About Us

डाॅ. राठी 

वुमन्स् हॉस्पिटल

प्रसुती  व स्त्रीरोग  निदान, वंध्यत्व उपचार,

काॅल्पोस्कोपी, सोनोग्राफी व दुर्बीण शस्त्रक्रिया केंद्र

Maternity,Fertility,Colposcopy,Sonography & Laparoscopy Centre


डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल हे स्त्रीरोग व प्रसूती क्षेत्रातील अत्याधुनिक उपचार सेवा देण्यासाठी ओळखले जाते. आमचा प्राथमिक उद्देश प्रत्येक महिलेला तिच्या जीवनातील विविध टप्प्यांवर सुरक्षित आणि उत्कृष्ट आरोग्यसेवा देणे हा आहे. महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन आम्ही गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, तसेच वंध्यत्वावर व्यापक उपचार देतो. आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षित आणि वेदनारहित शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. आम्ही उच्च जोखमीच्या प्रसूती आणि वंध्यत्व उपचारांमध्ये उत्कृष्टतेचा ध्यास घेतला आहे. समर्पित वैद्यकीय तज्ञांच्या टीमद्वारे प्रत्येक रुग्णाला वैयक्तिकृत उपचार मिळावेत याची आम्ही खात्री देतो. स्त्रीरोग शस्त्रक्रिया आणि वंध्यत्व उपचार क्षेत्रात डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल "स्त्रीशक्तीच्या आरोग्याची विश्वासार्ह साथ" देण्यास तत्पर आहे.


डाॅ. रविकिरण क. राठी

  • MBBS, MS, (OBGY)
  • प्रसुती  व स्त्रीरोग  तज्ञ
  • दुर्बीण शस्त्रक्रिया विशेषज्ञ
  • वंध्यत्व उपचार विशेषज्ञ

डाॅ. नेहा र. राठी

  • MBBS, MD, (OBGY)
  • प्रसुती  व स्त्रीरोग  तज्ञ
  • कॅन्सर निदान विशेषज्ञ
  • काॅल्पोस्कोपी  विशेषज्ञ

OUR SERVICES : -

OBSTETRICS :

  • Pre Conceptional Counselling 
  • (गर्भधारणा पूर्व तपासणी व सल्ला)
  • Complete Pregnancy Care (ANC)   
  • (गर्भावस्थानिदान व प्रसुती पूर्व तपासणी व उपचार)
  • Post Pregnancy Care   
  • (प्रसुती पश्चात तपासनी व उपचार)
  • High Risk Pregnancy 
  • (गरोदरपणातील रक्तदाब, मधुमेह थायरॉईड, कावीळ यावर उपचार)
  • Fetal NST (बाळाचे ठोके तपासणी)
  • Painless Labour ( वेदनारहित प्रसुती)
  • Normal Vaginal Delivery (नैसर्गिक प्रसुती)
  • Caesarean Section Delivery (सीझेरियन प्रसुती)

 GYNAECOLOGY :

  • Adolescent Clinic
  • (वयात येणाऱ्या मुला मुलींना मार्गदर्शन)
  • Pre marriage Counselling
  • (विवाहपूर्व समुपदेशन व मार्गदर्शन)
  • Contraception Counselling and Family Planning Clinic
  • (गर्भनिरोधक व कुटुंब नियोजन)
  • Menopause Clinic
  • (रजोनिवृत्ती चिकित्सा)
  • Menstrual problem & Uterine Bleeding
  • (मासिक पाळीचे आजारांवर उपचार)
  • Vaccination (HPV, Rubella, Swine Flu, Titanus) 
  • (लसीकरण)
  • Cervical Cancer Screening & Pap Smear 
  • (गर्भाशयमुख कर्करोग पासणी)
  • Abdominal & Vaginal  Hysterectomy 
  • (गर्भपिशवी काढणे)

LAPAROSCOPY :

  • Laparoscopic Gynaec Surgeries 
  • (दुर्बिणीद्वारे सर्व प्रकारच्या गर्भाशय व अंडाशयाच्या शस्त्रक्रिया)
  • Lap. Ectopic Pregnancy 
  • (दुर्बिणीद्वारे ट्युब मधील गर्भ काढणे)
  • Lap Hysterectomy 
  • (दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढणे)
  • Lap. Myomectomy
  • (दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या गाठी काढणे)
  • Diagnostic Hysteri - Laparoscopy 
  • (दुर्बिणीद्वारे वंध्यत्व उपचार)
  • Lap. Ovarian Cystectomy 
  • (दुर्बिणीद्वारे बीजांडाच्या शस्त्रक्रिया)
  • (सर्व प्रकारच्या गर्भाशय व अंडाशयाच्या शस्त्रक्रिया)

