About Us
दायमा चिल्ड्रेन हॉस्पिटल
"तंदुरुस्त बालक, सशक्त राष्ट्र!"
दायमा चिल्ड्रेन हॉस्पिटल चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी समर्पित असून उत्कृष्ट आणि तज्ज्ञ सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. बालकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी तज्ज्ञ डॉक्टर, कुशल परिचारिका आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत, आम्ही सर्वोत्कृष्ट उपचार प्रदान करतो. लसीकरण, पोषण सल्ला, वाढ व विकास तपासणी, तसेच विविध बालरोगांवरील उपचारांसाठी आमच्याकडे विशेष व्यवस्था आहे. प्रत्येक मुलाला निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळावे, यासाठी आम्ही काळजीपूर्वक प्रयत्नशील आहोत. आमच्या सेवेत सहानुभूती, विश्वास आणि गुणवत्ता यांचा समावेश असून, "तंदुरुस्त बालक, सशक्त राष्ट्र!" हेच आमचे ध्येय आहे.
डॉ. निलेश दायमा
- MBBS, M.D. (Paed) BJMC., Pune
- बालरोग व नवजात शिशु रोग तज्ञ
- Reg. No.: 2001/02/557
डॉ. सौ. परिधी दायमा
- MBBS, M.D. (Paed) BJMC., Pune
- बालरोग व नवजात शिशु रोग तज्ञ
- Reg. No.: 2001/02/467
AREA OF EXPERTISE :
- Newborn Baby Check up
- Vaccination
- Growth and Development : Assessment & Counselling
- Nutrition Assessments & Counselling
- Behavioural Assessments & Counselling
- High Risk Followup
- Paediatric Major & Minor Illnesses
- Pediatric Nutrition
उपलब्ध सुविधा :-
- सुज्जज बाह्यरुग्ण विभाग (OPD)
- सुज्जत आतंरुग्ण विभाग (IPD)
- सर्व प्रकारचे लसीकरण
- पल्स ऑक्सिमीटर
- बालदमा उपचार
- नेबुलायझेशन
Products/Services
दायमा चिल्ड्रेन हॉस्पिटल
डॉ. निलेश दायमा
- MBBS, M.D. (Paed) BJMC., Pune
- बालरोग व नवजात शिशु रोग तज्ञ
- Reg. No.: 2001/02/557

दायमा चिल्ड्रेन हॉस्पिटल
डॉ. सौ. परिधी दायमा
- MBBS, M.D. (Paed) BJMC., Pune
- बालरोग व नवजात शिशु रोग तज्ञ
- Reg. No.: 2001/02/467

पेडियाट्रिक कन्सल्टेशन
पेडियाट्रिक कन्सल्टेशन म्हणजे बालरोग तज्ञाकडून मुलांच्या आरोग्यविषयक तपासणी व सल्ला घेणे. मुलांच्या वाढीचे योग्य मूल्यांकन, रोगांचे निदान आणि उपचारासाठी ही आवश्यक असते. लहान वयात रोग लवकर ओळखले जावेत आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी पेडियाट्रिक कन्सल्टेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांचे आरोग्य सुदृढ राहते व भविष्यातील संभाव्य आरोग्य समस्यांना आळा घालता येतो.

