About Us
चिलगर हाॅस्पिटल
स्किन, हेअर, काॅस्मेटिक, लेझर व डोळ्यांचा दवाखाना
"आरोग्यदायी त्वचा, आकर्षक केस आणि स्पष्ट दृष्टीसाठी विश्वासार्ह उपचार!"
डॉ. सौ. भारती सु. चिलगर
- M.B.B.S., D.D.V. (मुंबई)
- त्वचा, गुप्तरोग, सौंदर्यशास्त्र विशेषज्ञ आणि त्वचा शल्यचिकित्सक
- Reg. No.: 2005/09/3394
डॉ. सुनिल रा. चिलगर
- M.B.B.S., D.O.M.S., F.G.O.
- फेको सर्जन
- नेत्ररोग तज्ञ
- Reg. No.: 2003/04/1659
उपलब्ध सुविधा :
त्वचारोग विभाग -
- सर्व त्वचारोग
- केसांचे विकार
- नखांचे विकार
- कुष्ठरोग निदान व उपचार
- केमीकल पिलींग
- त्वचेत इंजेक्शन देणे
- मस काढणे
- रेडिओ फ्रेवेन्सी
- कोडासाठी त्वचारोपन शस्त्रक्रिया
- स्किन स्कॅनिंग
- लेझर
- टी.सी.ए.पीलींग
- वुड्स लॅम्प तपासणी
- मायोडर्म ऍब्रेजन
नेत्ररोग विभाग -
- कॉम्प्युटराईज्ड डोळे तपासणी
- फेकोइमल्सीफिकेशन शस्त्रक्रिय
- बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रि
- कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया
- काचबिंदू निदान व शस्त्रक्रिया
- कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक
- नेत्रपटल तपासणी
- तिरळेपणावर उपचार
- लासरु शस्त्रक्रिया
- मधुमेह नेत्र तपासणी
- नेत्र इजा उपचार
Products/Services
चिलगर हाॅस्पिटल
"आरोग्यदायी त्वचा, आकर्षक केस आणि स्पष्ट दृष्टीसाठी विश्वासार्ह उपचार!"
त्वचारोग OPD टायमिंग :
- सकाळी 11 ते 3 पर्यंत
- सायंकाळी 5 ते 7 पर्यंत
- रविवार बंद
नेत्ररोग OPD टायमिंग :
- सकाळी 11 ते 3 पर्यंत
- सायंकाळी 5 ते 7 पर्यंत
- रविवार बंद

मायक्रोडर्मअब्रेजन
मायक्रोडर्मअब्रेजन हा त्वचाविषयी उपचार आहे, ज्यामध्ये सूक्ष्म क्रिस्टल्सच्या साहाय्याने त्वचेचा मृत आणि खराब झालेला वरचा थर काढला जातो. हा उपचार सुरक्षित, वेदनारहित असून त्वचेचा पोत सुधारण्यासाठी प्रभावी आहे.
फायदे : त्वचा गुळगुळीत होते, डाग कमी होतात, मुरुमांचे व्रण आणि सूक्ष्म रेषा कमी होतात. त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि कोलाजेन उत्पादन वाढते.

रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) आणि इलेक्ट्रोकॉटरी
रेडिओफ्रिक्वेन्सी (RF) आणि इलेक्ट्रोकॉटरी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
रेडिओफ्रिक्वेन्सी: रेडिओलहरींच्या उष्णतेने त्वचेसंबंधी समस्या (उदा. सुरकुत्या, लूज त्वचा) सुधारली जाते.
इलेक्ट्रोकॉटरी: विद्युत उष्णतेने ऊती कापणे, जळवणे किंवा रक्तस्राव थांबवणे.
फायदे: त्वचेला टवटवीत करणे, रक्तस्त्राव नियंत्रण व व्रण उपचार वेगवान, सुरक्षित व वेदनारहित प्रक्रिया.

केमिकल पिलींग
केमिकल पिलिंग म्हणजे त्वचेवर रासायनिक द्रव्य लावून वरची मृत त्वचा काढून टाकणे, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि नवीन, ताजीतवानी त्वचा तयार होते.
फायदे: मृत त्वचा काढल्यामुळे त्वचा अधिक तेजस्वी दिसते, टॅनिंग आणि डाग कमी होतात, चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि दाग कमी होतात, त्वचा अधिक टाईट आणि तरुण दिसते.

