About Us

आशीर्वाद
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

ISO 9001:2015 Certified Hospital

N.A.B.H Certified

एक पाऊल उत्तम आरोग्यासाठी



डॉ. सुरेश एम. छजेड

  • एम. डी. (मेडिसिन)
  • कन्सल्टींग फिजीशियन

डॉ. नितेश एस. छाजेड

  • एम.डी. (मेडिसिन), आय.डी.सी.सी.एम.
  •  कन्सल्टींग फिजीशियन ॲण्ड इंटेन्सीवीस्ट

डॉ. शैलेश एस. छाजेड

  • एम. एस. (ऑप्थ.) एफ.जी.ओ.
  •  नेत्ररोग तज्ञ

VISITING CONSULTANT :

डॉ. कल्याणसिंग गोठवाल

  • ऑन्कोलॉजिस्ट
  • महिन्याचा पहिला शनिवार

डॉ. राहुल रुईकर

  • न्यूरोलॉजिस्ट
  • महिन्याचा पहिला बुधवार

डॉ. अक्षय गाडिया

  • स्पाइन सर्जन
  • महिन्याचा दुसरा रविवार

डॉ. निकेत मंत्री

  • हेमॅटोलॉजिस्ट
  • महिन्याचा दुसरा शनिवार

डॉ. आकाश खरात

  • न्यूरोलॉजिस्ट
  • महिन्याचा दुसरा शनिवार व चौथा रविवार

डॉ. कपिल पोरे

  • ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट
  • महिन्याचा चौथा बुधवार

डॉ. श्रीगणेश बरनेला

  • नेफ्रोलॉजिस्ट
  • महिन्याचा चौथा शनिवार


उपलब्ध सुविधा:

अतिदक्षता विभाग-

  • Ventilator - कृत्रिम श्वासोच्छवासासाठी
  • सेन्ट्रल ऑक्सिजन अतिदक्षता विभाग
  • Ventilator - कृत्रिम श्वासोच्छवासासाठी
  • सेन्ट्रल ऑक्सिजन व मॉनिटरींग सिस्टीम
  • स्ट्रेस टेस्ट (टी.एम.टी.) आणि रडी इको
  • सर्पदंश, विषबाधा उपचार

मेडीसिन विभाग -

  • हृदयरोग मेंदुचे आजार, अर्धांगवायु उपचार
  • मधुमेह, रक्तदाब,
  • दमा क्षयरोग उपचार
  • किडनीचे आजार, यकृताचे आजार
  • डायलिसीस युनिट

नेत्र विभाग -

  • नामांकीत कंपनीच्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे डोळ्यांची तपासणी, रोग निदान व उपचार
  • कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी व चष्म्याचा अचूक नंबर
  • बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
  • फेकोलेन्सइम्प्लान्टेशन (घडीचे लेन्स)
  • कृत्रिम भिंगारोपण कृत्रिम भिंगाचा मशिनद्वारे अचूक नंबर
  • कॉन्टॅक्ट लेन्स (अदृष्य भिंग) तिरळेपणा रोग निदान, उपचार
  • काचबिंदुवरील मायक्रोस्कोपीक सर्जरी
  • लासूरवरील कायम स्वरूपी शस्त्रक्रिया
  • मधुमेह व रक्तदाब या सोबत डोळ्यांचे आजार असणाऱ्या रुग्णांचे रोग निदान, सल्ला व उपचार
  • फेको सर्जरी सेंटरव

Products/Services

आशीर्वाद मल्टीस्पेशाली हॉस्पिटल

आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेल्या खालील कंपनी CASHLESS मध्ये उपलब्ध आहेत -

  • SBI Insurance
  • Oriental Insurance - All TPA's
  • National Insurance
  • Care Health Insurance
  • Go-Digit Insurance
  • Medi Assists Insurance
  • Larisha Health Care Services Pvt. Ltd. Insurance (Gov, employee)
  • Universal Sompo General Insurance
  • Bajaj Allianz Insurance
  • ECHS (Ex-Serviceman Contributory Health Scheme) ARMY
  • Police plan - In Process
  • Star Health - In Process
  • ICICI Lombard - In Process
  • HDFC ERGO - In Process
  • New India Insurance - In Process
  • United India Insurance - In Process

नातेवाईकांनी पेशंट अडमिट करत असतांना INSURANCE कार्ड व आधार कार्ड सोबत असणे आवश्यक राहील.