INFERTILITY :

  • Infertility Treatment
  • (वंध्यत्व निदान व उपचार / स्त्री वंध्यत्व चिकित्सा)
  • Andrology 
  • (पुरुष वंध्यत्व निदान व चिकित्सा)
  • Fertility Enhancing Surgery
  • दुर्बिणीद्वारे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी शस्त्रक्रिया
  • Semen Analysis, IUI, IVF (टेस्ट ट्यूब बेबी) 
  • मुल नसणाऱ्या जोडप्यांसाठी संपूर्ण तपासणी 

 (सरकार मान्यताप्राप्त गर्भपात क्लिनिक)

Products/Services

डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल

"स्त्रीशक्तीच्या आरोग्याची विश्वासार्ह साथ"

डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल

डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल

डाॅ. रविकिरण क. राठी

  • MBBS, MS, (OBGY)
  • प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ
  • दुर्बीण शस्त्रक्रिया विशेषज्ञ
  • वंध्यत्व उपचार विशेषज्ञ

डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल

डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल

डाॅ. नेहा र. राठी

  • MBBS, MD, (OBGY)
  • प्रसुती  व स्त्रीरोग  तज्ञ
  • कॅन्सर निदान विशेषज्ञ
  • काॅल्पोस्कोपी  विशेषज्ञ

डाॅ. राठी वुमन्स् हॉस्पिटल

अल्ट्रासोनोग्राफी

अल्ट्रासाऊंड किंवा अल्ट्रासोनोग्राफी ही उच्च-फ्रिक्वेन्सी ध्वनीलहरींचा वापर करून शरीराच्या अंतर्गत संरचनांचे प्रतिमा तयार करते. हे एक नॉन-इनव्हेसिव्ह, विकिरणमुक्त तंत्र आहे आणि अवयवांचे निरीक्षण, गर्भाच्या स्थितीचे परीक्षण आणि विविध आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. याचे फायदे म्हणजे प्रत्यक्ष वेळेत प्रतिमा मिळवणे, सुरक्षितता आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध गरजांसाठी त्याचा उपयोग. यामुळे अचूक निदान व उपचाराचे नियोजन करण्यात मदत होते.

अल्ट्रासोनोग्राफी

काॅल्पोस्कोपी

काॅल्पोस्कोपी ही एक वैद्यकीय तपासणीची पद्धत आहे ज्याद्वारे गर्भाशयाच्या मुखाच्या (सर्विक्स) आणि योनीच्या आतील भागाचे बारकाईने निरीक्षण केले जाते. यासाठी काॅल्पोस्कोप नावाचे यंत्र वापरले जाते, ज्यामध्ये प्रकाश आणि लेंसचा वापर करून डॉक्टर सर्विक्स आणि योनीच्या भागाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करतात. ही तपासणी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची किंवा त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेतील बदलांची लवकर ओळख करून त्यावरील उपचार करण्यासाठी उपयुक्त असते.

काॅल्पोस्कोपीचे फायदे : गर्भाशयाच्या मुखावरील असामान्य पेशींची लवकर ओळख करून त्यावरील वेळीच उपचार होऊ शकतात, कर्करोगाचा धोका कमी होतो, आणि या तपासणीमुळे बायोप्सी घ्यायला मदत होते, ज्यामुळे अचूक निदान करता येते.

काॅल्पोस्कोपी

PCOD

PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय डिसऑर्डर.  पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी हार्मोनल संबधित समस्या आहे. 15 ते 44 अशा रिप्रॉडक्टीव्ह वयोगटातील कोणत्याही स्त्रियांमध्ये ही समस्या होऊ शकते. पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने हार्मोन्समधील असंतुलनामुळे उद्भवते. यामध्ये स्त्रीच्या शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनची पातळी वाढत असते. एंड्रोजन हे पुरुष हार्मोन असून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक झाल्यास ही समस्या होत असते. यामुळे स्त्रीमध्ये अंडाशयावर गाठी तयार होऊ लागतात. तसेच यामुळे अंडाशयाच्या आकारात वाढ होऊन त्याभोवती फॉलिकल्स साठू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर याचा परिणाम होतो.

