिगृह, वैद्यकिय आणि शल्यचिकित्सा सुश्रूषागृह
  • फिटल डॉपलर 
  • वंध्यत्व निवारण उपचार व संबंधित शस्त्रक्रिया
  • सरकारमान्य कुटुंबकल्याण केंद्र
  • सोनोग्राफी सुविधा, 2D इको, कलर डॉपलर
  • थर्माचॉईस बलून थेरपी - अतिरक्तस्त्राव मासिक पाळी करिता (विदर्भात प्रथमच)
  • स्तनाच्या गाठी व कॅन्सर सर्जरीथायरॉईडच्या गाठी
  • पोटातील आतडीच्या गाठी, अपेंडीक्स, हर्निया कॅन्सरच्या गाठी
  • गुद्‌द्वाराचे भगंदर, भूळव्याध, फिशर चे ऑपरेशन
  • दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढणे, बिनाटाक्याने गर्भाशय काढणे व टाक्याचे ऑपरेशन
  • अपेंडीवस व पित्ताशयाचे ऑपरेशन व इतर ऑपरेशन
  • गळ्यातील व इतर गाठी, फोड व इतर ऑपरेशन्स 
  • सीझेरीयन, वेदनारहित प्रसूती व डिलीव्हरी, व्हॅकुम व फाॅस्पेप्स डिलीव्हरी
  • गर्भाशयाच्या गाठी व बाजूच्या सिस्ट चे ऑपरेशन
  • पॅप स्मिमर तपासणी

Products/Services

लोटे हॉस्पीटल

"विश्वास, सेवा आणि उत्तम आरोग्य!"

लोटे हॉस्पीटल

स्त्री वंध्यत्व

गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे :

  • स्त्री-प्रजनन अवयवांतील दोष,
  • PCOS ची समस्या असणे,
  • हार्मोन्समधील असंतुलन,
  • pelvic inflammatory disease (PID) मुळे,
  • एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) यासारख्या आजारांमुळे,
  • स्त्रीचे वय अधिक असणे,
  • स्त्रीचे वजन जास्त असणे, लठ्ठपणा,
  • हायपोथायरॉडिजमची समस्या,
  • सिगारेट स्मोकिंग व अल्कोहोलचे व्यसन,
  • मानसिक तणाव,
  • कुपोषण किंवा शारीरिक दुर्बलता,
  • लैंगिक आजार,
  • किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम,
  • वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधांचा अतिवापर,
  • गर्भनिरोधक गोळ्या औषधांचा चुकीचा वापर, यासारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होत असते.

स्त्री वंध्यत्व

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज

लॅप्रोस्कोपिक गाइनाकोलॉजिकल शस्त्रक्रिया म्हणजे लहान छिद्रे आणि कॅमेऱ्याचा वापर करून केलेली कमीत-कमी वेदनेत होनारी शस्त्रक्रिया, जी स्त्रीरोगाशी संबंधित समस्या निदान आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते.

याचे फायदे म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदना, जलद बरे होणे, आणि गुंतागुंतीचा कमी धोका. त्यामुळे रुग्णांना सामान्य जीवनशैलीत लवकर परतण्यास मदत होते आणि एकूणच सुधारित परिणाम मिळतात.

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज

सोनोग्राफी

गरोदरपणात गर्भाची कमीत कमी ४ वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार सोनोग्राफीचा गर्भावर कोणाताही दुष्परिणाम होत नाही. कलर डॉप्लर सोनोग्राफी आवश्यक असेल तरच करावी. सोनोग्राफीमुळे खालील माहिती मिळते.

  • गर्भ हा गर्भाशयातच वाढ आहे का ?
  • गर्भाची वाढ
  • एका पेक्षा जास्त गर्भ
  • द्राक्षगर्भ / निर्जीव गर्भ
  • गर्भाची वाढ
  • गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
  • गर्भाला होणारा रक्त पुरवठा कलर डॉप्लर सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार)

सोनोग्राफी

प्रसव (सामान्य व सिझेरियन)

सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.

प्रसव (सामान्य व सिझेरियन)

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते. हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात.

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

गर्भाशय व गर्भाशय मुखाचा कर्करोग

स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्‍या कॅन्सरच्या यादीमध्ये गर्भाशय व गर्भाशय मुखाचा  कर्करोगाचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.

लक्षणे :

  • योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे.
  • ‎गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
  • लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
  • ‎रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
  • ‎याशिवाय भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

गर्भाशय व गर्भाशय मुखाचा कर्करोग

अपेंडिक्स वर उपचार

अपेंडिक्स हा लहान, नळीसारखा अवयव आहे, जो लहान आतड्याच्या शेवटी जोडलेला असतो. तो पचन प्रक्रियेत थेट उपयोगी नसतो.