आशीर्वाद मल्टीस्पेशाली हॉस्पिटल

आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. सुरेश एम. छजेड

  • एम. डी. (मेडिसिन)
  • कन्सल्टींग फिजीशियन

आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. नितेश एस. छाजेड

  • एम.डी. (मेडिसिन), आय.डी.सी.सी.एम.
  •  कन्सल्टींग फिजीशियन ॲण्ड इंटेन्सीवीस्ट

आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

डॉ. शैलेश एस. छाजेड

  • एम. एस. (ऑप्थ.) एफ.जी.ओ.
  •  नेत्ररोग तज्ञ

आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack

कोरोनरी धमनीद्वारे हृद्यास रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. जेंव्हा हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही कारणांनी अडथळा निर्माण होऊन हृदयाचा रक्तपुरवठा खंडीत होतो व त्यामुळे हृदयाचे स्नायू (Heart Muscles) निकामी होतात तेंव्हा हार्ट अटॅक म्हणजेच हृद्यविकाराचा झटका येतो.

लक्षणे:

  • छातीत दडपल्यासारखे वाटणे 
  • ‎छातीत दुखायला लागणे 
  • ‎छातीच्या मध्यभागापासून वेदनांची सुरवात होते. नंतर त्या वेदना मान, खांदा, हनुवटी डावा हात यांपर्यंत पोहचतात.
  • ‎बैचेन व अस्वस्थ होणे, भीती वाटणे
  • ‎अचानक जास्त प्रमाणात घाम येणे.
  • ‎अशक्तपणा जाणवणे,
  • ‎उलटी किंवा मळमळ होणे
  • ‎चक्कर येणे
  • ‎दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे,
  • ‎श्वास जोरजोरात घ्यावा लागणे ही लक्षणे हार्ट अटॅकमध्ये जाणवतात.

हृदयविकाराचा झटका येणे – Heart Attack

मधुमेह (शुगर) - Diabetes mellitus

स्वादुपिंड (Pancreas) ह्या अवयवातून इन्सुलिन स्त्रावाची निर्मिती होत असते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे कार्य या इन्सुलिन स्त्रावामार्फत होत असते. मात्र मधुमेहाच्या अवस्थेमध्ये इन्सुलिनची उत्पत्ती कमी झाल्याने किंवा शरीराच्या पेशी ह्या इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसल्यास, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले जात नाही. त्यामुळे रक्तातील साखर वाढू लागते. अशावेळी त्या स्थितीला मधुमेह म्हणजेच डायबेटिस असे म्हणतात.

 लक्षणे:

  • वारंवार लघवीला जावे लागणे
  • वारंवार तहान लागल्यासारखे वाटणे
  • अचानकपणे वजन घटणे
  • अशक्तपणा, चक्कर येणे
  • अधिक भूक लागणे
  • हात किंवा पायांत सतत टोचल्याप्रमाणे वाटणे
  • डोळ्यांचे विकार, त्वचा विकार होणे
  • मुत्रमार्गामध्ये इन्फेक्शन होणे
  • जखम भरून येण्यास जास्त कालावधी लागणे
  • मळमळ व उलटी होणे अशी लक्षणे मधुमेह मध्ये जाणवू शकतात.

मधुमेह (शुगर) - Diabetes mellitus

थायरॉइड संबंधि आजार

आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.

मात्र जेंव्हा थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास किंवा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास थायरॉइडचा त्रास सुरू होतो. त्या त्रासाला thyroid disease असे म्हणतात. थायरॉइडच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. * थायरॉइड ग्रंथी रक्तप्रवाहात थायरॉइड संप्रेरकांची पातळी नियंत्रित करते. थायरॉइड ग्रंथी पुरेशी हार्मोन्स तयार करत नसेल तर हायपोथायरॉइडिझम होते. तर थायरॉइड ग्रंथी जास्त हार्मोन्स तयार करत असेल तर हायपरथायरॉइडिझम होते.

