About Us

एकलारे
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

न्युरोकेअर । जनरल सर्जरी । आय.सी.यु.


नांदेडमधील एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले अग्रगण्य रुग्णालय आहे. डॉ. निशिकांत एकलारे व डॉ. सौ. विद्या एकलारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली येथे न्युरोकेअर, जनरल सर्जरी व आय.सी.यु. सेवांसह विविध उपचार दिले जातात. रुग्णालयात ३५ बेडची सुसज्ज सोय असून अतिदक्षता विभाग (ICU), सुसज्ज ऑपरेशन थिएटर व २४ तास तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आहे. स्पेशल, सेमीस्पेशल रूम, जनरल वार्ड तसेच २४ तास मेडिकल सुविधा उपलब्ध आहेत. प्रगत वैद्यकीय साधनांमध्ये E.E.G, E.C.G, व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटरचा समावेश असून प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ रुग्णसेवेस तत्पर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, समर्पित सेवा व रुग्णकेंद्रित दृष्टिकोनामुळे एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल हे नांदेड व परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह आरोग्यसेवेचे केंद्र बनले आहे. येथे रुग्णांचे आरोग्य, सुरक्षितता व समाधान हाच आमचा सर्वोच्च ध्यास आहे.

उपलब्ध उपचार:

न्युरोलाॅजी विभाग -

  • डोकेदुखी, अपस्मार (फिट येणे), पॅरालिसिस
  • लकवा /अर्धांगवायु, चक्कर येणे, स्मरण विकार
  • हालचाल विकार (कंपवात), मान व पाठदुखी
  • मज्जातंतू व स्नायू रोग, मणक्याचे रोग, झोपेचे विकार
  • मधुमेह न्युरोपॅथी, मेंदुज्वर, कंपवात
  • हातापायांना मुंग्या येणे, हातपाय न उचलणे
  • स्मृतरभ्रंश, बालरोग न्युरोलॉजी

जनरल सर्जरी विभाग - 

  • स्तन, थॉईराईड व पोटविकार यावरील शस्त्रक्रिया
  • किडणी संबंधित शस्त्रक्रिया, दुर्बिधीव्दारे रोग निदान
  • दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया, बर्न उपचार
  • कॅन्सर संबंधी उपचार, स्तनांचे कॅन्सर व इतर शस्त्रक्रिया
  • हर्निया शस्त्रक्रिया
  • मुळव्याध (भगंदर) लेझर उपचार
  • पोटाच्या विविध शस्त्रक्रिया
  • कोलोनोस्कोपी / गॅस्ट्रोस्कोपी
  • लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया
  • फुगलेल्या रक्तवाहिण्यांचे लेझर उचार
  • थायरॉइड ग्रंथीवरील शस्त्रक्रिया

Products/Services

एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

न्युरोकेअर । जनरल सर्जरी । आय.सी.यु.

एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. निशिकांत एकलारे MBBS., MD (Medicine), DM (न्युरॉलॉजी).

  • MBBS.: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छ. संभाजीनगर
  • MD.Medicine: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छ. संभाजीनगर
  • DM Neurology : नायर हॉस्पिटल मुंबई
  • एक वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणुन काम केले
  • वैद्यकीय व्यवसाय न्युरॉलॉजी मध्ये 12 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
  • Vertigo (चक्कर येणे) Carcinomatous meningitis (मेंदूज्चर, कॅन्सरशी निगडीत) Wilson's disease (Wilson's disease) अशा विविध आजारांवर विविध जर्नल मध्ये लेख प्रकाशित केले.

एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. सौ. विद्या एकलारे MBBS, D.N.B. जनरल सर्जरी Fellow Breast Surgery, TATA Hospital

  • MBBS.: रुरल मेडिकल कॉलेज प्रवरानगर, लोणी
  • DNB. सर्जरी: कमलनयन बजाज हॉस्पिटल, छ. संभाजीनगर
  • फेलोशिप : ब्रेस्ट (स्तनरोग) कॅन्सर मध्ये टाटा मेमोरियल
  • हॉस्पिटल (TATA हॉस्पिटल) मुंबई येथे एक वर्ष कार्य केले.
  • पुर्व कार्यानुभव -
  • 1) डॉ. हेडगेवार रुग्णालय, छ. संभाजीनगर
  • 2) TATA मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई
  • 3) जगजीवन राम हॉस्पिटल (पोटविकार विभाग) मुंबई.

एकलारे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल

अपस्मार (फिट येणे)

फिट येणे (Epilepsy) म्हणजे मेंदूतील विद्युत प्रवाहातील गडबडीमुळे होणारे आकडीचे झटके होय.

याची लक्षणे म्हणजे: शरीरात झटके येणे, तोंडाला फेस येणे, शुद्ध हरपणे, अचानक पडणे किंवा विचित्र वागणे. 

