About Us
डर्मा केअर
स्किन, हेअर & लेझर क्लिनीक
"तुमच्या सौंदर्याचा खरा तेजसपणा – त्वचा, केस आणि आत्मविश्वासाचा संगम!"
त्वचा, केस, लेझर आणि सौंदर्यविषयक क्लिनिक म्हणजे "डर्मा केअर स्किन, हेअर & लेझर क्लिनीक" अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तुमचं नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलवण्याच्या सेवेत सदैव तत्पर आहे. आमच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी तंत्रज्ञांच्या देखरेखीत आम्ही त्वचा आणि केसांच्या विविध समस्यांवर परिपूर्ण उपाय देतो. आमची विशेषता म्हणजे त्वचेच्य सर्व आजारावर अचुक निदान व खात्रीशीर उपचार लेझर उपचार, अॅस्थेटिक थेरपी आणि सौंदर्यशास्त्रातील आधुनिक उपचारांचा संपूर्ण वापर.
आम्ही तुमच्या सौंदर्याची योग्य काळजी घेतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व आणखी खुलतं. आमच्या सेवांमध्ये त्वचेच्या समस्या, केस गळती, मुरुम, pigmentation, anti-aging उपचार, आणि इतर अत्याधुनिक सौंदर्यविषयक उपचारांचा समावेश आहे.
तुमच्या सौंदर्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी आणि तुमचं नैसर्गिक सौंदर्य निखळ करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.
उपलब्ध सुविधा :
त्वचा विकार :
- पांढरा कोड
- नागवेढा किंवा नागीन
- कुष्ठरोग
- पांढरे डाग व चट्टे
- गजकर्ण
- नखांचे विकार
- सुरमा / सुरंजी
- त्वचेवरील ॲलजी॔
- सोरीयासीस
- पित्त/अलजी॔
केस विकार :
- केसांची दुर्बीणीने तपासणी
- केस गळणे
- केस पांढरे होणे
- टक्कल पडणे
- चाई लागणे
- कोंडा
सौंदर्यवर्धक क्रिया :
- केमिकल पिलींग
- हायड्रा फेशियल
- Vampire Facelift
- डर्मारोलर
- फेशियल रिसर्फेसिंग
त्वचेवरील शस्त्रक्रिया :
- इलेक्ट्रोकॉटरी
- रेड्डीओकॉटरी
- गाठ व चामखीळ काढणे
लेझर उपचार :
- DIODE लेझर: -अनावश्यक केस घालविण्यासाठी
- CO2 LASER: -मुरुम / फुटकुल्या / मुरुमाचे खड्डे कमी करण्यासाठी
- QS Nd yAg LASER : तीळ / डाग / वांग / गौधन घालविण्यासाठी
इतर :
- पी. आर. पी. केसगळती कमी करण्यासाठी
- आयन्टोफॉरेसीस हातापायाचा घाम कमी करण्यासाठी
- ऑक्झीफेशियल व डर्माफेशिअल
Products/Services
डर्मा केअर स्किन, हेअर & लेझर क्लिनीक
तपासणी शुल्क - RS 200
सोमवार ते शुक्रवार
- 10:30 AM TO 7:30 PM
शनिवार
- 10:30 AM TO 12:00 PM
रविवार बंद

डर्मा केअर स्किन, हेअर & लेझर क्लिनीक
डाॅ. शृती काळे (इढोळ)
- MBBS, DDV, FAM
- Skin Hair & Laser Speciality
- Fellowship In Aesthetic Medicine Lasers & Cosmetalogy (Mumbai)
- Reg No. : 2017/05/2314

लेझर उपचार
लेझर उपचारांमुळे त्वचेच्या डाग, पिग्मेंटेशन, आणि ऍक्नेच्या खुणा कमी होतात. यामुळे त्वचेला एकसमान रंग आणि पोत मिळतो. लेझरमुळे कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि लवचिक होते. सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. तसेच, हे उपचार तात्काळ परिणाम देतात आणि त्वचेला नवजीवन देतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