कारणे :

  • अपेंडिक्समध्ये अडथळा होणे (जसे की स्टूल, परजीवी किंवा ट्यूमर)
  • बॅक्टेरियल संसर्ग
  • जास्त प्रमाणात जंतुसंसर्ग

लक्षणे :

  • पोटाच्या उजव्या खालच्या भागात तीव्र वेदना
  • ताप येणे
  • उलट्या किंवा मळमळ
  • भूक मंदावणे
  • पोट फुगणे किंवा मऊ वाटणे

उपचार: अपेंडिक्सच्या उपचारांमध्ये त्वरित शस्त्रक्रिया (अपेंडिसेक्टॉमी) केली जाते. काही प्रकरणांमध्ये लवकर निदान झाल्यास औषधोपचाराचा वापर केला जातो.

अपेंडिक्स वर उपचार

हर्नियावर उपचार

हार्निया ही एक वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये एखादे अंतर्गत अवयव किंवा त्याच्या आसपासची स्नायू किंवा ऊती कमजोर होऊन ते बाहेरच्या भागात फुगतात.

कारणे :

  • स्नायूंची कमजोरी
  • जड वस्तू उचलणे
  • वारंवार खोकला
  • अपचन किंवा पोट साफ न होणे

लक्षणे :

  • फुगलेला भाग दिसणे
  • वेदना किंवा अस्वस्थता
  • जड वस्तू उचलताना त्रास
  • फुगलेल्या भागावर दबाव दिल्यास हलका दुखणे

उपचार : हार्नियासाठी मुख्यतः शस्त्रक्रिया केली जाते (ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक). गंभीर प्रकरणांमध्ये त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.

हर्नियावर उपचार

थायरॉईड संबंधित आजार

थायरॉईड ही मानेला समोरच्या बाजूस असलेला ग्रंथी आहे, जी हार्मोन्स तयार करून शरीराच्या चयापचय (मेटाबॉलिझम) नियंत्रित करते.

कारणे :

  • आयोडीनची कमतरता
  • ऑटोइम्यून विकार (जसे की हाशिमोटो रोग किंवा ग्रेव्ह्स डिसीज)
  • आनुवंशिक कारणे
  • हार्मोन्सचे असंतुलन
  • थायरॉईड ग्रंथीवर सूज किंवा ट्यूमर

लक्षणे :

  • वजन वाढणे किंवा कमी होणे
  • थकवा व अशक्तपणा
  • केस गळणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • चिडचिड किंवा ताण जाणवणे
  • हृदयाचे ठोके वेगाने होणे किंवा मंदावणे

उपचार : थायरॉईडच्या उपचारांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या प्रमाणानुसार औषधे दिली जातात (हायपोथायरॉईडसाठी थायरॉक्सिन, हायपरथायरॉईडसाठी अँटी-थायरॉईड औषधे). काही प्रकरणांमध्ये रेडिओआयोडीन थेरपी किंवा शस्त्रक्रिया केली जाते.

थायरॉईड संबंधित आजार

स्तनाचा कर्करोग - Breast cancer

स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.

लक्षणे : स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्‍या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.

  • स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
  • ‎अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
  • ‎बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
  • ‎स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

स्तनाचा कर्करोग - Breast cancer

मूळव्याधवर उपचार व शस्त्रक्रिया

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. मूळव्याध हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्याठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सच्या त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी मूळव्याधवर वेळीच उपचार करणे खूप महत्वाचे असते. पाइल्स समस्येमध्ये शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येत असते. तसेच शौचाच्या ठिकाणी खाज होणे, आग होणे, जळजळ आणि भयंकर वेदना होत असतात. त्रास अधिक वाढल्यास शौचावाटे रक्तस्त्राव होतो.

मूळव्याधवर उपचार व शस्त्रक्रिया

फिशरवर उपचार व शस्त्रक्रिया

फिशरमध्ये गुदाच्या ठिकाणी चीर पडत असते. त्यामुळे त्याठिकाणी तीव्र वेदना व रक्तस्राव होत असतो. या त्रासात शौचावेळी संडसवाटे रक्त पडत असते. फिशरचा त्रास हा फारसा गंभीर नसून ही समस्या अनेक लोकांना असते. बहुतेकवेळा साधारण चार ते सहा आठवड्यात गुदद्वारात पडलेली चीर आपोआप बरी होऊन फिशरचा त्रास दूर होत असतो. तसेच आठ आठवड्यानंतरही हा त्रास जाणवत असल्यास त्याला क्रॉनिक प्रकारचा फिशर असे म्हणतात.

फिशरवर उपचार व शस्त्रक्रिया

फिस्टुलावर उपचार व शस्त्रक्रिया

फिस्टुला म्हणजे शरीरातील दोन भागांमध्ये अनैसर्गिक मार्ग तयार होणे. हे मार्ग दोन अवयवांमध्ये किंवा शरीराच्या दोन पोकळ्यांमध्ये असू शकतात. गुद्द्वार आणि त्वचा किंवा मूत्रमार्ग आणि मलाशय यांच्यात फिस्टुला होऊ शकतो.

फिस्टुलावर उपचार व शस्त्रक्रिया

Gallery

Bhzk

Rate Us

Contact Us