About Us
CHANDAK SUPERSPECIALITY HOSPITAL
⚫पोटविकार, लिव्हर विकार, पॅन्क्रियाज विकार व ॲडव्हांसड् एंडोस्कोपी सेंटर
⚫स्त्री रोग व प्रसुती विभाग
⚫मेडिसिन विभाग
चांडक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, परभणी येथे पोटविकार, लिव्हर विकार, पॅन्क्रियाज विकार व ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी सेंटर, स्त्रीरोग व प्रसुती, मेडिसिन विभाग हे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले विश्वासार्ह आरोग्यसेवा प्रदान करणारे केंद्र आहे.
डॉ. प्रणव चांडक (MBBS, MD Medicine, DrNB Gastroenterology) हे पोटविकार, लिव्हर विकार, पॅन्क्रियाज विकार व एंडोस्कोपी सुपरस्पेशालिस्ट असून पचनसंस्था व यकृताशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर विशेष उपचार करण्यात सक्शम आहेत. डॉ. सौ. दिशा चांडक (MBBS, DGO, DNB OBGY) या अनुभवी स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ असून महिलांच्या सर्वांगीण आरोग्यसेवेसाठी समर्पित आहेत. डॉ. जी. एम. चांडक (MBBS, MD Medicine) हे अनुभवी कन्सल्टंट फिजिशियन असून विविध वैद्यकीय आजारांच्या उपचारात तज्ज्ञ आहेत.
उपलब्ध सुविधा:
पोटविकार, लिव्हर विकार, पॅन्क्रियाज विकार -
- एंडोस्कोपी , EVL (रक्ताच्या उलट्यासाठी)
- कोलोनोस्कोपी
- सिग्मॉइडोस्कोपी
- पानक्रियाटायटीस मॅनेजमेंट
- IBD & IBS चे निदान व उपचार
- लिव्हर ICU, गॅस्ट्रो ICU,
- पोटातील नाणे व इतर वस्तू काढणे,
- इसॉफेजीअल डायलेटेशन,
- ग्लु इंजेक्शन
- ERCP (Diagnostic and Therapeutic)
- पित्त नलीकेचे स्टोन व CBD चे कॅन्सर
- पित्त नलीकेचे Stenting (Metallic & Plastic)
- एन्डोलुप फॉर जी.आय.ब्लीड,
- पॉलीपेक्टॉमी, डायलेटेशन, PD स्टेंटिंग, लिव्हर बायोप्सी
- Capsule Endoscopy
आतड्यांचे आजार : गिळायला त्रास होणे, रक्ताची उलटी होणे, वारंवार पोट दुखी, हायपर ॲसीडीटी, पोटात गॅस जमा होणे, पोट फुगणे, वारंवार लुज मोशन होणे, पोट साफ न होणे
लिव्हरचे आजार : फॅटी लिव्हर (लिव्हर मध्ये चरबी जमा होणे), कावीळ (HBV, HBC), लिव्हर सी-हासीस, वारंवार पोटात पाणी जमा होणे, दारूमुळे होणारे लिव्हरचे आजार, लिव्हरचा कॅन्सर, लिव्हर प्रत्यारोपन सल्ला
पॅन्क्रियाजचे आजार : पॅन्क्रियाटायटीस, पॅन्क्रियाज कॅन्सर
पित्ताशयाचे आजार : पित्ताशयावरील सुज, पित्त नळी मधील खडे, पित्त नळीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर
स्त्री रोग विभाग -
OBSTETRICS : गर्भधारणा पूर्व तपासणी व सल्ला, गर्भावस्थानिदान व प्रसुती पूर्व तपासणी व उपचार, प्रसुती पश्चात तपासनी व उपचार, गरोदरपणातील रक्तदाब, मधुमेह थायरॉईड, कावीळ यावर उपचार, वेदनारहित प्रसुती, नैसर्गिक प्रसुती,सीझेरियन प्रसुती
GYNAECOLOGY : वयात येणाऱ्या मुला मुलींना मार्गदर्शन, विवाहपूर्व समुपदेशन व मार्गदर्शन, गर्भनिरोधक व कुटुंब नियोजन, रजोनिवृत्ती चिकित्सा, मासिक पाळीचे आजारांवर उपचार, लसीकरण, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी, गर्भपिशवी काढणे
LAPAROSCOPY : दुर्बिणीद्वारे सर्व प्रकारच्या गर्भाशय व अंडाशयाच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे ट्युब मधील गर्भ काढणे, दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढणे, दुर्बिणीद्वारे गर्भाशयाच्या गाठी काढणे, दुर्बिणीद्वारे वंध्यत्व उपचार, दुर्बिणीद्वारे बीजांडाच्या शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या गर्भाशय व अंडाशयाच्या शस्त्रक्रिया.
Products/Services
चांडक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
उपलब्ध अत्याधुनिक मशिनरी :-
- जगप्रसिध्द ऑलिम्पस (Olympus) कंपनीची गॅस्ट्रोस्कोप ड्युओडेनोस्कोप व कोलोनोस्कोपसह ॲडव्हानसड् एंडोस्कोपी सिस्टिम.
- ॲडव्हानसड् एंडोस्कोपी सूट विथ मॉडर्न फॅसिलिटीज.
- ॲलेंजरस (Allenger's) कंपनीचे अत्याधुनिक 'फ्लॅट पॅनल सी-आर्म' (C-Arm) मशिन.
- अर्बे (Erbe) कंपनीची अत्याधुनिक कॉटरी मशिन (Vio-300s).
- मेडिसिस (मेडिसिस) चे ऍनेस्थेशिया वर्क स्टेशन.
- वेल ईक्वीपड (सुसज्ज) आय.सी.यू. (ICU)