स्त्री असो वा पुरुष दोघांच्याही शरीरात निसर्गतः स्त्री आणि पुरुष असे दोन्ही हार्मोन्स असतात. मात्र पीसीओडी असलेल्या महिलेमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाण पुरुष हार्मोनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे अंडाशयात समस्या निर्माण होऊ लागतात आणि त्याच वेळी अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवू शकते.

PCOD ची लक्षणे : 

  • मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे
  • स्त्रियांमध्ये नको त्या ठिकाणी केसांची वाढ होणे – चेहरा, हनुवटी, स्तन, पोट 
  • चेहऱ्यावर मुरुम अधिक येणे तसेच तेलकट त्वचेची समस्या वाढते
  • डोक्याचे केस पातळ होऊ शकतात आणि त्यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात.
  • पीसीओडीमुळे स्त्रियांचे वजन जास्त वाढू लागते.
  • हार्मोनल बदलामुळे डोकेदुखी, थकवा असे त्रास होऊन झोपेच्या तक्रारी सुरू होतात.
  • गर्भवती होण्यास अडचणी येणे

PCOD मुळे होणारे परिणाम :

  • PCOD हे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण मानले जाते.
  • तसेच यामुळे अकाली गर्भस्त्राव (miscarriage) होण्याचा धोकाही असतो.
  • PCOD असलेल्या 80 टक्के महिलांचे वजन जास्त प्रमाणात वाढत असते, हाय ब्लडप्रेशर, मधुमेह, पक्षाघात होण्याचा धोका वाढतो.
  • तसेच स्लीप अ‍ॅप्निया, एंडोमेट्रियल कर्करोग आणि नैराश्याचा धोका सुध्दा ह्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांना अधिक असतो.

PCOD

स्त्री वंध्यत्व

गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे :

  • स्त्री-प्रजनन अवयवांतील दोष,
  • PCOS ची समस्या असणे,
  • हार्मोन्समधील असंतुलन,
  • pelvic inflammatory disease (PID) मुळे,
  • एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) यासारख्या आजारांमुळे,
  • स्त्रीचे वय अधिक असणे,
  • स्त्रीचे वजन जास्त असणे, लठ्ठपणा,
  • हायपोथायरॉडिजमची समस्या,
  • सिगारेट स्मोकिंग व अल्कोहोलचे व्यसन,
  • मानसिक तणाव,
  • कुपोषण किंवा शारीरिक दुर्बलता,
  • लैंगिक आजार,
  • किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणाम,
  • वेदनाशामक औषधे, मानसिक आजारावरील औषधांचा अतिवापर,
  • गर्भनिरोधक गोळ्या औषधांचा चुकीचा वापर, यासारख्या कारणांमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होत असते.

स्त्री वंध्यत्व

पुरुष वंध्यत्व (Male Infertility)

पुरुषांच्या संबंधित वंध्य्यत्व समस्येमध्ये शुक्रजंतूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. संबंधानंतर स्त्रीच्या गर्भाशयात शुक्रजंतूचा स्त्रीबीजशी मिलन होऊन गर्भधारणा होत असते. त्यामुळे शुक्रजंतूची निर्मिती, विर्यामधील शुक्रजंतूचे प्रमाण (sperm count), शुक्रजंतूचा आकार व शुक्राणूंची गती (movement of the sperm) ह्या पुरुषांसंबंधित बाबी गर्भधारणा होण्यासाठी आवश्यक असतात.

पुरुषासंबधी वंध्यत्वाची सहाय्यक कारणे : पुरुषांमधील वंध्यत्व समस्या ही अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे विविध रोगांमुळे वंध्यत्व येऊ शकते, जन्मजात जनन अवयवातील विकृतीमुळे, वीर्याच्या
उत्पादनावर परिणाम झाल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवते.

