About Us
क्षितिज
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
अतिदक्षता विभाग आणि मॅटर्निटी
महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना अंतर्गत पूर्णतः मोफत सेवा उपलब्ध
क्षितिज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे नांदेडमधील शिवाजीनगर येथे स्थित एक अद्ययावत, सर्वसुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल आहे, जे डॉ. राजेंद्र कृष्णाजीराव जाधव (सुनेगावकर) व डॉ. सरस्वती राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. रुग्णसेवा हेच आमचे सर्वोच्च ध्येय असून, आमच्याकडे ३५ बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग, आणि डिलीवरीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहेत.
२४ तास तज्ञ डॉक्टर्सची सेवा, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, व्हेन्टीलेटर, मॉनिटर, बेडसाईड सोनोग्राफी, एक्सरे, २-डी ईको, एन.एस.टी., आणि ई.सी.जी.सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आम्ही अत्याधुनिक उपचार प्रदान करतो.
हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल व स्पेशल रुम्स तसेच २४ तास मेडीकल सुविधा उपलब्ध आहेत.
उपलब्ध विभागांमध्ये मेडिसिन, हृदयरोग, किडनी विकार, मेंदू विकार, पोट विकार, शस्त्रक्रिया, बंधनत्व निवारण, रेडिओलॉजी व पॅथोलॉजी यांचा समावेश आहे.
क्षितिज हॉस्पिटल – जेथे विश्वास, तंत्रज्ञान आणि तज्ञता एकत्र येते.
DOCTORS ON PANEL
मेडिसिन विभाग -
- डॉ. राजेंद्र कृष्णाजीराव जाधव (सुनेगावकर)
- डॉ. शालीनी अंकुल्लवार
- डॉ. चांदु पाटील
- डॉ. बळवंत चव्हाण
स्त्रिरोग प्रसुती व वंधत्व निवारण केंद्र -
- डॉ. सरस्वती राजेंद्र जाधव
पोट विकार विभाग -
- डाॅ. राहुल देशमुख
- डॉ. प्रवीण मोहिते
रेडिओलॉजी विभाग -
- डाॅ. सुनील काळे
शस्त्रक्रिया विभाग -
- डॉ. गोपाळ शिंदे
- डॉ. राजेश अंकुलवाड
- डॉ. चंद्रकांत देवसरकर
- डाॅ. सुशांत दावरे
किडनी विकार विभाग -
- डॉ. शहाजी जाधव
- डॉ. राजीव राठोड
- डॉ. प्रमोल हांबर्डे
- डाॅ. योगेंद्र चिद्रवार
मेंदू, मणका विकार विभाग -
- डॉ. संदीप गोरे
- डॉ. श्रीनिवास अदिलवाड
- डॉ. स्वप्नील पाटील
- डॉ. योगेश कुंटलवाड
- डाॅ. तुषार सुरोसे
- डाॅ. गोविंद शिंदे
पॅथॉलॉजी विभाग -
- डॉ. कृष्णा पवार
हृदयरोग विभाग -
- डाॅ. गजानन झंवर
- डॉ. विजय कांबळे
- डॉ. राहुल पटणे
अस्थिरोग विभाग -
- डॉ.अजय पापुलवार
- डॉ.ललकार
त्वचारोग विभाग -
- डाॅ. जयश्री काबरा
डायलॅसिस विभाग -
- डाॅ. शहाजी जाधव
Products/Services
दमा – Asthma
दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.
अस्थमाची लक्षणे (Asthma symptoms) :
खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.
हार्ट अटॅकची लक्षणे (Heart attack symptoms) :
- छातीत दडपल्यासारखे वाटते,
- छातीत दुखायला लागते,
- छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
- बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
- अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
- अशक्तपणा जाणवणे,
- उलटी किंवा मळमळ होणे,
- चक्कर येणे,
- दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
- श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

पक्षाघात - Paralysis
मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते.
पक्षाघाताची लक्षणे (Paralysis symptoms) :
खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
- एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
- हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.
- तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
- अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
- एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
- चक्कर येणे, तोल जाणे,
- चेतना कमी होणे
- तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

मधुमेह व उच्च क्तदाब
स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.
मधुमेहाची लक्षणे (Diabetes symptoms) :
- वारंवार लघवीला जावे लागणे,
- वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
- अचानकपणे वजन घटणे,
- अशक्तपणा, चक्कर येणे,
- अधिक भूक लागणे,
- हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
- डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
- मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
- जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
- मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

थायरॉइड संबंधि आजार
थायरॉइड म्हणजे काय..?
आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.
मात्र जेंव्हा थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास किंवा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास थायरॉइडचा त्रास सुरू होतो. त्या त्रासाला thyroid disease असे म्हणतात. थायरॉइडच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. यामध्ये हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम असे थायरॉइडचे विविध आजार होऊ शकतात.