चांडक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
डॉ. प्रणव चांडक
- DrNB Gastroenterology (NBEMS, New Delhi)
- MD Medicine (KMC, Manipal)
- MBBS (IGGMC, Nagpur)
- Fellowship in Advanced Endoscopy
- Member of Society of Gastrointestinal Endoscopy of India (SGEI)
- MACG (USA)
- Consultant Gastroenterologist, Hepatologist & Therapeutic Endoscopist
- पोटविकार, लिव्हर विकार, पानक्रियाज विकार व एंडोस्कोपी सुपरस्पेशालिस्ट
- MMC Reg. No. : 2014083692
परभणी जिल्ह्यातील पहिले गॅस्ट्रोएंटरॉलॉजीस्ट (पोटविकार, लिव्हर विकार, पानक्रीयाज विकार व डायग्नोस्टीक व थेरॅप्युटीक एंडोस्कोपी तज्ञ).
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून वैद्यकीय पदवी प्राप्त.
सुप्रसिद्ध कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालय, मणीपाल येथून पदव्युत्तर पदवी पूर्ण.
मुंबई येथील प्रसिद्ध नायर हॉस्पिटल येथे वरिष्ठ निवासी पदावरील कामाचा अनुभव.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE), नवी दिल्ली अंतर्गत, ८६० खाटांच्या भिलाई स्टील प्लांटच्या पब्लिक सेक्टर हॉस्पिटल, भिलाई येथून सुप्रसिद्ध डॉ. एस.के. इस्सर व डॉ. जीवनलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सुपर स्पेशालिटी ची पदवी प्राप्त.
फेलोशिप इन ॲडव्हान्सड् एंडोस्कोपी चे शिक्षण.
सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी ऑफ इंडिया (SGEI) चे सदस्य.
एमएसीजी (USA) चे सदस्य.
उत्तर भारतातील अत्यंत व्यस्त आणि सर्वाधिक प्रोसिजर होणाऱ्या प्रयागराज येथील सुप्रसिद्ध डॉ. आलोक मिश्रा यांच्या हॉस्पिटलमध्ये २ वर्ष कन्सलटंट गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट म्हनुण प्रदीर्घ अनुभव.