अंगावर पुरळ उठणे – Skin Rashes
काहीवेळा अंगावर पुरळ येत असतात. यावेळी त्वचेवर बारीक, लालसर किंवा इतर रंगाचे फोड येत असतात. त्यामुळे त्याठिकाणी खाज येत असते.
कांजिण्या, गोवर, नागीण अशा अनेक रोगांमध्ये पुरळ उठणे हे लक्षण असू शकते. तसेच पुरळाचे अनेक प्रकारही असू शकतात.
कारणे :
इन्फेक्शन हे प्रमुख कारण आहे. पुरळ हे खालील रोगांमध्ये जंतुसंसर्गमुळे अंगावर उठतात.
• विषाणूजन्य आजार जसे गोवर, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण यांमुळे,
• जिवाणूजन्य आजार जसे इंपेटिगो, स्कार्लेट फीवर यांमुळे,
• बुरशीजन्य आजार गजकर्ण, नायटा इ.,
• ॲलर्जीमूळे
• औषधांच्या साईड इफेक्टमुळे,
• कीटकदंश,
• काही विशिष्ट वनस्पती, प्रदूषण, केमिकल्स यांचेशी संपर्क आल्यानेदेखील पुरळ उठते.
तसेच ल्युपस, डरमॅटोमायोसायटिस इ. काही गंभीर आजारांमध्येही त्वचेवर पुरळ येत असते.

अंगावर पित्त उठणे - Urticaria
अंगावर पित्त उठणे या समस्येला आयुर्वेदात ‘शीतपित्त’ ह्या नावाने संबोधलेले आहे. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला ‘शीतपित्त’ असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया (Urticaria) किंवा Hives असे म्हणतात तर बोलीभाषेत ‘अंगावर पित्त उठणे’ असे म्हंटले जाते.
प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात.

नागीण आजार - Shingles
नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजण्या आजार होत असतो.
कारणे : नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना कांजिण्या झालेला असतो त्यांच्या शरीरात मज्जारज्जूमध्ये कांजिण्याचा विषाणू लपून बसलेले असतात. आणि जेंव्हा केंव्हा त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ति कमी होते तेव्हा हे लपलेले विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर प्रचंड वेदना असणारे पुरळ निर्माण करतात त्याला नागीण होणे असे म्हणतात.
नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते. या विषाणूची एका किंवा दोन-तीन नसांनाही याची लागण होऊ शकते. नागीण शरीवरील कोणत्याही भागावर होऊ शकतो. काहीवेळा नागीण डोळ्यांमध्येही होऊ शकते. डोळ्यांमध्ये नागीण झाल्यास परिणामी अंधत्वही येऊ शकते.
लक्षणे :
- नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होतात. त्याठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवितात.
- तेथील त्वचेची आग होते.
- दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके येतात व त्यानंतर त्यात पाणी धरते.
- पाच ते सहा दिवसात खपल्या धरतात व फोडही जातात. फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.

गजकर्ण नायटा - Ringworm
गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्णला नायटा किंवा खरूज या नावानेही ओळखले जाते. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे. पावसाळ्यातील ओलसर दमट हवामान ह्या रोगासाठी पोषक असते. नियमित अंघोळ न केल्याने, स्वच्छतेअभावी त्वचेवर गजकर्ण, नायट्याच्या बुरशीची वाढ होते.
ट्रायकोफायटॉन रूब्रम, मायक्रोस्पोरम कॅनिस आणि एपिडर्मोफायटॉन फ्लॉकोसम या तीन जातींच्या बुरशीमुळे गजकर्ण होतो. प्रामुख्याने डोक्याची त्वचा, हाताचे तळवे, मनगटे, काखा, जांघा, मांड्या, हातापायांच्या बोटांमधील जागा इ. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हा रोग होऊ शकतो.
लक्षणे : या रोगात त्वचेवर वर्तुळाकार किंवा अंगठीप्रमाणे लालसर चट्टे उठतात. लाल चट्टे मुख्यतः जांघेत, ओटीपोटावर, काखेत, स्तन ग्रंथीवर दिसतात. हळूहळू त्यावर पांढरे कोंड्यासारखे पापुद्रे तयार होतात. त्या भागाला खूप खाज सुटते. शरीराच्या भागानुसार गजकर्णाचे प्रकार ओळखले जातात. उदा. डोक्याच्या गजकर्णाला खवड्या, तर पायाच्या बोटांमधील गजकर्णाला चिखल्या म्हणतात.
हाच आजार जर हातावर झाला तर त्याला टीनिया मानम म्हणतात आणि पायावर झाला तर टीनिया पेडीस/ॲथलिट्स फुट असं म्हणतात.
कारणे :
• गजकर्ण हा विशिष्ट बुरशीमुळे होणारा त्वचारोग आहे. गजकर्ण, नायट्याचे मुख्य कारण म्हणजे अस्वच्छता हे आहे.
• गजकर्णाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, कंगवा व ब्रश वापरल्यास हा रोग होऊ शकतो.
• स्नानगृह, स्विमिंगपूल, केशकर्तनालय इ. सार्वजनिक माध्यमांतून त्याचा प्रसार होण्याची शक्यता असते.
• प्राण्यांमध्येही गजकर्ण हा रोग आढळतो. ह्या रोगाचा प्रसार अस्वच्छ कुत्रे व मांजरी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाल्यानेही होतो.