लहान बाळाचे लसीकरण (Vaccination)
बाळांना नियमित लसीकरण केल्यामुळे बाळाचे अनेक आजारांपासून रक्षण होण्यास मदत होते. आपल्या लहान मुलास वेळच्यावेळी लसीकरण करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे.
Age of Child (0-15 day) : Vaccination - HBV 0, BCG, OPV.
Age of Child (1 1/2 Months) : Vaccination - DPT 1, HBV 1, HIB 1, IPV 1, Rotavirus 1, Pneumococcal 1.
Age of Child (2 1/2 Months) : Vaccination - DPT 2, HBV 2, HIB 2, IPV 2, Rotavirus 2, Pneumococcal 2.
Age of Child (3 1/2 Months) : Vaccination - DPT 3, HBV 3, HIB 3, IPV 3, Rotavirus 3, Pneumococcal 3.
Age of Child (6 Months) : Vaccination - Influenza 1
Age of Child (7 Months) : Vaccination - Influenza 2
Age of Child (9 Months) : Vaccination - MMR 1, Typhoid Conjugate Vaccine.
Age of Child (12 Months) : Vaccination - Hepatitis A, JE 1
Age of Child (13 Months) : Vaccination - JE 2
Age of Child (15 Months) : Vaccination - MMR 2, Chicken Pox, Pneumococcal Booster
Age of Child (18 Months) : Vaccination - DPT Booster 1, HIB Booster, IPV Booster 1.
Age of Child (5 years) : Vaccination - DPT Booster 2, IPV Booster 2, MMR 3
Age of Child (10 years) : Vaccination - Tdap / Td, HPV.

चाईल्ड अस्थमा
बाल अस्थमा ही एक दीर्घकालीन स्थिती असून त्यामुळे श्वासनलिकांनमधे जळजळ होते, श्वास घेताना घरघर असा आवाज येतो, खोकला आणि श्वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होतो. उपचारांमध्ये इनहेलर्स (ब्राँकोडायलेटर, कॉर्टिकोस्टिरॉईड्स), अॅलर्जी नियंत्रण आणि जीवनशैलीतील बदलांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये नेब्युलायझेशन किंवा बायोलॉजिकल थेरपीची आवश्यकता असू शकते. नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक काळजीमुळे लक्षणे नियंत्रित ठेवता येतात आणि जीवनमान सुधारता येते.

बाळाला जुलाब होणे
अनेक कारणांमुळे बाळाला पातळ जुलाब होत असते. प्रामुख्याने इन्फेक्शनमुळे असा त्रास बाळाला होत असतो. बाळाला पातळ जुलाब होत असल्यास डिहायड्रेशन होऊन धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी बाळाला जुलाब अतिसार होत असल्यास डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.
जुलाबामुळे बाळास सतत पातळ संडासला होत राहिल्यास डिहायड्रेशन होण्याचा अधिक धोका असतो. डिहायड्रेशनमुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होत असते. यासाठी जुलाबमध्ये डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तरल द्रव्यपदार्थ बाळास देणे व आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जुलाबवरील कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाळास देऊ नये.

चाईल्ड नेब्युलायझेशन
बाल नेब्युलायझेशन म्हणजे मुलांच्या श्वसन समस्यांसाठी वाफेतून औषधांचा वापर करून उपचार करणे. हे प्रामुख्याने दमा, ब्रॉंकोलायटिस, आणि इतर श्वसनविकारांमध्ये वापरले जाते. नेब्युलायझरने औषधे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचवता येतात, ज्यामुळे मुलांना लगेच आराम मिळतो. यामुळे श्वास घेण्यात अडचण असलेल्या मुलांच्या श्वासोच्छ्वासात सुधारणा होते आणि श्वसनमार्गातील सूज कमी होते. बाल नेब्युलायझेशन आवश्यक आहे कारण ते मुलांच्या तात्काळ आरामासाठी आणि गंभीर श्वसन समस्यांपासून संरक्षणासाठी उपयुक्त ठरते.

बाल पोषण आणि सल्ला
बाल पोषण आणि सल्ला म्हणजे मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या आहाराचे योग्य मार्गदर्शन व सल्ला घेणे. बालकांच्या शरीराच्या आणि मेंदूच्या विकासासाठी संतुलित आहार अत्यावश्यक असतो. डॉक्टरच्या सल्ल्यामुळे मुलांच्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, आणि कॅल्शियम मिळतात, ज्यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होते. बाल पोषण आणि सल्ल्यामुळे मुलांचे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, कुपोषण आणि संबंधित आजार टाळले जातात, आणि एकूणच आरोग्य सुधारते, ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल बनते.

Gallery