चांडक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
डॉ. सौ. दिशा चांडक
- MBBS, DGO, DNB (ObGy)
- स्त्रीरोग तज्ञ
KLE युनिव्हर्सिटी अंतर्गत जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, बेळगाव येथून वैद्यकीय पदवी प्राप्त.
MGM वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद येथून पदव्युत्तर पदविका पूर्ण.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE), दिल्ली अंतर्गत कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटल व रिजनल कॅन्सर सेंटर, प्रयागराज येथून पदव्युत्तर पदवी पूर्ण.
श्री शंकराचार्य मेडिकल सायन्सेस, भिलाई येथून वरिष्ठ निवासी पदावरील कामाचा अनुभव.

दुर्बिणीद्वारे अन्ननलिका व पोटाची तपासणी
दुर्बिणीद्वारे अन्ननलिका व पोटाची तपासणी (अप्पर जीआय एंडोस्कोपी) ही एक आधुनिक, सुरक्षित व प्रभावी निदान पद्धत आहे. यामध्ये तोंडावाटे एक बारीक, लवचिक व कॅमेऱ्याने युक्त नळी अन्ननलिका, जठर व लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात नेली जाते.
या तपासणीद्वारे ॲसिडिटी, अल्सर, रक्तस्राव, गाठी, कर्करोग, अन्ननलिकेतील सूज, यकृतविकारांमुळे निर्माण झालेल्या शिरांच्या फुगवट्यांचे अचूक निदान करता येते. आवश्यक असल्यास ऊतक नमुना (बायोप्सी) घेणे किंवा काही उपचार करणेही शक्य होते. ही तपासणी जलद, वेदनारहित व अत्यंत उपयुक्त मानली जाते.

दुर्बिणीद्वारे आतड्यांची तपासणी (कोलोनोस्कोपी)
दुर्बिणीद्वारे आतड्यांची तपासणी (कोलोनोस्कोपी) ही मोठ्या आतड्याचे व मलाशयाचे अचूक निदान करण्यासाठी केली जाणारी आधुनिक एंडोस्कोपिक तपासणी आहे. यामध्ये गुदमार्गावाटे कॅमेऱ्याने युक्त बारीक, लवचिक नळी आतड्यात प्रवेश करून त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते.
पोटदुखी, शौचात रक्त येणे, दीर्घकालीन जुलाब किंवा बद्धकोष्ठता, वजन कमी होणे, आतड्यांतील सूज, अल्सर, पॉलिप्स तसेच आतड्यांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी ही तपासणी केली जाते. आवश्यक असल्यास ऊतक नमुना (बायोप्सी) घेणे किंवा पॉलिप्स काढणेही शक्य होते. ही तपासणी सुरक्षित, प्रभावी व आतड्यांच्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.

सिग्मॉइडोस्कोपी
सिग्मॉइडोस्कोपी ही मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाची (रेक्टम व सिग्मॉइड कोलन) तपासणी करण्यासाठी केली जाणारी सुरक्षित व प्रभावी एंडोस्कोपिक प्रक्रिया आहे. यामध्ये एक बारीक, लवचिक कॅमेरा गुदद्वारामार्गे आत सोडून आतड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. गुदद्वारातून रक्तस्राव होणे, सतत जुलाब किंवा बद्धकोष्ठता, पोटदुखी, आतड्यांतील सूज, अल्सर, पॉलिप्स, कर्करोगाची शंका किंवा इन्फ्लेमेटरी बाऊल डिसीज (IBD) यांचे निदान करण्यासाठी ही तपासणी केली जाते. वेळेवर सिग्मॉइडोस्कोपी केल्यास आजाराचे अचूक निदान होऊन योग्य उपचार लवकर सुरू करता येतात

एंडोस्कोपिक व्हेरिसियल लिगेशन (EVL)
एंडोस्कोपिक व्हेरिसियल लिगेशन (EVL) ही अन्ननलिकेतील (इसोफॅगस) सुजलेल्या व रक्तस्राव होण्याची शक्यता असलेल्या शिरांवर उपचार करण्याची एंडोस्कोपिक प्रक्रिया आहे. यामध्ये विशेष रबर बँड लावून त्या शिरा बंद केल्या जातात. लिव्हर सिरोसिसमुळे निर्माण होणारा जीवघेणा रक्तस्राव थांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी ही सुरक्षित व प्रभावी प्रक्रिया केली जाते.

दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडे काढणे (ईआरसीपी)
दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडे काढणे ही एक प्रगत एंडोस्कोपिक उपचार पद्धत असून तिला ईआरसीपी असे म्हणतात. यामध्ये तोंडावाटे विशेष दुर्बीण अन्ननलिका, पोट व लहान आतड्यात नेऊन पित्तनलिकेपर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर विशेष उपकरणांच्या साहाय्याने पित्तनलिकेमध्ये अडकलेले खडे काढले जातात.
कावीळ, पोटदुखी, ताप, पित्तनलिकेतील अडथळा किंवा स्वादुपिंडाच्या दाहाची समस्या असल्यास ही प्रक्रिया केली जाते. यामुळे पित्ताचा प्रवाह सुरळीत होतो, लक्षणांमध्ये आराम मिळतो व गुंतागुंत टाळण्यास मदत होते. ही पद्धत सुरक्षित, प्रभावी व शस्त्रक्रियेशिवाय उपचार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते.

दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेमध्ये स्टेंट बसवणे
दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेमध्ये स्टेंट बसवणे ही एक प्रगत एंडोस्कोपिक उपचार पद्धत आहे. अन्ननलिकेमध्ये गाठ, कर्करोग किंवा इतर कारणांमुळे निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यामध्ये तोंडावाटे विशेष दुर्बीण अन्ननलिकेत नेऊन अरुंद झालेल्या भागात धातूचा किंवा विशेष जाळीदार स्टेंट बसवला जातो.
त्यामुळे अन्ननलिका खुली राहते व अन्न व द्रवपदार्थ सहज गिळता येतात. गिळताना त्रास होणे, अन्न अडकणे किंवा अन्ननलिकेतील अडथळा असल्यास ही प्रक्रिया उपयुक्त ठरते. ही पद्धत सुरक्षित, प्रभावी व शस्त्रक्रियेशिवाय आराम देणारी मानली जाते.

नळीद्वारे पोटामध्ये अन्नपुरवठा करणे
नळीद्वारे पोटामध्ये अन्नपुरवठा करणे ही एक विशेष एंडोस्कोपिक उपचार पद्धत असून तिला पर्क्युटेनियस एंडोस्कोपिक गॅस्ट्रोस्टोमी (पीईजी) असे म्हणतात. ज्या रुग्णांना तोंडावाटे अन्न किंवा पाणी घेणे शक्य नसते, त्यांच्यासाठी पोटामध्ये एक विशेष नळी बसवून अन्न, द्रवपदार्थ व औषधे दिली जातात.
मेंदूविकार, पक्षाघात, अन्ननलिकेतील अडथळा किंवा गिळण्यास गंभीर अडचण असल्यास ही प्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्णाला आवश्यक पोषण मिळते, शरीराची ताकद टिकून राहते व आरोग्य सुधारण्यास मदत होते. ही पद्धत सुरक्षित, प्रभावी व दीर्घकालीन पोषणासाठी उपयुक्त मानली जाते.

कावीळ (JAUNDICE)
कावीळ हे यकृतासंबधित आजारांचे एक लक्षण असू शकते. काविळमध्ये त्वचा, नखे आणि डोळे पिवळसर होतात. रक्तामध्ये बिलीरुबीन (Bilirubin) चे प्रमाण वाढल्याने काविळीची स्थिती उद्भवते. बिलीरुबीन हा तांबड्या पेशींमध्ये आढळणारा पिवळसर लाल रंगाचा घटक पदार्थ असतो.
यकृताद्वारे हा पदार्थ रक्तातून काढून टाकला जातो. त्यानंतर Bilirubin पित्ताशयत पाठवला जातो. त्यानंतर तो पदार्थ मलावाटे बाहेर टाकला जातो. जर हा पदार्थ मलावाटे बाहेर टाकला गेला नाही तर त्याची रक्तामध्ये Bilirubin ची अधिक वाढ होते त्यामुळे त्वचा, नखे, डोळे पिवळ्या रंगाची होतात.