पांढरे कोड - Vitiligo
पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.
लक्षणे :
- शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
- प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
- डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
- पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
- या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.
कारणे : पांढरे कोड ह्या त्रासाला जेनेटिक दोष प्रामुख्याने कारणीभूत असतात. या समस्येत जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणाऱ्या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. त्यामुळे मेलॅनीनच्या कमतरतेमुळे त्वचेवर पांढरे डाग होतात.

कुष्ठरोग - Leprosy
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टीरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा एक भयंकर असा संसर्गजन्य आजार आहे. कुष्ठरोगाचे बॅक्टेरिया प्रामुख्याने हातापायांच्या आणि त्वचेच्या नसा (nerves) यावर विपरीत परिणाम करतात. महाभयंकर अशा कुष्ठरोग ह्या रोगास Hansen’s disease किंवा महारोग या नावानेही ओळखले जाते. कुष्ठरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार झाल्यास कुष्ठरोग लवकर बरा होणे शक्य आहे.
कुष्ठरोगामुळे बाधित भागावर जखमा व अल्सर होतात, तेथील मज्जातंतूचे नुकसान होते आणि तेथील मांसपेशी कमकुवत बनत असतात. कुष्ठरोगावर जर वेळीच उपचार केले नाही तर यामुळे तीव्र स्वरुपाचे आणि कायमचे अपंगत्व येऊ शकते. उपचार न घेतल्यास या आजारात रुग्णाची बोटेसुद्धा झडून जातात.
कारणे : कुष्ठरोग हा ‘मायकोबॅक्टीरियम लेप्रे’ ह्या बॅक्टेरियामुळे होतो. कुष्ठरोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेद्वारे हे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरून त्यालाही कुष्ठरोगाची लागण करू शकतात. विशेषतः उपचार न घेतलेल्या कुष्ठरोग बाधित रुग्णाच्या संपर्कात अधिककाळ राहिल्यास कुष्ठरोग होण्याची शक्यता जास्त असते.
लक्षणे :
- त्वचेवर पांढरट किंवा लालसर चमकदार चट्टे येणे,
- मांसपेशी दुर्बल व कमकुवत बनणे,
- हात, पाय सुन्न पडणे, हातपाय बधिर होणे,
- बोटे वेडीवाकडी होणे,
- बाधित भागाच्या ठिकाणी संवेदना कमी होणे, यासारखी लक्षणे कुष्ठरोगात दिसू शकतात.

जास्त घाम येणे - Excessive sweating
घाम हा सर्वच लोकांना येत असतो. घाम येण्याचे प्रमाण व्यक्तीनुसार कमी किंवा अधिक असू शकते. घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होण्यास मदत होते. काही लोकांना मात्र अधिक प्रमाणात घाम येत असतो. या स्थितीला हायपरहाइड्रोसिस डिसऑर्डर (Hyperhidrosis) असे म्हणतात.
उन्हाळ्याच्या दिवसात, जास्त शारीरिक काम केल्यामुळे किंवा व्यायामामुळे, जास्त गरम किंवा तिखट पदार्थ खाल्याने, मानसिक तणाव, भीती यांमुळे घाम जास्त येत असतो. मात्र अनेकांना इतरवेळीही सारखा जास्त प्रमाणात घाम येत असतो. ही स्थिती हायपरहायड्रोसिस संबंधित असू शकते. त्यामुळे आपणास जास्त प्रमाणात घाम येत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून निदान व उपचार करून घ्यावेत.
कारणे :
- उन्हाळ्यातील उकाड्यामुळे किंवा कडक उन्हात जास्त फिरल्याने,
- जास्त काम किंवा व्यायाम करण्याने घाम भरपूर येतो.
- उष्ण वातावरणात काम करण्याने,
- जास्त गरम किंवा तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे,
- पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे,
- तसेच काहीवेळा विशिष्ट औषधे, मेनोपॉज, स्थूलता, रक्तातील साखर कमी झाल्याने, थायरॉईड समस्या यामुळेही अतिघाम येण्याची समस्या निर्माण होते.