लिव्हर सिरॉसिस
सिरॉसिस हा यकृताचा असा आजार आहे ज्यामध्ये निरोगी ऊतींच्या जागी जखमी व कठीण झालेल्या ऊती (स्कार टिश्यू) निर्माण होतात. यकृताला इजा झाल्यानंतर ते स्वतःची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करते, आणि त्याच प्रक्रियेत ही जखमी ऊती तयार होतात. यकृताला इजा होण्याची सामान्य कारणे म्हणजे दीर्घकाळ मद्यपान, हेपाटायटिस आणि इतर काही वैद्यकीय स्थिती.
काळानुसार या जखमी ऊती निरोगी ऊतींची जागा घेतात आणि त्यामुळे यकृताची कार्य करण्याची क्षमता कमी होते. यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते.
सिरॉसिसची लक्षणे -
- भूक न लागणे
- थकवा / ऊर्जा कमी होणे
- सहज रक्ताच्या गुठळ्या किंवा सूज येणे
- त्वचेवर खाज सुटणे
- वजन घटणे
- पिवळा कावीळ (त्वचा किंवा डोळ्यांवर पिवळसरपणा)
कारणं (Short मध्ये):
- जास्त प्रमाणात अल्कोहोल सेवन
- हिपाटायटिस B/C ची लागण
- चरबीयुक्त यकृत (Fatty liver)
- औषधांचे दुष्परिणाम
- अनुवांशिक आजार

इकोकार्डिओग्राम (2D इको)
होल्टर मॉनिटर्स हे हृदयाच्या विविध समस्यांचे निदान आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. हे अनियमित हृदयाच्या ठोक्यांमध्ये (ॲरिदमिया) झालेल्या बदलांचे निरीक्षण करण्यात, छातीत होणाऱ्या वेदनांचे मूल्यांकन करण्यामध्ये, आणि विशिष्ट हृदयाच्या औषधांचा प्रभाव तपासण्यात अत्यंत उपयोगी ठरतात. कौशल्यपूर्ण आरोग्यसेवा प्रदान करनारे तज्ञ या उपकरणाने नोंदवलेला डेटा काळजीपूर्वक विश्लेषित करून हृदयाच्या विद्युत कार्यातील अनियमितता शोधतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचे निदान व उपचार सुकर होतात.
होल्टर मॉनिटरिंग का वापरले जाते :
- हृदयातील अनियमितता शोधण्यासाठी.
- छातीत होणाऱ्या वेदनांचा शोध घेण्यासाठी : होल्टर मॉनिटर तुमच्या हृदयाचा जागरूक निरीक्षक म्हणून काम करतो आणि हृदयाची क्रिया नोंदवतो.
- औषधोपचारांचे मूल्यांकन करण्यासाठी.
- होल्टर मॉनिटरिंगमुळे डॉक्टरांना तुमच्या हृदयाच्या एकूण कार्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळते.

इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ECG)
इलेक्ट्रोकार्डिओग्राम (EKG/ECG) ही एक चाचणी आहे ज्यामध्ये छाती आणि हातापायांवर तात्पुरती इलेक्ट्रोड लावून तुमच्या हृदयाच्या विद्युत क्रियेचे निरीक्षण, मोजमाप आणि नोंद केली जाते. ही क्रिया हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवते. संगणक या माहितीचे तरंगाच्या स्वरूपात रूपांतर करतो, ज्याचे विश्लेषण तुमचे कार्डिओलॉजिस्ट करू शकतात.
ECG कधी वापरले जाते?
- तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग सामान्य आहे का किंवा ॲरिदमिया (अनियमित ठोके) आहे का हे तपासण्यासाठी.
- कोरोनरी धमनी रोगामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा योग्यरित्या होत आहे का (इस्केमिया) हे शोधण्यासाठी.
- हृदयविकाराचा झटका झाला आहे का हे निदान करण्यासाठी.
- हृदयातील असमान्यता, जसे की हृदयाच्या कक्षांचे वाढणे किंवा विद्युत वहनातील अडथळे शोधण्यासाठी.
- हृदयाचे नुकसान किंवा हृदय निकामी होणे.

