About Us
काळे हॉस्पीटल
हृदयरोग, मधुमेह, मेंदुरोग, किडनी विकार & स्त्री रोग
"We Care Naturally"
डॉ. श्रीकांत ओ. काळे
- एम.बी.बी.एस. (गोल्डमेडालिस्ट), एम.डी. (मेडिसिन), जे.जे. हॉस्पीटल, मुंबई
- कन्सल्टिंग फिजिशियन
- हृदयरोग, मधुमेह, मेंदुरोग व किडनी विकार तज्ञ
- Reg. No. : 2008/07/2867
डॉ. दिपाली श्री. काळे
- एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. (मुंबई)
- स्त्रीरोग व प्रसुती विशेषज्ञ
- Reg. No, : 2010/12/3380
काळे हाॅस्पीटल हे अकोला येथील सर्वात प्रगत विशेष रुग्णालयांपैकी एक आहे August 2012 साली डॉ. श्रीकांत ओ. काळे व डॉ. दिपाली श्री. काळे यांनी या हॉस्पीटलची स्थापना केली. काळे हॉस्पीटलमध्ये ओपीडी आणि आयपीडी सेवा उपलब्ध असून, हृदयरोग, मधुमेह, मेंदुरोग, किडनी विकार, व स्त्री रोग संबंधित आजार असलेल्या रुग्णांना सेवांचा लाभ मिळतो. येथे नॉर्मल डिलिव्हरी व सिझेरियन सेक्शन, कुटुंब नियोजन मार्गदर्शन व शस्त्रक्रियांसाठी पूर्ण सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे.
उपलब्ध सुविधा :
मेडिसीन विभाग -
- ICCU and Critical Care Unit
- 2D Echo - Cardiography and Colour Doppler
- हृदयरोग निदान व उपचार
- अर्धांगवायु, दमा, क्षयरोग, आमवात, श्वसनाच्या आजारांवर उपचार
- कृत्रिम स्वशनयंत्र (Ventilators)
- विषबाधा व सर्पदंश उपचार
- मधुमेह, मेंदुरोग, किडनी विकार निदान व उपचार
- डे - केअर उपचार (Day Care Treatments)
- थॉयरॉईड ग्रंथीचे विकार
- डी-फिब्रीलेटर
स्त्रीरोग विभाग -
- प्रसुती पूर्व, प्रसुती व प्रसुतीपश्चात तपासणी
- अद्यावत प्रसुती गृह
- सुसज्ज ऑपरेशन थियेटर
- सिझेरियन ऑपरेशनची सुविधा
- गर्भाशयाच्या पिशवीच्या ऑपरेशनची सुविधा
- लॅपरोस्कोपीक सर्जरी (बिनटाक्याची सर्जरी)
- दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
- मासिक पाळीचे आजारांवर उपचार
- वयात येणाऱ्या मुला मुलींना मार्गदर्शन
- गर्भधारणा पूर्व तपासणी व सल्ला
- विवाहपूर्व समुपदेशन व मार्गदर्शन
- सोनोग्राफी सेन्टर
- वंध्यत्व निवारण व सल्ला केंद्र
- सरकारमान्य कुटुंब कल्याण शस्त्रकिया केन्द्र
- स्पेशल रुम्स, ए.सी. रुम्स्, जनरल वॉर्ड
- सरकार मान्यताप्राप्त गर्भपात केंद्र
Products/Services
काळे हॉस्पीटल
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
थायरॉईड व लिपिड प्रोफाइल चाचणी/टेस्ट कॅम्प
दिनांक 19/04/2025 रोजी काळे हॉस्पिटल, आयकॉन हॉस्पिटलच्या पाठीमागे, भागवत प्लॉट्स, अकोला येथे सकाळी 10:00 ते दुपारी 20.00 वाजेपर्यंत अत्यल्प स्वागत मूल्य दरात थायरॉईड व लिपिड प्रोफाइल चाचणी कॅम्प आयोजित केला आहे. ज्यामध्ये T3, T4, TSH चाचण्या केल्या जातील. ज्यांना थायरॉईडची व मधुमेह/ डायबेटिस / हायपर टेन्शन, अंग सुजने, रक्त कमी होणे, पोट साफ न राहणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी वरील टेस्ट/चाचणी करणे आवश्यक राहते जेणेकरून पुढील उपचार करता येतात
तरी अकोला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेनी वरील संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन काळे हॉस्पिटलचे संचालकद्वय सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. श्रीकांत काळे, MBBS (Gold Medalist), M. D. (Medicine) व सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर दिपाली काळे, MBBS, DGO यांनी केले आहे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

काळे हॉस्पीटल
डॉ. श्रीकांत ओ. काळे
- एम.बी.बी.एस. (गोल्डमेडालिस्ट), एम.डी. (मेडिसिन), जे.जे. हॉस्पीटल, मुंबई
- कन्सल्टिंग फिजिशियन
- हृदयरोग, मधुमेह, मेंदुरोग व किडनी विकार तज्ञ
- Reg. No. : 2008/07/2867

काळे हॉस्पीटल
डॉ. दिपाली श्री. काळे
- एम.बी.बी.एस., डी.जी.ओ. (मुंबई)
- स्त्रीरोग व प्रसुती विशेषज्ञ
- Reg. No, : 2010/12/3380