लेझर उपचार
लेझर उपचारांमुळे त्वचेच्या डाग, पिग्मेंटेशन, आणि ऍक्नेच्या खुणा कमी होतात. यामुळे त्वचेला एकसमान रंग आणि पोत मिळतो. लेझरमुळे कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार आणि लवचिक होते. सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. तसेच, हे उपचार तात्काळ परिणाम देतात आणि त्वचेला नवजीवन देतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

लेझर द्वारे टॅटु नष्ट करणे
लेझर टॅटू रिमूवल ही सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे. उच्च-तीव्रतेच्या लेझर लहरी टॅटूच्या रंगद्रव्यांवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे त्या सूक्ष्म कणांमध्ये तुटतात. हे कण हळूहळू शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे काढून टाकले जातात.
फायदे:
- कोणत्याही प्रकारच्या टॅटूचे सुरक्षितपणे काढणे.
- त्वचेला नुकसान न पोहोचवणे.
- वेदनारहित आणि शास्त्रशुद्ध उपचार.

केसांची दुर्बीणीने तपासणी
केसांची दुर्बीनीने तपासनी केल्याने केसांच्या मूळ समस्यांचा शोध घेता येतो. योग्य उपचार मिळवून केस गळती, दुभंग, आणि अन्य केसांच्या समस्या टाळता येतात.
फायदे:
- केसांची मजबुती, आरोग्य आणि पोषण याविषयी माहिती मिळते.
- विशिष्ट समस्या ओळखून त्यावर योग्य उपचार निवडता येतात.
- केसांच्या मूळ समस्या सोडवून नवीन केसांची वाढ सुधारता येते.
- वेळेवर निदान करून केसांचे अधिक नुकसान टाळता येते.
- केसांच्या आरोग्याचा संपूर्ण अभ्यास करून संपूर्ण आरोग्य साधता येते.

चेहऱ्यावर नको असलेले केस घालविणे
चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे. चेहऱ्यावर अनावश्यक केस येण्याची समस्या अनेक तरुणींमध्ये होत असते. ओठांवर आणि हनुवटीवर अनावश्यक केस आल्यामुळे एकूणच सौंदर्यावरच बाधा निर्माण होते. चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
कारणे:
- अनुवांशिक घटक,
- सौंदर्य प्रसाधनांच्या चुकीच्या वापरामुळे,
- गर्भ निरोधक गोळ्यांच्या दुष्परिणामामुळे चेहऱ्यावर अनावश्यक केस येऊ शकतात.
- याशिवाय मानसिक तणाव ह्यासारख्या कारणांनी चेहऱ्यावर केस येऊ शकतात.

केस गळती
कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते.

डँड्रफवर उपचार
डोक्यातील कोंडा, ज्याला seborrheic dermatitis म्हणूनही ओळखले जाते, हे टाळू, भुवया किंवा नाकाजवळील त्वचेच्या पेशींचा अतिरेक आहे. हे मृत त्वचेच्या पेशींच्या जलद शेडिंगमुळे होते, परिणामी मोठ्या फ्लेक्स बनतात
डोक्यातील कोंडा कशामुळे होतो?
- बुरशीजन्य अतिवृद्धी: टाळूवर मालासेझिया बुरशीची भरभराट होते.
- स्कॅल्पचे अतिरिक्त तेल: परिणामी चिकट, तेलकट कोंडा होतो.
- अनियमित ब्रशिंग आणि केस धुणे.
- शैम्पूचा क्वचित वापर.
- तणाव आणि मानसिक आरोग्य स्थिती.

सोरायसिस – Psoriasis
सोरायसिस ही त्वचासंबंधी एक समस्या असून यामध्ये त्वचेच्या पेशींची जलदपणे वाढ होते. त्वचेवर लालसर, सुजयुक्त चट्टे येतात व तेथून पापुद्रे किंवा खवले निघत असतात. याला सोरियाटिक स्केल असे म्हणतात.
लक्षणे:
- त्वचेवर लालसर, सुज असणारे चट्टे येणे,
- चट्ट्याभोवती खाज येणे,
- चट्टे आलेल्या ठिकाणी वेदना किंवा आग होणे,
- त्वचेवरील चट्ट्यांवर पांढरट-चांदी कलरचे पापुद्रे येणे,
- त्वचेवर खाजवल्यास पापुद्रे भुसा होऊन खाली पडणे,
- त्वचा कोरडी होऊन क्रॅक पडून रक्तस्राव होणे,
- सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे.
अशी काही लक्षणे सोरायसिस या त्वचाविकारामध्ये असतात.