स्त्री वंध्यत्व
गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे :
- स्त्री-प्रजनन अवयवांतील दोष,
- PCOS ची समस्या असणे,
- हार्मोन्समधील असंतुलन,
- pelvic inflammatory disease (PID) मुळे,
- एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्स) यासारख्या आजारांमुळे,
- स्त्रीचे वय अधिक असणे,
- स्त्रीचे वजन जास्त असणे, लठ्ठपणा,
- हायपोथायरॉडिजमची समस्या,
- सिगारेट स्मोकिंग व अल्कोहोलचे व्यसन,
- मानसिक तणाव,
- कुपोषण किंवा शारीरिक दुर्बलता,
- लैंगिक आजार,
- किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम,
- वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधांचा अतिवापर,
- गर्भनिरोधक गोळ्या औषधांचा चुकीचा वापर, यासारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होत असते.

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज
लॅप्रोस्कोपिक गाइनाकोलॉजिकल शस्त्रक्रिया म्हणजे लहान छिद्रे आणि कॅमेऱ्याचा वापर करून केलेली कमीत-कमी वेदनेत होनारी शस्त्रक्रिया, जी स्त्रीरोगाशी संबंधित समस्या निदान आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते.
याचे फायदे म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदना, जलद बरे होणे, आणि गुंतागुंतीचा कमी धोका. त्यामुळे रुग्णांना सामान्य जीवनशैलीत लवकर परतण्यास मदत होते आणि एकूणच सुधारित परिणाम मिळतात.

हिस्टरोस्कोपी: गर्भाशयाच्या तपासणीसाठी वापरली जाणारी प्रक्रिया
ही एक कमी ञासदायक प्रक्रिया आहे ज्यामध्ये गर्भाशय तपासण्यासाठी लवचिक, प्रकाशयुक्त ट्यूब (हिस्टरोस्कोप) योनीतून व गर्भाशय मुखातून घालून तपासणी केली जाते.
गरज: अनियमित रक्तस्राव, गर्भाशयातील फायब्रॉइड्स, पॉलिप्स, चिठ्या, वंध्यत्व, ट्युब ब्लॅक यासारख्या समस्या ओळखणे व उपचार करणे. प्रजनन संबंधित शस्त्रक्रियेसाठी पूर्वतपासणी करणे.
फायदे:
- गर्भाशयातील समस्या अचूकपणे ओळखता येतात.
- पॉलिप्स किंवा फायब्रॉइड्ससारख्या समस्यांचे उपचार प्रक्रियेदरम्यानच करता येतात.
- काही प्रकरणांमध्ये प्रजननक्षमता सुधारण्यास मदत होते
- येथे कुठेही चिरा व टाका लागत नाही.

सोनोग्राफी
गरोदरपणात गर्भाची कमीत कमी ४ वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार सोनोग्राफीचा गर्भावर कोणाताही दुष्परिणाम होत नाही. कलर डॉप्लर सोनोग्राफी आवश्यक असेल तरच करावी. सोनोग्राफीमुळे खालील माहिती मिळते.
पहिली सोनोग्राफी: शेवटच्या पाळीच्या तारखेपासून ०८ आठवड्यात म्हणजेच २ महिन्याच्या आत.
- गर्भ हा गर्भाशयातच वाढ आहे का ?
- गर्भाची वाढ
- एका पेक्षा जास्त गर्भ
- द्राक्षगर्भ / निर्जीव गर्भ
दुसरी सोनोग्राफी (NT Scan) : शेवटच्या पाळीच्या तारखेपासून 13 आठवडे व 6 दिवसात म्हणजेच तिसऱ्या महिन्यात
- गर्भाची वाढ
- गर्भाला मतिमंदता (Down Syndrome) याचे निदान करणरी Sonography
- गर्भामध्ये काही व्यंग (NT Scan)
तिसरी सोनोग्राफी (Anomaly Scan): 18 ते 22 आठवड्यांपयंत (५ व्या महिन्यामध्ये)
- गर्भाची वाढ
- गर्भामध्ये काही व्यंग
- गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
- गर्भाशयातील वारेची (Placenta) स्थिती
चौथी सोनोग्राफी: शेवटच्या पाळीपासून 28 ते 36 आठवड्यांपर्यंत (9 व्या महिन्यात).
- गर्भाची वाढ
- गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कलर डॉप्लर सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार)