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack
हार्ट अटॅक का व कशामुळे येतो..?
कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.
कोणास येऊ शकतो हार्ट अटॅक (risk factors) :
- वयाच्या 25 वर्षानंतरच्या व्यक्ती,
- स्थूल शरीर, धमनीकठिन्यता, उच्च रक्तदाब, हाय ब्लड कोलेस्टेरॉल, मानसिक तणाव या समस्या असणाऱ्या लोकांमध्ये,
- हृद्यविकारासंबंधी अनुवंशिकता असणे, कुटुंबातील आजोबा, आजी, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यापैकी कोणाला हार्ट अटॅक आलेला असल्यास आपणासही हार्ट अटॅकचा धोका असतो.
- धुम्रपान, तंबाखु, अमली पदार्थ इ. च्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये हृद्य विकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
हार्ट अटैक खालील चार स्थितींमुळे येऊ शकतो..
- धमनीकठिण्य किंवा ॲथोरोक्लेरोसिस (Atherosclerosis) – रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीभोवती चरबी, कोलेस्टेरॉल व तत्सम पदार्थांचा संचय होतो
- रक्ताची गुठळी होणे – काहीवेळा हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये अचानक रक्ताची गुठळी तयार होते.
- काहीवेळेस रक्तातील गुठळी रक्तप्रवाहाबरोबर हृदयास रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यामध्ये जाऊनही अडथळा निर्माण करते.
- हृदयास रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी अचानक आंकुचन पावल्यामुळेही हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होऊ शकतो.
हार्ट अटॅकची लक्षणे (Heart attack symptoms) :
- छातीत दडपल्यासारखे वाटते,
- छातीत दुखायला लागते,
- छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी, डावा हात यांपर्यंत पोहचतात.
- बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे,
- अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
- अशक्तपणा जाणवणे,
- उलटी किंवा मळमळ होणे,
- चक्कर येणे,
- दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
- श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

इकोकार्डिओग्राम (2D इको)
इकोकार्डिओग्राम (2D इको) म्हणजे काय?
ही तुमच्या हृदयाची सोनोग्राफी असते. यामध्ये हृदयाच्या संरचनेची आणि कार्याची थेट प्रतिमा मिळते. या चाचणीमुळे डॉक्टरांना हृदयाशी संबंधित समस्या समजून घेण्यास मदत होते, जसे की हृदयाची पंपिंग क्षमता (इजेक्शन फ्रॅक्शन), हृदयविकाराचा झटका, हृदय निकामी होणे, हृदयाच्या वाल्वचा त्रास, ब्लॉकेजेस, जन्मजात हृदयाच्या दोषांचे निदान आणी हृदयाच्या वाढीव आकाराचे परीक्षण.
2D इको टेस्ट का आवश्यक आहे?
- हृदयविकाराचा झटका शोधण्यासाठी
- हृदयाच्या वाल्वमध्ये कोणती समस्या आहे का हे पाहण्यासाठी
- वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेनंतर उपचारांची प्रभावीता तपासण्यासाठी
- हृदयाची पंपिंग क्षमता जाणून घेण्यासाठी
- हृदयाच्या कक्षांमध्ये रक्ताच्या गुठळ्या आहेत का ते शोधण्यासाठी
- हृदयाभोवतीच्या थैलीमध्ये द्रव आहे का ते तपासण्यासाठी
- अजून न जन्मलेल्या बाळामध्ये हृदयाच्या दोषांचे निदान करण्यासाठी
- हृदयाच्या झडपांवर (वाल्ववर) कोणता ट्यूमर किंवा संसर्गजन्य वाढ आहे का हे तपासण्यासाठी

पक्षाघात - Paralysis
मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते.
पक्षाघाताची लक्षणे (Paralysis symptoms) :
मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
• एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
• हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.
• तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
• अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
• एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
• चक्कर येणे, तोल जाणे,
• चेतना कमी होणे
• तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.
पक्षाघात होण्याची सहाय्यक कारणे :
High BP, Heart Problems, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेहाचे प्रमाण मधुमेहाचे प्रमाण जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये पक्षाघाताचा अधिक धोका संभवतो.

क्षयरोग – Tuberculosis
क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.
क्षयरोग लक्षणे (TB symptoms) :
- तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
- बेडकायुक्त खोकला येणे,
- थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
- खोकताना छातीत दुखणे,
- श्वास घेण्यास त्रास होणे,
- अशक्तपणा,
- भूक व वजन कमी होणे,
- रात्री झोपल्यावर घाम येणे,
- सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

मधुमेह – Diabetes mellitus
स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.
डायबेटीस होतो म्हणजे शरीरात नेमके काय-काय होते..?
1) स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती कमी प्रमाणात होते किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत.
2) रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही.
3) रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते.
4) साखरेचे शरीरात व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळत नाही.
5) वाढलेली साखर कोणत्याही कार्याशिवाय मुत्रातून बाहेर टाकली जात असते.
6) मधुमेहाचा परिणाम आपल्या रक्तवाहिन्या, किडन्या, हृदय, डोळे, मेंदू- मज्जासंस्था (nervous system) यावर सतत होऊ लागतो.
मधुमेहाची लक्षणे (Diabetes symptoms) :
- वारंवार लघवीला जावे लागणे,
- वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे,
- अचानकपणे वजन घटणे,
- अशक्तपणा, चक्कर येणे,
- अधिक भूक लागणे,
- हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे,
- डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे,
- मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे,
- जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे,
- मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