  • वय जास्त असणे,
  • हार्मोन्समधील असंतुलनामुळे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोनची निर्मिती कमी झाल्याने,
  • जन्मजात पुरुषाच्या जननअवयवातील दोषामुळे,
  • वृषणांवर (testicles वर) आघात झाल्याने,
  • Hypogonadism किंवा जन्मजात वृषणांचा विकास न झाल्याने,
  • Undesaended testicle किंवा वृषण हे अंडकोषामध्ये न उतरल्यामुळे,
  • Varicocele किंवा वृषणांच्या शिरांना सूज आल्याने,
  • वृषणांचा रक्तपुरवटा खंडीत झाल्याने (Testicular torsion),
  • शरीरातील अँटीबॉडीजद्वारे शुक्रजंतूवर हमला झाल्यामुळे,
  • सिगारेट स्मोकिंग, अल्कोहोल यासारख्या व्यसनांमुळे,
  • डायबेटीस, लठ्ठपणा सारख्या आरोग्यसमस्या असणे,
  • लैंगिक आजारांमुळे,
  • गालफुगी आजारामुळे (Mumps),
  • Steroids, Sulfasalazine, Phenytoin यासारख्या औषधांच्या अतिवापरामुळे,
  • किमोथेरपी, रेडिएशन यांच्या दुष्परिणामामुळे,
  • व्यायामाच्या अतिरेकामुळे,
  • उष्ण ठिकाणी अधिक काळापर्यंत काम करणे, घट्ट अंतर्वस्त्रे वापरणे,
  • अतिगरम पाण्याच्या स्नान करण्याची सवय अशा अनेक कारणांचा शुक्रजंतूच्या निर्मितीवर परिणाम होऊन पुरुषांमध्ये वंध्यत्वता निर्माण होते.

पुरुष वंध्यत्व (Male Infertility)

श्वेतपदर (Leucorrea)

श्‍वेतपदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे हा त्रास नेहमीचाचं असे समजून दुर्लक्ष करावा किंवा लाज वाटते, संकोच वाटतो म्हणून लपून ठेवावा असाही नाही. निरोगी स्त्रियांमध्ये काही प्रमाणात पांढरे पाणी शरीरातून जाणे हे सामान्य आहे. परंतू त्याचे प्रमाण किंवा रंग बदलणे हे योनीतील इंन्फेक्शन तसेच अनेक आजारांचे लक्षणही ठरू शकते.

अंगावरून पांढरे का जाते..?

मासिकपाळी येण्याच्या काही दिवस आधी काही स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे किंवा गर्भधारण झाली असताना किंवा संभोगानंतर असा योनीमार्गातून पांढरा चिकट स्राव कळतनकळत जाणं नॉर्मल असतं. पण जाणवण्याइतपत सतत योनीमार्गातून स्त्राव जाणं, त्याचं प्रमाण वाढणं, त्या स्त्रावाला वास येणं, त्याबरोबर कंबरदुखी, योनीमार्गाच्या आत आणि बाहेरील बाजूस खाज सुटणं यासारख्या तक्रारींकडे स्त्रीयांनी निश्‍चितच दुर्लक्ष करू नये.

अंगावरून पांढरे जाण्याची कारणे :

  • योनी आणि गर्भाशयातील इंन्फेक्शन (जंतूप्रादूर्भाव) हे याचे प्रमुख कारण असते,
  • ‎याशिवाय गर्भाशयाला सूज आल्याने,
  • ‎गर्भाशयाच्या मुखाला जखमा झाल्यामुळे,
  • ‎सतत गर्भपात झाल्याने,
  • ‎गर्भाशयाच्या गाठी, गर्भाशयाचा कॅन्सर, बीजकोषाचा ट्यूमर, गुप्तरोग, अंग बाहेर येणे या विकारांमुळेही अंगावरून पांढरे जाऊ शकते.
  • ‎मानसिक ताण-तणावामुळे स्त्रीयांमध्ये पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढते.

श्वेतपदर (Leucorrea)

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शनामधे गर्भधारणा करण्याची योजना आखणाऱ्या व्यक्ती किंवा जोडप्यांना आरोग्य, जीवनशैली, आणि वैद्यकीय घटकांविषयी चर्चा आणि मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला जातो. याचे फायदे म्हणजे संभाव्य जोखीम ओळखणे व त्याचे व्यवस्थापन करणे, प्रजनन क्षमता सुधारणे आणि यशस्वी आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करणे.