वेळेवर उपचार न केल्यास दुखापत, स्मृतीचा त्रास व जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य निदान व औषधोपचार आवश्यक असतात.

अपस्मार (फिट येणे)

पक्षाघात - Paralysis

मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते.

पक्षाघाताची लक्षणे (Paralysis symptoms) :

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.
• एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.
• ‎हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.
• ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.
• ‎अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
• ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.
• ‎चक्कर येणे, तोल जाणे,
• चेतना कमी होणे
• तीव्र डोकेदूखी ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.

पक्षाघात - Paralysis

डोकेदुखी / मायग्रेन

डोकेदुखी / मायग्रेन ही मेंदूतील नसांच्या संवेदनशीलतेमुळे व रक्तवाहिन्यांतील बदलांमुळे होते. ताण, झोपेची कमतरता, उपाशीपणा, तेज प्रकाश, मोठा आवाज, काही अन्नपदार्थ हे कारणीभूत ठरू शकतात. उपचारांत ट्रिगर टाळणे, नियमित झोप, योग्य आहार, पाणी पुरेसे पिणे, औषधोपचार व रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर करावा. वेळेत निदान व उपचार केल्यास त्रास कमी होतो व पुनरावृत्ती टाळता येते.

डोकेदुखी / मायग्रेन

चक्कर येणे

व्हर्टिगो म्हणजे डोके हलविल्यावर किंवा स्थिर असतानाही आजूबाजूचे वातावरण किंवा स्वतः फिरत असल्याची जाणीव होणे, जे बहुधा आतील कानातील संतुलन यंत्रणेत बिघाड, मज्जासंस्था विकार, रक्तदाबातील बदल किंवा औषधांच्या दुष्परिणामांमुळे होते. उपचार आवश्यक असतात कारण योग्य निदान व व्यवस्थापनाने पडण्याचा धोका कमी होतो आणि जीवनमान सुधारते. लक्षणांमध्ये चक्कर, अस्थिर चाल, मळमळ, उलट्या, डोकेदुखी व कानात गूंजारव यांचा समावेश होतो.

चक्कर येणे

मान व पाठदुखी

मान व पाठदुखी म्हणजे मानेपासून कमरेपर्यंतच्या कण्याच्या भागात होणारी वेदना, जी स्नायूंचा ताण, डिस्कचे विकार, मज्जातंतूंचा दबाव किंवा अपघाती दुखापतीमुळे होऊ शकते. यावर उपचार आवश्यक असतात कारण वेदना नियंत्रित करून हालचाल सुधारता येते व विकाराची प्रगती टाळता येते. 

लक्षणांमध्ये सतत किंवा अधूनमधून होणारी वेदना, हालचालींमध्ये अडथळा, हात-पायात मुंग्या येणे, अशक्तपणा व कडकपणा यांचा समावेश होतो.

मान व पाठदुखी

मज्जातंतू व स्नायू रोग

मज्जातंतू व स्नायू रोग म्हणजे मज्जातंतूंची संदेशवाहक क्षमता किंवा स्नायूंची कार्यक्षमता बिघडवणारे विकार, जे आनुवंशिक कारणे, संसर्ग, ऑटोइम्यून प्रतिक्रिया, मधुमेह किंवा इजा यामुळे होऊ शकतात. उपचार आवश्यक असतात कारण योग्य निदान व व्यवस्थापनाने अशक्तपणा कमी होतो, हालचाल सुधारते व विकाराची तीव्रता मंदावते.

लक्षणांमध्ये स्नायू अशक्तपणा, मुंग्या येणे, वेदना, आकडी, हालचालींमध्ये अडथळा व थकवा यांचा समावेश होतो.

मज्जातंतू व स्नायू रोग

मेंदुज्वर

मेंदुज्वर म्हणजे मेंदू व मज्जारज्जूभोवतीच्या आवरणांची (मेनिंजीस) सूज, जी प्रामुख्याने विषाणू, जीवाणू, बुरशी किंवा परजीवी संसर्गामुळे होते. यावर उपचार आवश्यक असतात कारण वेळेवर निदान व औषधोपचार न झाल्यास जीवघेणा धोका व कायमस्वरूपी मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते.

लक्षणांमध्ये तीव्र डोकेदुखी, ताप, मान कडक होणे, प्रकाश सहन न होणे, उलट्या, गोंधळ, झटके व कधी बेशुद्धावस्था यांचा समावेश होतो.

मेंदुज्वर

स्मरण विकार (MEMORY DISORDER)

स्मरण विकार म्हणजे मेंदूच्या कार्यात झालेल्या बदलांमुळे माहिती आठवण्याची क्षमता कमी होणे. वेळेवर वैद्यकीय उपचार महत्त्वाचे असतात कारण योग्य निदान व उपचाराने विकाराची तीव्रता कमी करता येते व जीवनमान सुधारता येते.