अंगावर पित्त उठणे - Urticaria
अंगावर पित्त उठणे या समस्येला आयुर्वेदात ‘शीतपित्त’ ह्या नावाने संबोधलेले आहे. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला ‘शीतपित्त’ असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया (Urticaria) किंवा Hives असे म्हणतात तर बोलीभाषेत ‘अंगावर पित्त उठणे’ असे म्हंटले जाते.
प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात.

नागीण आजार - Shingles
नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीझ झोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण रोग हा varicella-zoster नावाच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. याचं व्हायरसमुळे कांजण्या आजार होत असतो.
लक्षणे:
- नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होतात. त्याठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवितात.
- तेथील त्वचेची आग होते.
- दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके येतात व त्यानंतर त्यात पाणी धरते.
- पाच ते सहा दिवसात खपल्या धरतात व फोडही जातात. फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.

पांढरे कोड - Vitiligo
पांढरे कोड ह्या त्वचेसंबंधीत समस्येला पांढरे डाग या नावानेही ओळखतात. बऱ्याच जणांना त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या असते. त्वचेला रंग देण्यास आवश्यक असणाऱ्या पेशींमध्ये विकृती निर्माण झाल्याने ही समस्या होते. ह्या पेशींना melanocytes असे म्हणतात. ह्या पेशींमधून मेलॅनीन नावाचे स्किन pigment तयार होत असते. मात्र पांढरे कोडमध्ये त्वचेवरील ठराविक भागातील पेशींमधून हे मेलॅनीन स्किन pigment तयार होत नाही. तेंव्हा त्याठिकाणच्या त्वचेवर पांढरे डाग येतात त्या समस्येला पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात.
लक्षणे:
- शरीराच्या काही भागांवर लहान मोठ्या आकाराचे पांढरे डाग येतात.
- प्रामुख्याने सुरवातीला हातापायांची बोटे, ओठ, कोपर, गुडघा येथे डाग येतात.
- डाग आलेल्या ठिकाणी वेदना, खाज वैगेरे त्रास होत नाही. केवळ रंगामध्येच बदल झालेला असतो.
- पांढरे कोड आलेल्या ठिकाणच्या त्वचेचा रंग पांढरा होतो तसेच तेथील केसांचा रंग सुध्दा बदललेला असतो.
- या डागांमुळे प्रखर उन्हामध्ये काहीवेळा त्रास जाणवू शकतो.

कुष्ठरोग - Leprosy
कुष्ठरोग हा मायकोबॅक्टीरियम लेप्रे या जीवाणूमुळे होणारा एक भयंकर असा संसर्गजन्य आजार आहे. कुष्ठरोगाचे बॅक्टेरिया प्रामुख्याने हातापायांच्या आणि त्वचेच्या नसा (nerves) यावर विपरीत परिणाम करतात. महाभयंकर अशा कुष्ठरोग ह्या रोगास Hansen’s disease किंवा महारोग या नावानेही ओळखले जाते. कुष्ठरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार झाल्यास कुष्ठरोग लवकर बरा होणे शक्य आहे.
लक्षणे :
- त्वचेवर पांढरट किंवा लालसर चमकदार चट्टे येणे,
- मांसपेशी दुर्बल व कमकुवत बनणे,
- हात, पाय सुन्न पडणे, हातपाय बधिर होणे,
- बोटे वेडीवाकडी होणे,
- बाधित भागाच्या ठिकाणी संवेदना कमी होणे, यासारखी लक्षणे कुष्ठरोगात दिसू शकतात.

नेत्ररोग विभाग -
कम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी - कम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी मधे नेत्ररोगतज्ज्ञाद्वारे दृष्टीची सखोल तपासणी करणे, ज्यामध्ये दृष्टीदोष, चष्म्याची गरज, तसेच डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित विकारांचा शोध घेतला जातो. यामध्ये दृष्टीक्षेप, दाब तपासणी, वाचण्याची क्षमता, आणि रंगदृष्टी परीक्षण यांचा समावेश होतो.