थायरॉईड ची लक्षणे:

  • सतत थकवा आणि अशक्तपणा
  • वजन वाढणे किंवा कमी होणे
  • मूड स्विंग्स
  • थंडी किंवा उष्णता जाणवणे
  •  पाचक समस्या
  • स्नायू आणि सांधेदुखी
  • मासिक पाळीची अनियमितता
  • चेहऱ्यावर सूज येणे
  • टोन बदलणे
  • केस गळणे

थायरॉइड संबंधि आजार

उच्च रक्तदाब (High Blood Pressure)

सध्याचे तणावग्रस्त जीवन, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाच्या विकाराचे प्रमाण वृद्धांबरोबरचं तरुणांमध्येही अधिक वाढले आहे. तरुण वयात उद्भवणाऱ्या या समस्येचे रूपांतर पुढे मोठ्या हृदयविकारात होत आहे. सामान्यतः स्वस्थ व्यक्तीमध्ये 140/90 mm Hg पेक्षा अधिक रक्तदाब वारंवार दर्शवत असल्यास त्या स्थितीस उच्च रक्तदाब (Hypertension) असे म्हणतात. 

 लक्षणे : रक्तदाब वाढल्यानंतर त्याची लक्षणं प्रत्येकाला कळून येतातच असं नाही. बर्‍याच वेळा रक्तदाब वाढल्यास,

  • वारंवार डोके दुखणे. डोकं जड होणं,
  • थकवा जाणवणे, चक्कर येणे.
  • कानशिलं गरम होणं,
  • निवांत झोप लागत नाही. झोपमोड होते.
  • छातीत धडधडणे, छातीत कळ येणे, हृद्य स्पंदन अधिक जाणवणे.
  • अल्पश्रमानंतरही श्वास, धाप लागणे.
  • वारंवार चिडचिड होणे.
  • अंधूक दिसणं, अचानक नजर कमजोर होणे यांसारखी लक्षणे उच्च रक्तदाबामध्ये दिसून येऊ शकतात.

उच्च रक्तदाब (High Blood Pressure)

क्षयरोग – Tuberculosis

क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. क्षयरोगाला ट्यूबरक्लोसिस किंवा टीबी रोग या नावानेही ओळखले जाते. क्षयरोग हा मायकोबैक्टीरियम ट्यूबरक्लोसिस ह्या जिवाणूच्या इन्फेक्शनमुळे होणारा एक रोग आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकातून हवेच्या माध्यमातून टीबीचे जिवाणू दुसऱ्या व्यक्तीलाही याची लागण करत असतात.
क्षयरोग प्रामुख्याने रुग्णाच्या फुफ्फुसांना प्रभावित करतो. तसेच बोनमॅरो (अस्थिमज्जा), मणका, किडनी, मेंदू आणि आतडे यातही क्षयरोग होऊ शकतो. टीबी हा एक गंभीर आजार असला तरीही यावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे टीबीच्या रुग्णाने जर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधोपचार केल्यास टीबी रोग पूर्णपणे बरा होत असतो.

लक्षणे:

  • तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे,
  • बेडकायुक्त खोकला येणे,
  • थुंकीतून किंवा खोकल्यातून रक्त येणे,
  • खोकताना छातीत दुखणे,
  • श्वास घेण्यास त्रास होणे,
  • अशक्तपणा,
  • भूक व वजन कमी होणे,
  • रात्री झोपल्यावर घाम येणे,
  • सर्दी आणि सौम्य स्वरुपाचा ताप असणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत.

क्षयरोग – Tuberculosis

दमा – Asthma

दमा (अस्थमा) हा श्वसनसंस्थेचा एक गंभीर असा विकार असून यामध्ये रुग्णास अस्थमाचा झटका येत असतो. यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतात. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास निर्माण होतो. घशात कफ साठल्याने श्वासोच्छश्वासाच्या वेळी घुरघुर किंवा साँयसाँय (Wheezing sound) असा आवाज योतो.