अक्यूट आणि क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस मॅनेजमेंट
अक्यूट आणि क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिस मॅनेजमेंट म्हणजे स्वादुपिंडाच्या (Pancreas) अचानक किंवा दीर्घकालीन सूज व नुकसानीवर केले जाणारे सर्वसमावेशक उपचार. अक्यूट पॅन्क्रियाटायटिसमध्ये तीव्र पोटदुखी, उलट्या व गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी तातडीचे उपचार केले जातात.
क्रॉनिक पॅन्क्रियाटायटिसमध्ये वारंवार होणारी वेदना, पचनातील अडचणी व मधुमेहाचा धोका नियंत्रित करण्यावर भर दिला जातो. यामध्ये औषधे, आहार व्यवस्थापन, एंडोस्कोपिक उपचार, स्टेंटिंग आणि आवश्यकतेनुसार इतर प्रगत उपचारांचा समावेश असतो, ज्यामुळे रुग्णाचे आरोग्य व जीवनमान सुधारते.

लिव्हर सिरोसिस
लिव्हर सिरोसिस म्हणजे यकृताच्या पेशींना दीर्घकाळ झालेल्या नुकसानीमुळे यकृतामध्ये कायमस्वरूपी व्रण (Scar Tissue) तयार होऊन त्याची कार्यक्षमता कमी होण्याची गंभीर अवस्था होय. दारूचे अतिसेवन, फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस बी किंवा सी यांसारख्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो. यामुळे पोटात पाणी साचणे, कावीळ, रक्तस्राव, गोंधळलेली मानसिक अवस्था तसेच लिव्हर निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळेवर निदान व उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य औषधे, आहारातील बदल, कारणांवर नियंत्रण आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने आजाराची प्रगती कमी करता येते व गुंतागुंत टाळता येते.

पोटात पाणी होणे
पोटात पाणी होणे (Ascites) म्हणजे पोटाच्या आतील पोकळीत असामान्य प्रमाणात द्रव साचणे होय. हे प्रामुख्याने लिव्हर सिरोसिस, लिव्हरचे गंभीर आजार, काही कर्करोग, हृदयविकार किंवा मूत्रपिंडाच्या विकारांमुळे होऊ शकते. यामुळे पोट फुगणे, वजन वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अस्वस्थता जाणवू शकते. पोटात पाणी होणे हे अनेकदा गंभीर आजाराचे लक्षण असते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. वेळेवर तपासणी व उपचार केल्यास मूळ कारणावर नियंत्रण मिळवता येते, गुंतागुंत टाळता येते आणि रुग्णाचे आरोग्य व जीवनमान सुधारता येते.

पोटातील नाणे व इतर वस्तू काढणे
पोटातील नाणे, बटण बॅटरी, पिन, हाडाचा तुकडा किंवा इतर परकीय वस्तू चुकून गिळली गेल्यास ती अन्ननलिका, जठर किंवा आतड्यांमध्ये अडकू शकते. अशा वेळी एंडोस्कोपीच्या साहाय्याने विशेष उपकरणांद्वारे ती वस्तू सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला “पोटातील नाणे व इतर वस्तू काढणे” असे म्हणतात.
ही प्रक्रिया अन्ननलिकेला इजा होणे, रक्तस्राव, छिद्र पडणे, संसर्ग किंवा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होणे यांसारख्या गंभीर गुंतागुंती टाळण्यासाठी केली जाते. वेळेवर उपचार केल्यास रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज अनेकदा टाळता येते व सुरक्षित पुनर्वसन शक्य होते.

स्त्री वंध्यत्व
गर्भधारणा होण्यास असमर्थ असणे म्हणजे वंध्यत्व. गर्भधारण करण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोहोंची समान भुमिका असते. वंध्यत्वाची 30% कारणे ही पुरुषासंबंधी असतात. तर 30% कारणे ही स्त्रीसंबंधी असतात. आणि उरलेली 40% कारणे ही दोहोसंबंधी असतात.