गोनियोस्कोपी
गोनियोस्कोपी ही एक डोळ्यांच्या तपासणीसाठी वापरली जाणारी प्रक्रिया आहे, जी डोळ्यांच्या समोरील कक्षेत असलेल्या कोनाचा अभ्यास करण्यासाठी वापरला जातो, जिथे कॉर्निया आणि आयरिस एकत्र येतात. हे तपासणी विशेषतः काचबिंदू (ग्लुकोमा) किंवा डोळ्यांच्या इतर आजारांमुळे आतल्या दाबावर परिणाम करणाऱ्या परिस्थितींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया
मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो. आज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक प्रमुख कारण ठरत आहे.
लक्षणे:
- मोतीबिंदूमध्ये नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. सर्व काही अस्पष्ठ दिसते.
- रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे, रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वर्तुळे दिसतात.
- प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश सहन होत नाही.
- वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double Vision).
- चष्म्याचा नंबर सारखा सारखा बदलत असतो.

काचबिंदू आजार
काचबिंदू म्हणजे Glaucoma. काचबिंदू हा डोळ्यांचा एक गंभीर असा आजार आहे. ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य माहिती ही ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असते. मात्र या विकारात या महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला आढळतो.
लक्षणे :
- डोळ्यात तीव्र वेदना होणे,
- अस्पष्ट व अंधुक दिसू लागणे,
- कडेच्या वस्तू न दिसणे,
- डोळे लाल होणे,
- डोके दुखण
- मळमळ व उलट्या होणे, अशी लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ दवाखान्यात जावे.
- कोणतेही काचबिंदूची लक्षणे नसतानाही काचबिंदू असु शकतो याला Normal Tension Glaucoma म्हणतात.

डोळ्यांचा तिरळेपणा
तिरळेपणा हे प्रामुख्याने डोळ्यातील जन्मजात दोष असतो याशिवाय अपुरी दृष्टी किंवा डोळ्याच्या बाहेरील स्नायू (Muscles) मध्ये सैलपणा आल्यामुळे डोळ्यात तिरळेपणा होत असतो. तिरळेपणा ह्या डोळ्याच्या आजारास English मध्ये Strabismus, Squint असेही म्हणतात. तिरळेपणा हा एका किंवा दोन्ही डोळ्यांतही असू शकतो. तिरळेपणात डोळ्यातील बुबुळं एका सरळ रेषेत नसतात. काहीवेळा डोळा नाकाच्या बाजूस वळलेला असतो या प्रकारास esotropia असे म्हणतात. तर डोळा कानाच्या बाजूस वळलेला असल्यास त्या प्रकारास exotropia असे म्हणतात.
कारणे :
- आनुवंशिकता म्हणजे कुटुंबामध्ये आई-वडील यांना तिरळेपणा असल्यामुळे,
- डोळ्यांमधील जन्मजात दोषामुळे,
- डोळ्याच्या स्नायूंमधील कमजोरी असल्याने,
- याशिवाय रेटिनाचे विविध आजार, चष्म्याचा मोठा नंबर असणे यांमुळेही तिरळेपणाची समस्या निर्माण होऊ शकते.

आळशी डोळा (Amblyopia)
आळशी डोळा हा डोळ्यांचा एक आजार असून याला वैद्यकीय भाषेत अँब्लियोपिया किंवा lazy eye असे म्हणतात. डोळा आळशी बनणे म्हणजे, जेंव्हा आपला मेंदू डोळ्यातील आलेल्या दोषामुळे त्या डोळ्यातील सिग्नलकडे दुर्लक्ष करू लागतो तेंव्हा पाहण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने तो डोळा आळशी बनतो. दृष्टी अस्पष्ट होणारा हा डोळ्यांचा विकार प्रामुख्याने सहा वर्षांच्या आतील मुलांमध्ये आढळतो.
लक्षणे : लक्षणांमध्ये मुलास एका डोळ्याने अस्पष्ट दिसू लागते. अशी लक्षणे दिसून आल्यास त्याचे लवकर निदान आणि उपचार होणे गरजेचे असते. एम्ब्लियोपियावर योग्य वेळीच उपचार करणे आवश्यक असते. अन्यथा त्या डोळ्याची दृष्टी कायमस्वरूपी अस्पष्ट होऊ शकते.

