About Us
खेरडे हाॅस्पीटल
इ. एन. टी.
"कान, नाक, घसा स्वास्थ्याची पूर्ण काळजी - खेरडे हॉस्पीटल, विश्वासाचा आवाज!"
डाॅ. विजय खेरडे
- MBBS., DORL., MICAI. (Delhi)
- MS. (E.N.T.) (Mumbai)
- कान नाक व घसा तज्ञ
- Regi. No.: 40917
खेरडे हाॅस्पीटल हे रामनगर, अकोला येथील सर्वात प्रगत विशेष ईएनटी (कान, नाक, घसा) रुग्णालयांपैकी एक आहे. 2008 साली डॉ. विजय खेरडे यांनी या हॉस्पीटलची स्थापना केली. खेरडे हॉस्पीटलमध्ये ओपीडी आणि आयपीडी सेवा उपलब्ध असून, कान, नाक, घसा संबंधित आजार असलेल्या रुग्णांना सेवांचा लाभ मिळतो. येथे कान, नाक, घसा शस्त्रक्रियांसाठी पूर्ण सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे.
स्पेशीॲलिटिज :
कान
- कानाची मायक्रोस्कोप द्वारे तपासणी
- श्रवण क्षमता मोजण्यासाठी ऑडिओमेट्री, इम्पेडन्स ऑडिओमेट्री.
- कानाच्या शस्त्रक्रिया (Micro Ear Surgeries) : टिंपॅनो प्लास्टी, मास्टोइडेक्टॉमी, स्टेपेडेक्टॉमी सर्जरी.
नाक
- दुर्बिनीद्वारे (Nasal Endoscopy) नाकाची तपासणी
- नाकाच्या शस्त्रक्रिया जसे कि - सेप्टोप्लास्टी, कॅब्लेशन सर्जरी, इंडोस्कोपीक सायनस सर्जरी, नेझल पॅलिप सर्जरी.
घसा
- घस्याच्या तपासण्या : राईनो - फॅरिंगो - लॅरिंगो - फायबर स्कोपी फॉर अर्लि डिटेक्शन ऑफ कॅन्सर,
- घस्याच्या व स्वर यंत्राच्या शस्त्रक्रिया : टाॅन्सिल्स सर्जरी, कॅब्लेशन ॲडिडाॅइड सर्जरी, मायक्रो लॅरिंजियल सर्जरी, बायोप्सी.
- स्लिप स्टडी फाॅर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप ऍपनिया (स्नोरिंग/घुरणे)
Products/Services
खेरडे हाॅस्पीटल
डाॅ. विजय खेरडे
- MBBS., DORL., MICAI. (Delhi)
- MS. (E.N.T.) (Mumbai)
- कान नाक व घसा तज्ञ
- Regi. No.: 40917

कानातील मळ -Ear wax
आपल्या कानामध्ये Ear wax तयार होत असते. कानात Earwax तयार होणे हे नॉर्मल असून ते कानाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. Earwax किंवा कानातील मळ हा अँटीबॅक्टेरियल असून ते एक ल्युबरिकंट आहे.
कानात Ear wax तयार होणे ही नॉर्मल बाब असली तरीही कानातील स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कान साफ न केल्यामुळे कानात अधिक प्रमाणात मळ साचतो त्यामुळे कानात खाज येणे, कान गच्च वाटणे, ऐकू कमी येणे, कानात दुखणे, कानात आवाज होणे, किंवा कानातून पाणी येणे अशा तक्रारीही होऊ शकतात.

कान दुखणे – Ear pain
कान दुखणे हा त्रास सर्वानाच कधींनाकधी होत असतो. विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अनेक कारणांमुळे कान दुखत असतात. यामध्ये प्रामुख्याने कानात झालेल्या इन्फेक्शनमुळे कान दुखत असतात. याशिवाय सर्दी झाल्यामुळे तसेच कानात मळ अधिक झाल्यानेही कान दुखू लागतो.
कारणे :
- कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे,
- सर्दी झाल्याने सायनस इंन्फेकशनमुळे,
- हिरड्या सुजल्यामुळे,
- कानात मळ अधिक झाल्याने,
- कानाचा पडदा फाटल्यामुळे,
- कानात काडी अथवा टोकदार वस्तू घालून जखम झाल्यामुळे,
- कानात इंज्यूरी किंवा मार लागल्याने कान दुखत असतो. वरीलपैकी कारणे ही कान दुखणे यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