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन

प्रसुतीपूर्व लसीकरण

प्रसुतीपूर्व लसीकरण म्हणजे गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या संरक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या लसी. या लसीकरणामुळे टेटनस, इन्फ्लूएंझा, आणि पर्टुसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो, गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो आणि बाळाला जन्मानंतर पासिव्ह प्रतिकारशक्ती मिळते. एएनसी लसीकरण आई आणि बाळाच्या एकूणच आरोग्य आणि कल्याणात महत्त्वपूर्ण योगदान देते.

प्रसुतीपूर्व लसीकरण

प्रसुतीपूर्व तपासणी (ANC)

एएनसी तपासणी म्हणजे प्रसवपूर्व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या सल्लामसलतीमुळे आई आणि वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याची नियमित देखरेख होते आणि संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते. एएनसीमध्ये विविध तपासण्या, पोषणाविषयी सल्ला आणि निरोगी गर्भधारणेसाठी मार्गदर्शन समाविष्ट असते, ज्यामुळे सुखद प्रसूती अनुभवास प्रोत्साहन दिले जाते.

प्रसुतीपूर्व तपासणी (ANC)

आई. व्ही. एफ (IVF) संबंधित मार्गदर्शन

वंध्यत्व आणि आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) सल्लागार प्रजनन समस्यांचा सामना करणाऱ्या जोडप्यांना मदत करण्यात तज्ञ असतात. ते प्रजननशी संबंधित अडचणींचे मूल्यांकन करतात, आयव्हीएफसारख्या उपचारांची शिफारस करतात आणि भावनिक आधार देखील देतात. ही तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणेची प्रक्रिया आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाणू आणि पुरुषाच्या शुक्राणूंचे लैबमध्ये निषेचन केले जाते, निषेचित भ्रूण नंतर स्त्रीच्या गर्भाशयात स्थानांतरित केला जातो.

IVF ची आवश्यकता :

  • निरुपयोगी फलन समस्या: स्त्री किंवा पुरुषात असलेल्या प्रजनन समस्यांमुळे नैसर्गिक गर्भधारणा होत नसल्यास IVF आवश्यक ठरते.
  • गंभीर एंडोमेट्रिओसिस: स्त्रीच्या गर्भाशयातील समस्या IVF ने मात केली जाते.
  • शुक्राणूंची कमी संख्या/गुणवत्तापुरुषांमध्ये शुक्राणूंच्या समस्येमुळे गर्भधारणा कठीण असते.
  • वयाचा परिणाम: वयस्कर जोडप्यांसाठी IVF प्रभावी ठरते.

IVF चे फायदे :

  • गर्भधारणेची संधी वाढते: नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा न होणाऱ्या दांपत्यांना IVF ही मदत करते.
  • गंभीर वैद्यकीय समस्यांवर उपाय: गर्भधारणेतील वैद्यकीय समस्या सोडवण्यासाठी IVF प्रभावी आहे.
  • नियोजित गर्भधारणा: योग्य नियोजनानुसार कधी गर्भधारणा करायची ते ठरवता येते.
  • सुरक्षित आणि प्रमाणित प्रक्रिया: IVF ही प्रक्रिया तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षितपणे केली जाते.

आई. व्ही. एफ (IVF) संबंधित मार्गदर्शन

प्रसव (सामान्य व सिझेरियन)

सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.

प्रसव (सामान्य व सिझेरियन)

लॅप्रोस्कोपिक गाइनाॅक शस्त्रक्रिया

लॅप्रोस्कोपिक गाइनाकोलॉजिकल शस्त्रक्रिया म्हणजे लहान छिद्रे आणि कॅमेऱ्याचा वापर करून केलेली कमीत-कमी वेदनेत होनारी शस्त्रक्रिया, जी स्त्रीरोगाशी संबंधित समस्या निदान आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते. याचे फायदे म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदना, जलद बरे होणे, आणि गुंतागुंतीचा कमी धोका. त्यामुळे रुग्णांना सामान्य जीवनशैलीत लवकर परतण्यास मदत होते आणि एकूणच सुधारित परिणाम मिळतात.

लॅप्रोस्कोपिक गाइनाॅक शस्त्रक्रिया

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते. हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया

गर्भाशय मुखाचा कर्करोग

सर्वायकल कँसर हा स्त्रियांमधील सर्विक्स (Cervix) ह्या अवयवात होणारा कँसर आहे. सर्विक्स म्हणजे गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयव. तर आशा ह्या सर्विक्सच्या पेशींमध्ये होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. इतर कँसरप्रमाणेच सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कॅन्सरनी मृत्यू होण्याचे प्रमाण हे इतर कर्करोगापेक्षा जास्त आहे.