फॅको सर्जरी
फॅको सर्जरी: ज्याला फॅकोएमल्सिफिकेशन (Phacoemulsification) असेही म्हटले जाते, ही मोतीबिंदूच्या उपचारासाठी सर्वात सामान्य आणि आधुनिक शस्त्रक्रिया आहे.
शस्त्रक्रियेची प्रक्रिया :
फॅको सर्जरीमध्ये, डॉक्टर डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाजूला एक छोटे छिद्र (2-3 मिमी) करतात. यानंतर, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर करून, मोतीबिंदू असलेल्या भिंगाला तुकडे करून, ते अल्ट्रासाउंड मशीनद्वारे काढले जाते. नंतर, त्याच ठिकाणी एक कृत्रिम भिंग (Intraocular Lens - IOL) स्थापित केले जाते.
फायदे :
- ही प्रक्रिया साधारणत: १५-३० मिनिटांमध्ये पूर्ण होते.
- फॅको सर्जरीमुळे डोळ्यात फारच लहान जखम होते.
- दृष्टीत त्वरित सुधारणा होते.
- या शस्त्रक्रियेत टाके (stitches) घालण्याची गरज नसते.

लॅसिक शस्त्रक्रिया
लॅसिक शस्त्रक्रिया : ज्याला लेझर-असिस्टेड इन सिटू केराटोमिल्युसिस असे म्हणतात, ही एक लोकप्रिय आणि आधुनिक शस्त्रक्रिया आहे जी डोळ्यांचे चष्म्याविना किंवा कॉन्टॅक्ट लेन्सशिवाय दृष्टी सुधारण्यासाठी वापरली जाते. लॅसिक शस्त्रक्रियेत डोळ्याच्या कॉर्नियाचा आकार लेझरच्या मदतीने बदलला जातो, ज्यामुळे दृष्टीदोष (जसे की मायोपिया, हायपरोपिया, आणि ॲस्टीग्मॅटिझम) दुरुस्त केले जातात.
शस्त्रक्रियेची प्रक्रिया :
लॅसिक शस्त्रक्रियेत, प्रथम डोळ्याच्या कॉर्नियाच्या वरच्या पातळ थरावर एक सूक्ष्म काप (फ्लॅप) तयार केला जातो. हा फ्लॅप उचलून, एक्साईमर लेझरच्या मदतीने कॉर्नियाचे पुनर्रचना (reshaping) केली जाते. यामुळे डोळ्याच्या कॉर्नियाचा प्रकाश फोकस अधिक अचूक होतो, ज्यामुळे दृष्टी स्पष्ट होते. शस्त्रक्रियेच्या शेवटी फ्लॅप परत ठेवला जातो, आणि तो नैसर्गिकरीत्या डोळ्यात चिकटतो.
फायदे :
- चष्म्यापासून सुटका
- ही प्रक्रिया साधारणतः 10-15 मिनिटांत पूर्ण होते. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच दृष्टी सुधारू लागते
- मायोपिया, हायपरोपिया, आणि ॲस्टीग्मॅटिझम अशा दृष्टीदोषांसाठी लॅसिक प्रभावी आहे.

डायबेटिक रेटिनोपॅथी
डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) हा डोळ्याचा एक गंभीर विकार आहे, जो मधुमेहामुळे (डायबेटिस) होतो. या विकारात डोळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या दृष्टीपटलाच्या रक्तवाहिन्या (retinal blood vessels) प्रभावित होतात. या रक्तवाहिन्यांमध्ये गळती होऊ शकते, किंवा त्या अवरोधित होऊ शकतात, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो.
डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे दृष्टी मंदावते, अंधुक किंवा अस्पष्ट दिसायला लागते, आणि गंभीर अवस्थेत अंधत्वही येऊ शकते. या विकारामुळे डोळ्याच्या पाठीमागील दृष्टीपटलावर (retina) नवीन, अस्थिर रक्तवाहिन्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.
डायबेटिक रेटिनोपॅथी हे दोन्ही डोळ्यांना प्रभावित करू शकते आणि मधुमेहाचा कालावधी व रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यानं याचा धोका वाढतो. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास या विकाराचा प्रभाव कमी करता येतो.
लक्षणे :
- अंधुक किंवा अस्पष्ट दृष्टी
- दृष्टीशक्तीत कमी होणे
- डोळ्यांसमोर काळे किंवा तरंगणारे डाग
- रंग ओळखण्यात समस्या
- डोळ्यांत ताण आणि वेदना जानवणे

Gallery




