कानातून पाणी येणे – Ear Discharge
कानाच्या विविध तक्रारी वरचेवर होत असतात. कानातून पाणी गळणे ही त्यापैकीच एक समस्या आहे. या त्रासाला ओटोरिया (otorrhea) असेही म्हणतात. हा त्रास सामान्य असला तरीही याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण वेळीच उपचार न झाल्यास कानात इन्फेक्शन वैगेरे होऊन अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
कारणे :
- प्रामुख्याने बॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शन होऊन कानातून पाणी येते.
- कानाच्या मधल्या भागात इन्फेक्शन झाल्याने ओटिटिस मीडिया मुळे कानातून पाणी येऊ लागते.
- कानाच्या पडद्याला छिद्र पडल्याने देखील कानातून पाणी येऊ लागते.
- सर्दी, खोकला, टाॅन्सिल्स, वाढलेले ॲडेनायड्स, ॲलर्जिक राइनाइटिस व सायनस सूज यांमुळे नाक आणि घशातील बैक्टीरिया आणि व्हायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन निर्माण करतात त्यामुळेही कानातून पाणी येते.
- लहान मुलांत टॉन्सिल्स व ॲडिनॉइड्सच्या वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनमुळे कानातून पाणी येण्याचा त्रास अधिक होतो.
- कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन कानातून पाणी येते.
- मोठ्या आवाजामुळे किंवा विमान उड्डाण करताना, स्कूबा डायव्हिंग यामुळे अचानक कानातील दाब वाढल्याने कानाच्या पडल्यास इजा होऊन कानातून पाणी येऊ लागते.
उपचार : जर औषधोपचाराने कानातून पाणी येणे थांबले नाही तर ऑपरेशन करावे लागते. पडद्याचे छिद्र दुरुस्त करण्यासाठी कानाच्या पडद्याचे प्रत्यारोपण (टिम्पॅनोप्लास्टी) केले जाते. या ऑपरेशनमध्ये कानामध्ये त्वचेचा कृत्रिम पडदा तयार करून बसविला जातो. काहीवेळा मायरिंगोटॉमी केली जाते. यात पडद्यातून द्रव बाहेर काढला जातो. तसेच व्हेंटिलेशन ट्यूब टाकण्यात येते.

कानात आवाज येणे - टिनिटस
टिनिटस (उच्चार टि-नि-टस) किंवा कानात घंटा वाजण्याचा आवाज ही कानात घंटा, गूंज, स्स्स असा आवाज, चिऊ-चिऊ, शिट्टी वाजल्यासारखा किंवा इतर आवाज ऐकण्याची भावना असते. हा आवाज कधी कधी किंवा सतत असू शकतो आणि त्याची तीव्रता वेगवेगळी असू शकते. पार्श्वभूमीचा आवाज कमी असताना, म्हणजे शांततेत, रात्री झोपण्याचा प्रयत्न करताना हा आवाज जास्त जाणवतो. क्वचित प्रसंगी हा आवाज आपल्या हृदयाच्या ठोक्यांशी जुळून येतो (पल्सेटाईल टिनिटस).
कारणे : कानाच्या मध्ये मळ साठणे, कानाच्या संक्रमण होणे किंवा क्वचितच कानाच्या श्रवण नस (ऑडिटरी नर्व) वर होणारा सौम्य ट्युमर यामुळे कानात अडथळे होऊ शकतात. काही औषधं - विशेषतः एस्पिरिन, काही प्रकारच्या अँटिबायोटिक्स, अँटी-इन्फ्लेमेटरी औषधं, शांतीकारक औषधं आणि डिप्रेशनच्या औषधांमुळे, तसेच क्विनाइन औषधांमुळे टिनिटस हा संभाव्य दुष्परिणाम म्हणून नोंदवला जातो. जवळपास २०० प्रिस्क्रिप्शन किंवा नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधांमध्ये टिनिटस हा संभाव्य दुष्परिणाम असू शकतो. वृद्धत्वामुळे होणारी श्रवण यंत्रणेतील (कॉक्लिया) किंवा कानाच्या इतर भागांतील हानी. मेनियर्स रोग ज्याचा परिणाम कानाच्या आतील भागावर होतो. ओटोस्लेरोसिस ही आजार आहे ज्यामुळे मधल्या कानातील छोट्या हाडांचा कडकपणा वाढतो.
परिणाम : थकवा, ताण, झोपेचे प्रश्न, एकाग्रतेत अडचण, स्मरणशक्तीच्या समस्या, उदासीनता, चिंता आणि चिडचिड.