आय. यु. आय. (IUI) & इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)
अंतर्गर्भाशयी गर्भधारणा (IUI) ही एक वंध्यत्व उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये विशेषरित्या प्रक्रिया केलेले शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात इंजेक्शन द्वारे ओव्ह्युलेशनच्या काळात सोडले जातात, ज्यामुळे गर्भधारणेची संधी वाढते.
इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) ही एक आधुनिक आणि प्रभावी वंध्यत्व उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये स्त्रीच्या अंडाशयातील अंडी बाहेर काढून त्यांचे प्रयोगशाळेत पुरुषाच्या शुक्राणूंशी मिलन घडवले जाते. तयार झालेल्या भ्रूणाला काही दिवसांच्या वाढीनंतर स्त्रीच्या गर्भाशयात पुन्हा ठेवले जाते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते.

लॅप्रोस्कोपिक & गाइनॅक सर्जरीज
लॅप्रोस्कोपिक गाइनाकोलॉजिकल शस्त्रक्रिया म्हणजे लहान छिद्रे आणि कॅमेऱ्याचा वापर करून केलेली कमीत-कमी वेदनेत होनारी शस्त्रक्रिया, जी स्त्रीरोगाशी संबंधित समस्या निदान आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते.
याचे फायदे म्हणजे पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत कमी वेदना, जलद बरे होणे, आणि गुंतागुंतीचा कमी धोका. त्यामुळे रुग्णांना सामान्य जीवनशैलीत लवकर परतण्यास मदत होते आणि एकूणच सुधारित परिणाम मिळतात.

सोनोग्राफी
गरोदरपणात गर्भाची कमीत कमी ४ वेळा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. सध्याच्या वैद्यकीय माहितीनुसार सोनोग्राफीचा गर्भावर कोणाताही दुष्परिणाम होत नाही. कलर डॉप्लर सोनोग्राफी आवश्यक असेल तरच करावी. सोनोग्राफीमुळे खालील माहिती मिळते.
पहिली सोनोग्राफी: शेवटच्या पाळीच्या तारखेपासून ०८ आठवड्यात म्हणजेच २ महिन्याच्या आत.
- गर्भ हा गर्भाशयातच वाढ आहे का ?
- गर्भाची वाढ
- एका पेक्षा जास्त गर्भ
- द्राक्षगर्भ / निर्जीव गर्भ
दुसरी सोनोग्राफी (NT Scan): शेवटच्या पाळीच्या तारखेपासून 13 आठवडे व 6 दिवसात म्हणजेच तिसऱ्या महिन्यात
- गर्भाची वाढ
- गर्भाला मतिमंदता (Down Syndrome) याचे निदान करणरी Sonography
- गर्भामध्ये काही व्यंग (NT Scan)
तिसरी सोनोग्राफी (Anomaly Scan): 18 ते 22 आठवड्यांपयंत (५ व्या महिन्यामध्ये)
- गर्भाची वाढ
- गर्भामध्ये काही व्यंग
- गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
- गर्भाशयातील वारेची (Placenta) स्थिती
चौथी सोनोग्राफी: शेवटच्या पाळीपासून 28 ते 36 आठवड्यांपर्यंत (9 व्या महिन्यात).
- गर्भाची वाढ
- गर्भाभोवती पाण्याचे प्रमाण
- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कलर डॉप्लर सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार)

गर्भधारणेपूर्व मार्गदर्शन
गर्भधारणेपूर्व मार्गदर्शनामधे गर्भधारणा करण्याची योजना आखणाऱ्या व्यक्ती किंवा जोडप्यांना आरोग्य, जीवनशैली, आणि वैद्यकीय घटकांविषयी चर्चा आणि मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी आवश्यक सल्ला दिला जातो.
याचे फायदे म्हणजे संभाव्य जोखीम ओळखणे व त्याचे व्यवस्थापन करणे, प्रजनन क्षमता सुधारणे आणि यशस्वी आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक वातावरण निर्माण करणे.