लक्षणे:

  • खोकला येतो, रात्रीच्या वेळी किंवा पहाटे खोकला अधिक प्रमाणात येणे.
  • ‎खोकल्याची उबळ अधिकतेने येत असते मात्र छातीत कफ इतका चिकटलेला असतो की खोकून-खोकून व्यक्ती बेजार होते पण कफ सुटत नाही.
  • ‎श्वास घुटमळल्यासारखे होते, बराच वेळ खोकल्यावर थोडा जरी कफ पडला तरी काही काळापुरते बरे वाटते. पण पुन्हा खोकला येतोच.
  • ‎दम लागतो, बैचेनी होते, वारंवार छाती चोंदणे, बोलण्यास त्रास होतो ही लक्षणे अस्थमामध्ये असू शकतात.

दमा – Asthma

किडनी संबंधि आजार

किडनी आपल्या शरीरातील रक्त शुद्ध ठेवण्याचे काम करते. रक्तामध्ये असलेल्या विविध विषारी घटक किडनीतून फिल्टर होऊन लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जाते. किडनी शरीरातील पाणी, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची मात्रा नियंत्रित ठेवते. किडनी शरीरातील आम्ल आणि क्षार नियंत्रित करते.

मात्र जेव्हा कोणत्याही कारणाने किडनी आपले व्यवस्थित कार्य करत नाहीत, तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे रक्तातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू लागते या स्थितीस किडनी फेल्युअर किंवा किडनी निकामी होणे असे म्हणतात. अशावेळी रक्तातील Serum Creatinine आणि Blood Urea चे प्रमाण अधिक वाढते.

किडनी खराब झाल्याची लक्षणे :

• भूक कमी होणे.
• वारंवार लघवीस होणे.
• लघवी करताना त्रास होणे, 
• मळमळ,उलट्या होणे.
• चेहऱ्यावर सूज येणे.
• उच्च रक्तदाब, रक्तदाब वाढतो.
• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे.
• कंबर दुखणे.
• पायावर सूज येणे ह्यासारखी लक्षणे असू शकतात.

किडनी संबंधि आजार

यकृताचा कर्करोग (Liver cancer)

यकृताच्या कॅन्सरमध्ये यकृतातून अपायकारक विषारी घटकांचा निचरा होण्यास अडथळा होतो. पर्यायाने रक्तातील अपायकारक विषारी घटकांची वाढ होते. अशावेळी योग्य उपचार केले गेले नाही तर यकृत निकामी होऊन रुग्ण दगावण्याचाही धोका अधिक असतो. यकृताचा कर्करोग हा यकृत आजारातील दुसऱ्या क्रमांकाचा आजार मानला जातो. यकृत कॅन्सरचे प्रमाण स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे. तर वयाचा विचार केल्यास 30 वर्षानंतरच्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते.

लिव्हर कॅन्सरची लक्षणे :

यकृत कॅन्सरमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तिंच्या पचनक्रियेमध्ये बाधा निर्माण होते.
भुख मंदावणे,
उलटी होणे, मळमळणे,
वजन कमी होणे,
यकृताचा आकार वाढणे, यकृताच्या ठिकाणी स्पर्शास गाठ जाणवणे,
पोटात पाणी होणे,
पोटाच्या उजव्या कुशीत दुखणे, जडपणा जाणवणे अशी लक्षणे अधिक दिवस दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक असते.

यकृताचा कर्करोग (Liver cancer)

नेत्र विभाग - कम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी

कम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी मधे नेत्ररोगतज्ज्ञाद्वारे दृष्टीची सखोल तपासणी करणे, ज्यामध्ये दृष्टीदोष, चष्म्याची गरज, तसेच डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित विकारांचा शोध घेतला जातो. यामध्ये दृष्टीक्षेप, दाब तपासणी, वाचण्याची क्षमता, आणि रंगदृष्टी परीक्षण यांचा समावेश होतो.

नेत्र विभाग - कम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी

मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मोतीबिंदू (Cataract) हा डोळ्याचा एक प्रमुख विकार आहे. मोतीबिंदूमध्ये डोळ्यातील काचेसारखे पारदर्शक असणारे भिंग हे अपारदर्शक, मोत्यासारखे पांढरट रंगाचे होते. अपारदर्शक झालेल्या या भिंगामुळे प्रकाशकिरण डोळ्याच्या आतील दृष्टीपटलापर्यंत पोहचू शकत नाहीत त्यामुळे दृष्टी मंदावते, अंधुक-अस्पष्ट दिसायला लागते. मोतीबिंदू हा एक किंवा दोन्हीही डोळ्यात असू शकतो. आज अकाली अंधत्व येण्यासाठी मोतीबिंदू हे एक प्रमुख कारण ठरत आहे.