श्रवण कमी होणे / बहिरेपणा
वैद्यकीय विज्ञानानुसार, डॉक्टर श्रवण कमी होण्याचे दोन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण करतात.
१. कंडक्टिव्ह हियरिंग लॉस
२. सेन्सोरीन्युरल हियरिंग लॉस
कंडक्टिव्हहियरिंग लॉस तेव्हा होतो जेव्हा बाहेरील कान आणि मधल्या कानातील भाग आवाजाच्या लहरींना आतल्या कानापर्यंत पोहोचवू शकत नाहीत. त्याच्या उलट, सेन्सोरीन्युरल हियरिंग लॉस तेव्हा होतो जेव्हा आतला कान व्यवस्थित काम करत नाही आणि त्याच्याकडे आलेल्या आवाजांना विद्युत प्रवाहांमध्ये रूपांतर करून ते मेंदूपर्यंत पोहोचवण्यात अयशस्वी ठरतो.
मात्र, जर श्रवण कमी होणे अंशतः कंडक्टिव्ह आणि अंशतः सेन्सोरीन्युरल असेल तर त्याला 'मिक्स्ड हियरिंग लॉस' म्हणतात. श्रवण कमी होण्याची तीव्रता श्रवणशास्त्र प्रयोगशाळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने मोजता येते.
कारणे :
- बाहेरील कान, कानाची नळी किंवा मधल्या कानातील रचना योग्य नसणे
- सर्दीमुळे मधल्या कानात द्रव साठणे
- कानाचा संसर्ग
- ॲलर्जी
- युस्टेशियन ट्यूबचे कार्य योग्य नसणे
- कानाचा पडदा फाटणे
- सौम्य ट्युमर
- मळ साठणे
- कानाच्या नळीतील संसर्ग
- कानात परकीय वस्तू असणे

व्हर्टिगो
व्हर्टिगो म्हणजे तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाला हलतंय किंवा फिरतंय असं वाटणं. याचा चक्कर येण्यापेक्षा वेगळा अनुभव असतो कारण व्हर्टिगोमध्ये हालचालीची भ्रमात्मक जाणीव होते. जेव्हा तुम्हाला स्वतःला हलतंय असं वाटतं, त्याला सब्जेक्टिव्ह व्हर्टिगो म्हणतात, आणि आजूबाजूचं वातावरण हलतंय असं वाटतं तेव्हा त्याला ऑब्जेक्टिव्ह व्हर्टिगो म्हणतात.
व्हर्टिगोचे उपचार
व्हर्टिगोचा उपचार त्याच्या कारणावर अवलंबून असतो. बऱ्याच वेळा कोणत्याही उपचाराशिवाय व्हर्टिगो आपोआप बरा होतो. याचे कारण असे की तुमचा मेंदू किमान काही प्रमाणात तरी कानाच्या आतील बदलांना सामावून घेतो आणि इतर यंत्रणांवर अवलंबून राहून संतुलन राखतो.

सायनस इन्फेक्शन – Sinusitis
आपल्या चेहऱ्याच्या मागे कवटीची हाडे असतात. या कवटीच्या हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाच्या ठिकाणी काही पोकळ भाग असतात, त्या पोकळ भागांना सायनसेस असे म्हणतात.या सायनसेसमध्ये पातळ आणि वाहणारा द्रवपदार्थ तयार होत असतो. त्याला श्लेष्मा (म्युकस) असे म्हणतात. काही कारणांमुळे सायनसमध्ये हा द्रवपदार्थ जास्त झाल्यास तो नाकावाटे बाहेर येऊ लागतो. मात्र काहीवेळा सायनस भागात जास्त प्रमाणात म्यूकस जमा होतो तेंव्हा तो नाकावाटे जास्त प्रमाणात वाहून न गेल्यास सायनसमधेच साठून राहतो. त्यामुळे साठून राहिलेल्या या म्यूकसमध्ये वायरस, फंगस किंवा बक्टेरियाचे इन्फेक्शन होऊन सायनसला सूज येते त्या स्थितीला सायनुसायटिस असे म्हणतात.
लक्षणे :
- सायनसच्या ठिकाणी वेदना होतात.
- नाकाच्या भोवती डोळ्यांच्यावर आणि जबड्याच्या हाडांमध्ये तीव्र वेदना होतात.
- सकाळी वेदना जास्त जाणवतात.
- डोके दुखणे. डोके हलविल्यास वेदना वाढतात.
- पुढच्या बाजूस किंवा खाली वाकल्यावर डोके आणि गाल दुखणे.
- नाक चोंदणे, ताप येणे, चेहरा सुजणे ही लक्षणे यात दिसून येतात.