लक्षणांमध्ये वारंवार विसरणे, अलीकडील घटना किंवा व्यक्ती ओळखण्यात अडचण, वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे, संभाषणात शब्द शोधण्यात अडचण, एकाग्रतेत घट व दैनंदिन कामांमध्ये गोंधळ यांचा समावेश होतो.

स्मरण विकार (MEMORY DISORDER)

हालचाल विकार (कंपवात)

कंपवात म्हणजे मेंदू किंवा मज्जासंस्थेतील बिघाडामुळे होणारी अनैच्छिक, लयबद्ध थरथर, जी हात, पाय, डोके किंवा आवाजावर परिणाम करू शकते. उपचार आवश्यक असतात कारण योग्य औषधे, थेरपी किंवा शस्त्रक्रियेद्वारे लक्षणे कमी करून रुग्णाचे दैनंदिन कार्य आणि जीवनमान सुधारता येते.

लक्षणांमध्ये सूक्ष्म किंवा जास्त थरथर, लेखन व वस्तू धरताना अडचण, हालचालींची गती कमी होणे व अस्थिरता यांचा समावेश होतो.

हालचाल विकार (कंपवात)

स्तनाचा कर्करोग - Breast cancer

स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.

लक्षणे : स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्‍या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.

  • स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
  • ‎अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
  • ‎बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
  • ‎स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

स्तनाचा कर्करोग - Breast cancer

ॲनोरेक्टल विकार

गुदद्वाराशी संबंधित विकारांना अ‍ॅनोरेक्टल विकार म्हणतात. यात मुख्यत्वे मूळव्याध (Piles), भगंदर (Fistula) आणि फिशर (Fissure) यांचा समावेश होतो.

मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळील रक्तवहिन्यांचे फुगणे, 

फिशर म्हणजे गुदद्वाराच्या त्वचेतील छोटा, तीव्र तडा / चीर

भगंदर म्हणजे गुदमार्ग व त्वचेमध्ये तयार होणारी फिस्टुलासारखी नळी होय. 

हे विकार प्रामुख्याने बद्धकोष्ठता, चुकीच्या आहारपद्धती व ताणामुळे होतात. योग्य निदान, औषधोपचार व शस्त्रक्रियेद्वारे यावर प्रभावी उपचार होऊ शकतात.

ॲनोरेक्टल विकार

हर्निया (Hernia)

हर्निया आजारात पोटाजवळील एखादा अवयव हा मांसपेशीच्या कमजोर छिद्रातून बाहेर येतो त्यामुळे हर्नियामुळे त्याठिकाणी फुगवटा आल्याचे दिसते. हर्नियाचे अनेक प्रकार आहेत. हर्निया हा आजार लहान मुलांपासून ते वृद्ध अशा कोणत्याही वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतो. हर्निया हे ओटीपोटातील भागात, जांघेत, कमरेत झालेला आढळतो.

हर्निया आजाराची लक्षणे :

  • हर्नियाचे सर्वात मुख्य लक्षण म्हणजे प्रभावित भागात फुगवटा किंवा गाठ आल्यासारखे आढळते.
  • उभे असताना, खाली वाकताना किंवा खोकताना स्पर्शाला हर्नियाची गाठ जाणवते.
  • झोपल्यावर त्याठिकाणी स्पर्श केल्यास हर्नियाचा फुगवटा नाहीसा झाल्याचे जाणवते.
  • हर्नियाच्या ठिकाणी वेदना जाणवू शकतात.
  • इनगिनल हर्नियामुळे जांघेत हर्नियाचा फुगवटा येतो.
  • इनगिनल हर्नियामुळे पुरुषांच्या स्क्रोटममध्ये (वृषणकोशात) सूज किंवा गाठ येते.
  • हायटल हर्नियामध्ये छातीत जळजळ होणे, गिळताना त्रास होणे आणि छातीत दुखणे अशी लक्षणे जाणवतात.
  • अंबिलीकल हर्नियामुळे बेंबीच्या ठिकाणी हर्नियाचा फुगवटा येतो.

हर्निया (Hernia)

लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, ज्याला कीहोल सर्जरी किंवा Minimal Invasive Surgery असेही म्हणतात, ही एक आधुनिक शस्त्रक्रिया पद्धत आहे. ही शस्त्रक्रिया सर्जनद्वारे अत्यंत लहान चिरा (साधारणतः ०.५ ते १.५ सेंमी) देऊन केली जाते. यामध्ये लेप्रोस्कोप नावाचे एक लवचिक फायबर-ऑप्टिक कॅमेरा असलेले उपकरण शरीरामध्ये टाकण्यात येते. या उपकरणाच्या साहाय्याने सर्जनला स्क्रीनवर अंतर्गत अवयव स्पष्ट दिसतात आणि विशेष उपकरणांच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते.

 लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेचे सामान्य प्रकार:

१. लेप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी : पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (बहुतेक वेळा पित्ताशयात खडे असल्यास केली जाते).

२. लेप्रोस्कोपिक अ‍ॅपेंडेक्टॉमी : अपेंडिक्स काढण्याची शस्त्रक्रिया (सामान्यतः अपेंडिसायटिस झाल्यास केली जाते).

३. लेप्रोस्कोपिक हर्निया रिपेअर : इनग्वाइनल, अंबिलिकल किंवा इन्सिजनल हर्नियासाठी.

४. लेप्रोस्कोपिक अ‍ॅड्हीझिओलायसिस : अंतर्गत चिकटवटा (Scar Tissue) काढून टाकण्याची शस्त्रक्रिया.

५. लेप्रोस्कोपिक कोलेक्टॉमी : कोलनचा काही भाग किंवा संपूर्ण कोलन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया.

६. लेप्रोस्कोपिक निदानात्मक प्रक्रिया : अकारण पोटदुखी, गाठ (Tumor) किंवा इतर कारणांसाठी निदान करण्यासाठी.

७. लेप्रोस्कोपिक आंत्र शस्त्रक्रिया : आंत्राचा रोगग्रस्त भाग काढून टाकण्याची शस्त्रक्रिया (जसे क्रोहन आजार, कर्करोग इ.)

लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया

अपेंडिक्सला सूज येणे (Appendicitis)

अपेंडिक्स हा अवयव आपल्या पोटात उजव्या बाजूला मोठ्या आतड्याशी जोडलेले असतो. या अपेंडिक्सची रचना ही एकाद्या पिशवीसारखी असते. याचे एक टोक मोठ्या आतड्याशी जोडलेले असते तर दुसरे पलीकडचे टोक मात्र बंद असते. जेंव्हा अपेंडिक्स ह्या अवयवाला सुज येते त्या स्थितीला अ‍ॅपेंडिसाइटिस (Appendicitis) असे म्हणतात.

अशा या अपेंडिक्समध्ये आतडय़ांतील अन्न काही कारणामुळे शिरते. अपेंडिक्सचे दुसरे टोक बंद असल्याने एकदा आत शिरलेले अन्न पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ते अन्न अपेंडिक्सच्या आतच पडून राहते व त्यात कुजण्याची प्रक्रिया सुरु होते. यामुळे पुढे जंतुसंसर्ग होऊन अपेंडिक्सला सूज येते व दुखणं सुरू होते. या त्रासाला अपेंडिसायटिस असे म्हणतात. अपेंडिक्सला सूज येऊन ते फुटूही शकते त्यामुळे इन्फेक्शन पूर्ण पोटात पसरून धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. हा त्रास प्रामुख्याने 10 ते 30 वर्ष वयामध्ये अधिक आढळतो.

अपेंडिक्सला सूज येणे (Appendicitis)

कोलोनोस्कोपी

डॉ. सौ. विद्या एकलारे ह्या कुशल सर्जन असून त्यांनी ४,००० हून अधिक कोलोनोस्कोपी यशस्वीपणे केल्या आहेत. कोलनमधील पॉलिप्स, सूज आणि कॅन्सर यांसारख्या आजारांचे निदान करण्यात त्यांना विशेष प्राविण्य आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ते अचूक आणि सखोल तपासणी करतात. तसेच ते सिग्मॉइडोस्कोपी आणि लिमिटेड कोलोनोस्कोपीद्वारे खालच्या कोलन व गुदाशयाच्या विकारांचे अचूक निदान व रुग्णानुरूप उपचार करतात.

कोलोनोस्कोपी

थायरॉईड संबंधित शस्त्रक्रिया

थायरॉईड ही मानेला समोरच्या बाजूस असलेला ग्रंथी आहे, जी हार्मोन्स तयार करून शरीराच्या चयापचय (मेटाबॉलिझम) नियंत्रित करते.

लक्षणे :

  • वजन वाढणे किंवा कमी होणे
  • थकवा व अशक्तपणा
  • केस गळणे
  • त्वचा कोरडी पडणे
  • चिडचिड किंवा ताण जाणवणे
  • हृदयाचे ठोके वेगाने होणे किंवा मंदावणे

उपचार: थायरॉईडच्या उपचारांमध्ये थायरॉईड हार्मोनच्या प्रमाणानुसार औषधे दिली जातात (हायपोथायरॉईडसाठी थायरॉक्सिन, हायपरथायरॉईडसाठी अँटी-थायरॉईड औषधे). काही प्रकरणांमध्ये रेडिओआयोडीन थेरपी किंवा शस्त्रक्रिया केली जाते.

थायरॉईड संबंधित शस्त्रक्रिया

Gallery

Rate Us

Contact Us