स्त्रीयांमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्‍या कॅन्सरच्या यादीमध्ये याचा क्रमांक स्तनाच्या कर्करोगानंतर लागतो. 35 ते 55 वयाच्या स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. सर्वायकल कँसर हा प्रामुख्याने ह्युमन पॅपीलोमा व्हायरस (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे होतो.

गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची कारणे  :

  • एचपीव्ही (पॅपिल्लोमा व्हायरस) बाधित स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका अधिकच वाढतो.
  • हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे
  • ‎अति स्थुलता – लठ्ठपणा हे एक गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमुख कारण ठरते
  • उशीरा रजोनिवृत्ती (मेनोपॉज) झाल्याने
  • ‎अनुवंशिकता 

गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणे :

  • योनीतुन अस्वाभाविकरित्या रक्तस्त्राव होणे, खूप जास्त रक्तस्त्राव होणे.
  • ‎गर्भाशयातील विकृतीयुक्त स्त्राव योनीतून येणे.
  • लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
  • ‎रजोनिवृत्तीनंतरही स्त्राव होणे.
  • ‎याशिवाय भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे, कंबर-पाय दुखणे यासारखी लक्षणेही जाणवू शकतात.

गर्भाशय मुखाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणाऱ्‍या कोणत्याही विकारापैकी सर्वात गंभीर असा विकार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.

स्तनाचा कर्करोग लक्षणे : स्तन कॅन्सरचा प्रारंभ दुग्ध ग्रंथीतुन निघणाऱ्‍या वाहिकांमधून होतो. सुरवातीला स्तनाच्या ठिकाणी एक पीडारहित गाठ, पिण्ड उत्पन्न होते.

  • स्तनात पीडारहित गाठ, पिण्ड असणे.
  • ‎अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे, स्तन आकुंचन पावणे.
  • ‎बोंडातून द्राव येणे, आत वळलेले बोंड. बोंड लाल होऊन वेदना होणे.
  • ‎स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.

स्तन कॅन्सरची कारणे :

  • स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो
  • ‎वयाच्या 12 व्या वर्षापुर्वीच मासिक पाळी सुरु झालेली असल्यास,
  • ‎वयाच्या 55 व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास,
  • ‎निसंतती, वंधत्वाची समस्या असणे,
  • ‎प्रथम अपत्य जर वयाच्या 30 वर्षानंतर झाल्यास,
  • ‎कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकामुळे,
  • ‎आपल्या बाळास स्तनपान न करणाऱ्‍या महिला,
  • ‎व्यसनाधिनतेमुळे जसे, तंबाखू, मद्यपान इ.

स्तनाचा कर्करोग

डॉ. राठी डॉयग्नोस्टिक्स् अँड इंटरव्हेन्शन सेंटर

डॉ. राठी डॉयग्नोस्टिक्स् अँड इंटरव्हेन्शन सेंटर

Gallery

डॉ राठी वूमेन्स हॉस्पिटल, बुलडाणा
प्रशस्त प्रतीक्षालय
प्रशस्त प्रतीक्षालय
अत्याधुनिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरी)
अत्याधुनिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरी)
अत्याधुनिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरी)
सोनोग्राफी मशीन व सुविधा उपलब्ध
तपासणी कक्ष (कन्सल्टिंग रूम)
तपासणी कक्ष (कन्सल्टिंग रूम)
तपासणी कक्ष (कन्सल्टिंग रूम)
प्रसूती कक्ष
क्रायोसर्जरी युनिट
क्रायोसर्जरी युनिट
गर्भाशयाच्या मुखाची जखम उपचार अगोदर
गर्भाशयाच्या मुखाची जखम उपचारा नंतर
गर्भाशयाच्या मुखाची जखम उपचार अगोदर
गर्भाशयाच्या मुखाची जखम उपचारा नंतर
गर्भाशयाच्या मुखाची जखम उपचार अगोदर
गर्भाशयाच्या मुखाची जखम उपचारा नंतर
अत्याधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटर
अत्याधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटर
अत्याधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटर
अत्याधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटर
वातानुकूलित पेशंट रूम
वातानुकूलित पेशंट रूम
औषधालय
औषधालय

Rate Us

Contact Us