नाकाचे हाड वाढणे
नाकाच्या आत असणाऱ्या टर्बिनेटमुळे नाकातून जाणारी हवा ही उबदार आणि ओलसर होते. जर हे नाकातील टर्बिनेट्स मोठे झाले तर ते नाकात जाणारी हवा रोखू शकतात. या समस्येला वैद्यकीय भाषेत टर्बिनेट हायपरट्रॉफी (Turbinate Hypertrophy) असे म्हणतात. तर बोलीभाषेत याला “नाकाचे हाड वाढणे” असे म्हणतात. या समस्येमुळे श्वासोच्छवासाची समस्या होऊ शकते, तसेच इन्फेक्शन आणि नाकातून रक्त येणे अशा समस्याही यामुळे होऊ शकतात.
लक्षणे :
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- झोपेत घोरणे,
- झोपेत नाकातून श्वास न घेता तोंडाने श्वास घेणे,
- झोपेत तोंड उघडे ठेऊन श्वास घेत असल्याने तोंड कोरडे पडणे किंवा सकाळी घसा दुखू लागणे,
- वास ओळखण्याची क्षमता कमी होणे,
- कपाळावर दाब जाणवणे,
- चेहऱ्यावर सौम्य वेदना होणे,
- नाक वाहणे
- नाक गच्च होणे
कारणे :
- सायनसचा त्रास असणे
- जन्मजात समस्या,
- ऍलर्जीक राहिनाइटिस (allergic rhinitis),
- सर्दी, पडसे आणि खोकला,
- ऍलर्जी,
- हार्मोन्समधील असंतुलन,
- गर्भधारणा,
- वाढते वय,

नाकात मांस वाढणे – Nasal Polyps
नाकात मांस वाढणे याला नोजल पॉलीप असेही म्हणतात. हा त्रास पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. नाकातील पॉलिप नाकात तसेच सायनसमध्येही होऊ शकतात. हे प्रामुख्याने एलर्जी, अस्थमा आजार किंवा इन्फेक्शनमुळेही होऊ शकतात.
लक्षणे :
- नाकाने श्वास घेण्यास त्रास होणे,
- नाक चोंदने,
- वारंवार सर्दी, नाकातून पाणी आणि शिंका येणे,
- सायनस इन्फेक्शन होणे,
- नाकाच्या ठिकाणी दुखणे,
- डोकेदुखणे,
- झोपेत घोरणे, स्लीप ऍप्निया असा त्रास यामुळे होऊ शकतो.
कारणे :
- आनुवंशिक घटकांमुळे,
- सायनस इन्फेक्शनमुळे
- दमा (अस्थमा) आजार असल्यामुळे
- एलर्जिक राइनाइटिसमुळे,
- Cystic fibrosis मुळे,
- तसेच ऍस्पिरिन किंवा ibuprofen ह्या औषधांच्या परिणामामुळेही हा त्रास होऊ शकतो.

टॉन्सिल्स
टॉन्सिल्स म्हणजे तुमच्या घशाच्या मागील बाजूस दोन्ही बाजूंना असलेल्या दोन लिम्फ नोड्स. ते एक संरक्षण यंत्रणा म्हणून कार्य करतात. ते शरीराला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करतात. जेव्हा टॉन्सिल्सला संसर्ग होतो, तेव्हा त्या स्थितीला टॉन्सिलायटिस म्हणतात.

घशाचा संसर्ग
घशाचा संसर्ग म्हणजे घशात सूज येणे किंवा वेदना होणे, ज्याला वैद्यकीय भाषेत फॅरिंजायटीस म्हणतात. घशाच्या संसर्गाचे मुख्य कारण बॅक्टेरिया किंवा व्हायरस असू शकतात. यामुळे घशात खवखव, वेदना, बोलताना किंवा गिळताना त्रास होणे, तसेच कधी कधी ताप, खोकला किंवा अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.
घशाच्या संसर्गाचे उपचार संसर्गाच्या कारणावर अवलंबून असतात. व्हायरल संसर्ग आपोआप बरा होतो, परंतु बॅक्टेरियल संसर्गासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स देऊ शकतात.

Gallery