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन
गर्भधारणेपूर्व मार्गदर्शनामधे गर्भधारणा करण्याची योजना आखणाऱ्या व्यक्ती किंवा जोडप्यांना आरोग्य, जीवनशैली, आणि वैद्यकीय घटकांविषयी चर्चा आणि मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला जातो. याचे फायदे म्हणजे संभाव्य जोखीम ओळखणे व त्याचे व्यवस्थापन करणे, प्रजनन क्षमता सुधारणे आणि यशस्वी आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करणे.

प्रसुतीपूर्व तपासणी व उपचार
एएनसी तपासणी म्हणजे प्रसवपूर्व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या सल्लामसलतीमुळे आई आणि वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याची नियमित देखरेख होते आणि संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते. एएनसीमध्ये विविध तपासण्या, पोषणाविषयी सल्ला आणि निरोगी गर्भधारणेसाठी मार्गदर्शन समाविष्ट असते, ज्यामुळे सुखद प्रसूती अनुभवास प्रोत्साहन दिले जाते.

प्रसव (सामान्य व सिझेरियन)
सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया
गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते. हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात.

PCOD
PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय डिसऑर्डर. पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी हार्मोनल संबधित समस्या आहे. 15 ते 44 अशा रिप्रॉडक्टीव्ह वयोगटातील कोणत्याही स्त्रियांमध्ये ही समस्या होऊ शकते. पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने हार्मोन्समधील असंतुलनामुळे उद्भवते. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनची पातळी वाढत असते. एंड्रोजन हे पुरुष हार्मोन असून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक झाल्यास ही समस्या होत असते. यामुळे स्त्रीमध्ये अंडाशयावर गाठी तयार होऊ लागतात. तसेच यामुळे अंडाशयाच्या आकारात वाढ होऊन त्याभोवती फॉलिकल्स साठू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर याचा परिणाम होतो. अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवू शकते.
PCOD ची लक्षणे :
- मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे
- स्त्रियांमध्ये नको त्या ठिकाणी केसांची वाढ होणे – चेहरा, हनुवटी, स्तन, पोट
- चेहऱ्यावर मुरुम अधिक येणे तसेच तेलकट त्वचेची समस्या वाढते
- डोक्याचे केस पातळ होऊ शकतात आणि त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.
- पीसीओडीमुळे स्त्रियांचे वजन जास्त वाढू लागते.
- हार्मोनल बदलामुळे डोकेदुखी, थकवा असे त्रास होऊन झोपेच्या तक्रारी सुरू होतात.
- गर्भवती होण्यास अडचणी येणे

श्वेतपदर (Leukorrhea)
मासिकपाळी येण्याच्या काही दिवस आधी काही स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे किंवा गर्भधारण झाली असताना किंवा संभोगानंतर असा योनीमार्गातून पांढरा चिकट स्राव कळतनकळत जाणं नॉर्मल असतं. पण जाणवण्याइतपत सतत योनीमार्गातून स्त्राव जाणं, त्याचं प्रमाण वाढणं, त्या स्त्रावाला वास येणं, त्याबरोबर कंबरदुखी, योनीमार्गाच्या आत आणि बाहेरील बाजूस खाज सुटणं यासारख्या तक्रारींकडे स्त्रीयांनी निश्चितच दुर्लक्ष करू नये.
कारणे:
- योनी आणि गर्भाशयातील इंन्फेक्शन (जंतूप्रादूर्भाव) हे याचे प्रमुख कारण असते,
- याशिवाय गर्भाशयाला सूज आल्याने,
- गर्भाशयाच्या मुखाला जखमा झाल्यामुळे,
- सतत गर्भपात झाल्याने,
- गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशयाचा कॅन्सर, बीजकोषाचा ट्यूमर, गुप्तरोग, अंग बाहेर येणे या विकारांमुळेही अंगावरून पांढरे जाऊ शकते.
- मानसिक ताण-तणावामुळे स्त्रीयांमध्ये पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढते.

Gallery

