मोतीबिंदू लक्षणे:

  • मोतीबिंदूमध्ये नेहमीची तक्रार म्हणजे अंधुक दिसणे. सर्व काही अस्पष्ठ दिसते.
  • ‎रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे, रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वर्तुळे दिसतात.
  • ‎प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश सहन होत नाही.
  • ‎वस्तूच्या दोन-दोन प्रतिमा दिसणे (Double Vision).
  • ‎चष्म्याचा नंबर सारखा सारखा बदलत असतो.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया

काचबिंदू आजार

काचबिंदू म्हणजे Glaucoma. काचबिंदू हा डोळ्यांचा एक गंभीर असा आजार आहे. ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचल्यामुळे काचबिंदू हा दृष्टीविकार होत असतो. डोळ्यांनी पाहिलेली दृश्य माहिती ही ऑप्टिक नाडीद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहचवत असते. मात्र या विकारात या महत्वाच्या नाडीवर परिणाम झालेला आढळतो.

काचबिंदू ची लक्षणे : काचबिंदूमध्ये अँगल क्लोझर ग्लुकोमा याप्रकारात खालील लक्षणे जाणवू शकतात.

  • डोळ्यात तीव्र वेदना होणे,
  • अस्पष्ट व अंधुक दिसू लागणे,
  • कडेच्या वस्तू न दिसणे,
  • डोळे लाल होणे,
  • डोके दुखण
  • मळमळ व उलट्या होणे, अशी लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ दवाखान्यात जावे.
  • कोणतेही काचबिंदूची लक्षणे नसतानाही काचबिंदू असु शकतो याला Normal Tension Glaucoma म्हणतात.

काचबिंदू आजार

डोळ्यांचा तिरळेपणा

तिरळेपणा हे प्रामुख्याने डोळ्यातील जन्मजात दोष असतो याशिवाय अपुरी दृष्टी किंवा डोळ्याच्या बाहेरील स्नायू (Muscles) मध्ये सैलपणा आल्यामुळे डोळ्यात तिरळेपणा होत असतो. तिरळेपणा ह्या डोळ्याच्या आजारास English मध्ये Strabismus, Squint असेही म्हणतात. तिरळेपणा हा एका किंवा दोन्ही डोळ्यांतही असू शकतो. तिरळेपणात डोळ्यातील बुबुळं एका सरळ रेषेत नसतात. काहीवेळा डोळा नाकाच्या बाजूस वळलेला असतो या प्रकारास esotropia असे म्हणतात. तर डोळा कानाच्या बाजूस वळलेला असल्यास त्या प्रकारास exotropia असे म्हणतात.

तिरळेपणाची कारणे :

  • आनुवंशिकता म्हणजे कुटुंबामध्ये आई-वडील यांना तिरळेपणा असल्यामुळे,
  • डोळ्यांमधील जन्मजात दोषामुळे,
  • डोळ्याच्या स्नायूंमधील कमजोरी असल्याने,
  • याशिवाय रेटिनाचे विविध आजार, चष्म्याचा मोठा नंबर असणे यांमुळेही तिरळेपणाची समस्या निर्माण होऊ शकते.

डोळ्यांचा तिरळेपणा

डायबेटिक रेटिनोपॅथी

डायबेटिक रेटिनोपॅथी (Diabetic Retinopathy) हा डोळ्याचा एक गंभीर विकार आहे, जो मधुमेहामुळे (डायबेटिस) होतो. या विकारात डोळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या दृष्टीपटलाच्या रक्तवाहिन्या (retinal blood vessels) प्रभावित होतात. या रक्तवाहिन्यांमध्ये गळती होऊ शकते, किंवा त्या अवरोधित होऊ शकतात, ज्यामुळे दृष्टीवर परिणाम होतो. 

डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे दृष्टी मंदावते, अंधुक किंवा अस्पष्ट दिसायला लागते, आणि गंभीर अवस्थेत अंधत्वही येऊ शकते. या विकारामुळे डोळ्याच्या पाठीमागील दृष्टीपटलावर (retina) नवीन, अस्थिर रक्तवाहिन्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. 

डायबेटिक रेटिनोपॅथी हे दोन्ही डोळ्यांना प्रभावित करू शकते आणि मधुमेहाचा कालावधी व रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यानं याचा धोका वाढतो. वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास या विकाराचा प्रभाव कमी करता येतो.

डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे :

  • अंधुक किंवा अस्पष्ट दृष्टी
  • दृष्टीशक्तीत कमी होणे
  • डोळ्यांसमोर काळे किंवा तरंगणारे डाग
  • रंग ओळखण्यात समस्या
  • डोळ्यांत ताण आणि वेदना जानवणे

डायबेटिक रेटिनोपॅथी

फॅको सर्जरी

फॅको सर्जरी: ज्याला फॅकोएमल्सिफिकेशन (Phacoemulsification) असेही म्हटले जाते, ही मोतीबिंदूच्या उपचारासाठी सर्वात सामान्य आणि आधुनिक शस्त्रक्रिया आहे.

शस्त्रक्रियेची प्रक्रिया :
फॅको सर्जरीमध्ये, डॉक्टर डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाजूला एक छोटे छिद्र (2-3 मिमी) करतात. यानंतर, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर करून, मोतीबिंदू असलेल्या भिंगाला तुकडे करून, ते अल्ट्रासाउंड मशीनद्वारे काढले जाते. नंतर, त्याच ठिकाणी एक कृत्रिम भिंग (Intraocular Lens - IOL) स्थापित केले जाते.

फायदे :

  • ही प्रक्रिया साधारणत: १५-३० मिनिटांमध्ये पूर्ण होते.
  • फॅको सर्जरीमुळे डोळ्यात फारच लहान जखम होते.
  • दृष्टीत त्वरित सुधारणा होते.
  • या शस्त्रक्रियेत टाके (stitches) घालण्याची गरज नसते.

फॅको सर्जरी

लॅसिक शस्त्रक्रिया

लॅसिक शस्त्रक्रिया : ज्याला लेझर-असिस्टेड इन सिटू केराटोमिल्युसिस असे म्हणतात, ही एक लोकप्रिय आणि आधुनिक शस्त्रक्रिया आहे जी डोळ्यांचे चष्म्याविना किंवा कॉन्टॅक्ट लेन्सशिवाय दृष्टी सुधारण्यासाठी वापरली जाते. लॅसिक शस्त्रक्रियेत डोळ्याच्या कॉर्नियाचा आकार लेझरच्या मदतीने बदलला जातो, ज्यामुळे दृष्टीदोष (जसे की मायोपिया, हायपरोपिया, आणि ॲस्टीग्मॅटिझम) दुरुस्त केले जातात.

शस्त्रक्रियेची प्रक्रिया :
लॅसिक शस्त्रक्रियेत, प्रथम डोळ्याच्या कॉर्नियाच्या वरच्या पातळ थरावर एक सूक्ष्म काप (फ्लॅप) तयार केला जातो. हा फ्लॅप उचलून, एक्साईमर लेझरच्या मदतीने कॉर्नियाचे पुनर्रचना (reshaping) केली जाते. यामुळे डोळ्याच्या कॉर्नियाचा प्रकाश फोकस अधिक अचूक होतो, ज्यामुळे दृष्टी स्पष्ट होते. शस्त्रक्रियेच्या शेवटी फ्लॅप परत ठेवला जातो, आणि तो नैसर्गिकरीत्या डोळ्यात चिकटतो.

फायदे :

  • चष्म्यापासून सुटका
  • ही प्रक्रिया साधारणतः 10-15 मिनिटांत पूर्ण होते.  शस्त्रक्रियेनंतर काही तासातच दृष्टी सुधारू लागते
  • मायोपिया, हायपरोपिया, आणि ॲस्टीग्मॅटिझम अशा दृष्टीदोषांसाठी लॅसिक प्रभावी आहे.

लॅसिक शस्त्रक्रिया

Gallery

ljoit8iti

Rate Us

Contact Us