किडनी संबंधि आजार
किडनी खराब होणे – Kidney failure :
किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.
मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.
किडनी खराब झाल्याची लक्षणे (symptoms) :
• भूक कमी होणे.
• वारंवार लघवीस होणे.
• लघवी करताना त्रास होणे,
• मळमळ,उलट्या होणे.
• चेहऱ्यावर सूज येणे.
• उच्च रक्तदाब, रक्तदाब वाढतो.
• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
• कंबर दुखणे.
• पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.

थायरॉइड संबंधि आजार
थायरॉइड म्हणजे काय..?
आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.
मात्र जेंव्हा थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास किंवा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास थायरॉइडचा त्रास सुरू होतो. त्या त्रासाला thyroid disease असे म्हणतात. थायरॉइडच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. यामध्ये हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम असे थायरॉइडचे विविध आजार होऊ शकतात.

अल्ट्रासोनोग्राफी
अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासोनोग्राफी ही उच्च-फ्रिक्वेन्सी ध्वनीलहरींचा वापर करून शरीराच्या अंतर्गत संरचनांचे प्रतिमा तयार करते. हे एक नॉन-इनव्हेसिव्ह, विकिरणमुक्त तंत्र आहे आणि अवयवांचे निरीक्षण, गर्भाच्या स्थितीचे परीक्षण आणि विविध आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याचे फायदे म्हणजे प्रत्यक्ष वेळेत प्रतिमा मिळवणे, सुरक्षितता आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध गरजांसाठी त्याचा उपयोग. यामुळे अचूक निदान व उपचाराचे नियोजन करण्यात मदत होते.

प्रसुतीपूर्व तपासणी (ANC)
एएनसी तपासणी म्हणजे प्रसवपूर्व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या सल्लामसलतीमुळे आई आणि वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याची नियमित देखरेख होते आणि संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते. एएनसीमध्ये विविध तपासण्या, पोषणाविषयी सल्ला आणि निरोगी गर्भधारणेसाठी मार्गदर्शन समाविष्ट असते, ज्यामुळे सुखद प्रसूती अनुभवास प्रोत्साहन दिले जाते.

प्रसुतीपूर्व लसीकरण
प्रसुतीपूर्व लसीकरण म्हणजे गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या लसी. या लसीकरणामुळे टेटनस, इन्फ्लूएंझा, आणि पर्टुसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो, गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो आणि बाळाला जन्मानंतर पासिव्ह प्रतिकारशक्ती मिळते. एएनसी लसीकरण आई आणि बाळाच्या एकूणच आरोग्य आणि कल्याणात महत्त्वपूर्ण योगदान देते.

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन
गर्भधारणेपूर्व मार्गदर्शनामधे गर्भधारणा करण्याची योजना आखणाऱ्या व्यक्ती किंवा जोडप्यांना आरोग्य, जीवनशैली, आणि वैद्यकीय घटकांविषयी चर्चा आणि मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला जातो. याचे फायदे म्हणजे संभाव्य जोखीम ओळखणे व त्याचे व्यवस्थापन करणे, प्रजनन क्षमता सुधारणे आणि यशस्वी आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करणे.

वंध्यत्व आणि आयव्हीएफ संबंधित मार्गदर्शन
वंध्यत्व आणि आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) सल्लागार प्रजनन समस्यांचा सामना करणाऱ्या जोडप्यांना मदत करण्यात तज्ञ असतात. ते प्रजननशी संबंधित अडचणींचे मूल्यांकन करतात, आयव्हीएफसारख्या उपचारांची शिफारस करतात आणि भावनिक आधार देखील देतात. याचे फायदे म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन, गर्भधारणेची शक्यता वाढवणे, आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या गुंतागुंतीच्या प्रवासात योग्य दिशा देऊन यशस्वी गर्भधारणा साध्य करण्यास मदत करणे.

प्रसव (सामान्य व सिझेरियन)
सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.

लॅप्रोस्कोपिक गाइनाॅक शस्त्रक्रिया
लॅप्रोस्कोपिक गाइनाकोलॉजिकल शस्त्रक्रिया म्हणजे लहान छिद्रे आणि कॅमेऱ्याचा वापर करून केलेली कमीत-कमी वेदनेत होनारी शस्त्रक्रिया, जी स्त्रीरोगाशी संबंधित समस्या निदान आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते. याचे फायदे म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदना, जलद बरे होणे, आणि गुंतागुंतीचा कमी धोका. त्यामुळे रुग्णांना सामान्य जीवनशैलीत लवकर परतण्यास मदत होते आणि एकूणच सुधारित परिणाम मिळतात.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते. हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात.

Gallery


