चामखीळ - Warts
त्वचेवर चामखीळ असण्याची समस्या अनेक लोकांना असते. चामखीळमुळे कोणताही विशेष त्रास होत नसला तरीही चामखीळ दिसायला चांगले वाटत नाहीत, यामुळे सुंदरताही खराब होत असते. यासाठी चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त उपायांची माहिती खाली दिली आहे.
कारणे : चामखीळ हे प्रामुख्याने ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे (HPV) होत असतात. चेहरा, मान, हात, पाठ, छाती आणि पोटावरही चामखीळ येऊ शकतात. चामखीळला English मध्ये Warts असे म्हणतात. तसेच चामखिळीला अंगावर मोस किंवा मस येणे असेही म्हणतात.

जळवात - Cracked heels
तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. याला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते.
कारणे :
• अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे,
• अधिक वेळ उभे राहण्याच्या सवयीमुळे,
• आरामदायी चपला, सँडल किंवा बूट न वापरण्यामुळे,
• हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पायाची त्वचा कोरडी (dry skin) झाल्यामुळे,
• जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे,
• पुरेसे पाणी न पिण्याच्या सवयीमुळे,
• व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे,
• डायबेटीस, हायपो-थायरॉईडीजम, लठ्ठपणा, सोरायसिस, त्वचेचे विकार यासारखे त्रास असल्यासही जळवात होऊन तळपायाला भेगा पडण्याची समस्या होत असते.
लक्षणे : जळवात मध्ये तळपायाला भेगा पडतात. त्याठिकाणची त्वचा फाटते, त्वचा रुक्ष व खडबडीत होते. काहीजणांना जळवातमुळे तळपायाला भेगा पडून त्याठिकाणी जखमा, वेदना व रक्तस्राव होणे असे त्रासही होत असतात.

अंगावर गाठी येणे – Lipoma
शरीराच्या त्वचेवर होणाऱ्या चरबीच्या गाठींना लिपोमा (Lipoma) असे म्हणतात. त्वचेवर चरबीच्या गाठी येण्याची समस्या अनेकांना असते. शरीराच्या कोणत्याही भागावर अशा चरबीच्या गाठी होऊ शकतात. प्रामुख्याने मान, खांदा, हात, मांडी, पोट आणि पाटीवर अशा गाठी होत असतात.
कारणे : चरबीच्या गाठी नेमक्या कशामुळे येतात याची ठोस कारणे अद्यापही माहीत झालेली नाही. 40 ते 60 वर्षाच्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात आढळतो. कुटुंबात चरबीच्या गाठी येण्याची अनुवांशिकता असणे, जेनेटिक फॅक्टर, हार्मोन्समधील बदल यांमुळे हा त्रास होऊ शकतो.याशिवाय Madelung’s आजार, काउडन सिंड्रोम, गार्डनर सिंड्रोम, एडीपोसिस डोलोरोसा यासारख्या आजारामुळे चरबीच्या गाठी येऊ शकतात

केसांची दुभी॔नीने तपासणी
केसांची दुभी॔नीने तपासणी केल्याने केसांच्या मूळ समस्यांचा शोध घेता येतो. योग्य उपचार मिळवून केस गळती, दुभंग, आणि अन्य केसांच्या समस्या टाळता येतात.
फायदे :
- केसांची मजबुती, आरोग्य आणि पोषण याविषयी माहिती मिळते.
- विशिष्ट समस्या ओळखून त्यावर योग्य उपचार निवडता येतात.
- केसांच्या मूळ समस्या सोडवून नवीन केसांची वाढ सुधारता येते.
- वेळेवर निदान करून केसांचे अधिक नुकसान टाळता येते.
- केसांच्या आरोग्याचा संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण आरोग्य साधता येते.

चेहऱ्यावर नको असलेले केस
चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
चेहऱ्यावर नको असलेले केस येण्याची कारणे अनेक असू शकतात. प्रामुख्याने, स्त्रियांमध्ये होणाऱ्या हार्मोन्समधील बदलांमुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येतात. शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे PCOD मुळे यामुळे हार्मोन्समध्ये बदल झाल्याने चेहऱ्यावर केस येतात. याशिवाय खालील कारणेही यासाठी जबाबदार असतात.
- अनुवांशिक घटक,
- सौंदर्य प्रसाधनांच्या चुकीच्या वापरामुळे,
- गर्भ निरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येऊ शकतात.
- याशिवाय मानसिक तणाव ह्यासारख्या कारणांनी चेहऱ्यावर केस येऊ शकतात.