प्रसुतीपूर्व तपासणी व उपचार
एएनसी तपासणी म्हणजे प्रसवपूर्व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान काही वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. या सल्लामसलतीमुळे आई आणि वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याची नियमित देखरेख होते आणि संभाव्य समस्यांचे लवकर निदान करता येते.
एएनसीमध्ये विविध तपासण्या, पोषणाविषयी सल्ला आणि निरोगी गर्भधारणेसाठी मार्गदर्शन समाविष्ट असते, ज्यामुळे सुखद प्रसूती अनुभवास प्रोत्साहन दिले जाते.

प्रसव (सामान्य व सिझेरियन)
सामान्य प्रसव हा नैसर्गिक पद्धतीने होणारा प्रसव आहे, जो सहसा कमी गुंतागुंतीचा असतो आणि त्यातून लवकर बरे होता येते. एलएससीएस (लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन) ही शस्त्रक्रियात्मक पद्धत आहे ज्यामध्ये आईच्या पोटावर छेद करून बाळ बाहेर काढले जाते. सामान्य प्रसव नैसर्गिक अनुभव देतो, तर एलएससीएस वैद्यकीय कारणांमुळे किंवा गुंतागुंतीमुळे निवडले जाते, ज्यामुळे सुरक्षित प्रसव सुनिश्चित होतो.

प्रसुति नंतर उपचार व मार्गदर्शन
प्रसवोत्तर काळात मातेस शारीरिक आणि मानसिक पुनर्बल आवश्यक असते. योग्य आहार, स्वच्छता, विश्रांती आणि स्तनपानाविषयी मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.
डॉक्टर व तज्ञांचा सल्ला घेऊन टाक्यांची काळजी, हार्मोनल बदल, मानसिक आरोग्य आणि नवजात बालकाच्या चांगल्या आरोग्यासाठी योग्य उपचार व सल्लामसलत आवश्यक आसते.

कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया
गर्भनिरोधक सल्लामसलतीत व्यक्तींना जन्मनियमनाच्या पद्धतींविषयी माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे ते सुज्ञ निर्णय घेऊ शकतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये ट्यूबल लिगेशन किंवा नसबंदी सारख्या शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे प्रजनन नियंत्रित करता येते.
हे दोन्ही नियोजित गर्भधारणेस प्रोत्साहन देतात आणि शस्त्रक्रियात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास सक्षम करतात.

PCOD
PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक अंडाशय डिसऑर्डर. पीसीओडी ही महिलांमध्ये उद्भवणारी हार्मोनल संबधित समस्या आहे. 15 ते 44 अशा रिप्रॉडक्टीव्ह वयोगटातील कोणत्याही स्त्रियांमध्ये ही समस्या होऊ शकते. पीसीओडी ही समस्या प्रामुख्याने हार्मोन्समधील असंतुलनामुळे उद्भवते.
यामध्ये स्त्रीच्या शरीरातील एंड्रोजन ह्या हार्मोनची पातळी वाढत असते. एंड्रोजन हे पुरुष हार्मोन असून स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक झाल्यास ही समस्या होत असते. यामुळे स्त्रीमध्ये अंडाशयावर गाठी तयार होऊ लागतात. तसेच यामुळे अंडाशयाच्या आकारात वाढ होऊन त्याभोवती फॉलिकल्स साठू शकतात. यामुळे अंडाशयाच्या कार्यावर याचा परिणाम होतो. अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवू शकते.

श्वेतपदर (Leukorrhea)
मासिकपाळी येण्याच्या काही दिवस आधी काही स्त्रियांमध्ये अंगावरून पांढरे जाणे किंवा गर्भधारण झाली असताना किंवा संभोगानंतर असा योनीमार्गातून पांढरा चिकट स्राव कळतनकळत जाणं नॉर्मल असतं.
पण जाणवण्याइतपत सतत योनीमार्गातून स्त्राव जाणं, त्याचं प्रमाण वाढणं, त्या स्त्रावाला वास येणं, त्याबरोबर कंबरदुखी, योनीमार्गाच्या आत आणि बाहेरील बाजूस खाज सुटणं यासारख्या तक्रारींकडे स्त्रीयांनी निश्चितच दुर्लक्ष करू नये.

Gallery