केस गळती
कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते.

डँड्रफ
डोक्यातील कोंडा, ज्याला seborrheic dermatitis म्हणूनही ओळखले जाते, हे टाळू, भुवया किंवा नाकाजवळील त्वचेच्या पेशींचा अतिरेक आहे. हे मृत त्वचेच्या पेशींच्या जलद शेडिंगमुळे होते, परिणामी मोठ्या फ्लेक्स बनतात
डोक्यातील कोंडा कशामुळे होतो?
बुरशीजन्य अतिवृद्धी: टाळूवर मालासेझिया बुरशीची भरभराट होते.
स्कॅल्पचे अतिरिक्त तेल: परिणामी चिकट, तेलकट कोंडा होतो.
अनियमित ब्रशिंग आणि केस धुणे.
शैम्पूचा क्वचित वापर.
तणाव आणि मानसिक आरोग्य स्थिती.

केमिकल पिलिंग
केमिकल पिलिंग म्हणजे त्वचेवर रासायनिक द्रव्य लावून वरची मृत त्वचा काढून टाकणे, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि नवीन, ताजीतवानी त्वचा तयार होते.
फायदे :
- मृत त्वचा काढल्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी दिसते.
- टॅनिंग आणि डाग कमी होतात.
- चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि दाग कमी होतात.
- त्वचा अधिक टाईट आणि तरुण दिसते.

डर्मा रोलर
डर्मा रोलर हे लहान आकाराचे साधन आहे. ज्यामध्ये लहान सुया असतात, ज्यामुळे सूक्ष्म जखमा होतात. यामुळे त्वचेचे पुनरुत्थान होते, कोलेजन उत्पादन वाढते, आणि त्वचा तजेलदार व आरोग्यदायी होते.
फायदे :
- त्वचेचा ताजेपणा आणि लवचिकता वाढते.
- सूक्ष्म जखमांमुळे नवीन त्वचा तयार होते.
- चेहऱ्यावरील डाग आणि ऍक्नेचे गुण कमी होतात.
- त्वचेचा पोत अधिक मऊ आणि समान होतो.
- डोक्यावर वापरल्यास केसांची वाढ सुधारते.

लेझर उपचार
लेझर उपचारांमुळे त्वचेच्या डाग, पिग्मेंटेशन, आणि ऍक्नेच्या खुणा कमी होतात. यामुळे त्वचेला एकसमान रंग आणि पोत मिळतो. लेझरमुळे कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि लवचिक होते. सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. तसेच, हे उपचार तात्काळ परिणाम देतात आणि त्वचेला नवजीवन देतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

सोरायसिस – Psoriasis
सोरायसिस ही त्वचासंबंधी एक समस्या असून यामध्ये त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे येतात व तेथून पापुद्रे किंवा खवले निघत असतात. याला सोरियाटिक स्केल असे म्हणतात.
सोरायसिसमध्ये त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन तेथे प्रचंड खाज सुटते. तेथील त्वचा ही जाड होते व त्वचेत पांढरट-चंदेरी रंगाचे पापुद्रे निर्माण होतात. पापुद्रे असणाऱ्या ठिकाणी खाजवल्यास भुसा होऊन पापुद्रे खाली पडत असतात.
सोरायसिसचे चट्टे प्रामुख्याने कोपरा, गुडघे अशा सांध्यांच्या ठिकाणी झालेले आढळतात. याशिवाय ते शरीराच्या डोके, चेहरा, कानाच्या मागे, मान, हात, पाय, पाठ अशा भागावरही होऊ शकतात.
लक्षणे :
- त्वचेवर लालसर, सुज असणारे चट्टे येणे,
- चट्ट्याभोवती खाज येणे,
- चट्टे आलेल्या ठिकाणी वेदना किंवा आग होणे,
- त्वचेवरील चट्ट्यांवर पांढरट-चांदी कलरचे पापुद्रे येणे,
- त्वचेवर खाजवल्यास पापुद्रे भुसा होऊन खाली पडणे,
- त्वचा कोरडी होऊन क्रॅक पडून रक्तस्राव होणे,
- सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे.
अशी काही लक्षणे सोरायसिस या त्वचाविकारामध्ये असतात.

Gallery






















